एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

७. एक बाई म्हणाल्या 'ही मालिका पाहून असं वाटलं की आपल्याही मुलांजवळ आजीआजोबा हवेत'. शेजारी असलेले नवरोबा खूश दिसत होते.....निदान काही दिवस आईच्याहातचं चांगलंचुंगलं खायला मिळेल म्हणून. त्या बाईच्या सासूबाई बघत असतील तर त्यांनी बॅगा पॅक करून निघायला नको. दाखवायचे आणि खायचे दात निराळे असतात.>>>>> +१

बिच्चारा !!! त्याला काय माहिती की आपली बायको तिच्या आईवडिलांबद्दल बोलत होती ते ........... उद्या घरी आल्यावर सासूसासरे दिसले की कळेल त्याला ...... 'एका लग्नाची आपली गोष्ट......'!!!!! कुठाय कुठाय तो राजवाडे ????

मालिकेत पाणी घालणं, हे अनेकदा लेखक-दिग्दर्शकांना अतिशय नाइलाजानं वाहिनीच्या सांगण्यावरून करावं लागतं. लोक मालिका पाहतात म्हणून जाहिराती मिळतात, या कारणामुळे वाहिनीला मालिका सुरू ठेवण्यात रस असतो. गुंतता हृदय हे आणि एलदुगो यांच्या बाबतीतही हेच घडलं. दोष उगाच लेखक-दिग्दर्शकांच्या माथी. Happy

मंदार, पिंजरा तुम्हाला बरी वाटली? असू शकते, तुमची आवड..... आणि कथा सशक्त होती म्हणता, असेलही मी त्याचा एकही भाग पहिला नाही, पण त्याचे ४५०-५०० भाग झाले हे खरं आहे का? तसे असेल तर कथेत भरपूर पाणी घातले म्हणावे लागेल. एवढे मास्टर-ब्लास्टर कलाकार राजवाडे टीम मध्ये होते आणि मालिका १७०-१८० भागात संपूनही प्रेक्षक कंटाळले होते. मग पिंजरा २ वर्ष पहायची म्हणजे एलदुगो, क्रिकेटचा २०:२० सामना वाटेल. असो. आवड आपली आपली .........

वाहिन्यांच्या जाहिराती आणि टीआरपी प्रेक्षकांच्यापेक्षा महत्वाच्या मानणारी ही लेखक, पटालेखक, निर्माता, दिग्दर्शक वगैरे मंडळी कथेत पाणी घालण्यापेक्षा 'कथे'सकट पाण्यात का जात नाहीत? सगळेच सुटतील...

एलदुगो ही मालिका पाहून मला एक गोष्ट समजली..... ' सॉफ्टवेयर कं. अणि तिचे निर्णय वालाच्या बिरड्यावर चालतात. कॉम्पुटर, प्रोग्रामींग सब झुठ है...' आता इन्फोसिस, विप्रो ह्या कंपन्यातून 'वालाचा व्यापारवृद्धीसाठी कसा उपयोग करता येईल?' ह्याचा उच्चपदस्थ विचार करत आहेत. जय बिरडं ! जय राजवाडे !!

>>अजुन चादरात मी">>

__/\__

मीराचा सासरा अंगद कसा असेल? तो 'कश्यप' आहे आणि ती 'रत्नपारखी'. आता 'मसाह' मध्ये एलदुगोची टीम घुसली नाही म्हणजे मिळवलं.

चिनूक्स : मालिकेत पाणी घालणं, हे अनेकदा लेखक-दिग्दर्शकांना अतिशय नाइलाजानं वाहिनीच्या सांगण्यावरून करावं लागतं. लोक मालिका पाहतात म्हणून जाहिराती मिळतात, या कारणामुळे वाहिनीला मालिका सुरू ठेवण्यात रस असतो. गुंतता हृदय हे आणि एलदुगो यांच्या बाबतीतही हेच घडलं. दोष उगाच लेखक-दिग्दर्शकांच्या माथी. >>>
हे अगदि खरे आहे, माझा एक मित्र प्रोडक्शन हाउस मध्ये असल्याने मला हे कळले. कधितरी नविन येणार असलेल्या मालिकेचे काही काम अपुर्ण असेल तर काही भाग वाढवायला सान्गतात.

लोक्स एक वाहता धागा काढू का?
ह्या धाग्याने २००० ची लिमिट ओलांडली आहे..
आणि मालिकाही संपलीये

शीर्षक असेल "सिरीयल किलर" Wink

तुम्हा सर्वांचे अत्यंत आभार...मी इतकी महाप्रचंड हसले आहे हा धागा वाचून... अय्यो... मज्जा आली.. चालूद्या...

मालिकेत पाणी घालणं, हे अनेकदा लेखक-दिग्दर्शकांना अतिशय नाइलाजानं वाहिनीच्या सांगण्यावरून करावं लागतं. लोक मालिका पाहतात म्हणून जाहिराती मिळतात, या कारणामुळे वाहिनीला मालिका सुरू ठेवण्यात रस असतो. गुंतता हृदय हे आणि एलदुगो यांच्या बाबतीतही हेच घडलं. दोष उगाच लेखक-दिग्दर्शकांच्या माथी >>
हे या मालिकेच्या बाबतीत अजीबात नाही पटले. पाण्यापेक्षा सॉफ्टवेअर आणि अमेरिकेविषयी सहज शक्य असूनही काडीचीही माहिती न घेता जे कै च्या कै संवाद लिहिलेले होते त्याचा दोष पुर्णपणे लेखक / दिग्दर्शकाकडेच असणार.

अजुन चादरात मी"
>>>>>>>>>>>>>>>>>

उदयची नवी म्हण दिसतेय बहुतेक....

"चादरी पडलं पवित्र झालं" Rofl Lol Light 1 (हा दिवा चादरीसाठी आहे याची नोंद घ्यावी Wink )

Pages