निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, नवीन भाग उद्या का? गुरुवारचा मुहूर्त? Happy
आणि तुझ्या कन्यका काय म्हणतात? छोटी कशी आहे? सध्या पुढे सरकणं चालू असेल ना? Happy

शांकली, त्याचे नाव नाही माहीत.. ( परत पुस्तकांची आठवण आली ! )
वर्षू... परत जंगलात जाईपर्यंत सगळ्यांचे सल्ले लक्षात राहतात.. तिथे गेल्यावर मी हरवतो.

गजानन, कौलावरचा भोपळ्याचा वेल म्हणजे माझी आजोळची आठवण. आम्ही जातो त्यावेळी वेल नसतो पण भोपळा मात्र देवळीत ठेवलेला असतो राखून.

हो जिप्स्या, तोच रानतंबाखू. विषारी वनस्पतिंचा पण एक बाफ काढून ठेव. शांकलीने लिहिलेली कावळीची माहिती पण तिथे ठेव.

जो_एस.. ते भोपळे वेगळे असतात. पं. कुमार गंधर्व स्वतः शेतात जाऊन भोपळे निवडत असत, असे वाचले होते.
गायकाच्या दोन बाजूचे तंबोरे, एका वेलीवरच्या, एकसमान आकाराच्या भोपळ्याचे असावेत, असा त्यांचा कटाक्ष होता.

मी घरी पुदीना लावलाय छोट्या कुंडीत... पण तो ईतका वाढतोय की फान्द्या बाहेर वाढत आहेत... तर पान नेमकी कुठली तोडु की ज्यामुळे वाढ कमी होणार नाही प्लिज मदत करा

आपल्याकडे हवामान कसे आहे आता ? आकाशात ढग दिसू लागलेत का ?

हो, यंदा ७ जुनच्या मुहुर्ताआधीच पाऊस कोसळणार...

कोणाला आठवतेय का, काही वर्षांपर्यंत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन रोज संध्याकाळी धुळ उडवत वारा सुटायचा आणि मग जोरदार पाऊस. ऑफिसातुन येताना हा पावसाचा रोजचा कार्यक्रम वैताग आणायचा.

गेले काही वर्षे हा कार्यक्रम तर बंद पडलाय्च पण पाऊसही जुनमध्ये रमतगमत दोन्-तिन आठवड्यानंतर उगवतो. गेल्या वर्षी तर उगवतो उगवतो म्हणता मह्णता गायबलाच...

गेल्या वर्षी आंबोलीच्या विहीरी मे महिन्यच्या शेवटी आटलेल्या. यंदा एप्रिलच्या शेवटीच आटल्यात Sad सगळे जण बोअर मारायचा विचार करताहेत. आता सगळ्यानीच बोअर मारले तर मग बोअरही आटतील.

(रच्याकने, नाशिक भागात बोअरसाठी जलपरी हा शब्द मी ऐकलाय Happy )

,'विषारी वनस्पतिंचा पण एक बाफ काढून ठेव,''.. जिप्स्या.. खरंच रे!!
दिनेश्दा.. हंसल ग्रेटल सार्खं वाटतं कि काय जंगलात शिरल्याबरोबर.. Lol

यंदा एप्रिलच्या शेवटीच आटल्यात अरेरे सगळे जण बोअर मारायचा विचार करताहेत. आता सगळ्यानीच बोअर मारले तर मग बोअरही आटतील.
साधना,
आटायला अगोदर (सगळेच बोअर मारायला लागल्या नंतर) पाणी तरी लागलं पाहिजे ना ! यात आता एका नविन बोअरला पाणी लागलं कि त्याच्या जवळच्या जुन्या बोअरचं पाणी गायब होण्याचे प्रकार तर सरास घडत आहेत.

आमच्यात एका शेतकर्‍याने एका मागुन एक असे एका एकर मध्ये ६ बोअर घेतले, २ ठिकाणी थोडे पाणी लागले,ते पाणी (कॉम्प्रेसरने) एकत्र करुन पानमळा वाचवला.
मी ७-८ वर्षापुर्वी २००,२२५,२५०,३०० पर्यंत सरास पाणी लागलेले बोअर पाहिले आहेत, पण आता जग बदललय त्यामुळे सध्या बोअरवेलला ४००,४५०,५००,५५० फुटावर देखील पाणी चकवा देत आहे, माणसान तयार केलेली अजस्त्र मशिन्स जमीनीत हवं तेवढे खोल शिरण्यासाठी तयार आहेतच आणि शेतकरी आपलं हाताला आलेलं पीक तरी कस वाया जाऊ देईल ?

नाशिक भागात बोअरसाठी जलपरी हा शब्द मी ऐकलाय>
सांगली भागात या (कुपनलिकेसाठी) बोअरवेलसाठी 'व्होल' हा शब्द वापरला जातो..

खूप दिवसांनी यायला मिळालं इकडे. अजून वाचायचं राहिलंय, पण तेवढा धीर नाही. या आठवड्यात महाबळेश्वरला एक झाड बघितलं तो गुलाबी शिरिष असावा असं वाटतंय. फोटो चांगला नाही आला, पण जाणकार ओळखू शकतील यावरून:
DSCF6433.JPG
पानं साधारण चिंचेच्या पानांएवढ्या आकाराची होती ही. झाड ४-५ मीटर उंच असेल.

'विषारी वनस्पतिंचा पण एक बाफ काढून ठेव,''.. जिप्स्या.. खरंच रे!!>>>>नक्कीच. १-२ दिवसात काढतो धागा.
औषधी वनस्पतींचा आहेच, तसाच विषारी वनस्पतींचा धागाही काढुया. Happy

दिनेशदा धागा काढते सवड मिळताच. तोपर्यंत चालू द्या.

