एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>त्याने "मला अंगद म्हण" म्हणल्यावर हा म्हणे नको सरच ठिक आहे

'अमेरिकेसाठी कायपण' Proud

"मी कोड जनरेटर प्लगिन्स वापरलेत म्हणून डेव्हलप्मेंट फास्ट झाली. मी (गौर फर्माईये) 'कोडस्' रिफॅक्टर केलेत." अशी वाक्ये होती त्याची. तुम्हीच म्हणत होतात ना की घनाला जरा सॉफ्टवेअर इंजिनीअरला शोभतील असे संवाद दिले पाहिजेत, घ्या! Proud

निरुपा रॉय स्टाईलमध्ये डोळ्यात पाणी आणून 'घना, ये मै क्या सुन रही हू? ये सुननेसे पहले मै मर क्यो नही गयी? तुमने तमाम सॉफ्टवेअर वालोंकी इज्जत मिट्टीमे मिला दी. हम किसीको मूह दिखानेके काबील नही रहे."

२००० च काय पुढच्या अजुन १००० पोस्टी टाकाव्या लागतील अशी भिती वाटतेय आता...

बरे झाले कालचा एपिसोड मी बघितला नाही ते......

घना मोडः असं नै ना होत नेहमी.>>>
ते घना मोड मधे शेवटी ५ मिनिटांनी "राधा किंवा इतर मंबरपैकी कोणतेही नाव" राहिलय का?

तुम्हीच म्हणत होतात ना की घनाला जरा सॉफ्टवेअर इंजिनीअरला शोभतील असे संवाद दिले पाहिजेत, घ्या! >>> Lol

बिनधास्तबोल

- ठराविक कंपू सोडून इतरांच्या मताला इथे किंमत नाही.

- आपल्या कंपूतील कोणीही भिकार मतप्रदर्शन केले तरी त्याची वाहवा करायची.

- आपणच सुरु केलेल्या सूत्रावर आपण वा आपल्या कंपूतील कोणीही टीका केली तरी चालेल इतर कुणी केली तर झोडून काढणे.

- नवीन कुणाला शिरकाव करू न देणे त्याला/तिला पूर्ण दुर्लक्षित करणे.

>> अगदी पटले.
मी इथे एक धागा सुरु केला होता पण मी नवीन सदस्य असल्याने आणि कुठल्याही कंपू मधे नसल्याने मला एक ही प्रतिसाद मिळाला नाही.
असो.

@बिनधास्तबोल, कबुतर

अस काही नसत हो..
सुरुवातीला नवीन असताना अस होतच..
पण इथे प्रत्येक जण तेवढाच मनमिळाऊ आहे.., जरी कधी मतभेद झाले तरी
तुमची एकदा मैत्री झाली कि काही प्रॉब्लेम येत नाही

लेखांच्या अनुषंगाने

चांगल्या लेखांना मायबोलीकर नेहमी उचलून धरतात
माझाही मायबोलीवर कुठलाही कंपू नाही , कुणाशी विशेष ओळख नाही , मला कोणी ग ट ग ला बोलवत नाही .. विपुतसुद्धा कोणीतरी येऊन कधीतरी खरडून जात
अस असूनही, माझ्या प्रत्येक लेखाला खूप सुंदर responce मिळतो
कारण मी माझ्या आनंदासाठी लिहितो.. कोणाला आवडू दे नको आवडू दे..
प्रतिसाद येउंदेत नको येउंदेत ..
आणि शेवटी हे आंतरजाल आहे .. इथे कोणी कसे वागावे हे तुम्हाला सांगायचा अधिकार नाही Happy

बिनधास्तबोल, कबुतर
लिहा हो तुम्ही बिनधास्त मिळेल की प्रतिसाद. प्रसादचे बरोबर आहे. आणि या मालिका बघताना जेवढी मजा येत नाही तेवढी नुसत्या प्रतिक्रिया वाचताना येते. मला ब्याटिन्ग मिळली नाही म्हनुन लहान मुले चिडतात तसे चिडु नका.

