एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि ते पॅकेजचं सांगितल्याबद्दल हात जोडून बोलला वगैरे. सॉफ्टवेअर वाल्यांची इज्जत धुळीला मिळवलीन मेल्याने.

कालचा माऊलीचा डायलाग ऐकला नाही?? नसेल तर ऐका परत

कुहू माऊली-मानव जोडीला रस्त्यात विचारते, काय चाललेय का घना-राधात. तेव्हा गंभीर चेहरा करुन माऊली म्हणतात की ही खुप मोठी गोष्ट आहे आणि आता ती संपतही आलीय, तेव्हा एकदाची ती संपली की मग मी कुहूमाऊली तुम्हाला एका लग्नाची दुसरी गोष्ट नक्की काय होती ते सांगेन....

आधीच्या भागात माऊली अमानवला सांगतो की त्याला सायकलवर डबलसीट नेता येत नाही म्हणून अमानव चालवतो आणि नंतर अर्ध्या रस्त्यातून खुशाल अमानवाला क्यारियरवर बसवून माऊली माऊली (हो, हेच लिहायचय) सायकल चालवतो. पाच मिंटात शिकला की सगळं!

"स्वहस्ते भंगीयले शिल्प" अश्या पंथातले काही कलाकार असतात. राजवाडे त्यातला दिसतोय. आधी काहीतरी चांगले करतो आणि शेवटच्या दिवशी त्याची वाट लावतोच.

स्वप्नामाऊली आणि प्रियामाऊलीसाठी तरी राजवाडेंनी मालिकेत अजून पांचटपणा सुरू ठेवावा.......:G
इथे साक्षात धिंगाणा घालत आहेत दोघी............ Proud

आज माऊलीने सगळ्यांसमोर कहाणी पुन्हा सांगितली काय? बालिकाबधू संपल्यावर स्विच केलं तर घना घराबाहेर जाताना दिसला.

घनाची आई - राधाचा फोटो पहिल्या प्रथम पाहिला ना तेव्हा मला असं आतून वाटलं की हीच मुलगी माझी सून आहे.....हायला, हे ऐकून मी सदगदित का काय म्हणतात ते झाले. त्या सौ. मीरा रत्नपारखीप्रमाणे मीही आता तप करणार आहे. ऐसीच सासू आपुनको भी मंगता हय.

घनाच्या आईला मुलगी हवी होती म्हणून काही दिवस ती घनाला मुलीचे कपडे घालत होती असं माईआजींच्या तोंडून ऐकलं. तरी नशीब काहीच दिवस घातले. नाहीतर 'दुसर्‍या' लग्नाची दुसरी गोष्ट अशी मालिका राजवाडेंना काढायला लागली असती. Proud

मालिकेच्या शेवटी जनताजनार्दनाचं मालिकेबद्दल मत ऐकवण्यात आलं.

