विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरले विंडीज...
वाहवा आता मज्जा येणार आहे...
भारत आणि विंडीज दोघांमध्ये चुरस...कोणाचा डाव जास्त लवकर कोसळतो याची...

विंडीज आपल्या "कोसळण्याच्या" लौकीकाला जागले.. Happy माझा अंदाज खरा ठरला..

पुढे थोडिशी चुरस आहे खरी. पण बहुतेक आफ्रिका बांगला ला हारवेल आणि भारत, विंडीज पैकी कुणिही जिंकले तरी फरक पडत नाही- दोघेही पुढे जातील कारण विंडीज बांगला चे ६ पॉईंट्स असले तरी विंडीज चा रन रेट खूप जास्त आहे. आप्ण हरलो तरी आपले ७ गुण आहेत. बांगला चे ६.

बांगला ने आफ्रिकेला हारवाय्चा चमत्कार केला तर मात्र आपली गोची होवू शकते. मग आपल्याला विंडीज विरुध्ध जिंकावेच लागेल. हारलो तर ईं. बरोबर ७ गुण आपले असतील. पण आपला रन रेट जास्त आहे.

आपण विंडीज विरुध्ध हरलो तरी आपला रन रेट ईं पेक्षा खूप जास्त आहे मग आपण पुढे जावू.

थोडक्यात आजच्या विजयाने आपल्याला अधिक फायदा झाला आहे, विंडीज चे नुकसान अधिक झाले आहे-प्रेशर त्यांच्यावर अधिक असेल.

आफ्रिका, भारत, ईंग्लंड, नक्की पुढे जातील. चौथ्या स्थानावर चमत्कार झालाच तर बांगला अन्यथा विंडीज (रन रेट च्या बळावर).

येस्स इंग्लंड जिंकले.. आपल्या गटात पण नेहमीचे टॉप संघ यावेत असे वाटतेय.. मग इथे ते नेहमीचे चार संघ नि इथे नेहमीच चार संघ.. मजा आयेगा मॅच देखनेकु !

दर वेळी होते तसेच अमका अमक्या विरुद्ध इतक्या इतक्या धावानी जिंकला, अमका अम्क्या विरुद्ध इतक्या धावानी हरला तर आपण उपउपांत्य फेरीत जाउ याच हालत मधे आपण आहोत. अशी परिस्थिती करुन आपण वर्ल्ड चँपियन म्हणवुन घ्यायला लायक आहोत का हा प्रश्न मला पडलाय.

विंडिज जिंकणार - भारताविरुद्ध - म्हणजे भारत ३ र्या नंबर वर - म्हणजे अहमदाबाद! Biggrin

भारत - पाक कसेतरि जमवणार हे नक्की

म्हणजे पाक आणी न्युझी जिंकणार शेवट्च्या मैचेस

अ गट
१. नुझी
२ पाक
३ औसी
४ लंका

ब गट
१. आफ्रिका
२. विंडिज
३. भारत
४. इंग्लंड

म्हणजे भारत- पाक - अहमदाबादला!
मग भारत - आफ्रिका सेमिमधे
आणी औसी - न्युझी/इंग्लंड

भारत - औसी फायनल

भारताच्या सर्व मैच interesting. भारताची पाक आणी औसी विरुद्ध होणारच ! नाहितर पैसे कोठुन येणार ? Biggrin पैसाच पैसा ! Biggrin

इंग्लंडला ऑस्ट्रेलिया दौर्‍यामुळे मी एक दावेदार समजत होतो पण इंग्लंडची टीम अतिशय टुकार आहे. सगळ्या मॅचेस रडत पडत हारल्या वा जिंकल्या. कुठेही येस्स फॅक्टर नव्हता. सा अ वि बांग्लाचे काही झाले तरी आता मजा येईल हे नक्की. अजुन काय पाहिजे?

माझी पोस्ट कोपी करुन ठेवा! Biggrin आणी पुढच्या विश्वचषकाच्या आधी शिकायला या माझ्याकडे क्रिकेट ! Biggrin

सगळ्या मॅचेस रडत पडत हारल्या वा जिंकल्या >> पण माझ्या मते तरी इंग्लंडने हा वर्ल्डकप इंट्रेस्टींग केलाय.. नाहीतर काहीच गंमत नव्हती या स्पर्धेत !! इंग्लंड टिम ऑफ टुर्नामेंटचे बक्षिस देण्यात यावे.. Proud

बाकी बांगलावासी पण निराश झाले असतील थोडे

गणु,
पण तुम्ही न्युझिलंड ला का टॉप वर ठेऊन ऑसीज ना ३ नंबर वर का टाकलय?
ऑसीज ची एक मॅच राहिलिय ना पाक विरुध्द ??

