Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज उल्का - माई प्रसंगात माई
आज उल्का - माई प्रसंगात माई आजीचा पण अभिनय चांगला वाटला मला
ती उल्काला जवळ घेते तो प्रसंग तर टडोपा होता
माझ्या पणजीचीच आठवण आली मला
घनाचा बॉस उल्केची माहीती
घनाचा बॉस उल्केची माहीती काढताना दाखवलय म्हणजे उल्केलासुद्धा धुमकेतु मिळणार तर जोपर्यंत राधा-घना च फायनल होत नाहीय तोपर्यंत एलदुगो च्या कास्ट, क्र्यु मेंबर, स्पॉटबॉय, मेकपमन जे कोणी बॅचलर आहेत एवढच काय मॅट्रीमोनीयलवाल्यांनीसुद्धा त्यांच्या सभासदांना १-२ सेकंदांसाठी का होईना एलदुगो च्या एकातरी एपीसोडमध्ये भाग घ्यायला पाठवल पाहीजे, म्हणजे सगळ्यांना लवकरात लवकर सुयोग्य जोडीदार मीळेल त्या Good Luck Chuck चित्रपटासारख
आज त्या आयडीचं
आज त्या आयडीचं "अsssssssssssssssssssग राधाsssssss कुठे होतीस तूssssssssssss" असलं डोक्यात गेलं ना... बावळट बाई
गार्निअरच्या अॅडने ५ मिनिट खाल्ली
घनाचे सर राधाला फोन करून कंपनीचे निर्णय विचारतात. कसले महान आहेत बॉस नाही तर आमचे प्रेमजी
शिका म्हणावं काही तरी
बंडोपंत तर काय
बंडोपंत
तर काय
हायला, तो सुप्रियाकाकू आणि
हायला, तो सुप्रियाकाकू आणि वल्लीकाकू मधला संवाद नॉर्मल आहे म्हणायची फुरसत....लगेच गार्निअरची बाटली काढलीन त्यांनी. अगदी 'रामबंधू मसाले'ची अॅड पाहिल्यासारखं वाटलं. कैच्या कै नं१.
एखादी घटना घडली की न्यूज चॅनेलवाले कसे दिसेल त्या लोकांच्या तोंडासमोर माईक धरून 'इस बारेमे आपकी क्या राय है' विचारतात तसं घनाचा बॉस राधा आणि मग घनाला त्याला अमेरिकेला पाठवण्याबद्दल विचारतो. कैच्या कै नं२.
आता तो घनाला अमेरिकेला पाठवायचा निर्णय घेणार. मग घरातले त्रागा करणार. घना त्याबद्दल बॉसकडे तक्रार करणार आणि मग बॉस राधाने घना अमेरिकेतच कसा 'निर्वाणपदाला' पोचणार आहे हे सांगितलं ते घनाला सांगणार. मग घनाला उपरती होणार. काय रे देवा!
रच्याकने, 'मनासारखं काम' म्हणजे काय रे भाऊ? घना अमेरिकेत कॉम्प्यूटर बडवायला काय अशोकवनात बसणार आहे? त्याच्याभोवती यक्ष-किन्नर स्वर्गीय संगीत वाजवणार आहेत? का अप्सरा काम करून तो थकला की त्याचं मनोरंजन करणार आहेत? ह्या माणसाला असा काय एक्स्पिपिरियन्स आहे की त्याला लगेच अमेरिकेत पाठवणार आहेत? व्हिसा इंटरव्ह्यू वगैरे असतो हे त्या बॉसला माहित आहे का? ह्या माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर माझ्या डोक्याचीच शंभर शकलं होऊन माझ्याच पायांवर लोळतील अशी परिस्थिती आहे.
बॉस आणि उल्काआत्याचा संवाद मधूनच ऐकला. ती त्याला खुशाल 'अरे' करत होती. त्यानेच सांगितलं का एकेरीत हाक मारायला?
और ये लगा सिक्सर. माऊली फिरसे चॅम्पियन. 'घनाचं तुझ्यावर प्रेम आहे' हे १०० वेळा राधाला सांगण्यापेक्षा माईआज्जीने हे असे घनाचे कान टोचायला पाहिजे होते. उगाच डोक्यावरचे केस पांढरे आहेत तिचे.
स्वप्ना +१ आजचा भाग जाम
स्वप्ना +१
आजचा भाग जाम डोक्यात गेलाय माझ्या
त्या अंगदकडे राधाचा नंबर कसा
त्या अंगदकडे राधाचा नंबर कसा आला?
आज स्थितप्रज्ञ लागूंनी चक्क कपाळावर आठ्या आणून दाखवल्या. याजोटाझापा.