१. एका बाईने 'मला ज्ञानाचं कॅरॅक्टर आवडतं' असं सांगितलं.
२. एक भाऊ म्हणाले 'एकटं राहिल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. एकत्र फॅमिलीमध्ये राहिल्याने ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळतं.' हे पुढे जाऊन दिग्या आणि वल्लभकाका होणार. हे ज्येष्ठच बर्‍याचदा अनेक प्रॉब्लेम्स उभे करतात हे शहाणपण त्यांना अनुभवाने येईलच.
३. एका बाईने मी ही मालिका २-३ वेळा पाहते असं सांगितलं. तिला माझा साष्टांग नमस्कार. तिच्या घरच्यांना पूर्ण सहानुभूती.
४. एक आजोबा म्हणाले 'अमेरिकेला जायचं खूळ ह्यामुळे कमी होईल. आपल्या देशात चांगली संधी मिळते हे तरुणांना कळेल'. त्यांना सांगावंसं वाटलं की तिथल्यासारखी पॅकेजेस नाही हो मिळत इथे. ते दाखवलं ते खोट्टं आहे.
५. एका भाऊंना 'एका लग्नाची' नंतर मालिकेचं पुढचं नाव क्षणभर आठवेना. काय हे! निदान कोणालातरी कॅमेरासमोर बोर्ड घेऊन उभं तरी करायचं.
६. एका माणसाने 'मी एका लग्नाची दुसरी गोष्ट....रोज बघतो' हे साधारण 'पुंडलिक वरदा' नंतर येणार्‍या 'हाsssरी विठ्ठल' च्या चालीवर म्हटलं.
७. एक बाई म्हणाल्या 'ही मालिका पाहून असं वाटलं की आपल्याही मुलांजवळ आजीआजोबा हवेत'. शेजारी असलेले नवरोबा खूश दिसत होते.....निदान काही दिवस आईच्याहातचं चांगलंचुंगलं खायला मिळेल म्हणून. त्या बाईच्या सासूबाई बघत असतील तर त्यांनी बॅगा पॅक करून निघायला नको. दाखवायचे आणि खायचे दात निराळे असतात.

बर्‍याच प्रतिक्रिया शिवाजीपार्कातल्या जिमखान्याच्या आणि आजी-आजोबा उद्यानाच्या बाहेर घेतल्या होत्या असं दिसत होतं. तेव्हढं मला आधी कळवलं असतंत तर मीसुध्दा प्रांजळ का काय म्हणतात ते मत द्यायला आले असते हो राजवाडे.....

संपली मालिका??????????????????????????????????????? Uhoh

श्या हल्ली काय चाललय वेळेव॑र कळतच नाय ब्वा. Sad

भुंग्या, म्हटलं तर संपली आणि म्हटलं तर नाही. म्हणजे राधा घरातच होती. घना आ़जीला सॉरी वगैरे म्हणत असताना मागे येऊन उभी राहिली. आता उद्या सगळे एकमेकांना सॉरी म्हणतील. आणि परवा उरलेली लग्नं लागतील. मला वाटतं लगेहाथ माऊली आणि परीचं सुध्दा लग्न लावून द्या. नाहीतरी माऊली एकटेपणाचं दु:ख वगैरे बोलला होताच.

इजा बिजा तिजा असंभव, अग्निहोत्र आणि आता एका लग्नाची दुसरी गोष्ट.. तीनही मालिका शेवटी 'आता संपवा एकदाचे' ह्या वळणावर आणल्या आणि एकदाचे ते वळण संपल्यावर 'अरे देवा, ह्या शेवटासाठी का वर्षभर टिवीसमोर बसलो?' म्हणत आपल्यालाच शिव्या दिल्या. सरा, तुस्सी ग्रेट हो...

आजचा भाग शुद्ध आचरट. बिचा-या देवकीकाकू. आज तर दया आली मला त्यांची.

माईआज्जींचं नेहमीचं नाटक सुरू झालं, आम्हाला कळलं, तरी घनाला पत्ता नाही. ह्या आजीबरोबर ३२ वर्षे काढली तरी अजुन तिला ओ़ळखता आले नाही तो राधाला काय..... जौद्या झाले, कशाकशावर टीका करायची.....

कुहूमाऊली तुम्हाला एका लग्नाची दुसरी गोष्ट नक्की काय होती ते सांगेन....
>>>
राधाला मानवच्या प्रेमाचा साक्षात्कार व्हावा म्हणुन मानव आणि घनाने संगनमताने केलेलं नाटक असू शकत का हे Uhoh Proud

स्वप्ना Lol
आजचा भाग मिसला मी
राधा का म्हणुन सॉरी म्हणत होती आजीला?

आजच्या भागावरचे आमचे मत आम्ही राखून ठेवत आहोत. Wink
समोर क्यामेरा आल्याशिवाय बोलण्यात अर्थ नाही हे लक्षात आलय.
परीचं क्यार्‍याक्टर अत्तिशय लाडकं आहे, झालच तर प्रभातच्या वडीलांची भूमिका सुंदर वठवलीये इ. मते पहा उद्या टिव्हीवर.

