विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणे कप जिंकणार , बशीने पण पिता येत नाही Happy
कोणतीही मॅच सहज जिंकलो नाही , ना आयर्लॅन्ड बरोबर ,ना बांगलादेशबरोबर , ज्या England ला आयर्लॅन्ड ने अन बांगलादेशने हरवल त्यांच्या सोबतही नशिब म्हणुन बरोबरीत

आज साहेब आउट होतांना सांगुन गेलेले , 'खबरदार कोणी चांगले खेळले तर ' , सगळे माझ्या सारखा शेवटचा शॉट मारुन पटापट परत या Happy

<, शेवटच्या ओव्हरसाठी नेहरा>> गणूजी, या एका गोष्टीमुळे मला तुमच्या कँपात येण्याचा मोह होतोय ! Absolutely inexplicable !! बराच वेळ गोलंदाजी न केलेल्या नेहराला अचानक शेवटची ओव्हर टाकायला बोलावणं, हरभजनची एक ओव्हर शिल्लक असताना, म्हणजे कमालच !! नेहराला लय सापडायलाच, तीही सांपडलीच तर, तीन चार ओव्हर लागतात !

मस्त बोलला धोनी. नेहरा ला फुल डिफेंड केला! अर्थात स्वतःच्या निर्णय सुद्धा. ह्याच्या अंडर कमीत कमी भारत टीम सारखा खेळतो तरी.

म्हणे आम्ही तेंडुलकरसाठी कप जिंकणार आहोत. Biggrin
आपले बॉलर लोक बॅटींग ला येतात म्हणजे बिनपैशाचा ओवरटाईम करायला सांगितल्यासारखं करतात.

धोनी एका साईडला उभा आणि तिकडे एकेक जण प्रसाद घेऊन रांगेतून निघून जावं तसं निघून जात होता.
एकमेकांत काही बोलणं नाही चर्चा नाही. आनंद होता सगळा. तरी इंग्लंडच्या मॅचमध्ये त्याच अवघडजागी पोळलं होतं पण तरी पुन्हा तेच.
त्यांचे पाच दहा मॅचेसच खेळलेले लोक एवढं प्रेशर असून पण परफॉर्म करतात आणि आपले शंभराच्यावर मॅचेस आयपील वगैरे खेळून पण पाट्या टाकतात.

मला नाही वाटत कोणी पाट्या टाकतं. प्रेशर! प्रेशर खाली नीट खेळता नाही येत आपल्या लोकांना. नेहराचा भुगा त्या पायीच झालाय आज.
Actually, you know what. I take that back!
सॉरी!
गंभीर नंतर आलेल्या बॅट्समनानी खरच खराब कामगिरी केली. धोनी म्हणतो तसच मोठा स्कोअर करायच्या नादात विकेटी खर्ची घातल्या.

.

गणू,
अ‍ॅडमिनने टाकलेली ही 'नवीन' सूचना पहा आणि फिक्सिंग बद्दल येथे आपले ज्ञान पाजळू नका

सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

छान! आफ्रिकेचे अभिनंदन... यावेळी no choking..
ज्या प्रकारचे गोलंदाज घेवून आपण खेळत होतो, विशेषतः आफ्रिकेविरुध्ध हाच निकाल अपेक्षित होता. आपण चांगली झुंज दिली ईतकच!
(आता झक्की देखिल बोंबलतायत की अश्विन ला घ्या पण धोणी ऐकत नाय!)
आजच्या जाणवलेल्या ठळक गोष्टी:
१. साहेब अन सेहवाग ज्या प्रकारे आपादमस्तक झोकून क्षेत्ररक्षण करत होते- धोणीला संदेश देत होते बहुदा..
२. पॉ.प्ले. असो वा नसो- स्टेन म्हणजे आयपिल मधला कचरा गोलंदाज नव्हे याचे आपल्याला भान राहिले नाही. युसूफ पठाण ने पट्टा फिरवण्या आधी थोडा गृहपाठ करून यायला हवा होता.
३. धोणी ची फलंदाजी (?) आणि नेहरा ची गोलंदाजी यापैकी वाईट्ट काय हा चर्चेचा विषय होवू शकत नाही- अपनी अपनी पसंद है.

तात्पर्यः दिपीका पाडुकोण प्रेक्षकात असेल तेव्हा मुनाफ ला डेथ ओवर्स मध्ये गोलंदाजी देवू नये (आधी ईंग्लंड्च्या वेळी आता आफ्रिकेच्या वेळी...) किंबहुना गोलंदाजीच देवू नये..
obviously in that case fire Munaf!! We will not ask Dhoni to justify that decision Happy

धोनीने साहेबांना बॉलींग का दिली नाही...साहेब किंवा भज्जी सुद्धा चांगले ऑप्शन्स होते...अर्थात हाईंड साईट इज ऑल्वेज २०-२० म्हणा...

