Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गाण्याचे शब्द चांगले
गाण्याचे शब्द चांगले होते.
कालचे संवाद एकदम मस्त! भाग गोड होता एकदम
पौर्णिमा | 19 June, 2012 -
पौर्णिमा | 19 June, 2012 - 11:41
उत्साही लोकांनो, जरा ब्रेक घ्या.
ह्या धाग्यावर २०००च्या वर पोस्टी झाल्या आहेत. संकेत असा आहे, की साधारण २०००च्या वर पोस्टी गेल्या की तो धागा बंद करावा- पानं लोड होण्याच्या दृष्टीने. त्यामुळे कोणीतरी नवीन धागा सुरू करा- गोष्ट पुढे चालू असा
पुढच्या पोस्टी नव्या धाग्यावर लिहूया.
भुंगा | 19 June, 2012 - 11:57
कालच्या तुझ्याविना मधे.... घना एकदम 'तुंदिलतनू" दिसत होता...
कधी तू चं एक्स्टेंशन होतं ते गाणं........... कशाला तो पारदर्शक कपडे घालून शाहरुखसारखं हात पसरवायचा अट्टाहास......... गड्या आधी जरा पोट बघ
त्याची पँट म्हणजे अक्षरश: कोल्हापुरी लेंगा होता.........
बाकी दोघांमधले संवाद मात्र छान होते काल.
भुंगा | 19 June, 2012 - 11:59
गायक मंगेश बोरगावकर आणि वैशाली सामंत........ त्यापेक्षा निहिरा जोशी हवी होती गायिका..........
महालक्ष्मी अय्यर पण चालली असती
मंजिरी सोमण | 19 June, 2012 - 12:08
पौर्णिमा, असे किती एपिसोड राहिले असतील आता त्या सिरियलचे, संपतच आलीये की
दीपांजली | 19 June, 2012 - 12:12
गाणीच नको !
admin | 19 June, 2012 - 12:25
आता चर्चेसाठी हा धागा वापरा:
http://www.maayboli.com/node/35791
==========================
आता पुढे बोला.....
दुसर्या गोष्टीचा दुसरा भाग?
दुसर्या गोष्टीचा दुसरा भाग? विक्रमी मालिका आहे
घ ना मा ठ आ
घ ना मा ठ आ हे
राधानी व्यवस्थित त्याला पूर्ण इंडीकेट केलय.
मला गाणं आवडलं. लाल शर्ट हे राम! जाऊच द्या. मुक्ता गोड आहे. तिचे हावभाव, चेहरा, इतर बोलत असतांना तिची रीअॅक्शन सहीये ही मुलगी!
स्वजो पण मस्तय. गोड माठ्या बरोब्बर साकारतोय तो.
मला गाण्यानंतर मात्र 'हम यहा, तुम यहा, वो समां, लेकीन कहा शुरूशुरू के प्यार का| फिर से चलो चुरा ले दिल यार का|' जास्त आठवायला लागलं.
पण आता फार ताणू नका म्हणावं लोक्स.
मला त्या गाण्याची चाल बरीचशी
मला त्या गाण्याची चाल बरीचशी 'आभास हा' सारखी वाटली.
गाणं बरंय, पण जागा अगदीच चुकली. कसले मस्त भांडत होते दोघं!
आशूडीकडून मंजूडीकडे बॅटन
आशूडीकडून मंजूडीकडे बॅटन पास!!!
"तुझ्या विना.." चे गीतकार कोण
"तुझ्या विना.." चे गीतकार कोण आहे?
मी सगळ मिसल
मी सगळ मिसल
मुक्ताचा पांढरा ड्रेस आणि
मुक्ताचा पांढरा ड्रेस आणि त्याच्या आधीचा दोन्ही छान होते .
गीतकाराचे नाव शिस्तीत दाखवले
गीतकाराचे नाव शिस्तीत दाखवले होते. पण त्याच वेळी 'पुढे पहा पिंजरा'ची भलीमोठी नक्षी आल्यामुळे नाव दिसले नाही!
गीतकाराचे नाव शिस्तीत दाखवले
गीतकाराचे नाव शिस्तीत दाखवले होते. पण त्याच वेळी 'पुढे पहा पिंजरा'ची भलीमोठी नक्षी आल्यामुळे नाव दिसले नाही! राग>>> अगदी.
घना आणि आबीर यांच्या
घना आणि आबीर यांच्या शरीरयष्टींमधला फरक फारसा जाणवू नये म्हणून पडद्याचा खालचा भाग जाहिरातींनी व्यापून टाकतात
गीतकाराचे नाव शिस्तीत दाखवले
गीतकाराचे नाव शिस्तीत दाखवले होते. पण त्याच वेळी 'पुढे पहा पिंजरा'ची भलीमोठी नक्षी आल्यामुळे नाव दिसले नाही!
>>>>>>>>
सॉल्लीड..... मी पण असाच वैतागलो होतो......
गीतकार अमित पाठारे आहे . मला
गीतकार अमित पाठारे आहे .