काल तुम्हा कुणाला, सीन्स - शॉट्स फार भराभर घेतलेत असे जाणवले नाही का?
तो कार्ल्याच्या भाजीचा सीन अगदी नावापूरता होता, लग्गेच पुढचा सीन म्हणजे उगवता सूर्याचाच?
गुंडाळावे तसा वाटला 'कालचा भाग' मला तरी Sad

>>माझाही मायबोलीवर कुठलाही कंपू नाही , कुणाशी विशेष ओळख नाही ,

सेम हियर.....खरं तर मी गटगला गेले तर पुन्हा कधीही गटग होणार नाही ह्याची मला खात्री आहे म्हणून मी जात नाही Proud

मला कोणी ग ट ग ला बोलवत नाही .. >>>
मायबोलीची अनेक गटग होत असतात, त्याबद्दलचे तपशील जाहीरही होत असतात. नुकतंच मायबोलीचं सगळ्यात मोठ्ठं गटग - 'वर्षाविहार' यशस्वीरीत्या पार पडले. तसेच मायबोलीचे संस्थापक श्री. अजय गल्लेवाले परवाच्याच रविवारी मुंबईत मायबोलीकरांना भेटून पुढे अमेरीकेला रवाना झाले. पुढील गटग जेव्हा ठरेल, तेव्हा त्याचे तपशील प्रथेप्रमाणे जाहीर होतीलच, आशा आहे की आपण तेव्हा मायबोलीकरांना भेटाल Happy

जीटीजी , कंपुबाजी इ. चर्चा इथे नको.
हा एलदुगो बीबी आहे.
बर , ती खोटी मंगळागौर अजुन किती कंटीन्यु होणार Uhoh
मला हसु येत होतं त्या फुगडी कवितांचं Proud
चहा बाइ चहा
गवती चहा
जावा जावांची फुगडी पहा Biggrin

बिनधास्तबोल, कबुतर >> १००% अनुमोदन
बापरे आजपण मंगळागौरीचा कार्यक्रम Angry
बहुतेक अमेरीकेने मंगळावर क्युरीऑसीटी यान उतरवल्याच्या आनंदात २-२ भाग मंगळागौरीचे दाखवले वाटत झी-मराठीने Lol

राधा-घनाचे काँट्रॅक्ट मॅरेज आहे हे प्रत्येकाला वेगवेगळे सांगून एकेक एपिसोड पार पाडणार.

दहा लाखांसाठी जिवे मारण्याची धमकी? अगदीच लो बजेट मालिका आहे.

नेहमीप्रमाणे माईआजींनी काही गुगली टाकलेली आहे.

राधा आणि घनाने आपल्याला धोका दिला असे म्हणणार्‍या काकाद्वयांना आणि मनस्विनीताईंनी धुणे बदडण्याचा धोका भेट म्हणून द्यावा का?

काल दोघा काकांनी घनाच्या बाबांना घना आणि राधाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे हे सांगतानाचा प्रसंग फसल्यासारखा वाटला. तो विनोदी करायचा का गंभीर ह्याबाबत नक्की निर्णय न करता आल्याने अक्षरशः खिचडी वाटली. त्यातून विवेक लागूंचा अभिनय विनोदी आणि बॅकग्राउन्डला गंभीर म्युझिक असं काहीतरी विचित्र पहायला मिळालं. घनाच्या बाबांना आपल्या बायकोचा स्वभाव माहित नाही का? आपल्याला काही माहित नाही तर तिला कशाला सांगायचं? तिचं झालं सुरु परत 'अहो, असं काय करताय? मला कळेल असं सांगा. कय बोलताय तुम्ही?' मला वाटतं इला भाटेना संवाद वाचायची गरज देखील पडत नसेल. दर एपिसोडमध्ये तेच संवाद. Angry

कालचा राधाचा उखाणा ऐकून पुलंच्या 'व्हिंदमाता'ची आठवण झाली. बरं घागर, घडा सोबत घनाला बसवल्यामुळे तो ह्या सर्वांइतकाच माठ आहे हे तिला सुचवायचं होतं असं वाटलं ते वेगळंच. त्यापेक्षा ते 'चांदीच्या ताटात चांदीची वाटी, राधा झुरते घनःश्यामसाठी" परवडलं असतं आणि चपखल बसलंही असतं.

कालचा राधाचा उखाणा ऐकून पुलंच्या 'व्हिंदमाता'ची आठवण झाली>>>>>>>>>>>स्वप्ने काय होता ग उखाणा?

Pages