विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एजाज अहमद, रोशन महानामा, ख्रिस केर्न्स आणि सारवान भारताविरुद्ध हमखासच खेळायचे, कारण काय असावे माहित नाही.

हो. मजा येईल. त्या पठाणला लायसन्स देण्यापेक्षा विरूला लायनन्स दिलं ते चांगल केलं. मला अफ्रिकेसारखं पहिल्या २० ओव्हर्स सारखं "हायलाईट्स पॅकेज"परत बघायचं आहे. आणि साउदी / ओराम / नेथन मॅक्युलमला फोडलेला बघायचं आहे. Happy त्यामुळे मिरपूरला माझा पहिला प्रेफरंस.

वीरु वर बिटवीन द बॉल्स जेंव्हा कॅमेरा असतो, तेंव्हा तो डोळे मिटून दीर्घश्वसन करत असताना दिसतो. स्पेशली दोन एक बॉल डॉट गेल्यावर, ते बघताना खूप बरं वाटलं. जय विरू, जय सचिन!!

चमन, लै मोठी यादी होईल भारताविरुध्द हमखास खेळणार्‍यांची...

पण दुसर्‍या टीम्सनी अशी यादी बनवायची तर एकच ओळ लागंल, सचिन तेंडुलकर, बिचारा एकटाच कंसिस्ट्नंसीने खेळतोय..

absolutely फक्त ३ रिव्हुझ म्हणजे एकाचे ३ बरोबर चॉइस आणि दुसर्याचे ३ चुकीचे चॉइस मॅच आजुन
वाइट करु शकतात. हेच मी कितिदा सांगतेय. लंकेविरुध्ध ची मॅच आठवा.
यासाठीच UDRS ला विरोध आहे.

चिमण | 18 March, 2011 - 04:11
बुवा, पहाटे उठून मॅच बघतोयस काय?

भारताला डीआरएस विरुद्ध भरपूर खाद्य मिळालंय या स्पर्धेत पण! माझा टीमने रिव्ह्यू घ्यायचा की नाही यालाच विरोध आहे.

निलिमा - सचिनला य वेळेस लेग बिफोर मध्ये लाटलेले आहे. अनेकदा लगेच रिप्ले मध्ये दिसते पण काहीच करता येत नाही. त्यामुळे रिव्हू सिस्टीम आहे त्याला माझा विरोध नाही तर पाठींबा आहे. शिवाय दुसरी बाजू पण चांगली अशी की अपांयरने दिलेला निर्णय रिव्हूने पण कायम ठेवला तर उलट त्या अंपायरची क्रेडेबिलिटी वाढवते, व अशी सिस्टिम आहे त्यामुळे "अंपायर फिक्स" (LBW साठी) हा फंडाच राहत नाही. नाहीतर इथे लोक अंपायर फिक्स आहे म्हणून ओरडले असते.

ऑसीज आले तर विरू आणि सचिन दोघही पेटले पाहिजेत! विरू सुरवातीला आणि सचिन ३० ओव्हर्स नंतर!!
<<< सचिन -वीरु तर आहेतच.. पण युसुफ पठाण-युवी पब्लिक नी पेटायची जास्त गरज आहे !

वरच्या अ‍ॅनॅलिसिस वरुन आणि बाकीच्यांच्या रिप्लाईजवरुन असे दिसतेय की आपल्याला आपल्या टीम वर काँफिडन्स नाही तेवढा बाकीच्या टीम्स वर आहे डोळा मारा (म्हणजे ऑसि पा़क ला हरवेल, साआ बांगलाला हरवेल).

* प्रतिसाद

पन्ना | 18 March, 2011 - 14:29

मो, आपल्या टिमची नेहमीच 'कागदी वाघ' अशी अवस्था असते. :|

केदार QF नंतर डायरेक्ट फायनल ला पोचलास!!! डोळा मारा

* प्रतिसाद

केदार | 18 March, 2011 - 14:27

मो, अपून बोलरेला है ना की WI हो अपून मारेगा!

* प्रतिसाद

दीपांजली | 18 March, 2011 - 14:29

मला पण शक्यता नं २ वा ३ होईल असेच वाटतेय. शक्यता नं २ परवडली, पण लंकेविरूध्द कठीण आहे.
<<< हो गं पन्ना.. लंका नकोच.. आले तर खरच अवघड आहे ! ते इडन गार्डन चं पानीपत आठवतं अरेरे.............
न्युझिलंड चांगली ऑप्शन आहे स्मित.

