Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रीया,...सकाळी गरम गरम कॉफी
रीया,...सकाळी गरम गरम कॉफी मिळतेय, तयार डबा मिळतोय आणि फक्त कविताच तर ऐकाव्या लागतात...त्या सुद्धा कूहूला दुस-या कोणत्यातरी विषयात गुंतवून टाळता येऊ शकतात........हेही नसे थोडके!
>>
ते तर तिला माहेरी ही मिळतच होतं की
परत तोंदाबुमा नव्हता
अबीरला पकडल असत तर दिवस रात्र टेस्टी फूड + सुंदर कविता मिळाल्या असत्या
मैना मग राजवाडे लवाजमा घेऊन
मैना मग राजवाडे लवाजमा घेऊन स्वप्नामाऊलींच्या घरी येतील
स्वप्ना परवडेल का तुला??
स्वप्नील च वाक्य आजचं "
स्वप्नील च वाक्य आजचं
" सॉफ्टवेअर करप्टेड राधा, व्हायरस डिटिक्टेड "
मिष्टर लागूंच्या चेहर्यावर
मिष्टर लागूंच्या चेहर्यावर भाव नाहीत आणि धाकट्या दोघांचे येडपटासारखं वागणं हे कोणत्याही नॉर्मल मनुष्याच्या पचनी पडून शकत नाही. घरात इतके लोक असताना बायकांना स्वयंपाकघरातून फुरसत मिळणं दुरापास्त असायला हवं तर या आपल्या एवढ्याश्या बुडकुल्यांमध्ये स्वयंपाक करताना बघणं पटत नाही. राधाला सगळं आयतं मिळतय म्हणून सोडून जायला नको वाट्टय याच्याशी १०० टक्के सहमत. मलाही असं मिळावं. आजच्या भागातही पाणी घातलं होतं. महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न नाही हे जाणवलं. शेवटच माऊलीचं एक बरं वाक्य ऐकण्यासाठी आधीचं सगळं पाच मिनिटात पळवलं. पुढच्या मालिकेचं नाव पाहून आपण आगीतून फुफाट्यात पडणार नाही ना?
ते तर तिला माहेरी ही मिळतच
ते तर तिला माहेरी ही मिळतच होतं की>> तेच तर... लग्न करुनही मिळत आहे ना. नाहितर ती कधीच माहेरी निघून गेली असती... घनासाठी झुरत बसायलाही वेळ मिळाला नसता तिला.
" सॉफ्टवेअर करप्टेड राधा,
" सॉफ्टवेअर करप्टेड राधा, व्हायरस डिटिक्टेड "
>>>
हायला
हे मिसल मी
r u prepared परवा अमेरीकेला
r u prepared परवा अमेरीकेला जाणारया उमेदवाराच नाव जाहीर होणार आहे....
अरे देवा काय हे? त्या अमेरीकेच्या नावावर काय काय अन्याय करतायत आमच्यावर आजकाल फ्रेशरसुद्धा अश्या गाजरांना भिक घालत नाहीत आणि हा घना त्या वाक्यावर काय खुश होतोय. कोणीतरी याला सांगारे की व्हिसा interview सुद्धा असतो आणि तोसुद्धा रिजेक्ट होऊ शकतो. आणि जरा बाकीचे उमेदवार तरी दाखवा, का ऑफिसमध्ये फक्त घनाच आहे?
पण जेवणात रमून गेले>>>> जोक
पण जेवणात रमून गेले>>>> जोक ऑफ द यीअर...
स्वप्ना
स्वप्ना
स्वप्ना
<<पुढच्या मालिकेचं नाव पाहून
<<पुढच्या मालिकेचं नाव पाहून आपण आगीतून फुफाट्यात पडणार नाही ना?>=+१००
काल राधा घनाला म्हणाली की ति
काल राधा घनाला म्हणाली की ति फक्त स्वतःचा विचार कर. बाकी कोणाचा (तिचा, घरच्यांचा वगेरे) कोणाचा करु नकोस.
