भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
आनंदयात्री, तो इमेल इथे शेअर
आनंदयात्री, तो इमेल इथे शेअर केल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद
सचिनवरची आणखी
सचिनवरची आणखी आर्टिकलं...
http://www.telegraph.co.uk/sport/cricket/cricket-world-cup/8381284/Steve...
http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/9423486.stm
भाऊ, मलाही तेच म्हणायचे आहे..
भाऊ,
मलाही तेच म्हणायचे आहे.. माझे विधान exactly that is a problem too! हे "ईतर" खेळाडूंसाठी आहे.. थोडक्यात ईतर खेळाडूंनी आपला खेळ सुधारावा, सामना जिंकण्यासाठी खेळावे- कोण देव आहे कोण मोठे आहे वगैरे गोष्टी भावनिक तत्वावर योग्य आहेत, त्या "वेगळ्या" ठेवायला हव्यात- तरच आपण सामन्यावर फोकस करू शकू.
असो.
छान आहे हर्ष भोगलेचा लेख.
छान आहे हर्ष भोगलेचा लेख.
भाऊ, कार्टून पण बेस्ट !!
<< मलाही तेच म्हणायचे आहे..
<< मलाही तेच म्हणायचे आहे.. >> योगजी, मग द्या टाळी ! हल्ली नीट न वाचताच घाईने प्रतिसाद द्यायची संवय तर नाही ना जडत आहे मला !!
>> कोण देव आहे कोण मोठे आहे
>> कोण देव आहे कोण मोठे आहे वगैरे गोष्टी भावनिक तत्वावर योग्य आहेत, त्या "वेगळ्या" ठेवायला हव्यात- तरच आपण सामन्यावर फोकस करू शकू.
५००% अनुमोदन! भावना बाजूला ठेवून खेळाचं विश्लेषण करून त्यातून शिकले तरच काही तरी होईल.
आनंदयात्री...... त्याच्या
आनंदयात्री......:-(
त्याच्या मनाची अवस्था काय असेल ह्याची कल्पनाच केली नव्हती!
रच्याकने,
माझा नवरा ती मॅच बघायला नागपूरला गेला होता, आणि दुसर्या दिवशी सकाळी विमानतळावर सचिन त्याला दिसला, अगदी जवळून! पण सुरक्षारक्षकाने त्याला थांबवून सही नाही घेऊ दिली.
युवीची मिळाली. झहीरपण होता.
तिघेही एकदम उदास आणि थकलेले वाटले, इति नवरा.
द. आफ्रिकेने आयर्लंडचा फडशा
द. आफ्रिकेने आयर्लंडचा फडशा पाडलाय !
भारताला वे.इंडीजविरुद्धचा २० तारखेचा सामना आत्यंतिक महत्वाचा. द.आफ्रिका वि. बंगलादेश व इंग्लंड वि. वे.इंडीज सामन्यांवरही भारताचं भवितव्य अवलंबून. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी पूर्ण हतबल झालेला न्यूझीलंड संघ "अ" गटात अग्रेसर !
वे. इंडीज विरुद्ध भारताची संघनिवड- विशेषतः गोलंदाजांची - म्हणजे धोनीची खरी कसोटी. आश्विनची घरची खेळपट्टी [चेन्नई], हरभजनच्या गोलंदाजीची बोथट झालेली धार, गेल व पोलार्ड कोणाला लक्ष्य करतील ही विवंचना, चावला त्या दोघांपुढे टिकेल का....... सारंच डोक्याला मुंग्या आणणारं. माझं मत चावलाच्याच बाजूने ... फक्त त्याने विश्वासपूर्वक उंची देवून गोलंदाजी करायला हवी, थोडा मार पडला तरीही !
गोलंदाजीची बोथट झालेली
गोलंदाजीची बोथट झालेली धार,>>>>>>> बोथट? आता परवा चांगली केली की गोलंदाजी?
दोन कारणे १. एक तर तुमच्याकडे
दोन कारणे
१. एक तर तुमच्याकडे काहीही पुरावा नाहीय.
