एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा भाग मी स्वयंपाक करता करता बघितला. ज्ञानाने दार आतून लावून घेताना फिस्सकन हसत चुकून मीठ डब्बल पडत होतं Proud
रच्याकने पपांशी फोनवर बोलताना घना म्हणाला "मी राधाशिवाय नाही जगू शकणार. अँड आय अ‍ॅम सॉरी फॉर दॅट." लेखक, डायरेक्टर, अभिनेता सगळ्यांच्याच डुलक्या म्हणावं का याला ? Biggrin माझ्या मते ही हाईट होती आख्या सिरियलची !
आणखीन एक माईआजीच्या खोलीत असताना नीळा शर्ट होता घनाचा. अन लगेच राधाकडे जाताना काकाद्वयींनी अडवलं तेव्हा लाल टिशर्ट Uhoh

साधना Proud
मला पण एक ठेऊन द्याविशी वाटलेली पण मी हिंसक विचारांना कंट्रोल केलं Proud

आरतीतै १

रीया, तू हिंसक विचारांना कंट्रोल करतेयस म्हणजे तुझे पालक बरे दिसताहेत... (ज्ञानाच्या भाषेत.. )

>>सगळ्या प्रतिक्रिया एकजात रटून घेतलेल्या वाटल्या मला तर

+१००००००

आजच्या एपिसोडमध्ये ती सौ मीरा रत्नपारखी आली मला सासू हवी आहे करत. टीव्हीवर येण्यापेक्षा शेजारच्या चार घरचे दरवाजे वाजवले असते तर एक काय चार सासवा मिळाल्या असत्या एव्हाना.

आजच्या एपिसोडमध्ये घना राधाला म्हणत होता 'मला अमुक अमुक मुली सांगून आल्या. सगळ्या माझ्याशी लग्न कर म्हणत होत्या'......टीव्हीवर काहीतरी फेकून मारावंसं वाटलं. अरे, ह्याच्या मागे मुलींनी लागावं असं काय आहे ह्या माणसात? ना रुप, ना धड नोकरी, ना स्वतःचं घर, स्वभाव तद्दन स्वार्थी. आणि मिजास बघा. फक्त मुलगा म्हणून लग्न करायचं का ह्याच्याशी? बरं, तसं असेल तर त्यात ह्याचं कर्तृत्व काय? असेलच तर ह्याच्या तीर्थरुपांचं कर्तृत्व. मी इतक्या मुलींना नाकारलं हा अभिमानाचा विषय दाखवल्याबद्दल सरा, चिमां आणि कोण ती लेखिका आहे सगळ्यांचा निषेध Angry

घ्या.....गार्निअरने शेवटल्या एपिसोडमध्ये सुध्दा जाहिरात करायची संधी सोडली नाहिये. सगळे एक्मेकांना एव्हढा मस्का मारताहेत की अमूल बटरची चकटफू जाहिरात होतेय. Proud

घना आणि राधा मॉरिशसला जाणारेत म्हणे. जाताना दोघं आणि येताना तिघं, माईआज्जीला नातूच आणू या दावायला म्हणून गेले नसले म्हणजे मिळवलं Proud

हायला, शेवटी 'पुन्हा भेटू......लवकरच' असं आलं. हे म्हणजे धक्का मारून जाणार्‍या ट्रकच्या मागे 'फिर मिलेंगे' लिहिलेलं असल्यासारखं वाटलं. सिरियल दहा वर्षांनी पुढे जाऊन परत सुरु करणार की काय? Uhoh

पार्ट टू येणार की काय?..... सिनेंमांचे सीक्वेल निघतायतच.... आता या मालिकेचा पण सीक्वेल येणार बहुतेक!

शेवटी 'पुन्हा भेटू......लवकरच' असं आलं. हे म्हणजे धक्का मारून जाणार्‍या ट्रकच्या मागे 'फिर मिलेंगे' लिहिलेलं असल्यासारखं वाटलं. +१

साधना Proud
स्वप्ना +१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

त्या माठाला ६५ मुली सांगून आलेल्या म्हणे.... एक तरी टिकली असती का या अश्या बावळटासोबत Angry
आणि हाईट म्हणजे भाटे बाई म्हणे पुढच्या वर्षी फॅमेलीत एक मेंबर वाढला असेल
अग बाई करियर बिरियर करू देत की त्याला जरा
काय घाई हिला Angry
आज तर राधाचा पण राग आला कैच्याकै होतं सगळचं

पुन्हा भेटू........................ Uhoh
Afraid

Suicidal Smiley

Frustrated user

माई आजी म्हणे आज सगळे शांत झोपतील... मी म्हणतच होते की हो बाई झोपणार आहोत आम्ही सगळे शांत पण तेवढ्यात म्हणे पुन्हा भेटू Sad

संपलं? आता पार्ट २ यायच्या आत आपण कथानक रंगवूया इथंच -

Proud

होस्ट - स्वप्ना राज
को होस्ट - रीया, भुंगा आणि मंडळी
संवाद - माबोकर

पुन्हा भेटू ? एका अटीवर ......मालिकेचा विषय, स्टारकास्ट, संवाद, लोकेशन्स आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेवट इथे मायबोलीवर ठरवण्यात येईल.....

