एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी मालिका.........

एलदुगो ह्या मालिकेबद्दल ' एका लग्नाच्या निमित्ताने.......' ह्या नावाने एक टीकालेख लिहून मी 'मायबोलीची' सुरवात केली होती. खूप जणांना ते आवडले नाही हे त्यानंतरच्या प्रतिक्रियांवरून समजले. कुणी काय पाहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण आता जी मतं मी वाचतोय त्यावरून बऱ्याच जणांना ही मालिका खटकायला लागली आहे. आधी कलाकारांच्यावर, त्यांच्या वेशभुषेवर मतप्रदर्शन व्हायचे त्याऐवजी कथानकावर टीका होते आहे आणि तेच योग्य आहे. सध्या मराठीत ५ खाजगी वाहिन्या आहेत पण बघण्यासारखे कार्यक्रम किती हा वादाचा मुद्दा आहे. प्रत्येकाची आवड वेगळी असे जरी गृहीत धरले तरी मालिका आणि त्यातील धागा ( स्त्री हीच स्त्रीची शत्रू ) समानच आहे फक्त कलाकार बदलतात. २-५ पानांची असलेली अवंतिका ही मूळ गोष्ट १-२ वर्ष पकवते हे मराठी पटलेखकांचे यश की विकृती? आपल्याला पानभर निबंधही नीट लिहिता येत नाही पण ज्यांना लिहिता येते ते 'असे' लिहित असतील तर आपण बरे! वाहिन्यांचा दिग्दर्शक, निर्मात्यावर दबाव असतो हे मान्य केले तरी त्यांची प्रेक्षकांबद्दल काही बांधिलकी आहे कि नाही? वाहिन्यांचे अर्थशास्त्र लक्षात घेतले तर टीआरपी वगैरे फार महत्वाचे वाटत नाही. आम्ही दाखवतो ते प्रेक्षकांना आवडते आणि त्यांना जे आवडते तेच आम्ही दाखवतो असे ह्या वाहिन्या सांगतात. नाहीतर 'चार दिवस सासूचे' १० का ११ वर्ष चालली नसती. ( ही मालिका चालू झाली तेव्हा कविता 'लाड' होती नंतर तिचे लग्न होवून २ मुले ही झाली. 'उंच माझा...' मुळे तिने ही मालिका सोडली नसती तर ती मालिका सुरु असताना आजीही झाली असती. ) आपल्या ह्या धाग्यात फक्त एलदुगो बद्दलच चर्चा करतो बाकी चर्चेच्या लायकीच्याही नाहीत. ही मालिका १७५-२०० भागात संपतीये तरी बाकीच्या अनादीअनंत काळ चालूच राहतील. राजवाडे, मांडलेकर ह्यांची ही गत तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवायच्या? आचार्य अत्रे म्हणायचे 'अतिशयोक्ती हा विनोदाचा पाया आहे', पण तीच अतिशयोक्ती मालिकांमध्ये दाखवून ही मंडळी मालिका विनोदी नव्हे हास्यास्पद करतायेत. एक तर बरेचसे हिंदी कार्यक्रम इंग्लिश ( अमेरिकन ) वाहिन्यांवरून चोरलेले असतात आणि हिंदी वरून आपल्या मायमराठीत आणि वर म्हणायचे आमचे 'वेगळे' आहे. आपल्याकडे चांगली कामे करणारी मंडळी आहेत ज्यांची राष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली आहे मग मालिका सादर करताना ह्यांची प्रतिभा कुठे जाते? ( मुक्ताबर्वे, विनय आपटे असे कलाकार काम चांगले करतात पण कथानक अवास्तवपणे भरकटते ) जे आवडते त्याचे कौतुक करायला हवे पण जे आवडत नाही किंवा अवास्तव असते त्यावर टीका झालीच पाहिजे. काय आहे म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय.......... बघा पटतंय का?

राजवाडेंना बहुतेक '...And they all lived happily ever after...' असा शेवट करायचाय! सगळ्या लग्नास उत्सुक असणार्याच्या डोक्यावर अक्षता पडणार!

