Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीरजा, टीक.
नीरजा, टीक.
मोत्याच्या किंवा सोन्याच्या
मोत्याच्या किंवा सोन्याच्या मण्यांचे फ्लॅट चोकर टाइप![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तन्मणी आवडतो मला मस्त दिसतो
तन्मणी आवडतो मला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसतो
फक्त ठुशी आणि एक लांब मंसु फारसं भारी नाही वाटत अस मला वाटतं पण बघू आता आईलाच आवडतय म्हणल्यावर माझ्याकडे फारसा ऑप्शन नाहीच रहात
मी गळ्यालगतच काही तरी घेईन
ठुशी हा माझा अत्यंत आवडता
ठुशी हा माझा अत्यंत आवडता दागिना. नथ, ठुशी, इरकल साडी, कानात कुड्या हा टिपीकल मराठी लुक वाटतो.
ठुशी हा खरंच राजेशाही दागिना!
ठुशी हा खरंच राजेशाही दागिना! नऊवारी साडीवर तर उच्च दिसतोच पण इतरही साड्यांवर मस्तच! कुठल्याही वयोगटाला शोभेसा आहे... पारंपारीक दागिने मला खूप म्हणजे खूप आवडतात!!!
मोकीमी तो मोत्यांचा एकसर फार
मोकीमी तो मोत्यांचा एकसर फार रॉयल आहे... मुंबईमध्ये हैद्राबादी मोत्यांचे नेकसेट्स कुठे मिळतील? फॉर्मल ड्रेसवर मस्त दिसतात ना... एकदम डिसेंट अॅण्ड एलिगंट!!
हि बिल्वदलटीक कशी वाटते बघा :
हि बिल्वदलटीक कशी वाटते बघा :
ठुशी हा माझा अत्यंत आवडता
ठुशी हा माझा अत्यंत आवडता दागिना. नथ, ठुशी, इरकल साडी, कानात कुड्या हा टिपीकल मराठी लुक वाटतो. >>>> माझा अगदी पेटंट म्हणावा असा 'कार्यक्रम लूक'!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ठुशी आणि एक लांब मंसु फारसं भारी नाही वाटत >>>>> काय सांगतेस? मला तर नविन दुसरं काहीच नाही सापडलं तर कधीही आवडणारे काँबीनेशन वाटते.
टीक पहिल्यांदाच ऐकले...
टीक पहिल्यांदाच ऐकले... पाहिले होते, पण या प्रकाराला टीक म्हणतात हे माहित नव्हते. छान असतात.
मी कोल्हापुरातून एकदम
मी कोल्हापुरातून एकदम पारंपरिक ठसठशीत ठुशी करून घेणारे एकदा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चां वर सो पॉलिश अर्थातच. सोन्याची कसली परवडतीये!
बिल्वदलटीक सुरेख दिसते आहे!
बिल्वदलटीक सुरेख दिसते आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला तर ठुशी फार आवडते.
मला तर ठुशी फार आवडते. घ्यायचीय अजून...
नीरजा, सेम पिंच चां वर सो च
नीरजा, सेम पिंच
चां वर सो च ....पण तरी बड्जेट किती ठेवावं लागेल ........उद्याच त्या नावानी एक रिकरिंग काढून टाकते.....
नी.. मलाबी तो कोल्हापुरी
नी.. मलाबी तो कोल्हापुरी साज्,ठुशी इ.इ. फार्र आवडतात..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
यावेळी दक्षु ने रेकमेंड केलेले 'चिपडे' ज्वेलर्स बन्द होते म्हणून आसपासच्याच कोणत्यातरी ज्वेलर्स शॉप मधून घेऊन आले.. चां वरच.. स्वस्त आणी मस्त
मला समहाउ (स्वतः घालायला
मला समहाउ (स्वतः घालायला )अजिबात नाही आवडत ठुशी , चिंचपेटी,
तन्मणी, नथ , पारंपारीक वाट्यांच मंगळसूत्र वगैरे !
बाद्वे.....सर्व नट्यांचे
बाद्वे.....सर्व नट्यांचे (नटण्याची आवड असणार्या ) आभार !
सदाबहार धाग्याबद्दल.....सध्या .रोज पहिली भेट याच धाग्याला....मस्त वाटत एकदम !
हाहा.. मला वाटलं होतं की मीच
हाहा.. मला वाटलं होतं की मीच एकटी इतकं सोनं परवडायचं नाही म्हणून बसलेय की काय?
मला ती बिल्वटीक जामच आवडलीय, आणि एथनिक म्हणून कोल्हापुरी साज देखील. कोल्हापुरात कुठे हे असे पारंपारिक दागिने (तेच ते चां वर सो चं पॉलिशवाले) करून मिळतात? भरवशाची-माहितीतली दुकानं असतील तर नांवे आणि पत्ते द्या ना.