योग Lol लै भारी.

बाकी चोकर्स म्हणता म्हणता अफ्रिकेवाले जिंकलेच की? ते ही आधी हारलेले आहेत. असो. त्या घडीचा जो बादशा तो पुढे सरकेल येवढच. मरत मरत किंवा मोठ्या मार्जिनने जिंकण्याशी मतलब.

DHONI IS OVERCONFIDENCE NOW...

MURKH PANA CHA KALAS.....JE AAPAN YANCHYA VAR VISHWAS THEVTO...

DHONI IS OVERCONFIDENCE NOW...

MURKH PANA CHA KALAS.....JE AAPAN YANCHYA VAR VISHWAS THEVTO...

मस्त बोलला धोनी. नेहरा ला फुल डिफेंड केला! अर्थात स्वतःच्या निर्णय सुद्धा. ह्याच्या अंडर कमीत कमी भारत टीम सारखा खेळतो तरी. >>>> बुवा खरंच असं वाटलं तुम्हाला ?
मला तर उलट वाटत आहे.हे आता माझे मत आहे फक्त. ज्ञान कमीच आहे! पण मला वाटते टीम मधे एकमेकात वाद / कोल्ड वॉर्स नक्की आहेत. म्हणून बोलिंग्च्या बाबतीत अनाकलनीय निर्णय, "आम्ही वयस्क झाल्यामुळे क्षेत्ररक्षणात थकतो" असली (लेकी बोले टाइप, ) स्टुपिड कमेन्ट करणे अन विचित्र अ न रिअ‍ॅलिस्टिक खेळ बघायला मिळत आहे असे मला वाटत आहे सारखे. Sad

मै, आपल्या इथे क्रिकेटचा प्रचंड फिवर आहे आणि फिवर म्हंटला की इमोशन्स, तर्क वितर्क सगळेच आले. म्हंटलं तर सगळच बरोबर आणि म्हंटलं तर सगळं चुक. वाद आहेत की नाही हे मला माहीत नाही पण जो काही निर्णय घेतला त्याच्या मागे ठाम पणे उभं राहण्यात पण जिगर लागते. एक सहज म्हणून सांगायचं तर धोनीनी नेहरा ला बॉलिंग दिली, आता त्या वेळी तो कसा बॉल टाकतो ह्याला फक्त नेहरा जवाबदार आहे. ह्या आधी बाकी बॉलरांकडून सुद्धा चुका झालेल्या आहेत. ह्याच धोनीनी टि २० वर्ल्ड कप च्या फायनला ला जोगिंदर शर्मा च्या हाती बॉल देऊन वर्ल्ड कप घरी आणला होता.
थोडक्यात मॅच मध्ये फक्त निर्णय असतो तो आकलनीय किंवा अनाकलनीय होता हे ह्या बद्द्ल स्पेक्युलेट करायला तुझ्या माझ्या सारखे मोकळे होतात.
त्याचं पत्रकारांशी चालू असलेलं बोलणं मी नंतर बराच वेळ ऐकत होतो. कुठेही मुर्खासारखं विधान मला तरी ऐकू नाही आलं (हे तू वर दिलय ते विधान त्यानी कधी केलं? मी सिरियसली विचारतोय). तो व्यवस्थित सगळ्याची जवाबदारी घेत अगदी नीट एक्सप्लेनेशन देत होता. मी पुर्वी गांगूली, तेंडल्या, अझर ह्यांना सगळ्यांना बोलताना पाहिलय. कदाचित धोनी बोलण्यात जास्त मास्टरफुल असेल (आहे) म्हणुनही असेल पण आपल्या जे दिसतं त्यावरुन आपण जे तर्क काढतो ते खरच कितपत खरे असतात हे कोणास ठाऊक.

ह्याच धोनीनी टि २० वर्ल्ड कप च्या फायनला ला आर पी सिंग च्या हाती बॉल देऊन वर्ल्ड कप घरी आणला होता.>> तो जोगिंदर होता हो...नंतर तो गायबलाच

अर्थात प्रत्येक मॅच जिंकण काही शक्य नाही, पराभव होणारच. यातुन मात्र पुढील सामन्यत प्रगती केली म्हणजे मिळवलं.

