एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज एल्दुगो मधे मुक्ताचा ऑफीसातला कलिगचे काम करणारा कलाकार इथे जिमखान्यात आला होता.>> कोण? तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा? संदिप पाठक की काय नाव आहे बहुतेक त्याचं..

ती आणि परी तेलंग थोपूवर फ्रेंडलिस्ट मधे आहे
कधी कधी देतात रिप्लाय>>>>>>>ओके.....पण मी दिलेली लिंक पहा नक्की.

आज एल्दुगो मधे मुक्ताचा ऑफीसातला कलिगचे काम करणारा कलाकार इथे जिमखान्यात आला होता.>>>>>>ग्रेट.....फोटो काढलात का नाही त्याच्या बरोबर????

सानी, तो एकतर्फी प्रेम करणारा आणि शाहरुखची नक्कल करणारा आला होता असे एका मैत्रीणीने सांगितले.
मधुरा, नाही गं , तो एका केबिनमधे बसला होता.त्यामुळे आणि मी उशिरा पोहोचले म्हणून त्याला बघितले नाही.

बाय द वे, अजून एक ताजी बातमी....

मुंबई-पुणे-मुंबईचा सिक्वेल येतोय.....'लग्नाला यायचंच' या नावाचा चित्रपट....साहजिकच मुक्ता-स्वप्नीलची जोडी आहे त्य; Happy आणि त्या आधी याच जोडीचा अजून एक चित्रपट येतोय.....कदाचित सगळ्यांना माहित आहे...."मंगलाष्टक वन्स मोअर"!!! Happy

तर मग लोकहो, ज्यांना हि जोडी आवडते त्यांच्या करता हि एक मस्त ट्रीटच आहे!!!

लग्नावरच्या सिनेमांची साथ आलेली दिसतेय. रच्याकने, तुमची 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' झी वर १४ ऑक्टोबर पासून सोम-शनि रात्री ९ ला सुरु होतेय.

अरे बाप रे! पटकथा लेखनाची जबाबदारी चिन्मय मांडलेकर ह्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.

पटकथा लेखनाची जबाबदारी चिन्मय मांडलेकर ह्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. >> म्हणजे एका पुरुषाचे ३ वि.बा.सं. अशी काही तरी थीम असावी Happy

मज्जा येणारे.........संगीत सलीलच आणि दिग्दर्शक विनोद लव्हेकर (एलदुगो चा दिग्दर्शक), कथा श्रीरंग गोडबोले आणि चि.मा.!!!

लग्नावरच्या सिनेमांची साथ आलेली दिसतेय. रच्याकने, तुमची 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' झी वर १४ ऑक्टोबर पासून सोम-शनि रात्री ९ ला सुरु होतेय.>>>>>चला आता मी त्यावर गप्पा मारायला अजून एक नवा धागा काढायला मोकळी!!! Proud

चिमांला नावं ठेवण्यात अर्थ नाही. 'मागणी तसा पुरवठा' करतो तो. याआधी चांगले काम केले आहेच की त्याने. Happy

आजकाल टीआरपीच्या युगात पटकथा लेखकाला आपल्या कुवतीनुसार चांगले लिहायचा चान्स मिळत असेल असे वाटत नाही. Sad

>>स्वप्ना_राज...चिन्मय मांडलेकर हे नाव वाचून मला तुमची आठवण झाली होती.

बाप रे! का हो?

>>चिमांला नावं ठेवण्यात अर्थ नाही. 'मागणी तसा पुरवठा' करतो तो. याआधी चांगले काम केले आहेच की त्याने.

चांगलं काम करणार्‍या माणसाकडूनच चांगल्या कामाची अपेक्षा असते ग.

Pages