भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
मास्तुरे | 18 December, 2010
मास्तुरे | 18 December, 2010 - 13:14
२०११ च्या विश्वचषकासाठी भारताचे संभाव्य ३० खेळाडू -
महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर , सुरेश रैना , गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग , विराट कोहली , झहीर खान , हरभजन सिंह , आशिष नेहरा, युवराज सिंग , विराट कोहली , शिखर धवन , पियुष चावला , चेतेश्वर पुजारा , आर. अश्विन , रोहीत शर्मा , अजिंक्य रहाणे , श्रीसंत , इशांत शर्मा , विनय कुमार , रवींद्र जाडेजा , प्रज्ञान ओझा , मुरली विजय , सौरव तिवारी , वृध्दिमान सहा , अमित मिश्रा , प्रवीण कुमार , मुन्नाफ पटेल, युसुफ पठाण, पार्थिव पटेल
शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विनय कुमार, रविंद्र जडेजा, मुरली विजय, वृध्दिमान साहा यांना कुठल्या बेसिसवर घेण्यात आले ते काही समजले नाही. इरफान पठाण संघात नाही याचे जरा आश्चर्य वाटले. द्रविड सुध्दा नाही. पण तो असता तरी त्याला पहिल्या ११ त संधी मिळणे शक्य नव्हते.
भाऊ नमसकर | 18 December, 2010
भाऊ नमसकर | 18 December, 2010 - 22:08
<<शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विनय कुमार, रविंद्र जडेजा, मुरली विजय, वृध्दिमान साहा यांना कुठल्या बेसिसवर घेण्यात आले ते काही समजले नाही>> पहिल्या यादीला तरी "कोटा" पद्धत लागणारच ना !
[आणि मास्तुरेजी, तुमची विराट कोहलीवर एव्हढी मेहेरनजर कां ? बेधडक दोनदा घातलंय त्याचं नाव !!! ])डोळा मारा
षड्जपंचम | 18 December, 2010
षड्जपंचम | 18 December, 2010 - 22:13
शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विनय कुमार, रविंद्र जडेजा, मुरली विजय, वृध्दिमान साहा यांना कुठल्या बेसिसवर घेण्यात आले ते काही समजले नाही. >> 'महेंद्र-हट्ट' बेसिस ... फिदीफिदी
टाईमटेबल, लिंक्स वगैरे माहिती
टाईमटेबल, लिंक्स वगैरे माहिती वर टाकायची असेल तर सांगा.. मी अपडेट करेन..
अॅडमिन, २०११ क्रिकेट
अॅडमिन,
२०११ क्रिकेट विश्वचषकासाठी वेगळा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद!
<<अॅडमिन, २०११ क्रिकेट
<<अॅडमिन, २०११ क्रिकेट विश्वचषकासाठी वेगळा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद!>> १००% सहमत.
पुढील तीन महिने हा "एक धागा सुखाचा" !
अरे वा हे बेस्ट
अरे वा हे बेस्ट झाले....
फुटबॉल विश्वचषकानंतर आता इथे सगळ्यांची मैफिल जमली तर...
तुम्हाला भेटून आनंद झाला...
आता काय तीन महिने राहूया इथेच पडीक
वल्डकपसाठी तिकीट -१
वल्डकपसाठी तिकीट -१
वल्डकपसाठी तिकीट -२
टाईमटेबलची एक जबरी लिंक
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे..
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
त्या संपूर्ण चक्रावर उंदीर फिरवा.
जबरी लिंक. बघताना मजा आली.
जबरी लिंक. बघताना मजा आली.
सध्याच्या फॉर्मवरून खालील संघ
सध्याच्या फॉर्मवरून खालील संघ उपांत्य फेरीत येतील असं वाटतंय.
