एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिस्सन काकू म्हणते ना पाचा उत्तरांची कहाणी साठा उत्तरी संपूर्ण? ते उलटे हवे ना? ही ही. आणि ते त्यांच्या रूम मध्ये उगीच जाऊन मग फार लाजायचे हे पॅथेटिक.

हो. साठा उत्तराची कहाणी असे हवे आहे.
पूर्वी फक्त देवकी आयडी भसाभसा घनाच्या खोलीत घुसायची आता दुसरी काकूही घुसखोरीत सामिल झाली. नवीन लग्न झालेल्यांच्याच नव्हे तर कोणाच्याही खोलीत असेच घुसलेले दाखवायचे हे जास्तच.

हो. साठा उत्तराची कहाणी असे हवे आहे.
पूर्वी फक्त देवकी आयडी भसाभसा घनाच्या खोलीत घुसायची आता दुसरी काकूही घुसखोरीत सामिल झाली. नवीन लग्न झालेल्यांच्याच नव्हे तर कोणाच्याही खोलीत असेच घुसलेले दाखवायचे हे जास्तच.

काल काळ्यांच्या घरात मीरा ऋषीकेश रत्नपारखी का आली त्याचा शोध लागला आहे...
आत्ताच मला सासू हवी मलिकेचा प्रोमो बघितला..
मीराचा सासूचा शोध फाइनली काळ्यांच्या घरात येऊन संपला..
सासूचा रोल उल्काआत्या (असावरी जोशी)करत आहे.. Happy

आणि मीराचा सासरा अंगद आहे की काय ?
>>> मला पण तेच बघायची उत्सुकता आहे! तसही एलदुगो वाले म्हटलेच 'पुन्हा भेटु!'

सई- आमा : अगदी अगदी!
मला ते पाचा उत्तराची कहाणी मुद्दाम म्हणल्यासारखं वाटलं
म्हणजे एवढासा किस्सा एवढा लांबवला म्हणुन वैगेरे....
माहीत नाही

लोक्स एक खबर अशी मिळतेय कि .. एका लग्नाची... चा दुसरा पार्ट काही महिन्यात येणारे..

त्यात काहीतरी वेगळी हटके स्टोरी दाखवणार आहेत म्हणे ...

त्यात काहीतरी वेगळी हटके स्टोरी दाखवणार आहेत म्हणे ...>> Lol ते किती पाण्यात आहेत हे समजलंच आहे एव्हाना! चालूद्या! Lol

त्यात काहीतरी वेगळी हटके स्टोरी दाखवणार आहेत म्हणे ...
>>>>
यांचं वेगळं होतं ना.....त्यांच नॉर्मल असेल मग बहुदा Wink

सगळे दोष मान्य करूनही अस वाटत, की टीका करण्याइतकी तरी पातळी असलेल्या मालिका कुठे आहेत? मीच लग्नात जास्त खर्च करणार ह्यावरून भांडणारे व्याही, सलवार-कमीझ मधली नायिका आणि सुनेवर मुलीसारखे प्रेम करणारी सासू ह्या गोष्टी मालिकांच्या जगात कुठे बघायला मिळतात?
लहान-सहान गोष्टींवरून सुनेला मारहाण करणे, तिच्या सर्व वयाच्या परिचितांवर ‘तो’ संशय घेणे, सदैव साडी आणि दागिने घालून वावरणे, त्याग-सहनशीलता ह्या गुणांचा (?) कडेलोट करणे. अश्या मालिकांच्या भाऊगर्दीत ही मालिका उजवी वाटली.

अनया + १

खरंच. बर्‍यापैकी नॉर्मल पात्रं, मुक्ता, विनय आपटे वगैरेंचा उत्तम अभिनय, ह्या अजून काही जमेच्या बाजू. सराने एक महिना मालिका लांबवली नसती तर नीटपणे संपली असती. बर्‍याचश्या मायनस गोष्टी धरूनही ही मालिका मला आवडली होती असंच म्हणेन.

अजुन चादरात मी" ..........म्हणजे काय ?

खिक्क =))

मेलो मेलो..

उदयन, अरे हसून ठसका लागला ना मला. आता हे वाक्य रोज आठवेल ना. सिरीअल संपल्यावर सोळा नवी पोस्टे म्हणजे हे कायतरी फिरुनी नवी जन्मेन मी असां झालां काय असे वाटले. घधाचे बाळ कुहू चे डोजे, उलकीचा विवाह, बाबांची साठी, लै कामं आहेत पुढील भागात.

मी ओनलाईन बघतो थोड्याफार मालिका ..त्यात या मालिकेची जाहीरात आली काल अचान्क...थोड्याच सेकंदासाठी होती..त्यामुळे घाईत वाचले असेन.. चांदरात या शब्दात चंद्राचा फोटो अनुस्वार म्हणुन आहे.. नेमका घोळ इथेच होतो..वाचताना त्या चंद्राकडे फोटो म्हणुन लक्ष जाते....मला वाटले की "दादा कोंडकें" नविन मालिका सुरु करत आहेत स्वर्गातुन..:हाहा:

Pages