विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> भारताचा २०११ चा कप्तान (धोनी) २०१५ मध्ये कुठे असेल?

माझ्या घरी येणारे चहा प्यायला! आयला मास्तुरे, तुला नाही त्या का पंचायती?

या वेळचा माझा घोडा साउथ आफ्रिका! कोण कोण माझ्या बाजूने? करा हात वर!

प्रवीण कुमार नसण्याचा आपल्याला पहिल्या १० -१५ ओवर मध्ये तोटा होऊ शकतो. तो आणि झहीर खान चांगले ओपनिंग कॉम्बिनेशन असले असते. विशेषतः दोघे स्विंग करू शकतात. श्रीसंथ मध्ये सातत्याचा अभाव आहे. प्रवीण कुमार सुरुवातीला ब्रेक थ्रू देऊ शकला असता त्यचं स्विंग मुवमेंट मुळे.
सर्व टीम आता पॉवर प्ले शेवटी घेऊन हाणामारी करतात, त्यात आपले गोलंदाज कसे परफॉर्म करतात त्यावर बरेच अवलंबून असेल. त्या बाबतीत श्रीसंथ काय किंवा प्रवीण कुमार काय, फारसा फरक पडणार नाही Happy

Pitches relaid केली आहेत न काहि ठिकाणी ? ती कशी वागतील ह्याबद्दल काही वाचण्यात आले नाही. नाहितर दोन वर्षांपूर्वीच्या champions league सारखे व्यायचे Sad

या वेळचा माझा घोडा साउथ आफ्रिका! कोण कोण माझ्या बाजूने? करा हात वर!>> जर true sub continental pitches असतील तर नाही. Australia, I still believe its still strong ODI team (हसी नसल्याचा परीणाम जाणवेलच)

>>> या वेळचा माझा घोडा साउथ आफ्रिका! कोण कोण माझ्या बाजूने? करा हात वर!

चिमणराव, तुमचा घोडा आयत्यावेळी कच खातो हो.

उपांत्य फेरीत भारत, श्रीलंका व द. आफ्रिका हे तीन घोडे नक्की येणार. चौथा घोडा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व पाकिस्तान यापैकीच असेल. यात पाकिस्तान हा गडद घोडा वाटतो. तो कदाचित अंतिम फेरीत सुध्दा धडक मारेल.

या वेळचा माझा घोडा भारत!

माझा अंदाज :
उपांत्य फेरी : भारत, द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड
अंतिम फेरी : भारत, द. आफ्रिका
विश्वविजेता : भारत

1975 World Cup in England - Winner WI
1979 World Cup in England - Winner WI
1983 World Cup in England - Winner IND
1987 World Cup in India and Pakistan - Winner AUS
1992 World Cup in Australia and New Zealand - Winner PAK
1996 World Cup in India, Pakistan and Sri Lanka - Winner SL
1999 World Cup in England - Winner AUS
2003 World Cup in South Africa - Winner AUS
2007 World Cup in West Indies - Winner AUS

विश्वचषक इतिहासात स्वतःच्या उपखंडात जिंकण्याचा पराक्रम फक्त श्रीलंकेनच साधलेला आहे.

मंडळी श्रीलंकेच्या संघात मुरली आहे बरं, जोडीला अजंथा मेंडिस आणि मलिंगा. अँजेलो मॅथ्युज हा ऑलराउंडर आणि स्पर्धा भारतीय उपखंडात. मग मुरली मेंडिससमोर इंग्लंड आफ्रिका ऑसी किती चालतील? लंकेचे सामने पण त्यांच्या घरीच आहेत. तेव्हा लंका उपांत्य फेरीत नक्की.
आणखी दोन जागा भारत आणि आफ्रिका.
उरलेल्या एका जागेसाठी ऑसी पाकिस्तानमध्ये टॉस.

<<सर्व टीम आता पॉवर प्ले शेवटी घेऊन हाणामारी करतात, त्यात आपले गोलंदाज कसे परफॉर्म करतात त्यावर बरेच अवलंबून असेल. त्या बाबतीत श्रीसंथ काय किंवा प्रवीण कुमार काय, फारसा फरक पडणार नाही >> मला वाटतं ह्या विश्वचषकात अशी हाणामारी रोखायला मध्यमगती व ऑफस्पीनरपेक्षा लेगस्पीनरच अधिक उपयोगी पडतील.
<<<विश्वचषकाचा इतिहास सांगतो कीं ज्या संघाना स्पर्धा सुरू असताना लय सापडते , तेच संघ चमकून जातात. भारत, श्रीलंका व पाकिस्तान अनपेक्षितपणे विश्वविजेते असेच झाले. या विश्वचषकासाठी मी तर न्यूझीलंडवरसुद्धा आधीच काट मारणार नाही;>> ही माझी टिमकी मी नम्रपणे पुन्हा वाजवतो !!! >> विश्वचषकाचे कांही सामने होईपर्यंत तरी मी हीच टिमकी वाजवत रहाणार [ मायबोलीवर ही टिमकी किती वेळा वाजवायची यावर मर्यादा नसेल तर ! ]. Wink

बरं. आता आम्ही उगाच म्हणणार नाही कोण जिंकेल ते.

