Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राधा खरच शिंकत होती ! अभिनय
राधा खरच शिंकत होती ! अभिनय केला असेल तर अप्रतिम .
अमेरिकेला गेला कि राधाच्या आठवणीने येइलच पण तसाही आळशी गोळा आपोआप परत येइल स्वतःची कामं स्वतःला करावी लागतात बघून >
मलाही वाटतंय, की तो सम्या
मलाही वाटतंय, की तो सम्या कटात सामिल असावा.
काल राधाची पर्स बदलली.
काल राधाची पर्स बदलली. राजवाडे नक्की हा धागा वाचतात!
बाबांनो नायक/नायिका मजबुरी म्हणुन एकमेकांबरोबर असणे शिरेल/शिनेम्यात चालत नाही त्यामुळे घनाला आता जॉब मिळणार मग तरीही राधाला (आणि इतर काळ्यांना) सोडुन जाणं नको म्हणुन तो ते सोडुन देइल.
हो! उगाच काही वर्षांनी भांडण झालं की "कुणी हिंग लावुन विचारलं नाही तिकडे." असं राधानी म्हंटलं तर?
श्रुती अगदी अगदी. पर्स बदलली.
श्रुती अगदी अगदी. पर्स बदलली. मी पण काल हेच्च म्हटले. कालचा मुक्ताचा अभिनय ग्रेट. तो तिला तोडून बोलतो व ती रड्ते तो सीन तर अगदी हलवून गेला. दिग्या व वल्लभ हे फक्त विनोद निर्मिती साठीच आहेत ना?
दूध का जला ऐवजी तो दुधाने ओठ भाजले तर माणसं ताक पण फुंकून पितात अशी मराठी म्हण वापरू शकला असता कि नै? मुक्ताचा कालचा कुर्ता छान पण ऑड लेंग्थ. बेकार सलवार व मिसमॅच
होणारी ओढणी. लिंबू टिंबू कंपनी व त्यांचा सीन पण छान होता.स्प्रुहा आवडली मला.
मदत प्लीज मदत प्लीज मदत
मदत प्लीज मदत प्लीज मदत प्लीज
मी आपलीमराठी वर काही मिसलेले भाग पाहण्याचा प्रयत्न करतेय पण काही लिंक मिळत नाहीये तिथे. जाणकारांनी सांगा प्लीज
http://youtu.be/-f3d8H30MlM त
http://youtu.be/-f3d8H30MlM
तुझ्याविना sssssssssssssss
स्वप्निल गोड दिसतोय. वैशाली सामंत चा आवाज सुट होत नाहीये असं वाटलं.
सम्या कटात सामिल असावा.>>>
सम्या कटात सामिल असावा.>>> बरोबरे दक्षे! सम्या उपनावाचे लोक साधारण असेच असतात
eka lagnachi dusri
eka lagnachi dusri gosht-http://www.desitvforum.net/forum/eka-lagnachi-dusari-goshta/
अरे त्या चम्याला कोणी सांगा
अरे त्या चम्याला कोणी सांगा रे..
नुसतं ओपनिंग आहे कळलं तर जॉब मिळाल्यासारखं करतोय..
वल्लीकाका माईला सांगतो...आपला घना परत अमेरिकेला चाललाय ...म्हणजे या आधी किती वेळा गेला होता ?
हे संवादलेखन म्हणायचं का डायरेक्टरच्या डुलक्या ?
प्रेक्षक जर मायबोलीकर असतील तर असल्या चुका खपवून नाही घेणार..(मला आवडलेल्या एका जाहीरातीच्या आधारे..)
फुग्याच्या बाह्यांचे ड्रेस्स
फुग्याच्या बाह्यांचे ड्रेस्स घालायची फॅशन आहे का सध्या?
फुग्याच्या बाह्यांचे ड्रेस्स
फुग्याच्या बाह्यांचे ड्रेस्स घालायची फॅशन आहे का सध्या?
>>>>> मी जानेवारीपर्यंत भारतात असताना तर बर्याच जणींना बघितलेलं. असेच ब्लाऊजपण बघितले. बारीक मुलींना(च) मस्त दिसतात.
तुझ्याविना गाण्याचे बोल :
तुझ्याविना गाण्याचे बोल : http://www.marathilyrix.com/tujhya-vina-lyrics/
आजच्या एपिसोड मधला घना राधाची
आजच्या एपिसोड मधला घना राधाची समजुत काढतो , तो शेवटचा सीन कमाल.. ufff..क्या केमिस्ट्री है !!! :).
आजचा घना- राधा मधला सीन अगदी
आजचा घना- राधा मधला सीन अगदी अफलातून जमला आहे.