मुलींनो, गाडगीळांकडे ४- ५
मुलींनो, गाडगीळांकडे ४- ५ ग्रॅम वजनाची ठुशी मिळते अर्थात त्यातले मणी पोकळ/लाखेचे असतात.
ठुशी माझा पण आवडता दागिना.
ठुशी माझा पण आवडता दागिना. त्याहून प्रिय मला कोल्हापुरी साज...
मला सोन्याचांदीच्या दागिन्यांमधे पारंपारिक प्रकारच जास्त आवडतात. एक तर ते कधीच आऊट ऑफ फॅशन वाटत नाहीत.
त्यामुळे इतके पैसे घालून घेतल्यावर मनसोक्त वापरता येतात. मोत्याच्या दागिने मात्र पारंपारिकपेक्षाही मॉडर्न स्टाईलचे जास्त आवडतात.
चांसोपा दागिने जास्त दिवस नीट
चांसोपा दागिने जास्त दिवस नीट टिकण्यासाठी काय करतात? आजकाल फार महाग झाले आहे त्यांचे पुनरुज्जीवन करणे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिंगी हो हो त्यात लाख असते
चिंगी हो हो
)
त्यात लाख असते म्हणे
आजच पाहून आले
त्यातल्या त्यात २ बर्या होत्या (नावडतीचं मीठ आळणी
नी ला अनुमोदन, ठुशी एकदम
नी ला अनुमोदन, ठुशी एकदम राजेशाहीच दिसते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रादर पारंपारिक कोणतेही दागिने (वर उल्लेखिलेले सर्वच) राजेशाही दिसतात.
पण घालायचे म्हणले तर गळा आणि अंगकाठी एकदम ठसठशित असेल तर त्याचा थाट अजून वाढतो.
http://www.pngjewelers.com/sw
http://www.pngjewelers.com/swarajya.aspx गाडगीळांच्या ह्या साईटवरपण छान डिझाईन आहे कोल्हापूरी साजाचं.
़काल एक मस्टर्ड कलरचा फोर्मल
़काल एक मस्टर्ड कलरचा फोर्मल कोट घेतला, स्वेटर सारखा. त्याच्या आत कोणता टॉप चांगला दिसेल?
मला ठुशी फार आवडते... माझ्या
मला ठुशी फार आवडते... माझ्या कडे ३-४ प्रकार आहेत. एक ठुशी स्टाइल मसु पण आहे
आणि ठाण्याला मराठे ज्वेलर
आणि ठाण्याला मराठे ज्वेलर मधुन मागे मी अश्या प्रकारचा सेट घेतला होता....
मोकिमी, तुम्ही जो फोटो टाकलाय
मोकिमी, तुम्ही जो फोटो टाकलाय सेम तशीच मी गाडगीळांकडुन घेतली होती.. वर उल्लेख केलाच आहे.
सगळ्यांच्या ठुश्या छान
सगळ्यांच्या ठुश्या छान आहेत.
मला नऊवारी साडीवर पारंपारिक ज्वेलरी कोणती घालायची असते(दागिन्यांची नावे) हे इथे कोणी सांगेल का?मुलीसाठी नऊवारी शिवून घेतली आहे,ट्रॅडिशनल डे साठी.त्यावर ज्वेलरी (आर्टिफिशिअल) घ्यायची आहे.ठाण्यात किंवा पुण्यात कुठे मिळेल का?
नऊ वारी वर घालायची ज्वेलरी =
नऊ वारी वर घालायची ज्वेलरी = नथ, चिंच पेटी/लफ्फा/ठुशी, मोत्यात घालायला तन्मणी, हातात गोठ / तोडे, पायात पैंजण, गळ्यात लांब घालायला मोहनमाळ / चपला हार / लक्ष्मी हार.
एकाच कार्येक्रमा पुरतं हवं असेल म्हणजे बजेट मधे तर ठाण्याला गोखले रोड वर "सुहासिनी श्रुंगार" कडे मिळु शकतात. जरा बरे बजेट असेल तर मग गोखले रोड वरच " सेनोरीटा", "कनक" यां मधे पण मिळेल. तसच ए.के. जोशी शाळे समोर ही एक दूकान आहे. तिकडे पारंपारिक दागीने मिळतात. एकदम छान बजेट असेल तर टेंभीनाक्याला ( चिंतामणी ज्वेलर्स च्या उजव्या बाजुला वळल्यावर ) सारस्वत बँके जवळ 'क्रिश्ना पर्ल" मधे सुरेख डिझाइन्स आहेत.
धन्स मोकिमी. नक्की जाईन.
धन्स मोकिमी. नक्की जाईन.
Pages