एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकीताई निदान गांगरल्याचा/घाबरल्याच्या किंवा या रेंजमध्ये इतर ज्या भावना येतात त्यांचा >> Rofl

आजच "रिमोट माझा" कार्यक्रमात ( एबिपी माझा वाहिनीवर) माई-आज्जी उर्फ रेखा कामत आणि इला भाटे यांची मुलाखत दाखवली....शेवट गोड गोड होणार असून राधा -घन नव्याने संसाराला सुरुवात करणार असे म्हणाल्या!.........................................................................

शेवट गोड गोड होणार असून राधा -घन नव्याने संसाराला सुरुवात करणार असे म्हणाल्या

हे अपेक्षितच आहे. यापेक्षा काही वेगळे असेल तर ती न्युज होईल.

शेवट गोड गोड होणार असून राधा -घन नव्याने संसाराला सुरुवात करणार असे म्हणाल्या
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पुन्हा नवे कॉंट्रॅक्ट म्हणजे.....

राधा मंगौच्या रात्री आत्याला सोडायला म्हणून आली ना आणि माहेरी राहिली मग काळेवाडीत अजून गोंधळ कसा नाही झाला... इला भाटे अजून ज्याला त्याला कशा नाही विचारत आहेत..."अरे राधाला पाहिलं का कुणी? परत कशी गेली ही न सांगता....घना परत भांडलास का रे तिच्याशी? बिचारी पोर....इ. इ......"

विलांना कोणीतरी दुसरे काही मंत्र/श्लोक शिकवा रे..... एकच एक म्हणत बसतात

आता दर वारी तो प्रत्येक ग्रहाचा मंत्र कसा म्हणणार????? नवग्रहस्तोत्र छापणार्‍या प्रकाशकांच्या पोटावर पाय Wink

देवानांच ऋषिनांच>>>
घनाच्या बाबांच्या तोंडून हे ऐकताना 'ह्यांच्या आईंचं आणि त्यांच्या आईंचं' असंच म्हटल्यासारखं वाटतं.. Sad

श्री लागूंना अभिनय ठार येत नाही हे या सिरिअल वरून मला कळले. एकच एक्स्प्रेशन कसं ठेवता येतं त्यांना गॉड नोज. एक भुवई वाकडी तिकडी, मध्ये दोन उभ्या रेघा आणि दुसरी भुवई स्थिर. राग असो, एक्साईटमेंट असो चेहरा आपला असाच. :|

बाकी.. जाउद्या! त्या माईआज्जी येता जाता दु:खी चेहर्‍याने उसासे टाकतायत. आणि इतर कोणी राधा-घनाची काळजी केली की म्हणतात पुढच्या वर्षी मंगळागौर, सगळं छानच होणार इत्यादी, इत्यादी. मग उसासे कशाला! :|

मला तर त्या आधीच्या राधाची इमेज सुध्दा 'स्वाभिमानी' वगैरे पेक्षा अतिशय अगाउ आणि अत्यंत बोरिंग वाटली होती.
चमकी वाला गेट अप तर बिग नो नो !
अत्ता तर काहीही चालु झालय.. एक ती सुप्रिया काकु एकटीच अगदी पहिल्या पासून ते अत्ता पर्यंत आवडली लिहिणार होते इतक्यात तो तिचा 'भाचीचं लग्नं मोडलं म्हणून वेड्या सारखा धो धो रडण्याचा सीन' आला आणि ती पण वेडेपणात सामील झाली !

मला समहाऊ, राधाचा स्वतःच्या(उंमाझो वाले स्वतः नाही) घरी असतानाचा टोन जरा खटकतो. आगाऊ, किंचित दादागिरी, बॉसिंग केल्यासारखा टोन असतो तिचा. कितीही जवळचे, मित्रासारखे असले तरी बाबांना जरा बरं वाटेल दरडावणे कमी झाले तर.