ज्या अर्थी स्पर्धेत भाग घेतला त्या अर्थी सर्वांना सारखीच संधि आहे, अगदी नेदरलँड्स किंवा कॅनडा ला सुद्धा.

<<बरं. आता आम्ही उगाच म्हणणार नाही कोण जिंकेल ते.>> झक्कीजी, इतरानीही आपापली टिमकी वाजवत रहावी, यातच तर खरी मजा आहे ! आणि, यांत शेवटीं मलाच टपली बसायची शक्यताच अधिक आहे !! Wink

विश्व चषक स्पर्धा चालू होण्यास आता एकच आठवडा राहीला आहे. यामुळे येथे आचार संहिता लागू होत आहे याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी. यातील कलमे पुढील प्रमाणे

१. भारतीय संघ तसेच त्यातील खेळाडू यांच्यावर आज पासून ते विश्व चषक स्पर्धा संपेपर्यंत टिका करण्यास सक्त मनाई आहे.
२. इतर संघ तसेच त्यातील खेळाडू यांची स्तुती करण्यास तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची टिमकी वाजवण्यास सक्त मनाई आहे.

या आचार संहितेची आपल्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना योग्य ती जाणीव द्यावी.

वरील पैकी कुठल्याही नियमाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तिस पुन्हा भेटल्यास होणार्‍या गंभीर परिणामांस सामोर जावे लागेल याची नोंद घावी.. भारतीय संघ काही कुटील लोकांच्या कारस्थानामुळे यदा कदाचित हरल्यास येथे टिमकी वाजवणार्‍या काफरांचा शोध घेऊन त्यांना पाकिस्तानात पाठवून योग्य ती शिक्षा देण्यात येईल याचीही नोंद घ्यावी..

विश्व चषक स्पर्धा भारतच जिंकणार असून इतर संघांना आम्ही फक्त आमच्या करमणुकी साठी बोलावले आहे हे आम्ही इतरांच्या सोयीसाठी आधीच नमूद करत आहोत. Happy

हे आधी कोणी टाकले असेल तर क्षमस्व. विश्वचषक स्पर्धेचे अमेरीकन वेळांप्रमाणे वेळापत्रक. (इंटरॅक्टिव)

http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

आणी स्टार स्पोर्ट्स अमेरिकेत या स्पर्धेतील सामन्यांची क्षणचित्रे दाखवणार असे वाचले (द्वारा: हर्ष भोगले टीवटिव)

http://www.sportzpower.com/?q=content/star-broadcast-cwc-highlights-n-am...

<<विश्व चषक स्पर्धा भारतच जिंकणार असून इतर संघांना आम्ही फक्त आमच्या करमणुकी साठी बोलावले आहे हे आम्ही इतरांच्या सोयीसाठी आधीच नमूद करत आहोत. >> इथल्या प्रत्येक पोस्टच्या सुरवातीला "मेरा भारत महान " लिहीणेही बंधनकारक होणार आहे का ? Wink

आपुन का घोडा भी भारत Happy
सध्यातरी सगळ्यात स्ट्राँग टीम वाटतीय भारत.... श्रीलंका आणि द. आफ्रिकेचे संघ सुद्धा चांगले आहेत!

पाकिस्तानला कमी लेखून चालणार नाही. त्यांच्या पुढे बरेच प्रोब्लेम होते आणि आहेत, पण एकंदरीत close scrutiny मुळे खेळाडूंना काही अवांतर गडबड करायची संधी नाही आहे. जर त्यांच्या मधले हेवे दावे सोडून ते एक दिलाने खेळले तर तो एक अतिशय धोकादायक संघ आहे.
माझ्या मते या स्पर्धेतला काळा घोडा पाकिस्तानच आहे.

>>>मला वाटतं ह्या विश्वचषकात अशी हाणामारी रोखायला मध्यमगती व ऑफस्पीनरपेक्षा लेगस्पीनरच अधिक उपयोगी पडतील.>>>
४० - ४२ ओवर नंतर पॉवर प्ले घेतल्यावर लेग स्पिनर ला किती संघ बोलिंग देतील शंका आहे. आणि सध्या कोणाकडेही दर्जेदार लेग स्पिनर नाही आहे. चावला पेक्षा ओझा परवडला असता बहुतेक. पण मध्यमगती किंवा तथाकथित तेज गोलंदाजांपेक्षा स्लो बोलर वापरणे शहाणपणाचे ठरेल असे वाटते.

गंभीर परिणामांस सामोर जावे लागेल याची नोंद घावी.. >>> अनुमोदन! काल रात्री शुक्रवारच्या चर्चेत दोन मित्रांचे भांडण झाले! एक साऊथ अफ्रिका म्हणत होता तर दुसरा ऑस्ट्रेलिया! मी आपला भारत! सचिन ६०० + धावा हाणनार ह्यावेळी! परत एकदा! (डबल टॉप!) आनदेव किसीकोभी. त्यातल्या त्यात इंग्लंड आणि आफ्रिकेच्या मॅच मध्ये मजा येणार!