२. या बाफवर विषयासंबंधी अॅडमिनने एक नियम तयार केला आहे तो तुम्ही मानत नाहीय. >>>
पुरावा नसताना सर्व पोलिटिशियन्स बद्दल बोंबाबोंब मारलेले लेख वाचा मायबोलिवरचे ! त्याचे उत्तर द्या मग पुढे बोला. नाहितर गप्प बसा. निम्मी मायबोली डिलिट करावी लागेल पुरावेच देण्याचा नियम लावायचा तर!
आणि जर तुम्हाला निकाल आधीच माहिती असेल, तर सामना सुरू होण्याअगोदरच इथे जाहीर करावा. >>>
पुन्हा तेच! मला निकाल माहित असता तर ! परत तेच! अहो बाइ, पोलिटिशियन्स बद्दल बोंब मारण्याआधी देता का तुम्हि पुरावा नेहमी ?
मैच फिक्स आहे हे माझे मत आहे आणी ते मांडण्यावर कोणी बंदि आणु शकत नाहि! धोनीने नेहराला शेवटची ओव्हर का दिली यावर जसे प्रत्येकाचे वेगळे मत असु शकते तसे माझेही मत आहे ! ज्यांना सहन होत नाहि त्यांनी वाचु नये!
मला समजत नाहि , कि एवढे होउनही पुन्हा पुन्हा मी लिहिलेले वाचले जातेच आहे. अहो कोणी compulsion केले आहे का तुम्हाला ? का मी तुम्हाला शिव्या दिल्या आहेत ? मी माझे मैच बद्दलचे मत व्यक्त करत आहे. पटले तर घ्या, नाहितर सोडुन द्या.
माझा नवरा ती मॅच बघायला नागपूरला गेला होता, >>
आता समजले खरे कारण ! पैसे गेल्याचे दुख मी समजु शकतो, पण त्याचा राग माझ्यावर काढु नका!
फक्त त्याने विश्वासपूर्वक
फक्त त्याने विश्वासपूर्वक उंची देवून गोलंदाजी करायला हवी, थोडा मार पडला तरीही !>> भाऊ नको.. उगीच सहा चेंडूवर सहा षटकार बघावे लागतील.. ते कॅरेबियन्स येडे आहेत.. तो पोलार्ड तर त्यांचा युसुफ आहे.. नि हा चावला कितीही उंची देत बसला तरी ते जागेवरून ठोकतील ह्याला... त्याचे नियंत्रण आजिबात नाहीये.. नि ही महत्त्वाची मॅच असल्याने आता प्रयोग करुन बघण्यात पॉईंट नाही..
आश्विनला पण आताच घेणे रिस्कच आहे.. एकातरी मॅचमध्ये त्याला आजमावून पहायला पाहिजे होते..
आपली मदार संपूर्णपणे फलंदाजीवर आहे.. चारशेच्या आसपास धावा करा नि विजय पक्का करा.. बस्स !
सध्या युसुफला बाहेर काढण्याचे वारे वाहत आहेत.. पण माझ्यामते तो मॅचविनर आहे.. त्यादिवशी त्याने मारलेला फटका काही वाईट नव्हता.. तर ग्रॅमीने एक उत्कुर्ष्ट कॅच पकडला होता.. तिथे कोणीच लक्ष दिले नाहीये... त्याला रैना हा चांगला ऑप्शन आहे म्हणा.. पण मॅचविनींगची वेळ आली तर युसुफच..
मला तर गंभीर बाहेर नि रैना आत.. हे बघायला आवडेल..
वे. इंडीज विरुद्ध भारताची
वे. इंडीज विरुद्ध भारताची संघनिवड- विशेषतः गोलंदाजांची - म्हणजे धोनीची खरी कसोटी>>मी धोनीला योगचा नंबर देऊ का ?
हा चावला कितीही उंची देत बसला तरी ते जागेवरून ठोकतील ह्याला... त्याचे नियंत्रण आजिबात नाहीये>>चावलाचा control नाही हि बाब खरी आहे.