(१) भारत (२) श्रीलंका (३) द. आफ्रिका (४) इंग्लंड
वेस्ट इंडिज व न्यूझीलंडला अजिबात संधी नाही. ऑस्ट्रेलिया कदाचित परत भरात येऊ शकेल. पाकिस्तानचा संघ पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल आहे. ते एकदम तळाला जातील किंवा विश्वचषक जिंकू सुध्दा शकतील. पण त्यांच्या संघाचे मनोधैर्य सध्या पूर्णपणे खचलेले आहे. बांगलादेश एकदोन आश्चर्याचे धक्के देऊ शकेल. बाकी इतर संघांना काहिही संधी नाही.
धन्यवाद पन्ना, केदार... लिंक
धन्यवाद पन्ना, केदार... लिंक वर चिकटवल्या आहेत.
वा वा वा वा! ही लिंक सुरू
वा वा वा वा! ही लिंक सुरू केली हे बरे झाले..
विश्वचषकाचा इतिहास सांगतो कीं
विश्वचषकाचा इतिहास सांगतो कीं ज्या संघाना स्पर्धा सुरू असताना लय सापडते , तेच संघ चमकून जातात. भारत, श्रीलंका व पाकिस्तान अनपेक्षितपणे विश्वविजेते असेच झाले. या विश्वचषकासाठी मी तर न्यूझीलंडवरसुद्धा आधीच काट मारणार नाही; शिवाय, विश्वचषकासाठीच्या विकेट या दोन देशातील मालिकांपेक्षां खूपच सरस व "स्पोर्टींग"असाव्यात हा अलिखीत दंडकच आहे. त्यामुळे उपखंडात आधी खेळल्या गेलेल्या दोन देशातील मालिकांवरून विश्वचषकातील कामगिरीचा अंदाज बांधता येणार नाही.
भारताला फलंदाजीचा अर्थात मोठाच आधार आहे पण गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यात इतर बरेच देश खूपच सरस आहेत, हे नाकारता येत नाही. इतर देशातील फिरकी गोलंदाजीचा दर्जाही खूपच सुधारला आहे व
उपखंडातील फलंदाजानाही धाकात ठेवण्याची त्यांची कुवत आहे. जागतिक दर्जाचे ऑलराऊंडर संघात असणं, हा एक विश्वचषकासाठी मोठाच फायदा असतो; आपल्याकडे तसा एकही खेळाडू नाही व हरभजन [व कांहीसा ईशांत]सोडला तर आपले गोलंदाज फलंदाजीकडे गंभीरपणे लक्षही देत नाहीत, ही काळजी करण्यासारखी बाब आहे. आपलं हल्लीचं अति क्रिकेटही आपल्याला महाग तर नाही ना पडणार, ही भिती आहेच. पण आपले नवोदित खेळाडू प्रतिभावान आहेत, जिगरी आहेत, सांघिक व स्पर्धात्मक वृत्तीत तयार झाले आहेत ही मोठी जमेची बाजू; विश्वचषक जिंकण्याच्या सांघिक इच्छाशक्तीला संघात सचिनचं असणं हेही वरदानच आहे.
गेल्या फुटबॉल विश्वचषकानं आधीच्या सर्व अंदाजाना सुरूंगच लावले; बघूं हा क्रिकेट विश्वचषक काय करतोय !
छान लिंक आहे .. माझ्या मते
छान लिंक आहे .. माझ्या मते श्रीलंका या वेळी सगळ्यात जास्त मजबूत दावेदार आहे .
एक म्हणजे तिथल्या पिचेस वर उपखंडा बाहेरच्या टीम ना खेळणे कायमच कठीण गेलय .. त्यामुळे सेमिज मधे तर ते ऑलमोस्ट नक्कि आहेत .
दुसरे म्हणजे त्यांचा संघ balanced आहे . मॅथ्थ्यूज सारखा एक complete आणी तुशारा , कुलसेखरा सारखे अर्धेमुर्धे allrounder ही त्यांच्याकडे आहेत .
शिवाय सन्गा keeping करणार म्हणजे १ batsman Free !!!!
पराग धाग्याबद्दल
पराग धाग्याबद्दल धन्यवाद.