पण तो तर पहिल्यापासून फक्त स्वतःचाच विचार करत आहे. आणि पूर्वा त्याला जे म्हणाली त्याचा - You deserve America
स्वप्नामाऊली u r simply
स्वप्नामाऊली u r simply great....
ह्या राधाला घना हवा होता
ह्या राधाला घना हवा होता तोपर्यंत ठीक होतं....... आता एका नव्या नायिकेला "सासू हवीय"
त्यासाठी अचाट प्रकार करताना दाखवलीये प्रोमोज मध्ये. डिझायनर पंजाबी ड्रेस घाऊन ही खडकावर एका पायावर काय उभी राहातेय, गवतात साष्टांग नमस्कार करायच्या निमित्ताने लोळण काय घेतेय.... एका तळ्यात पूर्ण वस्त्रांनिशी गळाभर पाण्यात उभी राहून अर्घ्य काय देतेय......
तिच्या अचाट योगलीलांवरून ही रामदेवबाबांची सून असावी काय अशी शंका आलीय...... रामदेवबाबांनी कामाला लावलीय तिला, म्हणूनच "सासू" शोधत फिरतेय
हरि ओम...... हरि ओम..... हरि ओम.....
एक लंबी सास लिजिये....... सांस लिजीये सासू नही
एक लंबी सास लिजिये.......
एक लंबी सास लिजिये....... सांस लिजीये सासू नही >>> सही!
नवा बाफ कोण उघडणारे? आजी
नवा बाफ कोण उघडणारे?
आजी जाणारे का? ती फुल्ल आनंद मोड मध्ये आहे.
घना स्वतःचा विचार करणार आणि म्हणणार मला स्वतःला राधा आवड्ते म्हणून मी इथेच्च राहणारे.
मग सर्व गोड.
अमा +१ भुंग्या काहीही झकोबा
अमा +१
भुंग्या काहीही
झकोबा
जेवते मी कधी कधी मन लावून अपवादाने
आता एका नव्या नायिकेला "सासू
आता एका नव्या नायिकेला "सासू हवीय"
माझ्या
तोंदातुन
पटकन
निघा ले
आमचि घेउन जा आनि
समोर आमच्या
आई बस्ल्या होत्या
बापरे :खोखो
(No subject)
>> रामदेवबाबांनी कामाला
>> रामदेवबाबांनी कामाला लावलीय तिला, म्हणूनच "सासू" शोधत फिरतेय
लोक्स रच्याकने कोनी नोटीस
लोक्स रच्याकने कोनी नोटीस केलं का?
परवा द ग्रेट माई आजी घनाला सांगत होत्या, " तू माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, मला ज्वर आहे म्हणुन मी बडबडतेय"
तापात माणूस हे अस पण बोलतो??? :अओ"
देवानांच ऋषिनांच ...........
देवानांच ऋषिनांच ........... ऐकुन ऐकुन घरात पाठ झालाय आता. >> हो ना.. आता उरलेल्या थोड्याथोडक्या दिवसांत बाकीच्या ग्रहांना पण संधी द्या ना लागू माऊली पावली म्हणायची..
थोड्या वेळापूर्वी एका मराठी
थोड्या वेळापूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर एलदुगोच्या चमूची शेवटच्या दिवसाचे चित्रीकरण संपल्यानंतरची मुलाखत होती. इला भाटे मालिकेत जसं बोलतात, तसंच बोलत होत्या. स्वप्नील जोशी लांबलचक वाक्ये, न अडखळता अगदी चुरूचुरू बोलत होता. मालिकेशी संबंधित पडद्यामागच्या सगळ्या मंडळींची नावेही त्यानेच घेतली. तेव्हा या मालिकेत त्याला अभिनय करावा लागलेला नाही असे कोणीतरी लिहिलेले आहे, ते विधान मागे घ्या.