अत्ता तर काहीही चालु झालय.. एक ती सुप्रिया काकु एकटीच अगदी पहिल्या पासून ते अत्ता पर्यंत आवडली
>>
बाप्रे ! Uhoh

पुढच्या वेळेला मी ती माई आजी कोणाशीही बोलताना किती वेळा तिच्या त्या पकाऊ टोन मध्ये "रे" म्हणतेय ते मोजणार आहे. आजच मोजणार होते पण जेवणात रमून गेले त्यामुळे मध्येच विसरले.
आता पुढच्या वेळेला मोजेन

मला समहाऊ, राधाचा स्वतःच्या(उंमाझो वाले स्वतः नाही) घरी असतानाचा टोन जरा खटकतो. आगाऊ, किंचित दादागिरी, बॉसिंग केल्यासारखा टोन असतो तिचा. कितीही जवळचे, मित्रासारखे असले तरी बाबांना जरा बरं वाटेल दरडावणे कमी झाले तर.

<<< एग्झॅक्ट्ली !
सासरी आल्यावर सुध्दा लगेच ऑफिस्ला जाते तो सीन आठवतोय का ? काही फार ओळख नसताना त्या काकुला किचन मधे शिरून 'मला डबा हवा होता' म्हणून ऑर्डर द्यायचाच टोन.
मला नाही आवडली ती अगदी सुरवातीची आणि अगदी नंतरची 'टिपिकल बहु' आणि घनाचे नखरे सहन करणारी रडकी राधा पण नाही आवडली !
मधली राधा जी घनामुळे थोडी माणासत येते , प्रेमात पडते , आधीचा लाउड टोन सोडून जरा नॉर्मल कडे येतो ती राधा जरा इंटरेस्टिंग होती.

>>घरी असतानाचा टोन जरा खटकतो. <<
माझ्या मते तो दोष राधेचा नाहि; मुक्ता बर्वे चा आहे. मला तर तिचा अभिनय सहज वावर दिसावा याकरता ओढुन्-ताणुन केलेला केविलवाणा प्रयत्न वाटतो. Happy

डीजे, बस्के++
(मी फक्त मधे मधेच पाहिली आहे मालिका, पहिले २-३, मधले २-३ पाहिलेले आणि गेले ३ आठवडे ऐकते/पाहते आहे - घरात लागलेली असते आणि येता जाता दिसते/ऐकू येते म्हणून. जेवढे एपिसोडस पाहिले तेवढ्यात तरी तसच वाटलं.)

>>>>मला समहाऊ, राधाचा स्वतःच्या(उंमाझो वाले स्वतः नाही)>>>> Lol Good One
चला आता मालिकेमध्ये काहीतरी होतय हे बघुन बर वाटतय. १५ ऑगस्टलाच मालिक संपवली असती तर खरया अर्थाने स्वातंत्र्यदिन साजारा करता आला असता Happy

>>मधली राधा जी घनामुळे थोडी माणासत येते , प्रेमात पडते , आधीचा लाउड टोन सोडून जरा नॉर्मल कडे येतो ती राधा जरा इंटरेस्टिंग होती<< हो अगदी..तेच बेअरिंग पर्फेक्ट होतं.. Happy

>>पुढच्या वेळेला मी ती माई आजी कोणाशीही बोलताना किती वेळा तिच्या त्या पकाऊ टोन मध्ये "रे" म्हणतेय ते मोजणार आहे.

अगदी अगदी 'ग'. 'ग' पण किती वेळा म्हणते ते सुध्दा मोजून काढ. हे असलं बोलणं, उसासे टाकणं, मरणाच्या गोष्टी करणं वगैरे अगदी सगळं नाटकी वाटतंय. थोडक्यात काय तर 'प्रिय राजूस, तू गेल्यापासून तुझी आई आजारी आहे. जिथे असशील तिथून लगेच घरी निघून ये. तुझा बाबा' अश्यातला प्रकार वाटतोय ब्लॅकमेलिंगचा.

>>१५ ऑगस्टलाच मालिक संपवली असती तर खरया अर्थाने स्वातंत्र्यदिन साजारा करता आला असता

नको नको, त्याहून अधिक भयानक प्रकार 'मला सासू हवी आहे' १०-१२ दिवस आधीच सुरु झाला असता.

आज माऊलीने राधाला मस्त सल्ला दिला. १०० पैकी १०० मार्क्स!

२ दिवसांत अमेरिकेला जाणार्‍या एम्प्लॉईचं नाव जाहिर होणार आहे असं घनाचा बॉस म्हणाला. काय लॉटरी काढणार आहेत का? ते ऐकून घनाच्या चेहेर्‍यावर जे भाव आले त्याला फक्त 'अष्टसात्त्विक' हा एकच शब्द योग्य आहे.

