एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घना म्हणतो, मी मॅरिड आहे म्हणून मला तुम्ही अमेरिकेला पाठवत नाही. मग मी घटस्फोट देतो. मग जाऊ द्याल? बॉस म्हणतो हो!
Lol कहर विनोदी होतं हे.
सिरियसली, कथालेखक, पटकथालेखक, संवादलेखक हे एकदाही एकमेकांशी बोलत नाहीत का? कोणालाच ह्यातल्या लॉजिकमध्ये प्रॉब्लेम आहे असं वाटत नाही? बर ते सोडा, किमान संवाद म्हणताना अभिनेत्यांनाही त्यात काहीही खटकत नाही? विनय आपटेंच्या 'संध्या'सारखं झालं हे Uhoh

घना म्हणतो, मी मॅरिड आहे म्हणून मला तुम्ही अमेरिकेला पाठवत नाही. मग मी घटस्फोट देतो. मग जाऊ द्याल? बॉस म्हणतो हो! >> हे ऐकल्यावर माझा विवेक लागू झालेला काही क्षण. मग अती झाले अन् हसू आले या ज्ञायाने जाम हसलो. Happy

बघावी अशी एकमेव मालिका (होती) ही... पण आत काय नुसतं "घाल पाणी, कर पातळ" चालू आहे. राधा घना ही न पात्रं तर अगदीच गंडली आहेत मालिकेमध्ये नळ सोडल्यामुळे. एकदम पपेट वाटायला लागली आहे आधईची खमकी, कणा असलेली राधा आता. ज्या घनाला तिच्या प्रेमाची किंमत नाही, त्याच्या कडून (पॉ़जिटीव) प्रतिसादाची इतकी वाट तिने का बघावी? चार दिवस मागून घेतले त्याने, तेव्हाच खरं तर तिने निर्णय घ्यायला हवा होता. अमेरिकेला जाण्ं झालं तर तिला डच्चू, नाही झालं तर आहेच ती, जातेय कुठे असा स्वार्थी अ‍ॅटईट्युड आहे त्याचा.
पप्रेमात माणसाची अक्कल जाते म्हणतात तसं झालंय राधाचं. राधाच्या पात्राची लावलेली वाट बघवत नाही.

हो, कालचा बॉस आणि घनाचा सीन, तो अख्खा सीन जाम डोक्यात गेला. एकदम ग्रीन कार्ड??? आणि मॅरिड चं लॉजीक काय, डीवोर्स दिल्यावर अमेरिका काय... वाट्ट्ट्टेल ते चालू होतं.

आणि मॅरिड चं लॉजीक काय, डीवोर्स दिल्यावर अमेरिका काय... वाट्ट्ट्टेल ते चालू होतं.>> हो! जणू तीनदा डीवोर्स म्हणाला की लग्गेच तो सुटणार आणि पुढच्या महिन्यात अमेरिकेला जाणार! त्या प्रिजिजरलाच वर्ष लागते साधारण, तोपर्यंत घनाला पाठवणार का (कित्ती ते प्रश्न :फिदी:)

काल मानव आणि माउली यांचा सायकल वरून हिंडतनाचा सीन पाहून बेक्कार हसलो राव
अरे काय चाललंय काय ... साधा फोन करून विचारता येत नाही ऑफिस कुठेय ते ?..
कैच्या कै दाखवतात
शेवटी तर ते दोघ घना माउली -घना माउली करत बोंबलत जातात .. हे पाहून जे सदेह वैकुंठवासी झालो
ते डायरेक्ट ९ वाजता मालिका संपल्यावर देहात प्रस्थापित झालो

अवातंर.. विवेक लागु हे रिमालागु चे पती.. खरंच का?? (मला माहित नाहीये पक्कं म्हनुन विचारतेय..) Uhoh

मालीका कितीही आवडली/नावडली असली तरी पुन्हा मराठी मालिकांकडे वळण्यासाठी रजवाडेंचीच वाट बघणार...२७ पासून एकुलता एक ८.३० चा स्लॉट बंद Sad

सगळा घोळ घनाने अमेरिकेला न जाण्यामागे त्याचे लग्न आहे या ठिसूळ पायाचा आहे. त्याच्यासाठी श्रीरंग गोडबोलेंच्या गळ्यात घंटा बांधा.

घनाच्या कंपनीला अमेरिकेला पाठवायला अविवाहित उमेदवारच हवे होते तर ती अट निवडप्रक्रियेतच टाकायची की.
(कालचं 'ते' कारण ऐकून घरकामासाठी २४ तास राहणारी विनापाश प्रौढ महिला पाहिजे अशा जाहिराती आठवल्या!)