धोनी ची ती मी लिहिलेली कमेन्ट हेडलाइन झाली होती की. इंग्ल्न्ड्च्या मॅचनंतर तो म्हणे याहून फिल्डिंन्ग चांगली होओणे अवघड आहे, नेटवर अजून सापडतील ती अर्टिकल्स
Dhoni said it would be tough to boost fielding standards due to the make-up of the squad, after a cumbersome fielding performance.

"I don't think we can improve the fielding very much because we have got quite a few slow fielders in the side," he said.
हे वयस्क खेळाडूंना इन्डायरेक्टली तो म्हणाला म्हणे. आजचे बोलणे नाही ऐकले.
असो. पुढच्या फेरीत गेलो आहोतच. बघू या पुढचे पुढे Happy

खरंय बुवा, आजची एक मॅच हरली म्हणुन नेहराला ठोकण चुकीच आहे. मागे त्यानच एक-दोन मॅच अशा प्रेशर सिच्युएशनमध्ये काढल्यात (न्युझी. व पाक विरुध्द).

३. धोणी ची फलंदाजी (?) आणि नेहरा ची गोलंदाजी यापैकी वाईट्ट काय हा चर्चेचा विषय होवू शकत नाही- अपनी अपनी पसंद है.
<<<< सध्याचा धोनी अ‍ॅज कॅप्टन सर्वात वाइट्ट आहे या दोन्ही पेक्षा !
खरच हाच तो टी२० वर्ल्ड कप चा कॅप्टन 'माही' वाटत नाहीये.. :(...

खरच हाच तो टी२० वर्ल्ड कप चा कॅप्टन 'माही' वाटत नाहीये>> actually तसे नाहि. बरेच घटक आहेत. तेंव्हा धोनी नवा होता, त्याची thinking process unknown होती. gut feeling वर त्याने घेतलेले निर्णय १००% बरोबर लागले होते. Who would have thought जोगिदर to hold his nerve ? Plus beginner's luck सारखा पण भाग असू शकतो. Every Captain is as good as his team-mates असे म्हणतात. बुवा वर म्हणाले तसे शेवटचा call चुकीचा असेल पण "भज्जीने ६ च्या rate ने आधी धावा दिल्या आहेत नि नेहराने अशा situation handle केल्या आहेत" हा विचार त्यामागे असू शकतो. It was 50-50 call. Nehra bowled rank bad (second) ball. He has habit of either drifting too much outside off or targeting way past leg stump to left handers.

आपली बॉलींग कमकुवत आहे हे लक्षात घेतात धोनीने ज्या तर्‍हेने बॉलर्स rotate केले होते that was commendable job. वर कोणी तरी किपिंग्बद्दल म्हटलय. असे म्हणतात "If one starts noticing keeper then keeper is doing bad job. Good keeper always goes unnoticed." धोनी may not be brilliant but he is doing reasonable job as wicket keeper. त्याचे alternatives - दिनेश कार्थिक, पियुष पटेल, do you really want to stretch your luck ? ;). my grievance against him is about his batting. But again at least he did not got out today. Maybe he was expecting others to play little more sensibly than they did.

आपण हरलो ह्याचे एकमेव कारण माझ्या मते आपल्या inning मधल्या शेवटच्या दहा overs हे आहे. We did not even batted allocated 50 overs, नुसत्या singles घेऊन सुद्धा अजून १० एक रन्स add होते तर ?

तसेच IPL मूळे बर्‍याच टिमना भारतीय विकेट्सची सवय होऊ लागली आहे, They can handle spin better than before now. They have gained experience of roaring crowd. They are getting used slower wickets. RSA has benefited more than any other team on that account. बहुतेक पूर्ण RSA चा संघ तीन वर्षे IPL खेळतोय.

गंभीर किंवा कोहली ह्यापैकी कोणीतरी एकच खेळवावा असे माझे मत. दोघेही innings builder आहेत. ३-४ पेक्षा खाली त्यांचे utilization प्रचंड कमी होते. Rather they are more of liability in lower middle order. Plus we need one guaranteed finisher and Rainaa seems to be ready to fill in those shoes. गंभीर किंवा कोहली मधे कोण ठेवावा ह्यामधे बराच गोंधळ आहे. गंभीर with raina and yuvi, we get nice enviable balanced combination of 3 each left- right handed batsmen. On the form alone, kohli seems to be in purple patch and should play. So take your pick. पठाण seems part of plan B. वरचे तिघे ज्या तर्‍हेने खेळताहेत नि if raina, yuvraj begin to finish games, पठाण ची गरज असेल का ? Maybe there's your
(only) chance to play five ballers. दिलेल्या पंधरांमधे ह्यापलीकडे फारसे डावे उजवे करायला वाव नाहि. आणि पंधरांबाहेर उरलेल्यांमधे ओझा वगळता आवर्जून आणावा असे कोणी सुचत नाही. fielding मधे मात्र रोहित शर्माची कमी भासते, रोहित, रैना,, युवि, कोहली, कार्थिक (not as a keeper) - This could be the best fielding combination we could play.