झी मराठीवर पुढल्या काही दिवसात असं टिकर दिसेल. 'अमेरिकेचे अध्यक्ष भारतभेटीवर. काय असेल त्यांचा अजेन्डा. जाणून घेण्यासाठी पहात रहा....एका लग्नाची दुसरी गोष्ट - सोम-शनि संध्याकाळी ८:३० वाजता'.

आता ऐका थेट प्रक्षेपण माऊलीच्या शब्दांत माईआज्जींना (संजय-धृतराष्ट्र मोड)

काय सांगू माऊली, अमेरिकेचं, हो हो, अमेरिकेचं एयर फोर्स वन धावपट्टीवर उतरलंय. विमानाचे दरवाजे हे असे हळूहळू हळूहळू उघडताहेत आणि काय सांगू महाराजा, दारात साक्षात ओबामामाऊली मिशेल माऊली सोबत उभी आहे. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतोय हो माईमाऊली. मग एक लाल गालिचा अंथरला गेलाय. त्यावरून ओबामामाऊली आणि मिशेल माऊली खाली उतरत आहेत. मागे दोन बॉडीगार्ड माऊल्या बंदुका घेऊन आहेत. आपली घनामाऊली हसतमुखाने त्यांना सामोरी जात आहे. ओबामामाऊली अगदी दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार करत आहे. आणि आत चलायची विनंती करत आहे. ती पहा घनामाऊली चालली विमानात आणि तिथून भुर्र अमेरिकेला. विमानाचे दरवाजे बंद होताहेत. आता विमान घनामाऊलीला पोटात घेऊन उडणार.

आणि हे काय? विमानाच्या खिडकीतून घनामाऊलीने हात बाहेर काढलाय. काय हे घनामाऊली? तुम्हाला सान्गितलं होतं ना खिडकीतून हात बाहेर काढायचा नाही म्हणून. माईमाऊली, तुम्ही संजीवकुमार माऊलीचा 'खिलौना' पाहिला आहे ना? त्यात तो मुमताजमाऊलीला अगदी अस्सेच हात खिडकीतून बाहेर काढून बोलवत असतो. ही इथे राधामाऊली विमानाच्या बाहेर उभी आहे. तिनेही आपले हात पसरलेत. आता राधामाऊली धावत विमानाकडे जात आहे. तिने घनामाऊलीचे हात घट्ट धरलेत. विमान धावपट्टीवरून धावत आहे. विमानासोबत राधामाऊलीही धावत आहे. थांबा, थांबा राधामाऊली. जाऊ देत घनामाऊलीला.

विमान थांबलं, माईमाऊली, विमान थांबलं. सगळी पायलट माऊलीची कृपा. घनामाऊली विमानातून धावत खाली उतरत आहे. पहा ती राधामाऊलीला म्हणत आहे 'मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.....राधा'. राधामाउली म्हणत आहे 'मीही तुझ्याशिवाय जगू शकत नाही....घनश्याम'.

ते पहा ओबामामाऊली आणि मिशेल माऊली खाली उतरत आहेत. राधामाऊली आणि घनामाऊली त्यांना वाकून नमस्कार करत आहेत. ओबामामाऊली आणि मिशेल माऊली त्यांना 'नांदा सौख्यभरे' म्हणत आहेत. अहाहा, काय हे दृश्य. धन्य धन्य झालो मी माईमाऊली. आता आईमाउली आणि बाबामाऊलींना काळजी करायची गरज नाही. ऑल इज वेल माऊली, ऑल इज वेल.

श्री लागूंना अभिनय ठार येत नाही हे या सिरिअल वरून मला कळले. एकच एक्स्प्रेशन कसं ठेवता येतं त्यांना गॉड नोज.>> अगदी अगदी. ते सगळ्यांना 'काय झालय?' विचारुन थकले...देवासमोर बसून माईआजीलाही विचारुन झाले...शेवटी 'आता कोणाला काही विचारणार नाही' असे परत सगळ्यांना सांगूनही झाले...तरी घरातले कोणीही त्यांना काही सांगत नाही.
मोहन जोशी या भुमिकेत नाहीत ते एक बरे झाले. त्यांचा आवाज, बोलण्याची पद्धत वेगळी आहे. ते असते तर आतापर्यंत घना आणि राधाला समोर बसवून काय ते स्पष्टपणे सगळे विचारले असते आणि त्या घनाला व्यवस्थित वळणावर आणला असता....६ महिन्याचे १ वर्ष झाले तरीही याला अजुन ४ दिवस हवेत विचार करायला...काहीपण.