लंकेने पार्लमेंट मेम्बर जयसुर्याला वगळायची डेअरिंग केलेली आहे. पण चक्क दीड महिना आधी १५ जणांची टीम? भारतीय उपखंडातील बोर्ड असले काही करत नाहीत. हे बहुधा निगोशिएशन्स ची सुरूवात असेल. पूर्वी त्यांचे कोणीतरी मंत्री नंतर दबाव आणून जयसुर्याला परत टीम मधे आणत. आता तोच पार्लमेंटमधे आहे. तेव्हा अजून फेरफार होतील.
जयसूर्या जून २०११ मध्ये
जयसूर्या जून २०११ मध्ये वयाची ४२ वर्षे पूर्ण करेल. २००८ मध्ये त्याने एका मर्यादित षटकांच्या सामन्यात भारताविरूध्द शतक केले होते. त्यानंतर तो कधीही २० पेक्षा धावा करू शकलेला नाही (चू.भू.दे.घे.). तो २००९ व २०१० च्या आयपीएल मध्ये संपूर्ण फ्लॉप होता. त्याच्या बॉलिंगमध्ये काहीही दम राहिलेला नाही. फिल्डिंग मध्ये व थोडा वेळ जरी बॅटिंग केली तरी तो लगेच थकतो. त्याने खरं तर स्वतःहून २००७ च्या विश्वचषकानंतर सन्मानाने निवृत्त व्हायला पाहिजे होते. तेव्हा तो ३७ वर्षे १० महिन्यांचा होता. आता त्याला वगळण्यात डेअरिंग, धाडसी निर्णय वगैरे नसून एका संपूर्ण संपलेल्या थकलेल्या खेळाडूला संघातून काढून टाकले आहे. तो परत संघात येणे अशक्य आहे. अनेक तरूण आणि गुणी खेळाडू श्रीलंकेत असताना तो कशाला पाहिजे? या वर्षीपासून त्याला कोणताही आयपीएल संघ विकत घेणे सुध्दा अशक्य वाटते.
अरे वा मस्त धागा अन
अरे वा मस्त धागा अन लिंक...
ईथेच टाका तंबू!
(सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क कुणाकडे आहेत? थोडक्यात कुठल्या चॅनल्स वर दिसणार आहेत?)
अंतीम सामना भारत वि. श्रीलंका होईल असे वाटते आणि तेही मुंबईत म्हणजे सोने पे सुहागा.. (आत्ताच या सामन्याची तिकीटे बूक करायला हवी नंतर भारत अंतीम सामन्यात आला तर १०० पटीने काळ्या बाजारात तिकीटे विकतील!)
एकंदरीत निकाल काहीही लागो यावेळी साहेबांची जीवघेणी फलंदाजी संपूर्ण मालिकेत पहायला मिळेल अशी खात्री आहे- विश्वचषक पटकवून त्या दिवशी मुंबईत एक दिवसीय क्रिकेट मधून निव्रुत्ती जाहीर करणार्या साहेबांच्या सोनेरी कारकीर्दीचा तो एक परमोच्च बिंदू असेल...
काय वाटते?
(भारताच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये तब्बल एक आठवड्याचे अंतर आहे- हे जरा तापदायक ठरू शकते कारण एकदा आलेला टेंपो, लय अशाने तुटू शकते.)
prediction of winner
prediction of winner ....................
Feb 19, 2011 Bangladesh vs India,
Feb 27, 2011 India vs England,
Mar 6, 2011 India vs Ireland,
Mar 9, 2011 India vs Netherlands
Mar 12, 2011 India vs South Africa
Mar 20, 2011 India vs West Indies
>>(सामन्यांच्या प्रक्षेपणाचे
>>(सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क कुणाकडे आहेत? थोडक्यात कुठल्या चॅनल्स वर दिसणार आहेत?)<< भारतात हे सामने ESPN-Star Sports-Star Cricket वर दिसणार आहेत. त्यामुळे चांगल्या प्रक्षेपणाची अपेक्षा आहे
औंदा भारत नायतर दक्षिण आफ्रिका
क्रिकबझने तयार केलेले वेळापत्रकाचे चक्र फुटबॉल विश्वचषकादरम्यान एका वेबसाइटने तयार केलेल्या चक्राशी हुबेहूब मिळते (त्रिविक्रमाने दिलेली लिंक बहुदा)
rediction of winner
rediction of winner ....................
