Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑगस्ट एन्डपर्यंत वेळ काढायला
ऑगस्ट एन्डपर्यंत वेळ काढायला आधी मंगळागौर झाली. आजच्या एपिसोडमध्ये कुहूचं गाणं झालं. आता समस्त काळेकुटुंबिय उद्या दहीहंडी फोडणार काय?
<<<तिथे माईआजी भजनाला वाजवतात
<<<तिथे माईआजी भजनाला वाजवतात तशा झांज्या वाजवत होत्या. मागे राधाची आत्या खुर्चीला रेलून उभी होती. त्यामुळे माईआजी मागच्या मागे कलंडणार नाही ना ही माझी भीती अनाठायी होती. >>>>>
स्वप्ना, हहपुवा
आता रोजचा एपिसोड (इथे ) लिहायचं काँट्रॅक्ट तुला......
<<तिथे माईआजी भजनाला वाजवतात
<<तिथे माईआजी भजनाला वाजवतात तशा झांज्या वाजवत होत्या.>> टाळ म्हणतात ना त्याला? झांज मोठी असते ना?
शेवटी मात्र राधाने स्वतःच्याच
शेवटी मात्र राधाने स्वतःच्याच वडिलांना 'मी आज इथे राहू का?' असं विचारलं तेव्हा तिची अपार कीव आली>>>>. अगदी अगदी.... बिचारी वातावरणात मोकळेपणा आणण्याचा इतका प्रयत्न करत होती ... विनय आपटेने काही न बोलता नुसते तिला जाता जाता जवळ घेतले.... सही सिन होता तो...खरंच वडील मुलगी वाटतात ते दोघे.
रच्याकने विवेक लागूंना तो गुलाबी शर्ट एवढा काय ढगळा देऊन ठेवला होता... वाढत्या मापाचा
सुरुवातीपासूनच घनाच्या
सुरुवातीपासूनच घनाच्या प्रेमात पडण्यासारखे होतं तरी काय? काहीच न करणार आलशी, अजागळ मुलगा असे ध्यान असताना? ते पण शुद्धीत असताना कॉनट्र्क्ट लग्न ठरवलेले असताना? नुसता सवयीचा का सोयीचा भाग आहे हा... प्रेम समजून रहाणारी राधा दाखवून गंडलय ते पात्र.
झंपी +१०००००००००००००
झंपी +१०००००००००००००
काल विवेक लागूंनी अख्या
काल विवेक लागूंनी अख्या मालिकेतला किंवा अक्ख्या आयुष्यातला एकमेव कडक डायलॉग मारला
"आम्ही पुरुष कशानेही बोर होतो.. त्यासाठी मंगळागौरच असली पाहिजे अस नाही
प्रसन्न झंपी +१ पुर्ण
प्रसन्न
झंपी +१
पुर्ण मालिकेचा बट्याबोळ करून टाकलाय. राधा या पात्राची पुर्णपणे वाट लावलिये
मालिका पाहिला सुरुवात केली तेंव्हा बर्याच अपेक्षा होत्या
सोन्याचा म्हणुन दागिना घालायला घ्यावा आणि निघावा पितळ्याचा अस झालय एकंदरच मालिकेचं
अवनी sonalisl, बरोबर आहे
अवनी sonalisl, बरोबर आहे तुमचं. झंपी +१०००००००००००००
ह्या मालिकेतलं पाणी घालणं बघून दूधवाला भैय्या पण लाजेल.
काँट्रॅक्ट मॅरेज प्रकरण
काँट्रॅक्ट मॅरेज प्रकरण लिस्सन काकूंना कळालंय हे राधाला कस काय कळलं? पूर्ण मंगळागौरभर त्या एकमेकींकडे अर्थपूर्ण नजरांनी पाहात होत्या..
आजच्या लोकप्रभा मध्ये मराठी
आजच्या लोकप्रभा मध्ये मराठी मालिकांवर एक लेख आह्त. त्यात उमाझो च्या संदर्भात आपल्या मायबोलीवरची कॉमेंट टाकली आहे. त्याचबरोबर जर का लेखकाने या बाफवरच्या पण काही select comments तिथे टाकल्या असत्या तर किती बरं झालं असतं ?????????
