भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
>> अरे पण चिमण तू फायनल
>> अरे पण चिमण तू फायनल पर्यंत भारत धडक मारणार असे म्हणालास ना?
हो. तेव्हा मी एक तटस्थ निरीक्षक असतो. मी captain/coach असलो तर NZ विरुद्ध हरू शकतो असंच टिमला सांगणार नाहीतर टीम बाराच्या भावात जाईल ना?
इंग्लंडची हालत खराब १३५/५ (२८
इंग्लंडची हालत खराब १३५/५ (२८ ओव्हर)... आज विंडिज मैदान मारेल असे वाटतय.
ईंग्लंड २७ षटके
ईंग्लंड २७ षटके १३४/५...
यांना घरचे विमान पकडायची घाई लागलीये बहुतेक.
(रोच ची गोलंदाजी- साहेब अन विरू चे लक्ष असेल अशी आशा करुयात.. शिवाय कुणीतरी नविन "बिशू" नावाचा फिरकी (लेग स्पिन) गोलंदाज आहे. यावर धोणी म्हणेल मेरे पास "अश्विन" है- बेंच पे!)
पुन्हा एकदा ईंग्लंड ज्या प्रकारे खेळत आहेत, सामना विंडीज ला बक्षिस द्यायचा ठरवलाय वाटतं.
(ईं. ने आपल्याला, आपण आफ्रिकेला सामना "भेट" दिलेत.. आफ्रिका बांगाला ला देईल का? )
बाकी आजची खेळप्पटी फिरकीला अनुकूल आहे का? घरी गेल्यावर बघायला मिळेल.
इंग्लंडनी आयर्लँडला पण भेट
इंग्लंडनी आयर्लँडला पण भेट दिलाय की एक सामना. आज वेस्ट इंडीजला पण देतील बहुतेक. तसे झाले तर फक्त कोण कुठल्या नंबर वर येईल येवढेच बाकी राहिल ग्रुप ब मध्ये..
<<"बिशू" नावाचा फिरकी गोलंदाज
<<"बिशू" नावाचा फिरकी गोलंदाज आहे. यावर धोणी म्हणेल मेरे पास "अश्विन" है- बेंच पे!) >> योगजी, तें "बिशू" पोरगं लेग-स्पिन टाकतंय, सुंदर फ्लाईट देऊन ! च़कवतंय त्या साहेबाना चांगल्या विकेटवर !! आणि इथं तर "चावलाला घालवा"चा ढोल पिटतोय आपण !!!
बरं घ्या चावलाला. हे त्याचे
बरं घ्या चावलाला. हे त्याचे स्टॅट्स
३ सामने १६८ चेंडू १७४ धावा दिल्या ४ विकेट्स. धावा/विकेट :४३.५ इकॉनॉमी ६.२१
भाऊ, चावलाने नव्या पोराकडून
भाऊ,
चावलाने नव्या पोराकडून काहि थोडेफार शिकले तरी खूप आहे.. चावला बेंच वरच बरा.. अर्थात आजची मॅच बघून धोणी नक्कीच चावला ला परत आणेल यात शंका नाही.
असामी.. अरे न्युझिलंडच्या रॉस
असामी.. अरे न्युझिलंडच्या रॉस टेलरला पाहीलेस का पाकीस्तानविरुद्ध? >> मुकूंद, तुम्ही सर्व BB वाचलीत त्यात त्यात मी लिहिलेले मिस केलेत बहुतेक. Taylor असा अधून मधून खेळत असतो आणि leg side चा राजा आहे. पकिस्तानी line, length चा पूर्ण बोरा वाजला होता तेंव्हा. उमार गुल जेंव्हा बॉलींग टाकत होता तेंव्हा, आधीच्या Aus च्या मॅचमधे किंवा मागच्या IPL मधे टेलरला जखडून ठेवलेलेही पाहिले आहे. तो तशी inning खेळू शकतो का ? हो का नाही पण खेळले का ह्याचे उत्तर वेटोरी तरी छतीठोकपणे देऊ शकणार नाहि.