जोड्या जोळवा उपक्रमात "मानव" च रहात होता बिचारा........ त्याची पण सोय केली वाटतं..... एक दोन सीन्स पाहिले त्यात एकमेकांवर आपटताना दिसले....... Proud

ज्ञानालाही जर कोणी मिळू शकते तर मानवला का नाही Wink

तो मानव आणि ती मानसी...... मानव-सी (संदर्भः ताल चित्रपट Happy )

राधाला पुन्हा मूळच्या रुपात आणि दिनक्रमात पाहून बरं वाटलं होतं. तिच्या बाबांची 'ती असं वागतेय कारण हे सगळं तिच्यासाठी सोपं नाहिये' ही कमेन्ट चांगली होती. कालच्या एपिसोडमध्ये सुध्दा राधा घनाला 'मी माझ्या घरी जाणार आहे, काळेवाडीत नाही' हे म्हणाली तेव्हा टाळ्या पिटाव्याश्या वाटल्या. तेव्हढ्यात तिने 'मधलं वर्षं पुसून टाकायचं आहे. ते कसं करणार. आहे का तुझ्याकडे उत्तर?' हा प्रश्न टाकून सगळं बिघडवलं. स्वाभिमानी आणि स्वावलंबी असलेली मुलगी एका स्वार्थी माणसासाठी का एव्हढी अगतिक होतेय?

काल ती सोनिया म्हणत होती की आम्ही चन्द्र कलेकलेने वाढतो तसा दर महिन्याला लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. ह्यावर मला 'आंधी' तला संजीव कुमारचा 'पर बीचमे अमावस आ जाती है' हा ड्वायलॉग आठवला Happy

माईआज्जीला देवकीच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली बहुतेक. बघावं तेव्हा श्रीपादला 'तुला काय झालंय? असा काय बसला आहेस?' असं विचारत असते. ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या......

तो वल्ल्भकाका प्रभातने मल्ल आणून त्या माणसाला धमकी दिली म्हणून खुश होतोय. उद्या त्याने गुंड आणले तर काय होईल ह्याचा विचार केलेला दिसत नाहिये. १० लाख कश्यासाठी मागितले होते म्हणे?

राधाची आत्या लवकर घरी गेली नाही तर तिच्यासाठी कोणालातरी शोधायची पाळी कथालेखिकेवर लवकरच येणार.....

राधाची आत्या लवकर घरी गेली नाही तर तिच्यासाठी कोणालातरी शोधायची पाळी कथालेखिकेवर लवकरच येणार.....
प्रशांत दामले मोड ऑन >> हस्स कस्स.. हस्स कस्स... आत्याच्या नवर्याला पण तर कोणीतरी शोधावी लागणार .. हाय का नाय Lol << प्रशांत दामले मोड ऑफ >>

कालच्या एपिसोडमध्ये सुध्दा राधा घनाला 'मी माझ्या घरी जाणार आहे, काळेवाडीत नाही' हे म्हणाली तेव्हा टाळ्या पिटाव्याश्या वाटल्या. >>> एकदम पटेश.

तेव्हढ्यात तिने 'मधलं वर्षं पुसून टाकायचं आहे. ते कसं करणार. आहे का तुझ्याकडे उत्तर?' हा प्रश्न टाकून सगळं बिघडवलं. स्वाभिमानी आणि स्वावलंबी असलेली मुलगी एका स्वार्थी माणसासाठी का एव्हढी अगतिक होतेय?>>> तिचा प्रथमच राग आला.

स्वाभिमानी आणि स्वावलंबी असलेली मुलगी एका स्वार्थी माणसासाठी का एव्हढी अगतिक होतेय?>> प्रेम! प्रेम!! माणसाला होत्याचं नव्हतं करतं हो! Wink

काल ती सोनिया म्हणत होती की आम्ही चन्द्र कलेकलेने वाढतो तसा दर महिन्याला लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. ह्यावर मला 'आंधी' तला संजीव कपूरचा 'पर बीचमे अमावस आ जाती है' हा ड्वायलॉग आठवला स्मित
>>>
Lol
मला पण Wink