अरुण, ह्यातल्या कुठल्या लेखात
अरुण, ह्यातल्या कुठल्या लेखात मायबोलीवरची कॉमेंट आली आहे?
http://www.lokprabha.com/lokp
http://www.lokprabha.com/lokprabha/20120817/coverstory-02.htm
इकडे आहे तो उल्लेख - प्रिया बापटच्या फोटो शेजारी.
'मराठीची अवस्था मात्र
'मराठीची अवस्था मात्र दोलायमान' या लेखात खालीलप्रमाणे मायबोलीचा संदर्भ आहे .....
"ठराविक काळ गेल्यावर सगळ्या मालिका एका सपाट ‘वळणावर’ का अडकतात? वास्तवात असं घडतं का? ‘मायबोली डॉट कॉम’ वर एका प्रेक्षकाचं ‘उंच माझा झोका’ बद्दलचं मत वाचलं. त्यात म्हटलंय, ‘यातल्या सगळ्या विडोज अगदी फ्रेश आणि डेझी, गोऱ्यापान दाखवल्या आहेत. चेहऱ्यावर येणारी अवकळा मेकअपने पुसून काढली आहे. सर्व कलादिग्दर्शन अगदी नवे कोरे आहे. विषयाची गरज म्हणून सुद्धा नॉनग्लॅमरस दिसणे निर्माता-दिग्दर्शकांना मान्यच नसते.’ - आणि इतर मालिकांच्या बाबतीतही कलादिग्दर्शनाबाबतीत हे अगदीच खरं आहे."
वाचली, वाचली
वाचली, वाचली
काळेवाडीतले लोक चिमणी येवढा
काळेवाडीतले लोक चिमणी येवढा खातात वटत, येवढया छोट्या कढई मधे पूर्ण काळे वाडी जेवते
येवढा का बरा विरोध आईडी चा
येवढा का बरा विरोध आईडी चा अमेरीके ला,
आज काय झालं? कुहुने लग्नाला
आज काय झालं?
कुहुने लग्नाला नकार दिला ना?
भुंग्याने लिहायला घेतलीये की काय मालिका
आज काय झालं? >>>> कूहु आणि
आज काय झालं? >>>> कूहु आणि आईडी ची रडारड
आता मालिकेत पाणी घालायचं
आता मालिकेत पाणी घालायचं म्हणून राधाच्या उखाण्याप्रमाणे अनेक दिवस घना रुसलेलाच आहे. त्याला विशेष काही संवाद नाहीत की नुसता मूक अभिनय करायलाही वाव नाही. त्यामुळे तो जास्तच माठ, आळशी, स्वार्थी वगैरे वाटत चाललाय. सतत काहीतरी जोक्स मारणारा, बडबड्या, राधाची समजूत काढणारा घना हा नव्हेच !
public memory is short. हे असंच चालू ठेवलं तर राधाला घनाऐवजी अबीरकडे पाठवावे लागेल. ( हो, हो, कितीही स्वतंत्र वृत्तीची असली तरी राधा लेखक, दिग्दर्शकाच्या हातातली कळसूत्री बाहुलीच )
कालचा राधाचा अभिनय
कालचा राधाचा अभिनय मस्त्च...बिचारी खुप वाईट वाटल
काय स्वतःला अडकवुन घेतेय (का तिला लेखक अडकवुन ठेवतोय ?? :अओ:) आनि मधेच ब्रेक मधे त्या बँकेची जाहीरात दाखवतात ,,,, काहीही अर्थ लावायचा नाही...सगळ ठीक होणार आहे अस सांगत आहेत का ???
सगळ विस्कळीत झाल्यासारख वाटतय
काल राधाला पाहून छान वाटले.
काल राधाला पाहून छान वाटले. जुनी हेअर स्टाईल व जुनी नोज रिंग पण आली परत. तिला परत त्या स्वच्छंदी रुपात पाहून मस्त वाटले. कथानक अश्याच वळणावर सोडले तर भारीच शेवट होईल....
प्लिज कालच्या भागाची लिंक
प्लिज कालच्या भागाची लिंक द्या कोणीतरी
किंवा मग आज रिपिट टेलेकास्ट कधी असतो?