बेकार..घनाने काही एक्सायटिंग पध्दतीनी प्रपोझ नाही केलं राधाला, रडत काय होता नुसता .. नाही तेंवह काँट्रॅक्ट मॅरेज मधे रोमँटिक गेस्चर्स आणि खर्‍या लव्ह स्टोरीत बदाबदा रडु !
त्या राधालाही उगीच टिपिकल लाजणे , शेवटी मॉरिशस ला जाताना साडी वगैरे दिली Uhoh
अबिर दर्शन नाही झालं शेवटी..उल्का-अंगद जोडी पण नाही जमली.
इतके भाग घेउन, इतकी पात्रं घुसडून शेवटी गुंडाळलीच स्टोरी !
'पुन्हा भेटु लवकरच' पाटी आली म्हणजे एक तर राजवाड्यांची दुसरी सिरियल तरी येणार लवकरच नाही तर पार्ट-२ येणार.
जसा हैदराबाद ब्लुज पार्ट-२ आला होता तसाच..त्यातही पहिल्या पार्ट मधे बायको साठी तो अमेरिकेला जात नाही, मग पार्ट २ मधे बॅक टु मॅरेज रिअ‍ॅलिटी आणि इनफिडॅलिटी Proud

निदान शेवटचा भाग तरी बरा करायचा.
शेवटपर्यंत घनाचे कपडे बरे दाखवले नाहीत.
राधाला तिच्या लग्नातली एखादी साडी नेसवली असती तरी बरे वाटले असते.
नावं ठेवून ठेवून कंटाळा आला आता.
शेवटी 'पुन्हा भेटू' म्हणे!
माबोकरांनी आता तिसरी गोष्ट सुरु केली तर मी परीचे काम करायला तयार आहे. Wink

राधाला गृप फोटो/मॉरिशससाठी साडी नेसायला लावली पण साडीसुद्धा तीच यार पिस्ता.. लग्नानंतर केरळ वगैरेचे डिस्कशन चालले होते तेव्हाची. इतकी लो बजेट मालिका आहे का ही?! Uhoh

तुम्ही सगळ्यांनी इतके लिहीले आहे की एलदुगो बद्द्ल आता लिहीण्यासारखे काही शिल्लक नाही. पण त्या संदर्भात जरा अवांतर---
सध्या आपली मराठी च्या कृपेने ' असंभव ' बघत आहे. ( इथे उसगावात असल्यामुळे बघता आली नव्हती ) ते दररोज ४ एपीसोड टाकतात. आज टाकलेल्या चार भागात (१३४ - १३७) आदिनाथ-शुभ्रा ची लग्नानंतर ६ महिन्यांनी पहीली रात्र. आणि इकडे घना - राधाची पण. कारणं वेगळी असली तरी, सिच्युएशन तीच ! अमेरिकेला न जाता भारतातच रहायचं ठरवतात. भाटेकाकूंचे काही संवाद तर थेट तिथून उचलून एलदुगो मधे टाकलेत. मालिकेच्या हीरोला अमेरिकेच्या मार्गावरुन मागे खेचणे आणि लग्नानंतर काही दिवस त्याला P1-P2 तून जायला लावणे हा सरांचा लाडका फंडा दिसतोय. असो.
मला फक्त जुळून आलेल्या या योगायोगाबद्द्ल सांगायचे होते. असंभव वर चर्चा सुरु करण्याचा मानस नाही. प्लीज नोट.

बऱ्याच गोष्टी अर्धवट सोडून दिल्या आहेत .कुहू चा साखरपुडा दाखवलाच नाही का शेवटी? निदान शेवटच्या भागात सगळ्या पात्रांना एकत्र तरी दाखवायचे !

ताणून ताणून लांबवून, शेवटी अपेक्षाभन्ग करून संपवली सिरीयल ............

होती चांगली, बघण्यासारखी .............पण .............................जावूदे

मला त्यापेक्षा पिंजरा बरी वटली, तिला निदान सशक्त कथा आणि ठसठशीत व्यक्तिरेखा तरी होत्या ...........शेवटी गोंधळ तिथेही झालाच!

मराठी सिरीयल चांगल्या येणार तरी कधी? एक शून्य शून्य, आणि १९९० चे दशकाच्या आठवणी वरच जगावे का दर्दी मराठी प्रेक्षकानि?

हा हा हा, सीरिअल पेक्षा इथल्या प्रतिक्रिया वाचून खूप करमणूक झाली....आता मी ठरवलंय नवीन सुरु होणारी कुठलीही सीरीअल बघायची नाही. सासू पण नको आणि चांदरात पण नको.

Pages