साहेबांची १३ शतके हरलेल्या सामन्यांमध्ये आहेत. हाही एक विक्रम आहे. आता सचिनच्या पंख्यांनी सचिनच्या शतकांमध्ये जास्ती आनंद शोधला तर त्यांना दोष देता येणार नाही. ती गोष्ट जास्ती भरवश्याची आहे भारताच्या जिंकण्यापेक्षा. शेवटी खेळ आनंदासाठीच तर पाहतात, आणि वारंवार भरवश्याच्या म्हशीला टोणगा (आय डी नव्हे) Happy पाहण्यापेक्षा भरवश्याची म्हैस पाहणे काय वाईट? त्यात अजून तरी कोणी स्वतः साहेबांवर फिक्सिंग चे आरोप तरी केले नाही आहेत. म्हणजे फिक्सिंग वर विश्वास ठेवणारे अथवा न ठेवणारे, दोघांनाही त्याचा आनंद घेता येईल. फार फार तर समोरचे फिक्स केले म्हणता येईल साहेबांचे शतक व्हावे म्हणून, पण साहेब तरी मनापासून खेळताना बघता येतील आणि त्याचा आनंदही घेता येईल.

सामन्याआधी धोनी बोललेला वरच्या फलंदाजांनी जास्तीत जास्त ओवर खेळाव्यात म्हणून. बहुतेक त्याला ५० ओवर म्हणायचे असेल जे सचिन आणि गंभीर नि ऐकले नाही म्हणून आपली तळाची फलंदाजी उघडी पडली Wink त्यात त्यांचा काय दोष?

असामी अनुमोदन !!!

मी तरी आता गंभीर ला बसवून कोहलीला खेळवावे अश्या मताचा आहे. काल scorecard बघून गंभीर चांगला खेळला असे दिसत असले तरी आपल्या फलंदाजीचे momentum घालवायला गंभीर कारणीभूत होता. त्याने न धड strike rotate केला ना आक्रमक शॉट खेळले. त्याचे प्रेशर येऊन सचिन ने स्लॉग शॉट खेळायला सुरुवात केली. आणि सेट झालेला असताना चुकीचा फटका मारून बाद झाला.
गंभीर चांगला फलंदाज आहे यात वाद नाही, पण आताच्या टीम मध्ये तो आणि कोहली फिट बसत नाहीत. एवढे फलंदाज घेऊन जर त्यांना खेळायला संधीच मिळत नसेल, तर त्यांचे काय लोणचे घालायचे आहे? आणि आता पर्यंत दोनदा अनुभव आला आहे, नुसती लांबच लांब फलंदाजांची फौज काही कामाची नाही. जर पहिले पाच लोक धावा करू शकत नाही तर ६वा आणि ७वा पण काही वेगळे दिवे लावणार नाही.

Chawala was sorely missed yesterday for his batting which was a component for his selection Biggrin

असामी, चांगले पर्याय मांडलेस. आता पुढच्या मॅच मध्ये बघू काय करतो धोनी. गंभीर किंवा कोहली मधला एकच कोणीतरी खेळवायची आयडिया आवडली. मी पठाण ला नक्कीच ठेविन पण. ह्या फॉर्मॅट मध्ये त्याच्या सारखे लोकं मॅच फिरवू शकतात. अर्थात असं म्हणत त्यानी सतत निराशा केली तर काही उपयोग नाही. ५ बॉलर्स ची आयडिया मलाही पटते पण I still think batsmen have a bigger stake in matches nowadays.

१४ ओवेर मध्ये ६२
लगे रहो
आपण होतो १२५ >>>>>> हो पण शेवट काय झाला ते बघितलंत नां? २८ धावांमध्ये सगळे हगवण लागल्यासारखे ड्रेसिंग रूममध्ये परत. Biggrin पण आपली टीम काय नं. १ टीम आहेच शेवटी.

म्हणे कप जिंकणार , बशीने पण पिता येत नाही
कोणतीही मॅच सहज जिंकलो नाही , ना आयर्लॅन्ड बरोबर ,ना बांगलादेशबरोबर , ज्या England ला आयर्लॅन्ड ने अन बांगलादेशने हरवल त्यांच्या सोबतही नशिब म्हणुन बरोबरीत>>>>>सही बोललात. माती खायचीच लायकी असणार्‍यांना काय पेढे मिळणार कां?