भारत वि. ऑस्ट्रोलिया सराव सामना कोणी पहात आहे का ? सेहवाग मस्त खेळतोय
टिव्हीएन स्पोर्ट्स वर आत्तापर्यंत तरी ठिक दिसते आहे.

मुख्य स्पर्धेपुर्वी असा एखादा झटका आवश्यकच आहे... खर म्हणजे ही इष्टापत्ती आहे... आता मुख्य स्पर्धेत जरा सिरिअसली खेळतील Happy

झटका नाही तरी निदान खर्‍याखुर्‍या सामन्यात Happy युवी, गंभीर अन रैना ची डोकेदुखी कायम आहे- खेळवले तरी ते "बसतात" नाही खेळवले तर जागा घ्यायला दुसरे कुणी विशेष नाहीये.

गंभीर सातत्त्याने निव्वळ मटका लागल्यागत खेळतोय, युवी वर आताशा प्रिति झिंटा देखिल पैसे लावत नाही अन रैना अजूनही "कंफ्युज्ट स्टेट" मध्येच असल्यासारखा खेळतोय.. धन्य आहे!

तेव्हा परत एकदा विरू, साहेब, पठाण (खेळला तर) यांवरच सर्व अवलंबून दिसतय..
--------------------------------------------------------------------------------
बांगलादेश ने हरवले तर तो झटका अधिक फलदायी ठरेल?

Uhoh

जिंकला भारत. अचं कचं झालं?
मी फक्त ऑसीची पडझडच बघितली. पाँटिंगनी अर्धशतक केलं म्हणजे तो फॉर्मात आलाय का चाचपडत खेळला?

द्रविड ही भारताची फलंदाजीतलीच नाही तर स्लीप कॉर्डनमधली पण वॉल आहे. फिरकी गोलंदाजांनी दिलेले झेल पकडणारे स्लीप क्षेत्ररक्षक आहेत का आपल्याकडे? आजकाल जोर नुसता ग्राउंड फिल्डिंग वर.
गेले काही दिवस कर्स्टन गुरुजी कोहलीचा क्षेत्ररक्षणाचा सराव करून घेताहेत अशा बातम्या आहेत.आज घेतला एकदाचा झेल त्याने. अश्विनला जोशात थ्रो देऊन जायबंदी करायचा प्रयत्नही केला. पुढल्या विश्वचषकापर्यंत तयार झाला तरी खूप. आणि कोहली भारताचा कामचलाऊ यष्टीरक्षकही आहे म्हणे?
हे सराव सामने रेकॉर्डमध्ये मोजले जातात का?
गंभीरचा प्रश्न गंभीर व्हायच्या आत सुटावा. शेवटची एकदिवसीय मॅच कधी खेळला होता, आणि चांगला स्कोर कधी केला होता त्याने?

<<लेग स्पिनर या विश्वचषकात चमकतील असं मला राहून राहुन वाटतं; चावलाला ठराविक खेळपट्ट्यांवर व निवडक संघांच्या विरुद्ध खेळवणं खूप फायदेशीर ठरूं शकतं.>>आपल्या उपखंडातील हा विश्वचषक लेगस्पीनर गाजवतील, ही माझी टिमकी खरी होणार कीं काय ? आजच्या सराव सामन्यात चावलाने ९षटकात ३१ धावा देऊन ऑस्ट्रेलियाचे ४ बळी घेतले !

आपल्या उपखंडातील हा विश्वचषक लेगस्पीनर गाजवतील >> पीचेस तशी बनवली तर नक्कीच गाजवतील...आजच्या पीचला पॉटींगने जास्त व थोड्याफार प्रमाणात ढोणीने शिव्या दिल्या.

तरीपण टु अर्ली टु से...भारतीय टीम सराव सामना जिंकुन हवेत नाही जायला पाहिजे तसच माध्यमांनीपण जास्त उहापोह नाही करावा...

भारताचा जिंकण्याचा सराव ??? काय हे, सराव सामना जिंकला तर लगेच फायनल जिंकल्याच्या वर Sad
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7489772.cms

<<तरीपण टु अर्ली टु से...>> एकदम मान्य ! पण लय सापडायला सराव सामने खूपच उप्युक्त ठरतात हेही खरं.

अरे वा! जिंकला की भारत... सुरुवातीच्या पडझडीनंतर काही खरे वाटत नव्हते!
पण शेपटाने भारताची लाज राखली आणि पियुष चावलाने धोनीची.... भांडुनभांडुन घेतले होते ना त्याला संघात Happy
गुड कीप इट अप... या विजयाने संघाचे मनोबल नक्कीच वाढले असेल... पण हवेत जाउ नयेत म्हणजे मिळवली.

Pages