'एकांतपणा' असा नविन शब्द उच्चारला गेला त्यांच्याकडून. मराठी समृद्ध होतेय.
'एकांतपणा' असा नविन शब्द
'एकांतपणा' असा नविन शब्द उच्चारला गेला त्यांच्याकडून. मराठी समृद्ध होतेय.
>>
आजचा भाग जाम डोक्यात गेलाय
आजचा भाग जाम डोक्यात गेलाय माझ्या >> + १....मी उठून निघून गेले !
लगेच गार्निअरची बाटली काढलीन
लगेच गार्निअरची बाटली काढलीन त्यांनी.?>>>
आज गार्निअर आलंय उद्या रूपसंगम, झालंच तर, केसरी (टूर्सवाले ! ), निर्लेप, धारा, आला, गोदरेज इ. इ. येणार.
दीपक हो केसरी येण्याची
दीपक
हो केसरी येण्याची शक्यता आहे कारण आज स्थितप्रज्ञ केरळ ट्रिप बद्दल विचारत होते
केरळ काय घेऊन बसल्येस रिया
केरळ काय घेऊन बसल्येस रिया केसरीतर्फे अम्मेरिक्का !
कुहूच्या जीवनात प्रभात झाली अन् सिरियल पहाणं , हा धागा वाचणं सोडलं. आणि आज गार्निअरचं पुडकं दिसलं
असो ह्या स्पीडने जर कथानक सांडलं तर घना मेरिकेत जाणार ओबामाला सपोर्ट करणार हे नक्की.
हे बघाच!
हे बघाच!
http://www.maayboli.com/node/37240
गार्निअरच्या अॅडने ५ मिनिट
गार्निअरच्या अॅडने ५ मिनिट खाल्ली !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
आपली मराठीवर आल्याशिवाय मला
आपली मराठीवर आल्याशिवाय मला काही बघण्याची सोय नाही आणि आज तर त्यांनी मालिका चढवलीच नाहीये. सुटले आजच्या त्रासातून असे वरच्या प्रतिक्रिया वाचून वाटत आहे. उंमाझो मात्र बघायला आवडते तीही नसल्याचे थोडे वाईट वाटत आहे.
मैना खरेsssssssssssssssss
मैना खरेsssssssssssssssss
आला आला. आजचा भाग आला.
आला आला. आजचा भाग आला. अविश्वसनीय गोष्टी पाहून गलबलून आले. गार्नियरची जाहिरात तर फक्कड जमली आहे.
बाकी घनाच्या बॉसशी उल्कात्याने गुंतागुंतीच्या विषयावर बोलणे किंवा बॉसने राधाचे मत ऐकण्यासाठी फोन करणे हे प्रसंग पाहण्याची मनाची तयारी वरील प्रतिसादांमुळे झाली होती.
मैना खरेsssssssssssssssss
मैना खरेsssssssssssssssss
होऽऽऽ अग्ग्ग्दी खरे!
कालचा भाग बघितल्यापासून मी
कालचा भाग बघितल्यापासून मी स्वप्नाची प्रतिक्रिया वाचायची मनापासून वाट पहात होते.
आणि त्याचे सार्थक झाले
रीयाबाई, आपल्या
रीयाबाई, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, आपण माझा अभिप्राय वाचलात ...... फक्त तो पूर्ण वाचला असता तर बरे झाले असते. मी कोणालाही टीका केली म्हणून नावे ठेवली नाहीत तसेच मी माझे दोन्ही अभिप्राय देताना टीकाच केलेली आहे. माझ्या अभिप्रायात शेवटी ' जे आवडते त्याचे कौतुक करायला हवे पण जे आवडत नाही किंवा अवास्तव असते त्यावर टीका झालीच पाहिजे.' असे लिहिले आहे. ह्यात मला कोणी कौतुक करायला अडवले आहे असे कुठेही सूचित केलेले नाही. हा धागा एलदुगो ह्या मालिकेवर असल्याने त्याचे कथानक कसे भरकटले त्यावरच टीका होतीये आणि तेच योग्य आहे असेच मी लिहिले आहे.(<< आधी कलाकारांच्यावर, त्यांच्या वेशभुषेवर मतप्रदर्शन व्हायचे त्याऐवजी कथानकावर टीका होते आहे आणि तेच योग्य आहे. >> ). शिवाय ५ मराठी वाहिन्या असून भरकटलेल्या मालिका, कॉपी केलेले ( 'चोरलेले' जरा जहरी वाटेल म्हणून बदलला .... ) कार्यक्रम ह्यावर टीका केलेली आहे. आपला का गैरसमज झाला कळले नाही? असो, मी माझे मत मांडले आहे.
परत आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!!