>>शेवटी तर ते दोघ घना माउली -घना माउली करत बोंबलत जातात .. हे पाहून जे सदेह वैकुंठवासी झालो
ते डायरेक्ट ९ वाजता मालिका संपल्यावर देहात प्रस्थापित झालो

Proud

बागे एका डिवोर्सची दुसरी गोष्ट काढतील मग ते
लिंगनिरपेक्ष लिखाणाची मालिकांना गरज, असा बीबी हवा बघ>> Lol

शेवटी तर ते दोघ घना माउली -घना माउली करत बोंबलत जातात .. हे पाहून जे सदेह वैकुंठवासी झालो
ते डायरेक्ट ९ वाजता मालिका संपल्यावर देहात प्रस्थापित झालो
>>
Lol

अजुनी चांदरातचा असर आहे का हा Proud

सगळा घोळ घनाने अमेरिकेला न जाण्यामागे त्याचे लग्न आहे या ठिसूळ पायाचा आहे. त्याच्यासाठी श्रीरंग गोडबोलेंच्या गळ्यात घंटा बांधा.>>> अमर प्रेम मध्ये पण असेच झाले .... सुरुवात ठिक होती ... पण नंतर बेस च डळमळला

होती .... :D... श्रीरंग गोडबोलेंची कथा होती... मला वाट्ते ३-४ महिने होती फक्त....

बाप रे! रच्याकने, 'अजूनही चांदरात आहे' पहायला मिळणार नाही म्हणून मला मनस्वी दु:ख होत आहे. Proud

बाप रे! रच्याकने, 'अजूनही चांदरात आहे' पहायला मिळणार नाही म्हणून मला मनस्वी दु:ख होत आहे
>>
का ते??
का पाहिला मिळणार नाही तुला?

बाप रे! रच्याकने, 'अजूनही चांदरात आहे' पहायला मिळणार नाही म्हणून मला मनस्वी दु:ख होत आहे

का?? त्या वेळेला कुठल्या दुस-या मनस्तापाला मुकपणे तोंड देत असतेस तु?? कुठली गं मालिका ९ ची???

मॅक्स, धन्यवाद. मला कालचा भाग आत्ता पहायला मिळाला, बर्‍या ऑडीओसकट!
काहीच्याकाही संवाद होते. पर्फॉर्मन्सवर परिणाम वगैरे ठीक आहे पण त्याच्या आजूबाजूची वाक्ये काहीपण! जाऊ द्या राव, दोनेक दिवसात संपणारच आहे मालिका.

performance वर परिणाम होतो तेही मला पटले नाही.... लग्न झाल्याने होतो न सोडचिट्ठी देताना नाही का होनार?
आपण कमावलेल्या पैशाचे आपण काय करतो त्याने कंपनीला काय फरक पडतो?......तो अंगड घनाला काहीही सांगतोय.

मला वाटते ती घनाची आत्या त्या अंगडला भेटणार होती ना.....ती भेटली असेल आणि तिने घना-राधा विषयी त्याला सगळे सांगितले असेल. तिच्या मते....राधाचा निर्णय झालाय....घनाचा होकार असेल तर ती राहणार नाहीतर ती जाणार.
घनाला ऑफर मिळाली म्हणून तो राधाला नाकारेल....ते चूक आहे. कारण त्याचे राधावर खूप प्रेम आहे हे (सगळ्या जगाला कळले आहे पण) त्याला कळले नाही.
तसेच ऑफर मिळाल्यावर ती नाकारुन राधाला हो म्हणण्याची शक्यता नाही. कारण वरिलप्रमाणे.
घनाला ऑफर मिळाली नाही म्हणून तो राधाला हो म्हणेल....तेही चूक आहे. कारण नंतर पुढे राधाला नेहमी वाटत राहणार कि अमेरिका नाही म्हणून मी!
या कारणामुळे त्याला फक्त अमेरिका किंवा राधा यापैकी एकाचीच निवड करायला लावायची.

हे काय काहीपण संवाद होते कालच्या आणि आजच्या भागात !! माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली काहीच 'माहिती' नसताना सांगोवांगीवर खरडलेले वाटत होते. मालिकेमधले नाट्य तर इतके तकलादू आहे की पडद्यामागच्या सर्व लोकांची Performance assessment करून त्यांनी overrun आणि resource underutilization ( टाईमपास फालतू गप्पांचे प्रसंग रंगवून) दोन्ही एकाच वेळी केल्याबद्दल त्या सगळ्यांना 'बेंच' वरून पण ढकलून द्यावे...

Pages