भारत - लंका हि असु शकते सेमिमध्ये. पण आफ्रिका जास्त वाटते! त्यात जास्त पैसा येइल! Lol

पण तुम्ही न्युझिलंड ला का टॉप वर ठेऊन ऑसीज ना ३ नंबर वर का टाकलय?
ऑसीज ची एक मॅच राहिलिय ना पाक विरुध्द ?? >>

पाक ऑसीज विरुध जिंकणार आणी न्युझीलंड लंकेविरुद्ध! point calculate करुन बघा असा निकाल घेउन !

आजच्या मॅचने ३ ऑप्शन ओपन केलेत,
http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/current/sto...

१ - बांगल हरतील सा.आ. कडुन आणि भारत विडीजला हरवल
यात बांगला बाहेर बसतील

२ - बांगल हरवतील सा.आ. ला आणि विंडीज भारताला
यात भारत विंडीजकडुन मोठ्या फरकाने हरल (१५० रन वा ३० ओव्हर राखुन) तर भारत बाहेर...
पण कमी फरकानी हरल तर इंग्लंड बाहेर.

३ - बांगल हरवतील सा.आ. ला आणि भारत हरवल विंडीजला
विंडीज घरी

४ - बांगल हरतील सा.आ. कडुन आणि विडीज भारतला हरवल
बांगला बाहेर.

सध्यातरी बांगला आरामात सा.आ. कडुन हरतील अस वाटतय. सो, सा.आ., भारत, विंडीज, इंग्लंड आत यावेत.

विंडीज चे फलंदाज आणि भारताचे गोलंदाज यांच्यात जबरदस्त मुकाबला होणार आहे. कोण आपल्या संघाचा गेम करतो जास्ती अवसानघातकी खेळ करून. यात जो कमी पडेल त्यांचा संघ जिंकेल. बघुया कोण जिंकतो आपल्या टीमला हरवण्यात Wink

इंगलंड, भारत, न्यु झिलंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका, पाकिस्तान ह्या टीम्स मला "कंपेरेबल" वाटतात, थोडक्यात एक मेकांशी खेळले की कोणीही जिंकु शकेल.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका चांगले खेळतायत आणि त्यांच्यात फायनल होण्याची दाट शक्यता आहे.

इंगलंड, भारत, न्यु झिलंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका, पाकिस्तान ह्या टीम्स मला "कंपेरेबल" वाटतात, थोडक्यात एक मेकांशी खेळले की कोणीही जिंकु शकेल.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका चांगले खेळतायत आणि त्यांच्यात फायनल होण्याची दाट शक्यता आहे.

<<< Hmmm.. somehow द. अफ्रिका मला नाही वाटत ऑसीज इतकी तुल्यबळ !
ती पण 'इंगलंड, भारत, न्यु झिलंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका, पाकिस्तान 'याच गृप मधली वाटते..

आपण दक्षिण अफ्रिकेला रडवलं त्यामुळे मी आपल्याला त्यांच्या आधी रेट करेन. कारण आपण हरलो ते निष्काळजीपणामुळे. जर उरलेल्या विराट, युवी, धोणी आणि पठाण ह्या फलंदाजांनी केवळ २०,२० धावा केल्या असत्या तर आपण ३६०+ राहिलो असतो. शिवाय आपल्या टुकार गोलंदाजांनी पण अफ्रिकेला २९६ मध्ये पाटा पिच वर देखील टस्सल दिली. ह्या दोन्हीमुळे आपण अफ्रिकेच्या पुढे आहोत.
इंग्लंडच्याही आपण पुढेच आहोत कारण तिथेही शेवटी आपण ठेपाळलो व ऑलमोस्ट अफ्रिकेसारखीच मॅच हातात आणली होती.
विंडीज अनप्रिडिक्टेबल आहे. आधी सारखेच. पाक बरी वाटतेय पण अफ्रिदी चालला नाहीतर (ते ही बोलींग मध्ये) तेही बरी टीम ह्याच कॅटॅगीरीमध्ये येतात.
श्रीलंका चांगली टीम आहे तर ऑस्ट्रेलिया बरी मध्ये मोडते.

कागदावर आपली टीम नेहमीसारखी वाघ आहे. पहिले तिघे तर वाघासारखे खेळत आहेत व झहिरही तशीच गोलंदाजी टाकतो. प्रश्न आहे मधली ऑर्डर बाकीचे कधी क्लिक होणार? कारण तसेही बॉलिंग आपली स्ट्रेन्थ नाहीच.

उद्या रात्री पासून धमाल आहे.
Fri Mar 18 2011 23:30 EDT 39th Match. Group B - Bangladesh v South Africa. Shere Bangla National Stadium. Mirpur
Sat Mar 19 2011 05:00 EDT 40th Match. Group A - Australia v Pakistan. R Premadasa Stadium. Colombo

आणि रविवारी आपली!

हायलाईट्स बघतोय सकाळचे. ट्रॉटनी रसेलचा कॅच घेतला ती सिक्स दिली!!! काय जबरी! इंगलंड केम आऊट अ विनर! इथे मॅच वळू शकली असती. इंडीज ला क्लियर चान्स होता जिंकायचा!