असाम्या- काय हे एव्हडी वाईट परिस्थिती आली का?>> योग I assume you have no stance on the actual question then. I do not hence the question.
स्पीनर्सची ही कामगिरी यापुढील सामन्यांत अधिकच भरीव होणं अपरिहार्य आहे.>>भाऊ त्यात चावलाचे नाव नाही तोवर उपयोग काय ?
बुवा हिराल पटेल सेहवागसारखा खेळतो असे पाँटींग म्हणाला ते ऐक्लत का ?
आसाम्या पाँटींगला सेहवागची
आसाम्या पाँटींगला सेहवागची भिती वाटतीये म्हणून तो कोणालाही तसे म्हणून सेहवागला कॉम्प्लेक्स द्यायचा प्रयत्न करतोय...
किंवा... आजकाल कुणीही ऑसीज ला
किंवा... आजकाल कुणीही ऑसीज ला ठोकाठोक करायला लागला की पाँटींग ला सेहवाग दिसत असेल (वॉर्न ला स्वप्नात सचिन तसे..)
ईंग्लंड किल्ला लढवतय... २५०
ईंग्लंड किल्ला लढवतय... २५० झाले तर या खेळपट्टीवर "स्वान" नक्की करामत करू शकतो. शिवाय ईतर गोलंदाजही चांगले आहेत ईं चे..
विंडीज पाठलाग करताना ऐन वेळी कोसळते हा त्यांचा इतीहास आहे.
तरी बरी झालीये की धावसंख्या..
तरी बरी झालीये की धावसंख्या.. १३५/५ वरुन २४०/९ वर नेलाय स्कोर. अगदीच एकतर्फी होईल असे वाटत नाही.
<< ३ सामने १६८ चेंडू १७४ धावा
<< ३ सामने १६८ चेंडू १७४ धावा दिल्या ४ विकेट्स. धावा/विकेट :४३.५ इकॉनॉमी ६.२१ >> मयेकरजी,
५ सामने ४२.५ च्या सरासरीने ५ विकेट, हे आहे स्टॅटिस्टीक्स आपल्या सर्वात अनुभवी स्पिनरचं, याच स्पर्धेतलं; आणि तो ऑफ-स्पिनर आहे, ज्याला चेंडूवरचं नियंत्रण ठेवणं लेग्-स्पिनरपेक्षां खूप सोपं असतं ! आत्ताच बिशूच्या आदल्या षटकात राईॅएटने आंखूड टप्प्याच्या बिशूच्या चेंडूवर दोन चौकार ठोकले; तरीही त्याला पुढची ओव्हर दिली गेली व त्यात त्याने राईटला झेलबाद केलं. त्याचं स्टॅट. आहे या मॅचचं- १०षटकं, ३४ धावा, तीन बळी ! [सर्व गोलंदाजांत कमी षटकामागे धावांची सरासरी ]. << बरं घ्या चावलाला > हें धोनीला किंवा मला आपण सांगून काय उपयोग ? आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं, तें मी मांडतो; चुकलोच तर बिनशर्त, प्रांजळपणे कबूलही करतो !!
ईंग्लंड किल्ला लढवतय... २५०
ईंग्लंड किल्ला लढवतय... २५० झाले तर या खेळपट्टीवर "स्वान" नक्की करामत करू शकतो>बहुतेक, RSA ची मॅच इथेच होती ना ...
असामी, प्रेजेनटेशन नाही
असामी, प्रेजेनटेशन नाही बघितलं मी, पण पटेल बद्दलची बातमी वाचली तेव्हा त्यात पाँटिंगचा तु म्हणतोयस तो काँमेंट वाचला. मी वाचलं तेव्हा मला तो थेट तुलना करतोय असं नाही वाटलं. हे बघ.
"If we happen to let (Sehwag) get off to a start like that in a big game, then it's going to be a whole lot harder to peg them back," the Australia skipper said. "We probably didn't bowl as well as we needed to."
कदाचित प्रेजेन्टेशन मध्ये केली असेल तुलना. असो. सेहवाग टाईप वाटतो खरी त्याचा खेळ, तडाखेबंद शॉट आणि जरा बेताचच फुटवर्क
तसा लहान आहे त्यामुळे भरपुर वाव असावा स्कील जरा तासुन घ्यायला.