योगी ज्यांना मालिका नाही आवदतेय ते नावं ठेवतायेत
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कौतुक करा
हा धागा चर्चा करण्यासाठी आहे
चांगली किंवा वाईट अस काही स्पेसिफाय केल नाहिये कोणी
तुम्ही कौतुक करा ना
कोणी आडवलय का? पण ज्यांना आवडत नाही तरी पहावी लागतेय त्यांनी राग पण व्यक्त करू नये का?
शेवटी कोणाला काय आवडावं आणि काय नाही हे ज्याचा त्याचा प्रश्न नाही का?
या विषयावरची हेमाशेपो!

प्रशांत दामले मोड ऑन >> हस्स कस्स.. हस्स कस्स... आत्याच्या नवर्याला पण तर कोणीतरी शोधावी लागणार .. हाय का नाय हाहा << प्रशांत दामले मोड ऑफ >>
>>

ते बीटविन द लाईन होतं
ही इथेच राहीली तर तो दुसरी शोधेल ना
मग हिला कोणीतरी शोधावा लागेल असं

स्वप्ना, खर्‍या प्रेमात 'स्व'च नसतो. स्वाभिमान, स्वार्थ काहीच.
पण येत आहे ना ती आता ताळ्यावर. होत आहे जुनीच स्वाभिमानी, स्वत्व असलेली राधा. तिचा बॉस म्हणतो तसं, अर्थात, फक्त कपडे बदलून काहीच होत नाही. तुमचा 'कोअर' शाबूत असला की झालं.

आणि प्रेमात 'कोअर'ही बदलायची शक्यता असते Wink

श्रध्दा, दुरुस्ती केली आहे. फूड फूड अति पाहिल्यचा परिणाम Happy

>>स्वप्ना, खर्‍या प्रेमात 'स्व'च नसतो. स्वाभिमान, स्वार्थ काहीच

कबूल ग. पण तरीही एखाद्याने किंवा एखादीने प्रेमात पडून इतकं अगतिक होऊ नये हेमावैम. 'प्रेम हे दानासारखं सत्पात्री असावं' असं मला वाटतं.

पौर्णिमाशी सहमत, प्रेम माणसाला नुसते आंधळेच करत नाही तर लुळे पांगळे आणि अपंगही करते, पण त्याच माणसाला प्रेमाची साथ मिळाली तर त्याला पुर्ण जगाशी लढण्याइतपत सक्षमही करते....

काल राधाला नंतर विचार करताना पाहुन भिती वाटली, ती आज काळेवाडीत जाणार तर नाही ना? अज्जिबात जाऊ नये. एवढे प्रेम वाटतेय त्या गाढवाबद्दल (चार पायाच्या गाढवाने मला माफ करावे, त्याच्याबद्दल मला आदर आहे, त्याने मी त्याचा अपमान करतेय असे अजिबात वाटुन घेऊ नये), तर निदान तो स्वतः येईपर्यंत तरी वाट पहा म्हणावे... अगदीच जावेसे वाटले तर 'मैने तुमसे मुहब्बत की है, गुलामी नही की सजना" हे गाणे गुणगुणावे आणि स्वस्थ बसावे.

बाकी मी कालचा एपिसोड फक्त ऐकला.. घनाचा फोन आल्यावरचे २-३ मिनिटेच काय ती खरी मालिका होती. बाकी सारे पाणी.. काळेवाडीतले लोक अगदीच तकलादु आहेत. स्वतःबद्दल इसिक्युरीटी, मुलेही तशीच.. काय चाललेय...

'प्रेम हे दानासारखं सत्पात्री असावं' असं मला वाटतं.

मलाही तेच वाटतं. अपात्री दान केल्याने पुण्याऐवजी पाप लागते तर अपात्री प्रेम केल्याने आयुष्याचे वाटोळे होते.

>> पण त्याच माणसाला प्रेमाची साथ मिळाली तर त्याला पुर्ण जगाशी लढण्याइतपत सक्षमही करते....

यू तो अकेला भी अक्सर गिरके संभल सकता हू मै
तुम जो पकड लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हू मै
मांगा है तुम्हे दुनिया के लिये.......