* प्रतिसाद

वैद्यबुवा | 18 March, 2011 - 14:31

मो, त्या जोड्या तुल्यबळ टीमांमध्ये नाहीयेत म्हणुन. बाकी कॉन्फिडन्स कमी आहे हे ही खरच आहे म्हणा. स्मित

वरचे सगळे वाचुन ह ह पु वा! Happy

मो,पन्ना,वैद्यबुवा.... अस होण्याचे कारण म्हणजे आपली टिम नेहमी हरायला नको आपण या निगेटिव्ह दडपणाखाली व मानसिकतेने खेळते असे वाटत मॅच बघताना... ते आपण जिंकायलाच पाहीजे अश्या पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्युडने खेळले पाहीजेत या
मताचा मी आहे. तो कोण नॉर्थ पोलवर जाउन आलेला... आपल्या कोचचा मित्र... तो येउन आपल्या टिमला म्हणे मानसिकतेचे धडे देणार होता.. त्याच काय झाल? झालच तर तो कोण साउथ आफ्रिकेचा पॅटी अप्टन म्हणुन सायकॅट्रिस्ट आपल्या टिमला वेळोवेळी मदत करतो म्हणे... आपल्या टिमकडे बघुन वाटत नाही तो चांगल काम करतो त्या बाबतीत.... नाहीतर आपले खेळाडु त्याचा वर्ग चालु असताना उगाच टिवल्याबावल्या करत असावेत..:)

आपण चाहते आपल्या टिमशी भावनिक लेव्हलवर अतिशय गुंतलेलो असतो व साहजीकच आपण आपल्या टिमच्या निगेटिव्ह व्हाइब्स पटकन पिक अप करतो.... म्हणुन आपल्याला आपली टिम परफॉर्म करेलच की नाही याचा कॉन्फिडन्स वाटत नाही....(सचिन एक अपवाद!).....त्यातही आपल्या बॉलर्स बद्दल तर अजिबातच कॉन्फिडन्स वाटत नाही त्यांची देहबोली बघुन (एक झहिर सोडुन!).... मोट्ठे उदाहरण...नेहरा व चावला! Happy

बरोबर आहे मुकुंद Happy
काय करणार शारजा पासून ते मधली फळी घसरणे, फटाके लावायला गेलो असताना मियंदाद नी लास्ट बॉल सिक्स ठोकणं, सुशील दोशीची 'मनोवैग्यानिक दबाव' वाली कॉमेन्ट्री , कांबळीचे अश्रु हे सगळं बघतच वाढलीये आपली पिढी Proud

निलिमा - सचिनला य वेळेस लेग बिफोर मध्ये लाटलेले आहे>>>>>>>>> अरे आजचा मकल्लम नी घेतलेला कॅच पहा जयवर्देनेचा! बाकी सगळ्या चुका फिक्या वाटतील ह्याच्यापुढे. ट्रॉटनी घेतलेला कॅच सिक्स दिला तो बरोबर वाटला होता मला.

केदार
रिव्हू सिस्टीमला विरोध नाही UDRS मुर्खासारखे मुळ नियम बदलते ते आवडत नाही. ओरिजिनल lbw नियमात असे अंतर नाही कारण ते अन्तर जलदगती ज्यांचा चेंडुवर control नसतो आणि फिरकी गोलंदाजांसाठी वेग्वेगळे आहे.
उदा. २.५ मीटर चा नियम म्हणजे आता २.५१ मीटर वर जमिनीवरुन २ इंच जाणारा चेंडु मधल्या स्टम्प वर असेल तर नॉटाउट आणि २.४९ मीटरवर लेग स्ट्म्पला कॉर्नर वर चिकटत असेल आणि अम्पायर्ने आउट दिले असेल तरी निर्णय बदलायची गरज नाही से कसे काय? याऐवजी अम्पायरला रिव्हू घेण्याची सोय करुन निर्णय परत घ्यायला येता हवा आणि ते त्याच्याविरुद्ध काउन्ट करंणे पण योग्य नाही नाहीतर अम्पायर निर्णय बदलायला काचकुच करणारच.

शिवाय ३ नच अपिल का? समजा ४ चुकीचे निर्णय दिले २ अ संघाविरुद्ध आणि २ ब संघाविरुद्ध पण ३ नच अपिल म्हणुन जपुन अपिल करताना अ संघाने आपले चान्स घालवले तर २-२ एकदम २-० होणार.