असाम्या, अरे मस्त फिल्डींग वगैरे लावली होती इंगलंडनी. तू म्हंटला होतास तसं धोनीनी पण चांगली लीड केली आपली बोलिंग इनींग. नेहरानी पागलपंती नसती केली तर खरच जिंकलो असतो. पुढे हे होता कामा नये!

~~ढकलपत्रातून आलेली चारोळी ~~

जेव्हा सचिन शतक मारतो | म्हणे भारत सामना हरतो |
प्रश्न तर असा पडतो | बाकी संघ काय करतो ||
धोनी काय गोट्या खेळतो | युवी काय भज्जी तळतो |
नेहराला तर कोणीही चोपतो | गड जातो सिंह बळी ठरतो ||

कालच्या सामन्यात मला जाणवलेलीं वैशिष्ठ्यं -
१. सारवान हा अनुभवी फलंदाज आहे व २२२ ला ७वी विकेट पडली तेंव्हा तो चांगलाच स्थिरावलेला होता; त्याने खालच्या फलंदाजांची कुवत ओळखून ७विकेट गेल्यावर सूत्र आपल्य हाती घेऊन स्वतःच्या खेळाचा पवित्रा बदलायला हवा होता. त्यावेळी फक्त २२ धावा जिंकायला हव्या असूनही सारवानसारख्या ज्येष्ठ खेळाडू इतक्या उदासिनपणे तिथं उभा असल्यासारखा वाटला, हें खूप खटकलं;
२. इंग्लंडच्या दोन स्पिनरनी [ त्यातला ट्रेडवेल अनपेक्षितपणे संघात आलेला] ८४ धांवा देऊन वे.इंडीजच्या सात विकेट घेतल्या एवढंच नव्हे तर विकेट अत्यावश्यक असलेल्या निर्णायक षटकात
इंग्लंड त्यांच्या भरवशावर जिंकू शकले. वे.इंडीजनेही या "मस्ट वीन" सामन्यासाठी बिशूसारख्या नवोदित लेग्-स्पिनरवर भरवसा ठेवला व बेनला सुरवातीची षटकं देणंही पसंत केलं ;
३. हातात आलेला सामना [ ७० चेंडूत ३४ धावा जिंकायला व चार विकेट शिल्लक] शिस्तबद्ध जिद्दीशिवाय जिंकता येत नाही याचं उदाहरण वे.इंडीजनी साकार केलं; खेळातील कौशल्याला दुर्दम्य चिकाटीची जोड असली तर हातातून गेलेला सामनाही खेंचून आणता येतो, हें इंग्लंडने दाखवलं .

भाऊ ही हाराकिरी विंडीजला नवी नाही, पहिला चॅम्पियन्स कप वि. सा.आ. व नुकताच झालेल्यातली ऑसीज वि.ची फायनल यात त्यांचा डाव गडगडलाय बर्‍याचदा.

अजुन एक म्हणजे त्यांचा कॅप्टन सोडला तर बाकी सिनियर खेळाडु उत्साही नाही दिसले मॅच बाबत. चंदरपॉलला न घेऊन अजुन एक चुक केली.

बहुतेक गेल आज आउट झालेल्याची कसर भारताविरुध्द भरुन काढेल

<< तर बाकी सिनियर खेळाडु उत्साही नाही दिसले मॅच बाबत. >> गौतमस्टारजी, मलाही जाणवलं; सारवान तटस्थ निर्विकारपणे शेवटी पडझड पहात उभा होता हे असह्य होत होतं. मला वाटतं वेगवेगळ्या बेटांतून आलेल्या खेळाडूंमधून एकजीव झालेला असा वे.इंडीज संघ जगापुढे आणणं क्लाईव्ह लॉईडनंतर कोणत्याच कप्तानाला साधलेलं नाही ! त्यातच, वे.इंडीजमधे आता क्रिकेटपेक्षा बास्केटबॉलचं आकर्षण खूपच वाढलंय त्यामुळेही तिथला क्रिकेटचा दर्जा ढांसळतोय, असंही म्हटलं जातंय.

भाऊ हरभजनचा इकॉनॉमी रेट ४.४१ आहे. चावलाचा ६.२१ पठाण ४.९६ युवराज ५.०९
भारतीय कसे मुरलीला विकेट द्यायची नाही म्हणून सांभाळून खेळतात तसे सगळे संघ हरभजनला सांभाळून खेळतात आणि दुसर्‍या बाजूला युवराजला विकेट्स देतात.

वे.इंडीजमधे आता क्रिकेटपेक्षा बास्केटबॉलचं आकर्षण खूपच वाढलंय >> हम्मम्म खरंय अर्थात क्रिकेटेतर खेळ जोपासल्याने त्यांचा फायदाच झालाय. उदा. उसेन बोल्ट

Pages