, तर निदान तो स्वतः येईपर्यंत तरी वाट पहा म्हणावे..<<<<
मग ते अगदीच 'लव्ह आज कल'टाईप होईल. त्यात याच थीमला नेटकी ट्रीटमेंट दिली होती.

राधा घरी आली नाही म्हणून देवकी चिंतेत कशी नाही पडली अजून ? बघावं तेव्हा 'राधा राधा' करत त्यांच्या खोलीत घुसत असते Wink

प्रेम! प्रेम!! माणसाला होत्याचं नव्हतं करतं हो! >>>>>> +१००० Happy
राधा ने आता घनाला काही बोलु नये ,विचारु नये..काही काहीच करु नये .... माठ घना नाहीतरी जागेवर येणार्च आहे कथानका नुसार Wink Proud
आनि पुढची येनारी मालिका कहर आहे...सासु हवी आहे..का तर सगळ्यांना सासवा आहेत आनि हीला नाही.... कैच्याकै Angry

लोक्स, रेडिओ मिर्ची (९८.३) वर आज रात्री ९ ते ११ पुरानी जिन्स मध्ये शम्मी कपूरची मुलाखत ऐकता येईल.

तेव्हढ्यात तिने 'मधलं वर्षं पुसून टाकायचं आहे. ते कसं करणार. आहे का तुझ्याकडे उत्तर?' हा प्रश्न टाकून सगळं बिघडवलं. स्वाभिमानी आणि स्वावलंबी असलेली मुलगी एका स्वार्थी माणसासाठी का एव्हढी अगतिक होतेय? >>
घनानेच तिला 'मधलं वर्षं पुसून टाकायचं आहे.' असे सांगितले होते. 'ते कसे करू' हे त्यालाच विचारणे हे अगदी योग्य होते. 'त्याला वाटतय की पाटीवरची अक्षरे पुसण्याइतके सोपे आहे ते मग त्यानेच सांगावे कसे करायचे ते' हा राधाचा approach अगदी बरोबरच वाटला मला.

आणि ती कुठे झालीये आगतिक? एखाद्या माणसावर प्रेम बसणे आणि त्याची कबुली देणे यात कसली आगतिकता? त्याला बरेच धाडस लागते Happy आता घनाने तिचे प्रेम अव्हेरले तर ती स्वतःला सावरतेय की. त्याला वेळ लागणारच की. प्रेमच का इतर अनेक घटना असतात की ज्या घडल्यानंतर माण्साला सावरायला वेळ लागतोच उदा. अपघात, अपयश. निर्बुद्ध, आगतिक नायिका त्या असतात ज्या आपल्या सावत्र आइच्या, प्रेम न वाटणार्‍या नवर्‍याच्या, कजाग सासूच्या ताटाखालचे मांजर बनून रहातात, त्यांचे शारिरीक अत्याचार सहन करत रहातात.

श्री. लागू यांना कसलाच अभिनय करता येत नाही पण आता त्यांचे ते स्तोत्र म्हणणे डोक्यात जातय. त्यात कसलीच भावना नसते आणि चालही.

त्यांचे ते स्तोत्र म्हणणे>> तेच की Lol
आणि नवग्रहस्तोत्रातला एकच श्लोक म्हणतात. एकेक श्लोक एकेका सीनला म्हणला असता, तर एव्हाना काही लाख लोकांचं नवग्रह स्तोत्र आपोआप पाठ झालं असतं आणि ह्या मालिकेने समाजपरिवर्तन घडवून आणले म्हणून (तरी) तिचं कौतुक झालं असतं! Proud

ती मध्ये अगतिक झालेली. आता सावरलीय... ते स्तोत्र म्हणणं माझ्याही डोक्यात जातं..
श्री. लागू यांना कसलाच अभिनय करता येत नाही +१००००००००००००००००००००००० देवकीताई निदान गांगरल्याचा/घाबरल्याच्या किंवा या रेंजमध्ये इतर ज्या भावना येतात त्यांचा अभिनय करतात.. यांना काहीच येत नाही.

Pages