फक्त त्याने विश्वासपूर्वक
फक्त त्याने विश्वासपूर्वक उंची देवून गोलंदाजी करायला हवी, थोडा मार पडला तरीही !>> भाऊ नको.. उगीच सहा चेंडूवर सहा षटकार बघावे लागतील.. >>>>> अरे त्यातच तर फिरकी गोलंदाजी रहस्य दडलय! भाऊ बरोबर सांगतायत, फिरकी मध्ये फटके पडण्याची शक्यता जास्त असते पण त्याला न घाबरुन आपला डाव (स्पीन आणि फ्लाईट दोन्ही) टाकत रहाणे आणि बॅट्समनला ला "डिसीव" करणे ह्यातच सगळं कौशल्य आहे.
मला आठवणारा फ्लाईट चा चांगला उपयोग करणारा गोलंदाज सकलेन मुश्ताक. अजुनही आहेत किंवा पण मला का कोणास ठाऊक सकलेनच जास्त आठवतो.
गंभीर बाहेर नि रैना आत.. हे
गंभीर बाहेर नि रैना आत.. हे बघायला आवडेल.. >>५००-१०००% अनुमोदन.
तसंच नेहराला बसवुन अश्विनला आत आणायला हवा, ही मॅच तशी महत्वाची आहे आणि अश्विन निदान ० वर आउट न होता किमान ५-६ रन तरी जोडु शकतो.
<< आता परवा चांगली केली की
<< आता परवा चांगली केली की गोलंदाजी? >> वैद्यबुवा, मला प्रामाणिकपणे वाटतं उपखंडातील खेळपट्ट्यांवर भज्जी आपला मुख्य 'स्ट्राईक बोलर' असायलाच हवा पण तो तसा अजिबात वाटत नाही.
त्याला फलंदाज आरामात खेळतात, रिव्हर्स फटके सहज मारतात; तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभवी गोलंदाज आहे, दहा षटकं टाकतो त्यामुळे विकेटही मिळवतो/मिळतात. पण दरारा निर्माण करणारा तो आतां राहिलेला नाही. ' दूसरा' टाकणंही त्याने सोडून दिलं असावं. तो जीव तोडून क्षेत्ररक्षण करतो, चेंडूची फेंक अचूक करतो ही मात्र जमेची बाजू. याउलट, चावला हा तौलनिक दृष्ट्या अननुभवी व जागतिक किर्तीचा अजून तरी नाही. तरी पण, लेगस्पिनची जादू अजूनही खंद्या फलंदाजांवरही चालते ही वस्तुस्थिती आहे व उपखंडातील खेळपट्ट्यांवर त्याचा फायदा भारतानं उठवणं हितावह. बाद फेरीत विरुद्ध संघाच्या फलंदाजांवरील दडपणामुळे चावला अधिकाधिक प्रभावी ठरूं शकतो, असं माझं तज्ञ नसूनही मत.
भारताला वे.इंडीजविरुद्धचा २०
भारताला वे.इंडीजविरुद्धचा २० तारखेचा सामना आत्यंतिक महत्वाचा. द.आफ्रिका वि. बंगलादेश व इंग्लंड वि. वे.इंडीज सामन्यांवरही भारताचं भवितव्य अवलंबून. >> ही आपली नेहेमीची रड आहे ना!! मी लहानपणापासून हे पाहत आले आहे. आपण आपला सामना एवढ्या रन्स नी जिंकला आणि 'अ' ने 'ब' ला एवढ्या फरकाने हरवले तर आपली पुढच्या फेरीत जायची शक्यता आहे वगैरे...
समथिंग्स नेव्हर चेंज.
वैद्यबुवा.. खरेय.. गटस लागतात
वैद्यबुवा.. खरेय.. गटस लागतात चेंडूला उंची द्यायला.. नि त्यातून निभावणे नि विकेट घेणे हे खरे कौशल्य.. पण सध्या कुठल्याच स्पिनर्सकडे ते दिसत नाहीये.. साकी माहीर होता त्यात.. मुश्ताक अहमद देखील.. मुंबईचा साईराज बहुतुले, रमेश पोवार तसेच होते.. पण आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांना चांगलेच चोपले नि दोघेही बाहेर..
तसंच नेहराला बसवुन अश्विनला आत आणायला हवा, >> हे तर आणखीन बरं होईल मग..