मला तर त्या आधीच्या राधाची इमेज सुध्दा 'स्वाभिमानी' वगैरे पेक्षा अतिशय अगाउ आणि अत्यंत बोरिंग वाटली होती.
चमकी वाला गेट अप तर बिग नो नो !>>+१

मला राधा खूप बदलली आहे, अगतिक झाली आहे असे नाही वाटत. तिचे घर, घरातील माणसे बदलली तसे तिच्या सवयी बदलल्यात इतकेच. तिला घना ईतकाच आवडला आहे तर जावे ना त्याच्याबरोबर अमेरिकेला....तसेही त्याने तिला आधिच सांगितले होते कि मलाही तू आवडतेस पण मग मला अमेरिकेला जायचे आहे तर तू येणार आहेस का माझ्याबरोबर? तेव्हा ती नाही म्हणते. माईआजीसमोर लग्नानंतर मी बदलले पण घना नाही बदलला मग म्हणून मी घनावर माझे मत्/निर्णय नाही ना लादू शकत? असे सांगते. लग्नानंतर फक्त घनाबरोबर राहिली असती तर तिला घना आवड्ला नसता बहुतेक पण ती आख्या घरात, तिथल्या माणसांत गुंतली आहे.... सकाळी कॉफी करून देणारे सासरे, ऑफिसला डबा करुन देणारी सासू-चुलत सासू, गोड बोलणारी नणंद आणि सतत कौतुक करणारे बाकिचे लोक.... या सगळ्या पॅकेजमुळे घना जास्त चांगला वाटतोय तिला. तसेच घरातल्या सगळ्यांना घरा अमेरिकेला जायला नको आहे ही तिची जमेची बाजू.

तसही ' सकाळी कॉफी करून देणारे सासरे, ऑफिसला डबा करुन देणारी सासू-चुलत सासू, गोड बोलणारी नणंद आणि सतत कौतुक करणारे बाकिचे लोक' हे सगळं असेल तर कोण जाईल अमेरिकेला Proud

कॉफी करून देणारे सासरे बघावं तेंव्हा कोडी सोडवत किंवा मख्ख चेहरा करून बसलेले असतात
सासू बघावं तेंव्हा स्वतःचा संसार सोडून "काये ना" करत यांच्याबाबत चिंतामग्न असते
ती गोड गोड बोलणारी नणंद वैनुडी वैनुडी करत कविता ऐकवत असते
चुलत सासू सासरे तर धन्यवादच! बोलायचीच सोय नाही
माई आजी सारखी महान आजेसासू, ज्ञाना सारखा दीर
आणि घना सारखा............ राधा करणारा नवरा........
असली फॅमिली असती तर मी त्याच्याआधी स्वतःच पळून गेले असते काळेवाडी सोडून

पूर्वा...खरर्रच कि! Happy
रीया,...सकाळी गरम गरम कॉफी मिळतेय, तयार डबा मिळतोय आणि फक्त कविताच तर ऐकाव्या लागतात...त्या सुद्धा कूहूला दुस-या कोणत्यातरी विषयात गुंतवून टाळता येऊ शकतात........हेही नसे थोडके! Happy

विमानाच्या खिडकीतून घनामाऊलीने हात बाहेर काढलाय. काय हे घनामाऊली? तुम्हाला सान्गितलं होतं ना खिडकीतून हात बाहेर काढायचा नाही म्हणून. माईमाऊली, तुम्ही संजीवकुमार माऊलीचा 'खिलौना' पाहिला आहे ना? त्यात तो मुमताजमाऊलीला अगदी अस्सेच हात खिडकीतून बाहेर काढून बोलवत असतो.>>> Lol

बॉडीगार्ड माऊल्या!
हसून हसून वाट लागली.
आणखी ते मुमताज माऊली आणि संजीवकुमारर माऊली, ओबामा आणी मिशेल माऊली इ. हसवून गेलं. आता आपणच 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' ही विनोदी मालिका सुरु करायला हवी. Wink

Pages