एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधा खरच शिंकत होती ! अभिनय केला असेल तर अप्रतिम .
अमेरिकेला गेला कि राधाच्या आठवणीने येइलच पण तसाही आळशी गोळा आपोआप परत येइल स्वतःची कामं स्वतःला करावी लागतात बघून > Lol

काल राधाची पर्स बदलली. राजवाडे नक्की हा धागा वाचतात! Lol
बाबांनो नायक/नायिका मजबुरी म्हणुन एकमेकांबरोबर असणे शिरेल/शिनेम्यात चालत नाही त्यामुळे घनाला आता जॉब मिळणार मग तरीही राधाला (आणि इतर काळ्यांना) सोडुन जाणं नको म्हणुन तो ते सोडुन देइल.
हो! उगाच काही वर्षांनी भांडण झालं की "कुणी हिंग लावुन विचारलं नाही तिकडे." असं राधानी म्हंटलं तर? Happy

श्रुती अगदी अगदी. पर्स बदलली. मी पण काल हेच्च म्हटले. कालचा मुक्ताचा अभिनय ग्रेट. तो तिला तोडून बोलतो व ती रड्ते तो सीन तर अगदी हलवून गेला. दिग्या व वल्लभ हे फक्त विनोद निर्मिती साठीच आहेत ना?

दूध का जला ऐवजी तो दुधाने ओठ भाजले तर माणसं ताक पण फुंकून पितात अशी मराठी म्हण वापरू शकला असता कि नै? मुक्ताचा कालचा कुर्ता छान पण ऑड लेंग्थ. बेकार सलवार व मिसमॅच
होणारी ओढणी. लिंबू टिंबू कंपनी व त्यांचा सीन पण छान होता.स्प्रुहा आवडली मला.

मदत प्लीज मदत प्लीज मदत प्लीज

मी आपलीमराठी वर काही मिसलेले भाग पाहण्याचा प्रयत्न करतेय पण काही लिंक मिळत नाहीये तिथे. जाणकारांनी सांगा प्लीज

http://youtu.be/-f3d8H30MlM

तुझ्याविना sssssssssssssss

स्वप्निल गोड दिसतोय. वैशाली सामंत चा आवाज सुट होत नाहीये असं वाटलं.

अरे त्या चम्याला कोणी सांगा रे..
नुसतं ओपनिंग आहे कळलं तर जॉब मिळाल्यासारखं करतोय..

वल्लीकाका माईला सांगतो...आपला घना परत अमेरिकेला चाललाय ...म्हणजे या आधी किती वेळा गेला होता ?
हे संवादलेखन म्हणायचं का डायरेक्टरच्या डुलक्या ?

प्रेक्षक जर मायबोलीकर असतील तर असल्या चुका खपवून नाही घेणार..(मला आवडलेल्या एका जाहीरातीच्या आधारे..)

फुग्याच्या बाह्यांचे ड्रेस्स घालायची फॅशन आहे का सध्या?
>>>>> मी जानेवारीपर्यंत भारतात असताना तर बर्‍याच जणींना बघितलेलं. असेच ब्लाऊजपण बघितले. बारीक मुलींना(च) मस्त दिसतात. Happy

घनाला बाळं आवडतात ते अगदी समजतंय वागण्यातून. लहान बाळाची काढावी तशी समजूत काढली राधाची! Happy व्हेरी क्युट! Happy

आज घना आणि राधाचा सीन उच्च होता. अफलातून केमिस्ट्री. Happy स्वप्निल जोशी प्रत्येक सिच्युएशनमध्ये उत्तम अभिनय करतोय. रोमँटिक सीन्स असोत, विरहाचे असोत किंवा आजचा समजावण्याचा सीन असो. सुपर्ब !!!
उमेश कामतसुद्धा राधाला ईंप्रेस करायचा जबरदस्त प्रयत्न करतोय हे फार छान दाखवतोय Happy
स्पॄहा जोशी चक्क मला आवडायला लागलीये Wink अर्थात जेव्हा ती सेन्सिबल मुलगी असल्याचा पुरावा देते तेव्हाच. स्वप्निल आणि तिचं नातं अगदी खर्‍या भावा बहिणीसारखं वाटतं.

हॅट्स ऑफ सतिश राजवाडे ( फॅन मोड ऑन Proud )

एकदम बरोबर बस्के , टु क्युट :).
मुक्ता तर आहेच जबरी पण आजही पुन्हा एकदा स्वप्नील चा अभिनय जास्त आवडला :).

आज घना-राधा सीन छान होताच पण त्यातही मुक्ता चा अभिनय फारच भावला. एक आईविना वाढलेली मुलगी वरवर टॉमबॉईश आहे पण आत कुठे तरी ती छोटी मुलगी तशीच आहे..... ते तिने अचूक दाखवल. शेवटी पण यार तू आईचा वाढदिवस विसरायला नको होतास अस घना म्हणतो तेव्हाचा दोघांचाही अभिनय तर लाजवाब!! खर त एपिसोड तिथेच संपवायला हवा होता.

बस्के, संपदा +१
शेवटी पण यार तू आईचा वाढदिवस विसरायला नको होतास अस घना म्हणतो तेव्हाचा दोघांचाही अभिनय तर लाजवाब!! खर त एपिसोड तिथेच संपवायला हवा होता. >> अगदी अगदी..

इशा मला पण दोन दिवस जरा आवडले तिचे केस.. Happy
वाचत असतील मज्जा आहे! पटकथेमध्ये माबोकर असंही लिहीलं पाहीजे त्यांनी Lol

कुहुचा गेट अप फक्त घना-राधाच्या लग्नातला ( गुजराथी साडी ) चांगला होता आणि हेअरस्टाइल चांगली होती,!
इतर सगळ्या नौवारीतल्या बायकां मधे उठून दिसत होती ती.
बाकी कधी लक्ष जात नाही कुहुकडे .

वाचत असतील मज्जा आहे! पटकथेमध्ये माबोकर असंही लिहीलं पाहीजे त्यांनी >>> +१ Happy
राधाचे बाबा-घनाची आत्या जोडी कधी जमणार हो राजवाडे >> जमवा हो राजवाडे...धमाल येईल Biggrin

एका भागात राधा अबीरला म्हणते, "तुम्हाला सगळ्याच गोष्टीतले सगळॅच समजते का?"
मला वाटले, तिचे पुढचे वाक्य असेल की .... "तुम्ही मायबोलीवर xxxxx ह्या आयडी ने लिहीता का?"

Pages