राधाने अगदी योग्य तो स्टँड
राधाने अगदी योग्य तो स्टँड घेतलाय. घनाचे चार दिवस संपेपर्यंत वाट बघत बसाय्चे सोडुन तीने आपले पुर्वीचे आयुष्य जिथे थांबलेले तिथुनच परत पुढे नेण्याचा निर्णय घेतलाय तो योग्य आहे, तिच्या मधले काही भाग सोडुन आधी दाखवलेल्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत आहे.
खरेतर मालिकाकर्त्यांनी समाजधारणेच्या विरुद्ध जाऊन राधाने शेवटी घनाला नाकारले हे दाखवायला हवे. पण अर्थात तसे होणार नाही. कदाचित शेवटच्या भागात घना अचानक सुधारेल. सुरवातीला जो दाखवलेला त्याचे सुधारीत रुप समोर येईल.
साधना +१ परवाचाच भाग फक्त
साधना +१
परवाचाच भाग फक्त बघितला. पहिली राधा बघुन (उगाचच) खूप बरं वाटलं.
हल्ली घनाला साधी २ वाक्यही
हल्ली घनाला साधी २ वाक्यही नसतात
किती मोठी फालतू गिरी आहे , जे मालीकेच महत्वाच पात्र आहे त्यालाच वाव नाही..
तो दुसर्या मालिकेत बहुतेक बिझी असेल.. पण एवढी लोकप्रिय मालिका असताना, हल्ली त्याला गायबच करून टाकलाय
काही वाक्य असलीच ती सुद्धा चाचरत.. मंद आणि माठ स्वरुपाची...
तो मानव राधाच्या घरात कधीही फिरू शकतो हे कसबस पचवल . पण तो आता काळ्यांच्या घरातही आपल्या बापाचा माल असल्यागत कसा काय फिरू शकतो?
कै च्या कै दाखवतात
ते कुहू प्रकरण आता एवढ हायलाईट केलाय कि.. ह्या दोघांची कहाणी बाजूलाच पडलीये
राजवाडे गेम हरलेत.. त्यांना काहीही सुचत नसाव..
उगाच २६ पर्यंत खेच्तायेत
त्यानंतर तर " मला सासू हवी" नामक महाभयंकर मालिका सुरु होतेय रे बाबा ..
आवरा
खरेतर मालिकाकर्त्यांनी
खरेतर मालिकाकर्त्यांनी समाजधारणेच्या विरुद्ध जाऊन राधाने शेवटी घनाला नाकारले हे दाखवायला हवे.>>साधना अगदी मनातले बोललीस.
The Break-Up मला म्हणूनच आवडला होता. त्यातला हिरो शेवटी सुधारतो पण जे. अॅ. सांगते कि she does not feel the same way.
घना त्याच्या अव्यक्त राहिलेल्या प्रेमाच्याच मागे आहे अजुन. जी व्यक्ती अस्तित्वात नाही त्या व्यक्तिने पाहिलेल्या स्वप्नाला(जे त्याने स्वतःने आपणहून पाहिलेले नाही असे) तो पुर्ण करत बसला आहे. त्यापुढे दुसरे काहीच महत्वाचे नाही.
द ब्रेकअप बद्दल सहमत सोनाली..
द ब्रेकअप बद्दल सहमत सोनाली..
पण सध्या या सिरिअलमध्ये वाट्टेल ते चालले आहे.
सटवाईला नव्हता नवरा, आणि
सटवाईला नव्हता नवरा, आणि म्हसोबाला नव्हती बायको, या न्यायाने मानव आणि लीसनकाकुंची भाची; उल्का आणि काश्यप, वगैरे लग्ने जुळणार कि काय? त्या ज्ञानाच्या गळ्यातही कोणीतरी म्हैस बांधा, तो तिच्या तोंडून वेद म्हणून घेईल आणि बाकी सगळे सुटतील.
मग कोणकोण सिंगल राहतील? सध्या गंगा यमुना यांना माफ केलं, तर राधाचे पपा, 'माउली', आणि माई आजी! हे बिचारे असेच राहणार, कि यांच्यासाठी नवीन पात्र मालिकेत येणार?
तो मानव राधाच्या घरात कधीही
तो मानव राधाच्या घरात कधीही फिरू शकतो हे कसबस पचवल . पण तो आता काळ्यांच्या घरातही आपल्या बापाचा माल असल्यागत कसा काय फिरू शकतो?
तो शाहरुख आहे.. काहीही करु शकतो...
Pages