भाऊ + अजुन १ म्हणजे भज्जीची
भाऊ + अजुन १ म्हणजे भज्जीची आता स्लॉग ओव्हरमध्ये बॉलींग टाकण्याची जिगरही राहिली नाही अस वाटतय.
माझ्या मते धोनीने बॅटिंग
माझ्या मते धोनीने बॅटिंग ऑर्डर बदलण्याची चूक केली. तेव्हा इतकी काही गरज नव्हती. माझ्या मते ४५ च्या पुढची ओव्हर असेल तर त्याला वर पाठवला तर ठीक आहे. काय असेल ते कारण असो, पण बॅटिंग ऑर्डर बदलल्यावर बरेच बॅट्समन फेल झाले आहेत/होतात. उदा. युसुफला हॉलंड विरुद्ध पण वर पाठवला होता. तेव्हाही तो फेल गेला. तिकडे आयर्लंडचा केव्हिन ओब्रायन इंग्लंडच्या मॅच नंतर थोडा वर यायला लागलाय पण फेल जातोय.
>>> ' दूसरा' टाकणंही त्याने
>>> ' दूसरा' टाकणंही त्याने सोडून दिलं असावं.
हरभजनचा 'दूसरा' आता पहिल्यासारखा पडत नाही !
>>> तसंच नेहराला बसवुन अश्विनला आत आणायला हवा,
पोलार्ड फिरकीपेक्षा मध्यमगती गोलंदाजांना जास्त बदडतो. त्याच्याकडे फटक्यांचे वैविध्य नाही (खरं तर त्याला क्रिकेटीअर म्हणावे की नाही हीच शंका आहे). यष्टीसमोर पडलेला चेंडू ताकदीच्या जोरावर लॉन्ग ऑन किंवा मिडविकेटच्या डोक्यावरून स्टेडियममध्ये मारणे हा एकच फटका त्याला येतो. ऑफ साईडचे कोणतेही फटके (कट किंवा ड्राईव्ह) किंवा लेगसाईडचे इतर फटके (फ्लिक, ग्लान्स, पुल इ.) त्याला मारताना कधी पाहिले नाही.
अश्विन ऑफस्पिनर असल्याने त्याचे ऑफकडून लेगकडे जाणारे चेंडू म्हणजे त्याची चंगळच होईल. असे चेंडू तो सहजच लॉन्ग ऑन किंवा मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकावून देईल. त्याच्याऐवजी चावलाचे लेगस्पिन त्याला ऑफसाईडला मारणे फारसे जमणार नाही असे वाटते.
वैद्यबुवा, मला प्रामाणिकपणे
वैद्यबुवा, मला प्रामाणिकपणे वाटतं उपखंडातील खेळपट्ट्यांवर भज्जी आपला मुख्य 'स्ट्राईक बोलर' असायलाच हवा पण तो तसा अजिबात वाटत नाही.>>>>> मान्य! मी आधीही इथे लिहीलय मागे, मला आपल्या टीममधला कुठलाही बॉलर भेदक वाटतच नाही. फॉर दॅट मॅटर हे टी २० नावाचं भुत क्रिकेट जगतात आल्यापासुन कुठलेच बॉलर भेदक वाटत नाहीत, थोडक्यात सगळ्यांना कधी मधी (पुर्वी च्या गोलंदाजांपेक्षा नक्कीच जास्त) चांगलेच फटके बसतात.
उपखंडातील धावपट्ट्यांबद्द्ल पण अनुमोदन फक्त चावलाची फिरकी इतकी जादुई आहे की नाही ह्याबाबत शंका आहे (नजीकचा इतिहास बघता). बॉलर लोकांना खरच खुप अवघड झालय चमक दाखवायला पण त्यातच संधी आहे असही म्हणता येइल.
त्याच्याऐवजी चावलाचे लेगस्पिन
त्याच्याऐवजी चावलाचे लेगस्पिन त्याला ऑफसाईडला मारणे फारसे जमणार नाही असे वाटते.
>> पोलॉर्ड हे अजब रसायन आहे, फलंदाज नसुन काठीने कपडे बडवणारा धोबी वाटतो. त्याचे बरेचसे शॉट हे लेग साइड सिक्स असतात. तर लेगी ला विथ द स्पिन मारणा सोप पडल त्याला. तसच अश्विनचा कॅरमबॉलपण चालावा पोलॉर्ड विरुध्द.