शोभा मुली दोघीही मजेत. राधा आता बसायला जाते.

शोभा मुली दोघीही मजेत. राधा आता बसायला जाते.>>>>>>>..व्व्वा! मला फ़ोटो पाठव ना. Happy
राधा आता बसायला जाते>>>>>>>>>>>>कुणाकडे? Uhoh Lol

गौरी, हा 'उदळ' नावाचा वृक्ष आहे. आपला शिरीष, रेन ट्री यांच्याच कुटुंबातला आहे. पण याच्या शेंगा वेगळ्या असतात. लालसर (यात थोडी कॉपर शेड जास्त) आणि टोकदार असतात. Happy

शोभा..........तू पण ना!

अबोल, पुदीन्याची विरळणी करावी लागेल. बारीक वाटणार्‍या फांद्या मूळापासूनच तोडायच्या. जमिनीवर तो पसरत जातो पण कुंडीत असे करावे लागेल. या फांद्या कडेच्याच नव्हे तर मधल्याही तोडायच्या.
पुदीन्याची पाने मिनिटभर गरम पाण्यातून काढून मग बर्फाच्या पाण्यात टाकायची. आणि सावलीत सुकवायची. हिरवीगार टिकाउ पूड होईल.

शांकली, हे "उदळ" आमच्या कॉलनीत पण लावलेय. चांगली बाब म्हणजे एकसूरी लागवड नाही.

वर्षू, मी कुठल्याही बागेत असाच हरवतो Happy

जिप्सी, संदर्भासाठी चांगला होईल तो बीबी. कण्हेरी, पिवळी कण्हेर, कळलावी पण त्यात असू देत.

अनिल, भूजळ पातळी फारच खाली गेलीय. पावसाळ्यातली पंचगंगा बघितली असशीलच. ते लालभडक पाणी म्हणजे सगळा सुपीक गाळ ती वाहून नेते. पाणी तर नेतेच नेते.

उदळ... नीट फोटो आला असता तर बरे झाले असते. मला तर रेन ट्री वाटलेला, पार्कियासारखी पानरचना असलेला. Happy

शांकली तुझे डोळे चांगलेच तयार आहेत.

यात आता एका नविन बोअरला पाणी लागलं कि त्याच्या जवळच्या जुन्या बोअरचं पाणी गायब होण्याचे प्रकार तर सरास घडत आहेत

हो, पंकजच्या घरी त्याच्या चुलत भावाने बोअर मारला आणि पंकजची विहीर कोरडी पडली. आता आठवड्यातुन दोन्-तिनदा टँकर बोलवुन डाळींब वाचवायचे प्रयत्न चाललेत. Sad

आज एक विलक्षण गोष्ट वाचनात आली. सा. सकाळचा १८ मे चा पूर्व प्रकाशित अंक आज आमच्याकडे आला. त्यात सध्या 'कीटकांचे सौंदर्यजग' नावाचं सदर प्रा. आलोक शेवडे लिहीत आहेत. आजच्या अंकात त्यांनी एक विलक्षण माहिती दिलीये..........ती आपणा सर्वांसाठी इथे देत आहे. त्यांच्याच शब्दांत .............

"एक दिवस मी सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेत फेरफटका मारत होतो. मॉन्सूनपूर्व मशागतीची तयारी म्हणून आजूबाजूचं गवत जाळून टाकणं सुरू होतं. त्या जळणार्‍या गवतामधून जीव वाचवत असंख्य कीटक, नाकतोडे उड्या मारत होते. त्यापैकी एक नाकतोडा मी माझ्या बोटांवर अलगद घेतला व त्याचं व्हिडियो चित्रण करू लागलो. आणि मला एक विस्मयकारक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे तो नाकतोडा प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होता. चक्क आपली मान वळवून ज्वाळांच्या दिशेनं पहात होता. नाकतोडा मान वळवून पाहू शकतो, हे तोपर्यंत मला ज्ञात नव्हतं आणि भितीनं घाबरगुंडी उडालेल्या नाकतोड्याच्या चेहर्‍यावरचे हावभावही मी यापूर्वी कधी प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते. नाकतोडा या कीटकाचं हे वागणं माझ्यासाठी नवीनच होतं. मग मी माझ्या बोटांची दिशा जरा बदलली, तोच नाकतोड्यानंही आपली मान फिरवली. मी जशी जशी बोटांची दिशा बदलत होतो तसतसा नाकतोडाही आपली मान पेटलेल्या गवताकडे वळवून पुन्हा पुन्हा त्या ज्वाळांकडे पहात होता. त्याच्या डोळ्यांची हालचाल, स्पर्शिकांची हालचाल केवळ भीतीची संवेदना व्यक्त करत होती. त्या नाकतोड्याच्या मोहरीएवढ्या मेंदूत या निसर्गाने 'सजीव प्रेरणा' भरली आहे, याची खात्री पटली आणि मग मानवी मनाचे खेळ या इवल्याश्या कीटकांनाही लागू असतील का, या प्रश्नाची तीव्रता अधिकच वाढली."

साधना.....:स्मित: पण एक सांगू, अगं हे वृक्ष, वेली, फुलंच इतके जीव लावणारे आहेत ना की यांना विसरणं म्हणजे आपल्या स्वत:ला विसरण्यासारखं आहे, असं नाही का होत?

नि ग चं हे बेश्ट आहे हा ... त़ज्ञांकडून केवढी माहिती मिळते इथे! शांकली, उदळ हे नावही माहित नव्हतं मला! जरा शोधल्यावर इथे सुंदर फोटो माहितीसहित सापडला त्याचा:

http://www.flickr.com/photos/dinesh_valke/7203596284

Pages