हरले आज.. Sad

मला सुरुवातीची थोडी आपली बॅटिंग पहायला मिळाली. नंतर सगळा वेळ प्रवासात गेला. नंतर बातम्यांमध्ये पाहिले की हरले.

<<
म्हणे आम्ही तेंडुलकरसाठी कप जिंकणार आहोत.
धोनी एका साईडला उभा आणि तिकडे एकेक जण प्रसाद घेऊन रांगेतून निघून जावं तसं निघून जात होता.
>>
चमन, Lol

नुसती फलंदाजी चांगली असून काय उपयोग? इतर सगळ्या संघांची फलंदाजीही आपल्याइतकी नाही पण तरीही चांगलीच आहे. गोलंदाजी वाईट आहे आपली. शेवटच्या १० षटकांमध्ये अजून कितीही रन झाले असते तरी ते आफ्रिकेने रनरेट सांभाळून केलेच असते. इंग्लंडविरुद्ध ३३८ करूनदेखील जिंकू शकले नाहीत.

नुसते बॅटिंगचे क्रिकेट थोडे कंटाळवाणे होते पहायला. बॅट्स्मन आणि बॉलर मध्ये जरा कश्मकश असली की पहायला मजा येते. नागपूरचे पीच तसेही पाटाच आहे म्हणा.

आपलं क्षेत्ररक्षण [ग्राऊंड फिल्डींग ] काल खूपच सुधारलेलं वाटलं; तशीच आपल्या गोलंदाजांची कामगिरी उंचावणे अत्यावश्यक आहे. फलंदाजीच्या बाबतीत आपण श्रीमंत आहोत [तिथं जी कांही पडझड दिसते, ती श्रीमंतीचेच नखरे आहेत ]. सात-आठ फलंदाज ही संकल्पना विसरून, जे आहेत त्यानी त्यांच्या नवलौकिकाप्र्माणे कामगिरी करावी ही रास्त अपेक्षा बाळगून गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करणं हे सर्वाधिक महत्वाचं . विरुद्ध संघ व खेळपट्टी यांचा पक्का कयास घेऊन उपलब्ध असलेले कोणते गोलंदाज खेळवावे हे निष्ठुरपणे ठरवणं, यावर आपली पुढची वाटचाल ठरणार आहे. [ काल चेंडू खाली रहात होते.भज्जीला आमलाची विकेट मिळाली कारण तो चेंडू ऊंची देऊन टाकला होता व बहुधा तो एकमेव चेंडू इतक्या ऊंच उसळला होता; युवराजने गेल्या मॅचला ५ विकेट घेतल्या म्हणून त्याच्या फ्लॅट चेंडूना कालही मिळाव्यात असली गणितं यापुढे महागात पडतील; धूर्तता नंतरच्या मुलाखतीत नव्हे तर मैदानात दाखवायला हवी, हेही धोनीने उमजून रहावे ]. कोणते गोलंदाज घ्यायचे व विशिष्ठ संघाविरुद्ध व खेळपट्टीवर त्यानी कशी गोलंदाजी करायची याची व्यूहरचनाच आपली विजेतेपदाची दिशा [ व दशा] ठरवतील.
असं म्हणून, मी माझी अक्कल पाझरणं आतापुरतं तरी आवरतं घेतों ! Wink

आतापर्यंतचा फॉर्म बघता भारत आफ्रिकेपुढे लोटांगण घालेल असं वातत होतं. पण चक्क आफ्रिकेच्या नाकतोंडात पाणी गेलेले बघून मला तरी बरं वाटलं.

आज कधी नव्हे ती बोलिंग पण चांगली पडली.

भारत जर ५० षटके खेळला असता तर?

हरभजनला शेवटचा ओव्हर मिळणे शक्य नाही. टी-२०च्या पहिल्या विश्वचषकात भज्जीने शेवटचा ओव्हर मला नक्को रे बाब्बा असं सांगून पळ काढला होता. याउलट सचिनने एकदा चक्क ५०वे षटक मागून घेतले होते. याला म्हणतात जिगर.
आता दोन्ही बाजूनी झहीर ४९-५० टाकु शकेल असा नियम बदलून घ्यावा(कोण रे ते झहीरला बिनभरवशाचा म्हणणारे? या स्पर्धेतले स्टॅट्स बघा)

कालिसने नवे केस उगवून घेतलेत का? द. आफ्रिकेत भारताविरुद्ध कसोटीत खेळणारा कोणीतरी वेगळाच वाटत होता. Happy

Pages