Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खांद्याएवढ्या केसांसाठी
खांद्याएवढ्या केसांसाठी काहीतरी २-३ हेअरस्टाईल सांगा मस्त.>> मला पण....मला पण.....
अशा प्रकारच्या साड्यांमधे मी
अशा प्रकारच्या साड्यांमधे मी कम्फर्टेबल असते....
फ्रेंच रोल
फ्रेंच रोल
अनिश्का सगळ्यात पहिली रिंग
अनिश्का सगळ्यात पहिली रिंग आहे ना.. तशी सोन्याची आहे माझ्याकडे नि त्याला खाली खड्याचे झुमके आहेत
मस्त दिसतात एकदम
(No subject)
फ्रेंच रोल>>>कश्या प्रकारे
फ्रेंच रोल>>>कश्या प्रकारे घालायचा याच्या स्टेप घाला ना कोणितरि !
मला खुप आवडतो पण घालता येत नाही
अनिश्का सगळ्यात पहिली रिंग
अनिश्का सगळ्यात पहिली रिंग आहे ना.. तशी सोन्याची आहे माझ्याकडे नि त्याला खाली खड्याचे झुमके आहेत
मस्त दिसतात एकदम>>>>>>>>>>> सहीच गं
योडे
योडे
कश्या प्रकारे घालायचा याच्या
कश्या प्रकारे घालायचा याच्या स्टेप घाला ना कोणितरि !
>>
+१
दक्षे, केस फिरणारच नाहीत तसे इतके लहान आहेत.
मग हाफ पोनी घालायचा...इतक्या
मग हाफ पोनी घालायचा...इतक्या लहान केसांचे काय करु शकतो??? किंवा मग आपण घरी केस उलटे फिरवुन क्लिप लावतो आणि वर केसांचा तुरा ठेवतो तसं करुन छान क्लिप लावावा..
इतके लहान असतील तर मग कर्लस
इतके लहान असतील तर मग कर्लस करून घे. चांगले दिसतील. आणि एका बाजूला काहीतरी डेकोरेशन करायचं..
माधवी, 'सेनोरिटाज' मध्ये बघ
माधवी, 'सेनोरिटाज' मध्ये बघ >> कुठे आहे हे, योडी?
कुठे आहे हे,
कुठे आहे हे, योडी?
>>
ह्याच्या 'स्वर्ग' सारख्या फ्रॅन्चायसी असतात. पुण्यात कुठे असेल ते नाही सांगता येणार मला.
माधवी पुण्यात राठोड ज्वेलर्स
माधवी पुण्यात राठोड ज्वेलर्स मध्ये बघ. तुळशीबागेत. शर्मिली चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जाताना डाविकडे आहे. पण जरा महाग वगैरे मिळेल.
किंवा तुळशीबागेत ते एक फेमस
किंवा तुळशीबागेत ते एक फेमस जुनं हॉटेल आहे ना? अगत्य बहुतेक त्या गल्लीत पण उजव्या बाजूला एक काँप्लेक्स आहे त्यात दुकानं आहेत बरीच. हंट केलंस तर चांगलं डिझाईन स्वस्तात मिळून जाईल.
लग्नाला जायचं असल्यास सरळ
लग्नाला जायचं असल्यास सरळ घराजवळच्या पार्लर मधे जाऊन हवीतशी हेअरस्टाईल करून घेणं सोपं पडेल बहुतेक. दोनेक दिवस आधी पार्लरवालीशी बोलून आपल्या रिक्वायरमेंट्स सांगून ठेवाव्या. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे डेकोरेशन ही असतं ..
माझ्या पोरीच्या लग्नात तीन दिवस आमच्याकरता ( मी + पोरगी),सकाळ,संध्याकाळ च्या हेअर स्टाईल्स करता पार्लरमधे टाईमसकट बुकिंगच करून टाकलं होतं अॅडवान्समधे त्यामुळे खूप कष्ट वाचले होते.
ते लोंबते कानातले मला फार
ते लोंबते कानातले मला फार आवडतात पण एका कानाचे बीळ मोठे झाले आहे
मोठे झालेले बीळ परत छोटे करुन मिळते डॉक्टरला विचारा.
नही वर्षे, माझी पार्लरवालीच
नही वर्षे, माझी पार्लरवालीच उगवते १२-१२.३० ला. शिव्या पडतील इतक्या उशीरा गेले तर.
धन्स योडी आणि दक्षिणा! बघते.
धन्स योडी आणि दक्षिणा! बघते. ऑनलाईन बघितली काही पण फारच टिपिकल आहेत.
माधवी, डायरेक्ट दुकानातच जाऊन
माधवी, डायरेक्ट दुकानातच जाऊन बघ. छान छान असतात डिझाईन्स आणि बरेचदा 'बाय १ गेट १ फ्री' ऑफरही चालु असते.
योडे अगं ती कितीला का
योडे अगं ती कितीला का उगवेना.. तु तिच्याशी आधी बोलून तिला लवकर येऊन करून दे म्हण ना... मेकप ला वगैरे सकाळी ७ ला सुद्धा जातात या बायका.. तू बात तो कर के देख.
दक्षिणा, हा स्टँड बनवून कुठून
दक्षिणा, हा स्टँड बनवून कुठून घेतलास? मस्त आहे.
सन्जना, डिझाईन दिलंस तर
सन्जना, डिझाईन दिलंस तर कोणिही फॅब्रिकेशन करणारा माणूस बनवून देईल, रॉट आयर्नचा.
आज सगळे शांत शांत इथे?
आज सगळे शांत शांत इथे?
फ्रेंच रोल>>>कश्या प्रकारे
फ्रेंच रोल>>>कश्या प्रकारे घालायचा याच्या स्टेप घाला ना कोणितरि ! सान्गना कोणीतरी.........
फ्रेंच रोल>>>कश्या प्रकारे
फ्रेंच रोल>>>कश्या प्रकारे घालायचा याच्या स्टेप घाला ना कोणितरि ! सान्गना कोणीतरी.........>>>>मी पण वाट बघतेय
दक्षिणा तू वर जे चित्र दिले
दक्षिणा
तू वर जे चित्र दिले आहेस त्यात केसांचे एन्ड्स कसे लपवले आहेत ते कळत नाहीये. असेच खोचून द्यायचे का ?
होय बहुतेक माधवी
होय बहुतेक माधवी
ओके जरा ट्राय करावं म्हणतेय.
ओके जरा ट्राय करावं म्हणतेय. माझे केस एवढे लांब नाहियेत. खांद्यापर्यंत आहेत. बघू जमतेय का!
मी एक स्टाईल सांगते,छोट्या
मी एक स्टाईल सांगते,छोट्या केसांसाठी छान दिसते,पुढच्या केसांची हवी तशी रचना करुन घ्यावी(भांग पाडुन वा पुर्ण उलटे विंचरुन क्लिप लावणे ),या नंतर सर्व केस विंचरुन पोनीटेल घालावी(केस थोडे लांब असतील तर पोनी दुमडुन घ्यावी),पोनीटेलच्या वर एक होल करावे आणि पुर्ण पोनी त्या होल मधे एखादा बोळा खोचावा तशी खोचावी पण खोचताना पोनी पुर्ण Tuck होईल याची काळजी घ्यावी.हे झाल्यावर खोचल्या जागी एखादे फुल वा ब्रोच लावावा.
ही स्टाईल छान अंबाड्या सारखी दिसते,ऑफिसला Formal Wear वर पण छान दिसते(अर्थात फुल न ब्रोच वगळून्),लिहायला खुप वेळ लागतो पण प्रत्यक्षात पटकन करुन होते.
Pages