चिमण | 15 March, 2011 - 13:48 >> अनुमोदन!!! उगाच नको ते एक्सपेरीमेंट केले धावा वाढवायला आणि अंगलट आले
>> लेगसाईडचे इतर फटके (फ्लिक,
>> लेगसाईडचे इतर फटके (फ्लिक, ग्लान्स, स्क्वेअर ड्राईव्ह, पुल इ.) त्याला मारताना कधी पाहिले नाही.
मास्तर, स्क्वेअर ड्राईव्ह लेग साईडचा फटका कधी पासून झाला? असो, तो सहसा शेवटी खेळायला येतो तेव्हा गोलंदाज शक्यतो स्टंप टू स्टंप बॉलिंग करायचा प्रयत्न करतो. सहज पणे मारता येऊ नये म्हणुन. अशा वेळी समोर मारणंच सोप्प जातं.
श्रीला संधी द्यावी. तो चांगली
श्रीला संधी द्यावी. तो चांगली टाकेल. दुसरा पर्याय परत नेहरा.
सचिन
विरू
गंभीर
रैना
युवी
धोणी
अश्विन
भज्जी
झहिर
पटेल
श्री
६+५ अशी निवड करावी. नाहीतरी ७ वा बॅटसमन घेऊन खेळूनही फक्त पहिले तिघे अन युवीच खेळतोय. मग पठाणला घेऊन काय करायचे, तो १० ओव्हर्सच टाकत आहे तर अश्विन टाकेल. आणि नेहरा ऐवजी श्री व विराटला बसवून रैनाला घ्यावा. नाहीतरी विराट एकदाच खेळला, रैनाने १० धावा केल्या की तो काय न विराट काय एकच म्हणावे.
पण धोणी ३ बदल नाही करणार असे दिसते.
हरभजनचा 'दूसरा' आता
हरभजनचा 'दूसरा' आता पहिल्यासारखा पडत नाही !>>>
पठाणला ठेवायला पाहिजे. विंडीज ला धुवेल तो.
धोनीने या सामन्यात सचिनला
धोनीने या सामन्यात सचिनला विश्रांती द्यावी.....
या सरप्राइज टॅक्टीस मुळे विंडिजला नक्की कुणाला आऊट करावे कळणार नाही.त्यामुळे आपल्या ४००+ धावा होतील आणि विंडिज मॅच हारतील...
शिवाय 'सचिन बाद झाल्यामुळे'
शिवाय 'सचिन बाद झाल्यामुळे' घसरगुंडी लागली असेहि होणार नाही!
आता अगदी बुडत्याला काडीचा आधार अशी अवस्था झाली आहे, तेंव्हा ही एक काडी!
पठाणला ठेवायला पाहिजे. विंडीज
पठाणला ठेवायला पाहिजे. विंडीज ला धुवेल तो.>>१०० % सहमत.
नेहरा ऐवजी श्री व विराटला बसवून रैनाला >> १००% सहमत.
पण धोणी नाही करणार.
माझं पण मत पठाण ला!! फक्त
माझं पण मत पठाण ला!! फक्त ह्यावेळी कमी स्कोअर करुन चालणार नाही. तो इथुन पुढे दर वेळेस चालला तर दर वेळी आपल्या "एज" असणार आहे.
' दूसरा' टाकणंही त्याने सोडून
' दूसरा' टाकणंही त्याने सोडून दिलं असावं. >> तो मधे "दुसरा" पहिला म्हणून टाकत असे नि मधे मधे आठवण आली कि ऑफ स्पिन टा़कत असे
वाट्टेल त्या combinations केल्या तरी जोवर पिच साथ देत नाहि (किंवा समोरचे डोक्यावर कफन बांधून उतरत नाहित) तोवर आपली गोलंदाजी भेदक वाटणार नाहि. We have to live with that. If you want, you can then play 5 ballers and take chance that 3 of them will hold their nerves or play 7+3 combination and hope 7 batsmen will make impossible scores.
पोलार्डला IPL final मधे कसे ठरवून बाद केलेले हे कोणालाच आठवत नाहि का ?
Pages