बाकी, बिशुची बॉलिंग पाहिली. कधी कधी फ्लाईट देतो. बाकी बॉल खुप स्पीन करतोय असं नाही वाटत. आपल्याला त्रास होईल इतकी खत्रा बॉलिंग नाही वाटत. मला रसेल वगैरेची भिती आहे. आपले पीच पाटा असले तरी गुडलेंत पिच करुन चांगला उसळवतोय बॉल रसेल. आपले सगळे पंटर मला जरा कच्चेच वाटतात असले बॉल खेळताना.
बिशू मला आवडला. त्याची बोलींग
बिशू मला आवडला. त्याची बोलींग पाहायला मजा आली. गेलची बॅटींग बघायची आता.
वेस्ट इंडीजची सुरुवात तर एकदम
वेस्ट इंडीजची सुरुवात तर एकदम धडाकेबाज झाली आहे. योग म्हणतात तसं कोसळायला नको आता!
गेल बाबा पेटलेले दिसतायेत...
गेल बाबा पेटलेले दिसतायेत... असेच खेळावे.. म्हणजे आपला पुढच्या फेरीचा रस्ता पुढची मॅच हारलो तरी मोकळा...
ऑसम! गो गेल!! आपला ८७ चा
ऑसम! गो गेल!!
आपला ८७ चा विक्रम मोडणार वाटतं.
केदार.. उगाच गो गो करु नकोस.
केदार.. उगाच गो गो करु नकोस. आऊट होईल तो..
म्हणजे आपला पुढच्या फेरीचा
म्हणजे आपला पुढच्या फेरीचा रस्ता पुढची मॅच हारलो तरी मोकळा...>> :फिदी:, हेच ते, हेच ते... हीच सवय आपल्या टीम ने आपल्याला लावली आहे. हिरकु
मला आवडतो तो. भारताच्या वेळी
मला आवडतो तो. भारताच्या वेळी गेल गो बॅक असे लिहिन.
तुला टेनिस बाफ वरचे जिंक्स
तुला टेनिस बाफ वरचे जिंक्स माहित नाहीत म्हणून अस म्हणतोयेस केदार.. लालू आणि परागला विचार तिकडचे जिंक्स.. गो गो म्हणले की तो खेळाडू बाहेर गेलाच म्हणून समजायचं,,
बघ बघ.. हे लिही पर्यंत गेलाच
बघ बघ.. हे लिही पर्यंत गेलाच गेल...
हो दुसराही गेला.
हो दुसराही गेला.
आपली गो माता असते त्यामुळे
आपली गो माता असते त्यामुळे भारत खेळात असताना जिंक्सं वगैरे काही नाही.
अजून २-३ पडल्या अशाच तर काही खरं नाही!
तिसरी पण विकेट पडली राव
तिसरी पण विकेट पडली राव विंडीजची..
तिसरा गेला .. बुवा हे लिंक
तिसरा गेला ..
बुवा हे लिंक बघा
http://www.rediff.com/cricket/slide-show/slide-show-1-world-cup-2011-pat...
सगळे जग आता म्हणायला लागले
सगळे जग आता म्हणायला लागले की, मैच फिक्स होती. आजच्या सकाळमधेही आले. फक्त माबोकरांना तसे वाटत नाहि
आठ आठ तास फोनवर बोलणारे हे बहाद्दर मैच फिक्स करत नाहित ?
http://72.78.249.107/esakal/20110316/4870399959236896824.htm
प्रदिप आगरवाल आफ्रिकेच्या मैच च्या वेळेस भारतीय ड्रेसिंग रुम मधे होता! परत पाहा मैच
बघितलं रे असामी. मी कनेडियन
बघितलं रे असामी. मी कनेडियन पेपर मधुन घेतला होता तो संवाद. मी नव्हतं वाचलं/ऐकलं हे.
अजुन सारवान आणि पॉलार्ड आहेत आणि अॅवरेज ही जोरात आहे. जिंकु शकतात.
Pages