एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि विवेक लागू त्या दिग्याकाकाला म्हणाला 'माझ्याशिवाय कोण आहे तुला दुसरं?' ऑ? माई आहे ना, दिग्याची बायको आणि मुलं आहेत. मला आता त्या 'जाने भी दो यारो' मधल्या धृतराष्ट्रासारखं 'ये क्या हो रहा है' असं विचारावंसं वाटतंय. Uhoh

अवान्तराबद्दल माफ करा.
बिनधास्तबोल, कबुतर, प्रसन्न तुमच्या मायबोलीकरान बद्दल च्या कल्पना चुकीच्या आहेत. मी कोणालाही ओळखत नसताना वर्षा विहार ला घाबरतच गेले आणि अपेक्षेपेक्षा जास्त मजा करून आले. एकही गटग अटेंड न्हवते केले पण सगळ्यानी छान सामावून घेतले. दरवेळी गटग ला जाता येईल असे नाही पण एकदा येऊन बघाच. तुमची मते आपोआप बदलतील.

मला आता त्या 'जाने भी दो यारो' मधल्या धृतराष्ट्रासारखं 'ये क्या हो रहा है' असं विचारावंसं वाटतंय.>>>>>:G

घरात फंक्शन चालू असताना, पाहुणे आले असताना घरातले सगळे शेपरेट शेपरेट एकमेकांना भेटत होते हे हास्यास्पद वाटले. हाईट म्हणजे विवेक लागू त्या पाहुण्यांच्या समोर माई आजीना विचारायला गेला होता की आपल्या घरी काय चालू आहे?

काळेवाडीच्या स्वयंपाकघरात लावलेली नोटीसः

|| श्री माऊली प्रसन्न ||

काळेवाडीच्या समस्त सभासदांस हे सूचित करण्यात येत आहे की कुटुंबाची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १० रोजी सकाळी १२ वाजता माईच्या खोलीत आयोजित करण्यात आलेली आहे. ह्या सभेत पुढील प्रश्न चर्चेस येतीलः

१. घना आणि राधा प्रकरण
२. वल्लीकाकाची अस्वस्थ मनोवस्था
३. माईची उदासीनता
४. कुहूच्या लग्नाची तयारी

तरी सर्व सभासदांस विनम्र विनंती आहे की ही सभा होईतो सोसायटीच्या आवारात इथेतिथे घोळक्याने उभे राहून हलक्या आवाजात ह्या प्रश्नांची चर्चा करू नये. त्यामुळे रहदारीला अडथळा येतो

(माईच्या) आज्ञेवरून

तो विनोदी करायचा का गंभीर ह्याबाबत नक्की निर्णय न करता आल्याने अक्षरशः खिचडी वाटली.>>>>
मला अनेक भागांमधे तसं वाटलं.

दहा लाखांसाठी जिवे मारण्याची धमकी? अगदीच लो बजेट मालिका आहे.

>>>>>>>>>>>>

भरत, अहो राठोड विला, विरानी हाऊस मध्ये करोडोच्या गोष्टी हो Proud

ही काळेवाडी आहे ना म्हणून दहा लाखांवर बोळवण Wink

दिग्याकाकाने वल्लभकाकाला घना आणि राधाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगितलं. घनाच्या बाबांनी त्यांना बोलताना ऐकलं. त्यांनी खोदखोदून खोदखोदून विचारल्यावर त्या दोघांनी घना आणि राधाबद्दल काहीतरी आहे पण ते माईला विचार असं सांगून तिथून पळ काढला. मग घनाचे बाबा मंगळागौर चालली होती तिथे गेले. तिथे माईआजी भजनाला वाजवतात तशा झांज्या वाजवत होत्या. मागे राधाची आत्या खुर्चीला रेलून उभी होती. त्यामुळे माईआजी मागच्या मागे कलंडणार नाही ना ही माझी भीती अनाठायी होती. माईआजीने घनाच्या बाबांना पहून न पाहिल्यासारखं केलं त्यामुळे ते नाईलाजाने परत आत गेले. पण आद्य चिंतातुर जंतू उर्फ घनाच्या आईने त्यांना पाहिलं आणि आत जाऊन त्यांची उलटतपासणी केली. त्यांनी आपल्या घरात कुठेतरी काहीतरी चुकतंय असं तिला सांगितलं. तसंच ते फक्त आपण दोघे सोडून घरात सर्वांना महित आहे असंही सांगितलं.

तसंच ते फक्त आपण दोघे सोडून घरात सर्वांना महित आहे असंही सांगितलं.

घनाचे बाबा वल्लभला 'कुहूच्या लग्नाचा प्रॉब्लेम आहे का? मला सांग मी करतो मदत' असे उद्गार काढल्यावर जाम हसले मी. यांना यांच्या पोराच्या प्रॉब्लेमचा पत्ता नाहीय एकाच घरात राहुन आणि दुस-यांच्या पोरांचे प्रॉब्लेम्स सोडवायला धावताहेत.

ओह, धन्स स्वप्ना Happy
म्हणजे भिजतं घोंगड आहेच तर, घनामाऊलीचा निर्णय जाहीर व्हायचाच आहे अजून....

चिंतातूर जंतू>> Lol
आताशा ती सिरयलीत दिसली की मला तुझा हा शब्द आवर्जुन आठवतो Proud भाटेबै ला परफेक्ट सुटेबल Lol

काल घनाच्या बाबांनी दिग्या आणि वल्लभकाकाला उद्देशून 'हे जे तुमचं काय कुचूकुचू चाललं होतं ना' असं म्हटलं. 'कुचूकुचू' हा शब्द मी आत्तापर्यत फक्त बायकांच्या तोंडी ऐकलाय.