Feb 19, 2011 Bangladesh vs India,
Feb 27, 2011 India vs England
Mar 6, 2011 India vs Ireland,
Mar 9, 2011 India vs Netherlands
Mar 12, 2011 India vs South Africa
Mar 20, 2011 India vs West Indies
<<<<< सगळे सामने भारतच जिंकणार..
वा! वा! मस्त धागा हे वर्ल्ड
वा! वा! मस्त धागा
हे वर्ल्ड कप बघता याव म्हणुन मी हॉस्टेल सोडुन फ्लॅट आणी मुख्य म्हणजे टि. व्ही. /LCD घ्यायच्या नादात आहे :फीदी:
( भारतात वर्ल्ड कप असत त्या वर्षी TV/LCD च्या किमती वाढतात अस कुणी तरी मला सांगीतलेल )
त्यानंतर तो कधीही २० पेक्षा
त्यानंतर तो कधीही २० पेक्षा धावा करू शकलेला नाही (चू.भू.दे.घे.). तो २००९ व २०१० च्या आयपीएल मध्ये संपूर्ण फ्लॉप होता. त्याच्या बॉलिंगमध्ये काहीही दम राहिलेला नाही. फिल्डिंग मध्ये व थोडा वेळ जरी बॅटिंग केली तरी तो लगेच थकतो.
क्रिकेटच काय, इतरहि काही जमत नसल्याने तो राजकारणात शिरला.
संपूर्णपणे नालायक, असेच लोक राजकारणात चमकतात. जसे अमेरिकेत एफ डी आर, जॉर्ज (२ रा) बुश.
भारतात कदाचित् चांगले, कर्तबगार लोक असतील राजकारणात. त्याशिवाय का भारताची एव्हढी प्रगति झाली! क्रिकेटमधे चक्क पहिला नंबर, भारतीय माणसाला ऑस्कर! राजकारण्यांचीच कर्तबगारी.
जॉर्ज (२ रा) बुश >> पहिल्याचे
जॉर्ज (२ रा) बुश >> पहिल्याचे काय?
>> संपूर्णपणे नालायक, असेच लोक राजकारणात चमकतात. >> अमेरिकेत ते सीआयएचे प्रमुख म्हणुन देखील चमकू शकतात तुमच्या अमेरिकेचे काही सांगता येत नाही..
सगळे सामने भारतच जिंकणार.>
सगळे सामने भारतच जिंकणार.> शेठजी, कॉन्फिडन्स जबर्दस्त आहे तुमचा राव..
बांग्लादेशला ह्यावेळी २०० धावांनी तुडवायला पाहिजे.. बदला २००७ चा..
<<सगळे सामने भारतच जिंकणार.>
<<सगळे सामने भारतच जिंकणार.> इतकं पक्कं फिक्सींग आधीच झालंय !
अरे
अरे वा.....................फिक्सीन्ग अधिच झाले..........?????/
>>पुढील सामन्यात काही चमत्कार
>>पुढील सामन्यात काही चमत्कार घडतात का पाहूयात- त्यातला पहिला चमत्कार म्हणजे धोणी ने टॉस जिंकणे हा असेल <<<
भारतीय एकदिवसीय संघावर विश्वास ठेवा ना राव, आपल्याच घरात खेळणार आहोत.
धोनीने कीपिन्ग आणी बॅटिन्ग
धोनीने कीपिन्ग आणी बॅटिन्ग सोबत टॉस्सिन्ग चा सराव सुरु करायला हवा.
आज squad निवड्ले जाणार आहे
आज squad निवड्ले जाणार आहे हो.....................................
Pages