आजचा भाग शुद्ध आचरट. बिचा-या देवकीकाकू. आज तर दया आली मला त्यांची.
>>
अरे बाप्रे!
आज त्यांना गदगदून आलं असेल
शेवटी का होईना कोणाला तरी आपली दया आली एकदाची Proud
का पण म्हणे त्या बिचार्‍या? Uhoh

मैने Angry
मानवचा अनुल्लेख Angry
शोनाहो
एका महान व्यक्तीबद्दल लिहिलच नाहीस तू?????????????????????????
Proud

अग्निहोत्र मी पाहिली नाहीये पण मालिकेत मध्ये कितीही पाणी घालायला लागलं तरी शेवटी शेवटी मालिका परत पकड घेते. असंभवमध्येही मध्ये कित्येकशे एपिसोड्स सुलेखाचाच विजय झाला आणि शुभ्राला मात्र सुलेखा हीच इंदुमती हे अगदी शेवटी कळलं. त्याने लोकांचा पेशन्स गेला. ह्या मालिकेची पकड मात्र शेवटाला अगदीच सुटली. अशक्य पांचट करुन ठेवलं सगळं !

सिरिअसली, घनापुढे मानवही बरा वाटतोय आजकाल! काय ते हात जोडून डोळ्यात पाणी आणून चालले होते.. आणि अंगद कश्यपला कशाला मिळेल त्याच्याएव्हढा पगार. पूर्वीपेक्षा सध्याचे पगार जास्तच असतात!

मला इतका संताप होतोय गेले काही दिवस. किती मातेरं कराल अरे?? Angry

लोकप्रभात आलेले हे टीव्ही मालिकांवरचे लेख वाचा:

http://www.lokprabha.com/lokprabha/20120831/charcha01.htm
http://www.lokprabha.com/lokprabha/20120831/charcha02.htm
http://www.lokprabha.com/lokprabha/20120831/tv.htm

आणि हा लेख खास एलदुगोवर आहे http://www.lokprabha.com/lokprabha/20120831/mulakhat.htm. सराचा फोटोही आहे त्यात.

>>प्रवाही पटकथा, चटकदार संवाद, उत्तम अभिनय, नेटके दिग्दर्शन

लेख लिहिणार्‍याने मालिकेचे हल्लीचे भाग पाहिलेले नसावेत बहुधा Happy

१. प्रवाही पटकथा - हा प्रवाह बहुधा पाणी गेल्यावर नळातून येणार्‍या जलधारेचा असावा.

२. चटकदार संवाद -

अ. शामराव चांगला मुलगा आहे, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ग राधा.
ब. देवानांश्च ऋषिनांश्च (१..n).
क. जमाईबापू नाही आले?
ड. मला ऑफिसला जायला उशीर होतोय
ई. अहो काय झालंय? मला काही सांगाल का?
फ. मला ना खूप टेन्शन आलंय. कसं होणार ह्या मुलीचं लग्न झाल्यावर

३. उत्तम अभिनय - 'हे आपलं अमेरिकेतलं ऑफिस' असं बॉसने म्हटल्यावर घनाजीरावांचा अभिनय हे ह्यचं उत्तम उदाहरण.

४. नेटके दिग्दर्शन - ह्याबाबत काय लिहू? ये पब्लिक है ये सब जानती है

अत्तापर्यांताचा कहर डायलॉग

आयडी ... बॉर्री.....
मी ..खूप बॉरी खूप खूप.. बॉरी..... ग =)) =)) =))

आयडी ... बॉर्री.....
मी ..खूप बॉरी खूप खूप.. बॉरी..... ग =)) =)) =))

वैतागले मी ते ऐकुन. आधी वाटले माझेच कान बिघडलेत... Happy

Pages