काळेकंपनीच्या तोंडात अगदी तीळ
काळेकंपनीच्या तोंडात अगदी तीळ भिजत नाही. आता उल्काआत्या आणि मानव-मानवीण सगळ्यांना राधा-घनाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कळणार. उरले फक्त परी, कुहू, प्रभात, त्याचे वडिल, गंगा आणि यमुना. हे क्ळल्यावर घनाचे बाबा मारुतीस्तोत्र आणि गणपतीस्तोत्रच काय पण येत असतील तर गीतेचे सगळे अध्याय म्हणतील बहुतेक. त्या दिवशी नाहीतरी सुप्रियाकाकू रामरक्षा म्हणत होतीच.
स्वप्ना....साष्टांग नमस्कार
स्वप्ना....साष्टांग नमस्कार बाई तुला.....
अशक्य हसतोय तो प्रसंग डोळ्यासमोर आणून
आशुचँप आजचा दिग्या आणि
आशुचँप
आजचा दिग्या आणि वल्लभकाकाचा प्रसंग आवडला. तसंच उल्का आणि माईतला सुध्दा. उल्का बोल बोल बोलल्याने माईला 'ग' म्हणायचा जास्त चान्स मिळाला नाही. मी मोजायला बसलेच होते. प्रोमोमध्ये राधा आणि घनातला जो सीन दाखवला त्यावरून माऊलीची मात्रा बरोब्बर लागू पडली आहे असं दिसतंय.
घनाचे बाबा घनाला हनिमूनला
घनाचे बाबा घनाला हनिमूनला जायला राजी करताना म्हणे सांगणार आहेत की नवराबायकोंनी एकमेकांना वाचता यावं यासाठी वेळ दिला पाहिजे. त्यातून एक्मेकांबद्दल वेगवेगळया गोष्टी समजतात. केरळच्या त्यांच्या ट्रीपमध्ये हेच झालं वगैरे वगैरे. म्हणजे केरळच्या ट्रीपमध्ये नक्की काय झालं???
आज भाग संपताना पाहिला मी.
आज भाग संपताना पाहिला मी. त्यामुळे सगळंच मिसल.
माई आणि उल्काआत्यातला प्रसंग बेस्ट
उल्का बोल बोल बोलल्याने माईला 'ग' म्हणायचा जास्त चान्स मिळाला नाही. मी मोजायला बसलेच होते.
>>>
तर काय
मी पण
पण मी अशी सोडणार नाहीये माई आजीला
मोजूनच रहाणार मी
नवराबायकोंनी एकमेकांना वाचता
नवराबायकोंनी एकमेकांना वाचता यावं यासाठी वेळ दिला पाहिजे.>>>स्वप्ना ...ते नवराबायकोंनी अधूनमधुन एकमेकांना वाचत राहिले पाहिजे असे आहे ते. मला आधि कळेना हनिमून ला जान्याचा आणि वाचायला वेळ द्यायचा काय संबंध.....आणि काय वाचायला? पण मालिका पाहिल्यावर कळले
प्रोमोमध्ये राधा आणि घनातला जो सीन दाखवला त्यावरून माऊलीची मात्रा बरोब्बर लागू पडली आहे असं दिसतंय.>>+१
आज उल्कीला dedicated एपि
आज उल्कीला dedicated एपि आवडला. तिच्या तोंडचे सगळे संवाद सुरेख होते. कुठेही अवाजवी शब्दसंपदा खर्ची न घालता आपलं म्हणणं थोडक्यात मांडणं हे कदाचित emotional माणसाला अवघड आहे. पण rational थिंकिंगचा मूळ पिंड असणारा माणूस ते जास्त सहजी पार पाडू शकतो हेमावैम..
किती दिवसांनी उल्काआत्याला
किती दिवसांनी उल्काआत्याला बोलायला चान्स राजवाड्यांनी दिला. त्याबद्दल तिने म्हणे खास आभार मानले त्यांचे. तिला खरच भरून आलं होतं अगदी. तो अभिनय नव्हता. चांगले संवाद वाट्याला येऊ शकतात यावर क्षणभर म्हणे तिचा विश्वास नव्हता. हे सगळे ऐकीव माहितीवर आधारित.
उद्या घना राधाला जाब विचारणार आहे.
Pages