आणि या २ घटनांचे काय
१) मॅकमिलनचा कॅच पहिल्या अम्पायरला नीट वाटला आणि त्याने आउट दिला. थर्ड अम्पायरला तो पुढुन नीट दिसला पण मागच्या कॅमेर्यातुन नीट दिसला नाही तर benefit of doubt द्यायचा. आता हा benefit of doubt आहे का benefit of Camera not capable आहे?
२) England चा रसेलचा कॅच स्पष्ट आत होता आता असे बघुन पण अम्पायरने चुकीचा निर्णय दिला तर काय?

रिव्हु सिस्टीम सोपी हवी. अम्पायरला हातात व्हिडिओ द्या जो १० मिनटे मागेपर्यन्त जाइल आणि अम्पायर प्रत्येक निर्णयाच्या आधी तो रिफर करु शकतो. काय वाटते?

सचिनला विशेषता lbw लाटलेले आहे. हे मात्र मान्य. मला रिव्हु सिस्टीम हवीए पण एकदम सोपी.

खरंय. भारतीय टीम जेत्यांसारखी मैदानावर वावरतंच नाही. हातची मॅच जातेच कशी(?) हे एक कोडं आहे. सलामीच्या जोडीने ७०-८० धावा केल्या कि संघाच्या कमीत्-कमी ३०० धावा व्हायलाच हव्यात हा सांघीक आत्मविश्वास नाही. मैदानात उतरलो आहोत ते जिंकण्यासाठीच हि भावना जोपर्यंत संघात उतरत नाही तोवर क्षमता असुन देखील हवे तसे रिझल्ट्स मिळणार नाहीत. याबाबतीत ऑसीज कडुन खुप शिकण्यासारखं आहे.

इन्ग्ल्न्ड भारी खेळतायेत. हे झाल्ट्मन्चे आर्टिकल सही आहे. तोन्डातुन घास काढायची इन्ग्ल्न्डला एवढी सवय झाली कि ते ... http://blogs.espncricinfo.com/zaltzman/archives/2011/03/_after_a_long_ga...

मस्त लिहीतो हा झाल्टमन. ग्रेस बद्दलची कॉमेन्ट वाचून तर हसून मेलो मी Happy

त्याचे अकमल व पाक वरचे तर जबरी होते. याच आर्टिकल वर बाजूला ती लिन्कही आहे ('ट्वेन्टी क्रेझी मिनट्स...')

एजाज अहमद, रोशन महानामा, ख्रिस केर्न्स आणि सारवान >>> अकीब जावेद, अँडी फ्लॉवर, चंदरपॉल, कलीनन... Happy

काल जुम्मा झाला...त्यामुळं आज बांगला जिंकण्याचे चान्स किती वाटतात??

तसंच भारतान पाकला जुम्म्यादिवशी किती वेळा हरवलंय? (१ - म्हणजे २००३चा वर्ल्ड्कप) ईतरवेळी माहिती आहे का कुणाला?

निलिमा-व्ही, छान लिंकबद्दल धन्यवाद. [ द.आफ्रिकाचे पाठीराखे ती छबी डब्ल्यूजी ग्रेसची नसून हशीम आम्लाचीच आहे, असंच म्हणतील !].

"ब" गटातील उलाढालींवर प्रकाश टाकल्याशिवाय माझ्यासारख्या आगाऊ एक्सपर्टला कसं राहवेल !
grupb.JPG

द.आफ्रिका १३५-२ [२८ षटकं]; भारताचा रक्तदाब आटोक्यात ठेवायचा आटोकाट प्रयत्न करताहेत द. आफ्रिकन्स ... निदान अजून तरी !!

Amezing tendlya!

वैद्यबुवा, लिंकबद्दल धन्यवाद.
म्हणूनच सचिनला देव मानणारे "अंध"श्रद्धाळू नसून डोळस रसिक आहेत !

भाउ झकास
वैद्यबुवा तेन्डल्याला बहुतेक बघायचे होते की आन्धळेपणे त्याचे मेट्स कसे खेळतात!

<< वैद्यबुवा तेन्डल्याला बहुतेक बघायचे होते की आन्धळेपणे त्याचे मेट्स कसे खेळतात! >> आज बावीस वर्षं तेंच बघतोय तो व "त्याच्या सेंच्युरींमुळे आपण कधी मॅच जिंकलोंय" असं विचारणार्‍यांचे बावीस वर्षं विचकणारे दांत बघत !! Wink

>>> मास्तुरे, इतर - भारत-विंडीज मॅच टाय झाली किंवा वॉश आउट झाली तर या समीकरणात काय होईल ते ही इंटरेस्टिंग असेल.