ता.क. : ( या विषयावरची हेमाशेपो! ) जरा विस्तृत करून सांगितले तर तेवढीच ज्ञानात भर !!
उल्कात्याने माईआजीला
उल्कात्याने माईआजीला घनाराधाचे प्रकरण तू विनोदला सांगितलेस पण मला सांगावेसे तुला वाटले नाही असे ऐकवले. पण घनाराधाप्रकरणाची माहिती विनोदने माईआजीला सांगितली होती ना?
किती चुका मोजाव्यात/सोडून द्याव्यात?
भरतदा +1 मैना योगी पोस्ट
भरतदा +1
मैना
योगी पोस्ट समजावून सांगून माझ्या अल्पमतीत भर टाकल्याबद्दल धन्यवाद.
माझीही ही या बाबतची शे पो
आजच्या भागात तर आधीच्या
आजच्या भागात तर आधीच्या भागांमधलेच प्रसंग पॅच केलेले होते. ते काय आम्हाला माहित नाहीत का? अजिबात विसरलेलो नाही .......खरं सांगायचं तर विसरायचं आहे पण विसरू शकत नाही. अत्याचार सहजगत्या नाही कानामागं टाकता येत.
घना झोपलेला असताना राधाला मागचे काय काय संवाद आठवत असतात. ती कासवाच्या गतीनं त्याच्याजवळ येते. हा अजून कुंभकर्ण अवस्थेतच! त्याच्या केसातून हात वै, म्हणजे जास्तच! ब्याग्राउंडला तुझ्या विना, तुझ्या विना हा सामंतबाइंचा टोकदार आवाज आपल्या कानात घुसतो पण घनाच्या नाही.
त्याच्या दृष्टीनं आजचा दिवस भयानक महत्वाचा असूनही झोप आली यातच सगळे समजले.
माईज्जीनं चित्रांचा अल्बम पहायला सुरुवात केली आणि मी तिथपासून पळवली दृष्ये. सगळी मिळून साडेचार मिनिटे दिली मी आजच्या भागाला.
वि. सू. आता फक्त एक अठवडा धीर धरायचा आहे. जातील हेही दिवस जातील.
मैना दिवस जातील काय अग काही
मैना दिवस जातील काय अग
काही नको नाही तर डोहाळे जेवण न ऑल ... परत मलिका लांबेल
त्याच्या दृष्टीनं आजचा दिवस
त्याच्या दृष्टीनं आजचा दिवस भयानक महत्वाचा असूनही झोप आली यातच सगळे समजले.
>> हे भारी
शनिवारचा भाग मिसला. काय
शनिवारचा भाग मिसला. काय (नाही) झालं म्हणे?
शनिवारचा भाग मिसला. काय
शनिवारचा भाग मिसला. काय (नाही) झालं म्हणे? >>> फार काही मिसलं नाहीस स्वप्ना. नाही म्हणायला घनाच्या बॉसचा तो स्वतः "आनंदी" असल्याचा संशय येईल असा अभिनय मात्र मिसलास .......
काल मॅरेथॉन एपिसोड्स होते सलग
काल मॅरेथॉन एपिसोड्स होते सलग ५-६ तास, कुणी हिम्मत केली पहायची?
काल मॅरेथॉन एपिसोड्स होते सलग
काल मॅरेथॉन एपिसोड्स होते सलग ५-६ तास, कुणी हिम्मत केली पहायची?
Fortunately, we had better things to do
धन्स अरुण आजचा भाग मिसलेल्या
धन्स अरुण
आजचा भाग मिसलेल्या दुर्देवी (!) जीवांसाठी:
१. राधा नेहमीप्रमाणे ऑफिसला जाते. राधा आणि देवकीमाता सुखसंवाद मी म्यूट करुन पाहिला.
२. घना अलार्मचा आवाज झाल्याने उठतो. मग बिछान्यात बसून राधा आणि आपल्यात झालेले अनेक संवाद आणि प्रसंग आठवतो. (आम्हा पामरांना उठल्यावर २ मिनिटंही बसण्याइतका वेळ नसतो सकाळी. पण ह्यांचं सगळंच वेगळं आहे ना!)
३. घनाचा मित्र त्याला फोन करून बेस्ट ऑफ लक देतो.
४. मानव पुष्पगुच्छ घेऊन घनाला भेटायला येतो. १-२ वाक्यं माणसासारखी बोलतो. आणि मग मला सगळं कळलंय, तुम्ही डिव्होर्स घेऊ नका असं विनवतो.
५. कुहू आणि प्रभातचं भांडण झालंय म्हणे. कुहू आणि वल्लीकाकू सुखसंवाद मी नंतर म्यूट करुन पाहिला.
Pages