एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्याकरीता नक्किच आहे. प्रभातने आजन्म ब्रम्हचारी राहण्याची शप्पथ घेतलीय
काल तर कुहू लग्न कधी होणार म्हणुन रडत होती............
>>>>>>>>>>>>

भान आणि साधना..... Happy माझं सिरियल बघणं वसूल म्हणजे Wink

>>>>>> तुमच्याकरीता नक्किच आहे. प्रभातने आजन्म ब्रम्हचारी राहण्याची शप्पथ घेतलीय >>>>
प्रभात १० वर्षाचा असताना त्याने ती प्रतिज्ञा घेतली होती ती त्याला हल्लीच आठवली..... Happy

बोअर होते २ एपिसोड्स.. ते पकाउ काका पब्लिक, कुहु-प्रभात सगळे फॉरवर्ड करण्याच्या कॅटॅगरीतले सीन होते.
अबिर ला राधा खरच आवडायला लागलीये बहुतेक नाटक करता करता, म्हणून चिडचिड ... कहानीमे ट्विस्ट Proud

अबिर ला राधा खरच आवडायला लागलीये बहुतेक नाटक करता करता, म्हणून चिडचिड>>>>>>> अग्गं मी पण अगदी हेच लिहायला आले होते.

<<< अबिर ला राधा खरच आवडायला लागलीये बहुतेक नाटक करता करता,

डीज्जे , हे जर खरं असेल तर मजा येईल
<<<<
तसही कोणी तरी वाचत ना ए ल दु गो टिम पैकी हा बाफ Proud
त्यामुळे जर खरं नसेल तर अजुनही राजुवाडे खरं करु शकतात Wink

अबिर ला राधा खरच आवडायला लागलीये बहुतेक नाटक करता करता >> नको! लग्न / प्रेम एकच पुरे Happy प्रत्येक पात्राची २-३ लग्न झालेली बघण्याकरता बाकीच्या मालीका आहेत.

माधव Lol

मला राधा-अबीर ही जोडी बघायला जास्त आवडेल.. घनाचे मला नीट काय कळत नाही. कधी वाटते की तो जबाबदारी घ्यायला एवढा काचकुच करतोय तर पुढे काय करेल, तर कधी वाटते मुळात त्याला अशी जबाबदारी नकोच होती, मग आता प्रेमात पडुन का म्हणुन ही जबाबदारी त्याने घ्यावी??? एनी वेज, बघु पुढे काय होते ते...

वविला घेऊन येतो कुहूला

छान!!!!! सांसचे उत्साही मेंबरांचे काय होईल????? बिचारे महिनाभर दिवसरात्र एक करुन वविच्या दुपारी काय कार्यक्रम करावे हे ठरवतील आणि आयत्या वेळी मात्र कुहू तिच्या उत्स्फुर्त कविता ऐकवुन त्यांच्या कार्यक्रमावर पाणी ओतेल...... Happy

<घनाच्या आत्या चा नवरा पण कटात सामिल आहे अस कालच्या भागावरुन वाट्ले> कटाची सुरुवातच त्याच्यापासून होते. त्यानेच माईआजीला काँट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगितले.
पण कालच्या भागावरून घनाची आत्या सामील नाही हे कळले.

भुंग्या, कुहूला वविला घेऊन आलास तर कुहू भोवती अजून भुंगे घोंगावायला लागतील Proud

माधव, <<< नको! लग्न / प्रेम एकच पुरे प्रत्येक पात्राची २-३ लग्न झालेली बघण्याकरता बाकीच्या मालीका आहेत.

हे खरंय, पण समहाऊ अबीर राधा आणि घना हे त्रिकूट इतकं छान आहे की मी त्यांच्यातले कोणतेही काँबिनेशन बघायला तयार आहे. बाकी मालिकांत इतकं सशक्त स्टारकास्ट नसतं Happy

<<< अरे संपु नये प्लिज इतक्यात.. सहा महिन्याचं काँट्रॅक्ट तर सप्टेंबर पर्यंत तरी टिकु दे एलदुगो !

अगदी अगदी. झीला म्हणावं , त्या पिंजराछाप इतर सगळ्या मालिका संपवा आधी मग एलदुगो कडे वाकडी नजर फिरवा Biggrin

अबीर कुहु जोडी जमली तर???????????????>> पहाट्च्या ब्रम्ह्मचर्यात्वाची शपथ ऐकून नुकतेच कुठे, भ्रमराच्या इवल्याश्या टिचभर डोळ्यांत, स्वप्न दवबिंदूंसार्रखे रूजू लागले होते, रीया... का, का तू एखाद्या खाष्ट माळ्यासारखे वागून, त्याच्या लाडक्या फुलाला 'भ्रमर प्रतिबंधित विभागात' नेऊन लावते आहेस? Wink Proud

बादवे, कालचा अबीरचा लाईट ग्रीन शर्ट आणि करडी ट्राऊझर ऑसम दिसत होती, तो काल अ‍ॅट हिज बेस्ट दिसला... Happy

नाहीतर या सगळ्यात कुहूच असायची हा माई आजी सोबत, राजवाडेचं डोकं कुठे चालेल सांगता येत नाही, सॉरी सॉरी मनस्विनीचं Proud

तुम्ही लोकांनी कुहूला अंडरएस्टीमेट करावं अशीच राजवाडे-मनस्विनीची अपेक्षा आहे Proud

एव्हढं सगळं करणं कुहूला जमायचं नाही...........कुहूला अंडरएस्टीमेट करावं अशीच राजवाडे-मनस्विनीची अपेक्षा आहे>>>>>>>>>>>>>

Lol तो राजवाडेचाच एक पिक्चर कुठला? अमृता खानविलकर, संदीप कुलकर्णी वाला? त्यात हिरॉइन आणि व्हिलन सोडून सगळेच पोलिस असतात, अगदी इला भाटे सुद्धा, आणि शेवटपर्यंत संशयही येत नाही ... तसं काहीसं कुहूच्या बाबतीत करायचं असेल राजवाडेला

सगळेच पोलिस असतात, अगदी इला भाटे सुद्धा>>> Lol
नाव सांग गं सिनेम्याचं... इला भाटे पोलिसाच्या भूमिकेत असू शकेल अशी कल्पनाही करवत नाहीये Rofl

त्यात हिरॉइन आणि व्हिलन सोडून सगळेच पोलिस असतात, >> Lol इथे घनामाऊली आण राधामाऊली वगळता, इतर सर्व कटात असावेत मग, अग्दी 'निष्पाप ज्ञानाही' Biggrin

तो राजवाडेचाच एक पिक्चर कुठला? अमृता खानविलकर, संदीप कुलकर्णी वाला? त्यात हिरॉइन आणि व्हिलन सोडून सगळेच पोलिस असतात, अगदी इला भाटे सुद्धा, आणि शेवटपर्यंत संशयही येत नाही ... तसं काहीसं कुहूच्या बाबतीत करायचं असेल राजवाडेला
>>>>>>>>

गैर........

Pages