'कुचूकुचू' हा शब्द मी आत्तापर्यत फक्त बायकांच्या तोंडी ऐकलाय.>>> मग आता ऐकलास ना पुरुषाच्या तोंडीही? Proud

का ही ही खटकतं स्वप्नाला...

'हे जे तुमचं काय (बायकांप्रमाणे) कुचूकुचू चाललं होतं ना' असा उपहास भरला होता त्या संवादात...

कोणीतरी म्हणालं होतं ना इथे एक पुस्तक आहे 'चार दिवस घनाचे, चार दिवस राधाचे' आहे म्हणून. घनाचे चार झाले की राधाचे, मग त्याच्या बाबांचे, तिच्या बाबंचे, त्याच्या आईचे. तेव्हढं होईतो ऑगस्ट एन्ड येईल

कोणीतरी म्हणालं होतं ना इथे एक पुस्तक आहे 'चार दिवस घनाचे, चार दिवस राधाचे' आहे म्हणून. घनाचे चार झाले की राधाचे, मग त्याच्या बाबांचे, तिच्या बाबंचे, त्याच्या आईचे. तेव्हढं होईतो ऑगस्ट एन्ड येईल>>>>>>>>>>> हे असे सगळ्यांचे चार चार दिवस करता करता मालिका "चार दिवस सासुचे" च्या मार्गावर जाणारसे वाटयतेय Happy

कुचूकुचू' हा शब्द मी आत्तापर्यत फक्त बायकांच्या तोंडी ऐकलाय.>>>> स्वप्ने अगदी बर्रोब्बर. मी पण.

येस्स संवाद स्त्रीनेच लिहीले आहेत ना तिच्या तोंडी आहे तो शब्द. हे पब्लिक आपल्या मनाने थोडीच बोलतंय.
इला काकुंची साडी मस्त होती कालची नउवारी. पण ते ब्लाउजला पिन लाऊन पदर मागनं फिक्स करायचं जाम फिल्मी वाट्तं

माझं पूर्वावर प्रेम आहे तिच्या इच्छे खातर मी कसंही करून अमेरिकेस जाणार आहे. ती मेली व तिच्याशी लग्न करणे शक्य नाही म्हणून तुझ्याशी केले इतके सपष्ट सांगितल्यावर्ही राधाला तो फक्त 'रुसला' असे वाट्ते आहे? मला असे कोणी सांगितले तर मी परत तोंडही बघणार नाही. काय त्यांचे पेपर्स साइन करून देते वाटेला लावा असे सांगेन. प्रेमा पेक्षा सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा. अर्थात रिअल लाइफ मध्ये. हे तर डेलिसोप आहे. Happy

पूर्वाने त्याला सांगितलेले, 'यू डिझर्व्ह अमेरिका,' म्हणजेच इन्डायरेक्टली 'यु डोन्ट डिझर्व्ह मी.' तेव्हा इथून सूट. पण हा काही जाईना. तेव्हा ती स्वतःच इंग्लंडला गेली.

राधा प्रेमात पार बुडालीय.. त्यामुळे तो रुसलाय असे वाटतेय तिला.. Happy बिच्चारी...

बाकी मालिका जामच बकवास झालीय आता. अबीरला आणुनही कथेला काही फायदा झाला नाही. फक्त टिआरपी वाढला. कालची मंगळागौर तर कळस होता.. आता शेवट सुचेपर्यंत काहीही दाखवतील..

मंगळागौरीच्यावेळी नेसलेल्या नऊवारी साड्या राधा घनाच्या लग्नातल्याच होत्या असं वाट्टय. दोन्ही काका अगदीच बालीश भांडत होते. घनाचा घसा बसलाय अशी मला शंका आहे. त्याला त्यामुळे कै संवादच नाहीत. यांच्याकडे मंगौ. दोन दिवसात ठरून झालीही. आमच्याकडे हापिसातून रजा, गुरुजी मिळणं , केटरर यांची सांगड घालता घालता नाकी नऊ येतात.

सबवर स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असलेली मालिका सुरू होतेय. लीना भागवत आणि स्पृहा जोशी एका अतिलोकप्रिय नवाक्षरी नाटकात रंगमंचावर.

आज अख्ख्या एपिसोडमध्ये दिग्याकाकाचं 'खोट्या लग्नाची मंगळागौर करण्यात काय अर्थ आहे? ह्यापेक्षा भातुकलीचा खेळ बरा." हे एकच वाक्य अर्थपूर्ण होतं. बाकी माईआजीची रेकॉर्ड 'तू हे श्रीपादला सांगायला नको होतंस' यावरच अडकली होती. तिने बायकांना पुढल्या वर्षी मंगळागौरीचं आमंत्रण देताना राधाचा उल्लेख केला तेव्हा तिने शाहरूखला ओम शांती ओम मध्ये 'अगर किसी चीज को पुरी शिद्दतसे चाहो तो पुरी कायनात उसे आपसे मिलवाने पर मजबुर हो जाती है' असं काहीसं म्हणताना ऐकलं की काय अशी शंका आली.

शेवटी मात्र राधाने स्वतःच्याच वडिलांना 'मी आज इथे राहू का?' असं विचारलं तेव्हा तिची अपार कीव आली. 'धोबीका कुत्ता, ना घरका ना घाटका' अशी स्वत्:ची अवस्था त्या मूर्ख स्वार्थी घनाच्या प्रेमात पडून तिने करुन घेतली आहे. लानत है ऐसी मोहब्बतपे'!

Pages