घनाला बाळं आवडतात ते अगदी
घनाला बाळं आवडतात ते अगदी समजतंय वागण्यातून. लहान बाळाची काढावी तशी समजूत काढली राधाची! व्हेरी क्युट!
आज घना आणि राधाचा सीन उच्च
आज घना आणि राधाचा सीन उच्च होता. अफलातून केमिस्ट्री. स्वप्निल जोशी प्रत्येक सिच्युएशनमध्ये उत्तम अभिनय करतोय. रोमँटिक सीन्स असोत, विरहाचे असोत किंवा आजचा समजावण्याचा सीन असो. सुपर्ब !!!
उमेश कामतसुद्धा राधाला ईंप्रेस करायचा जबरदस्त प्रयत्न करतोय हे फार छान दाखवतोय
स्पॄहा जोशी चक्क मला आवडायला लागलीये अर्थात जेव्हा ती सेन्सिबल मुलगी असल्याचा पुरावा देते तेव्हाच. स्वप्निल आणि तिचं नातं अगदी खर्या भावा बहिणीसारखं वाटतं.
हॅट्स ऑफ सतिश राजवाडे ( फॅन मोड ऑन )
एकदम बरोबर बस्के , टु क्युट
एकदम बरोबर बस्के , टु क्युट :).
मुक्ता तर आहेच जबरी पण आजही पुन्हा एकदा स्वप्नील चा अभिनय जास्त आवडला :).
आज घना-राधा सीन छान होताच पण
आज घना-राधा सीन छान होताच पण त्यातही मुक्ता चा अभिनय फारच भावला. एक आईविना वाढलेली मुलगी वरवर टॉमबॉईश आहे पण आत कुठे तरी ती छोटी मुलगी तशीच आहे..... ते तिने अचूक दाखवल. शेवटी पण यार तू आईचा वाढदिवस विसरायला नको होतास अस घना म्हणतो तेव्हाचा दोघांचाही अभिनय तर लाजवाब!! खर त एपिसोड तिथेच संपवायला हवा होता.
परवाच्या भागात राधा नी लेयर्स
परवाच्या भागात राधा नी लेयर्स मधे hair extensions लावले होते की .. मला पण वाटतेय की सिरीयलवाले माबो. वाचतायेत.
संपदा, डीजे, बस्के +१
संपदा, डीजे, बस्के +१
बस्के, संपदा +१ शेवटी पण यार
बस्के, संपदा +१
शेवटी पण यार तू आईचा वाढदिवस विसरायला नको होतास अस घना म्हणतो तेव्हाचा दोघांचाही अभिनय तर लाजवाब!! खर त एपिसोड तिथेच संपवायला हवा होता. >> अगदी अगदी..
इशा मला पण दोन दिवस जरा आवडले
इशा मला पण दोन दिवस जरा आवडले तिचे केस..
वाचत असतील मज्जा आहे! पटकथेमध्ये माबोकर असंही लिहीलं पाहीजे त्यांनी
LOL खरच वाचत असाल तर , राधाचे
LOL खरच वाचत असाल तर ,
राधाचे बाबा-घनाची आत्या जोडी कधी जमणार हो राजवाडे
कसलं काय, मायबोली वाचूनही
कसलं काय, मायबोली वाचूनही मायबोली माहित नाही म्हणत असतील .
त्या कुहूचा युनिफॉर्म बदलून
त्या कुहूचा युनिफॉर्म बदलून तिला बरे कपडे कधी देणार?
कुहुचा गेट अप फक्त
कुहुचा गेट अप फक्त घना-राधाच्या लग्नातला ( गुजराथी साडी ) चांगला होता आणि हेअरस्टाइल चांगली होती,!
इतर सगळ्या नौवारीतल्या बायकां मधे उठून दिसत होती ती.
बाकी कधी लक्ष जात नाही कुहुकडे .
वल्ली काकूंची सुट्टी संपली
वल्ली काकूंची सुट्टी संपली नाही का अजून?
वल्ली काकू जाउ दे, ती आसावरी
वल्ली काकू जाउ दे, ती आसावरी जोशी पण गायब आहे.. कट शिजवायला गेलीये कि सुट्टीवर ?
वाचत असतील मज्जा आहे!
वाचत असतील मज्जा आहे! पटकथेमध्ये माबोकर असंही लिहीलं पाहीजे त्यांनी >>> +१
राधाचे बाबा-घनाची आत्या जोडी कधी जमणार हो राजवाडे >> जमवा हो राजवाडे...धमाल येईल
एका भागात राधा अबीरला म्हणते,
एका भागात राधा अबीरला म्हणते, "तुम्हाला सगळ्याच गोष्टीतले सगळॅच समजते का?"
मला वाटले, तिचे पुढचे वाक्य असेल की .... "तुम्ही मायबोलीवर xxxxx ह्या आयडी ने लिहीता का?"
Pages