मला मंगेश बोरगांवकरचा आवाज ह्या गाण्यात खूपच आवडला. वैशाली सामंत आवडतच नसल्याने तिच्याबद्दल न बोलणे इष्ट
केशरी शर्टाबद्दल नो कमेंट्स. कारण स्वप्निल सध्या भन्नाट काम करतोय, त्याला बाकी सर्व गुन्हे माफ
तो लाल शर्ट आणि ती तुंदिल
तो लाल शर्ट आणि ती तुंदिल तनु- एवढे कसे ढ असतात हे ड्रेस डिजायनर्स???
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=0eUoePe4rZ0&feature=related
अमित पाठारे
निलेश मोहरीर.
मंगेश बोरगांवकर, वैशाली सामंत.
मंजू.. भविष्यात अजून एक धागा
मंजू.. भविष्यात अजून एक धागा काढायला लागला तर "एका लग्नाची दुसरी गोष्ट - अजून चालूच!" असं नाव दे..
(No subject)
कालच भाग मी मिसला. रस्त्यात
कालच भाग मी मिसला. रस्त्यात असतानाच लेकीचा फोन आला की आई, तू आज राधा घनाचं आयटम साँग मिस्स केलंस.
घना माऊलीला कधी कधी अभिनय
घना माऊलीला कधी कधी अभिनय जमतो. संवाद छान होतेच पण संवादांना आणि सिच्युएशनला अनुसरुन हावभाव दाखवण्यात राधा दरवेळी चेंडू सीमापार धाडते.
मला तर मुक्ता, विनय आपटे, दिग्या, माऊ ह्यांच्यामुळेच मालिका बघावीशी वाटते. माऊचं "अगंबाssईsss" फारच भारी! खुप दिवसात म्हंटल्याचे ऐकले नाही.
स्वप्ना_राज यांची पोस्ट कधी
स्वप्ना_राज यांची पोस्ट कधी येणार?
आयटम साँग >> गाणं बरं होतं
आयटम साँग >>
गाणं बरं होतं पण वैशाली सामंतने वाट लावली.लाल शर्ट चित्रिकरण नेत्रसुखद वाटावं म्हणून असणार.पण राधाचा पांढरा ड्रेस आणि घनाचा लाल शर्ट माझ्यामते जमून गेला.
मी त्या शानच्या गाण्याची जास्त फॅन झाले.'कुछ कम रोशन है चांदनी'..
ते शानचं गाणं ह्या मालिकेकरता
ते शानचं गाणं ह्या मालिकेकरता बनवलय का? मला वाटलं कुठल्या सिनेमातलं आहे कारण चलते चलते मधली ट्युन नेहमचीच वाजवतात ती लोकं.
ते गाणं केजोच्या दोस्ताना
ते गाणं केजोच्या दोस्ताना मधलं आहे
हो दोस्तानामध्ये आहे हा शोध
हो दोस्तानामध्ये आहे हा शोध मला कालच लागला.
तेच म्हंटलं. धन्यवाद संपदा
तेच म्हंटलं. धन्यवाद संपदा
ही गाणी वापरताना सुद्धा पैसे मोजावे लागत असतील.
एलदुगोमुळे हे गाणं जास्त फेमस
एलदुगोमुळे हे गाणं जास्त फेमस झालंय ;), मला ह्या सीरीयलमुळेच हा साक्षात्कार झाला होता
हे गाणं जास्त फेमस केल्यामुळे केजोनेच सतिश राजवाडेला बक्षिस द्यावे
ही गाणी वापरताना सुद्धा पैसे
ही गाणी वापरताना सुद्धा पैसे मोजावे लागत असतील. >>> हो, शिवाय कॉपीराईटची भानगडही असेलच. त्यामुळेच बहुधा अख्खी टीम तीच असून 'का कळेना..' वापरलं गेलं नसावं.
"एका लग्नाची दुसरी गोष्ट - अजून चालूच!" >>>
सुप्रिया चं काम करणारी लीना
सुप्रिया चं काम करणारी लीना भागवत आहे ना ?
मला तिचं काम फार आवडतं...
उमेश कामतच पण विशेष कौतुक... लोकप्रिय मालिकेत मधेच प्रवेश करून जम बसवणं ...सोपं नाही.
(काही मार्क्स त्याच्या लुक्सला पण आहेतच !)
आधी बरीच टीका सहन करून स्पृहानी पण सगळ्यांना आपलसं केलय..
वल्लभ-वल्लीला वर्गातून काढून टाकलं का?
जोडप्यांचे विविध प्रकार दाखवायचा प्रयत्न केलाय मालिकेत..
घटस्फोटित तरीही अजून इंट्रेस्ट टिकवून असलेले वृंदा आणि विनोद.
नवर्याला वार्यावर सोडून माहेरी तळ ठोकलेली प्राची आणि उल्हास.
सट्टेबाज नवर्याला 'अगदीच काही वाईट नाहीयेत ' असं समजून संसारात रमलेली सुप्रिया आणि दिग्या..
बायको नसताना सगळा संसार एकट्याच्या खांद्यावर वाहणारा महेश .....वगैरे..
मंजू.. भविष्यात अजून एक धागा
मंजू.. भविष्यात अजून एक धागा काढायला लागला तर "एका लग्नाची दुसरी गोष्ट - अजून चालूच!" असं नाव दे..
>>>
मंदारदा
मी पण वाट पहातेय
आणि तेवढ्यासाठीच चार चार वेळा या धाग्यावर डोकावतेय
गो स्वप्ना गो!
Pages