भारत-विंडीज सामना टाय किंवा वॉशआउट झाला तर दोघांनाही १ गुण मिळून भारताचे ८ व विंडीजचे ७ गुण होतील. आफ्रिकेचे आधीच ८ गुण आहेत, इंग्लंडचे ७ आहेत व बांगलाचे ६ आहेत. त्यामुळे बांगलाने आफ्रिकेला हरविले तर इंग्लंड बाहेर, बांगला - आफ्रिका टाय/वॉशआउट झाली तर बांगला बाहेर आणि आफ्रिकेने बांगलाला हरविले तरी बांगला बाहेर.

आज आफ्रिकेने बांगलाविरूध्द ५० षटकांत २८४ धावा केल्या आहेत. आफ्रिकेने स्टेन व मॉर्केलला विश्रांती दिली आहे. तरीसुध्दा २८५ धावा करून सामना जिंकणे बांगलाला अशक्य नसले तरी अवघड आहे. आज काहिही करून बांगला हरू देत अशी प्राथर्ना इंग्लंड व विंडीज करत असतील.

<< आज काहिही करून बांगला हरू देत अशी प्राथर्ना इंग्लंड व विंडीज करत असतील. >> Prayers appear to have been answered ! Bangla 34 -4 !!
Anyway, the Cup now enters the " Praying Stage ", for every team and supporters.
[ Sorry, my P.C. is refusing to change from 'English' to 'Marathi' ].

झालं! बांगला नी जरा अपेक्षाभंग केला. जिंकतील असं नव्हतं वाटत पण टफ देतील असं वाटून गेलं. होम क्राऊड असुनही काही फायदा नाही झाला. पुढच्या वर्ल्ड कप ला कदाचित आणखिन पुढे सरकतील.

वैद्यबुवा तेन्डल्याला बहुतेक बघायचे होते की आन्धळेपणे त्याचे मेट्स कसे खेळतात>>>>>> Happy
निलीमा , भा पो. मला फक्त वाटतं की टीम मध्ये कोणी मुद्दाम बेफिकीरीनी खेळत नाहीत. ते त्यांच्या कुवतीनुसार खेळत असतात. तेंडल्या बार खुपच वर सेट करतो आणि त्यामुळे आपल्या सारख्यांचे बाकीच्या खेळाडूंच्याबाबतीत अपेक्षा वाढतात.

इकडे ऑसीजचे तसे फार चांगले नाही चालले आहे आणि कमी स्कोअर झाला तर पाकिस्तान ला जमला पाहिजे गाठायला. ते ही काही कमी बेभरवशाचे नाहीत.

ब गटात उद्या भारताने विंडीजला हरविले तर भारत २ रा, इंग्लंड ३ रा व विंडीज ४ था असेल. जर विंडीजने भारताला हरविले तर विंडीज २ रा, भारत ३ रा व इंग्लंड ४ थे असतील.

आज पाकड्यांनी ऑस्ट्रेलियाला हरविले तर पाकडे १ ल्या, श्रीलंका २ र्‍या, ऑसीज ३ र्‍या व किवीज ४ थ्या क्रमांकावर असतील.

जर उलटे झाले तर ऑसीज १ ले, लंकन्स २ रे, किवीज ३ रे व पाकडे ४ थे असतील.

त्यामुळे आज ऑसीज व उद्या आपण जिंकले पाहिजे म्हणजे उपांत्यपूर्व फेरीत आपल्यासमोर किवीज येतील. कोणत्याही परिस्थितीत आपण ३ र्‍या क्रमांकावर जाता कामा नये. जर गेलो तर आपल्याला लंकेशी खेळावे लागेल. विश्वचषकाच्या इतिहासात आपण लंकेला एकदाच हरविले आहे तर लंकेने आपल्याला ५-६ वेळा हरविले आहे.

मास्तुरे, आपण बी २ किंवा बी ३ असणार हे बरोबर. क्वार्टरच्या ह्या पोजिशन्स करता मॅचेस अशा आहेत ना. थोडक्यात आजची ऑसी-पाकिस्तान मॅचचा निकाल लागु पर्यंत नाही ना कळणार?
A3 B2, A2 B3

आपण B2 असलो तर :
आज जर ऑसीज जिंकले तर A3 न्यु झिलंड असणार. आज ऑसीज हरले तर A3 ऑसीज असणार.

आपण B3 असलो तरः
आज जर ऑसीज जिंकले तर A2 श्रीलंका असणार. आज ऑसीज हरले तरी A2 परत श्रीलंकाच असणार (कारण पाक अ‍ॅ गृपात १ नं वर पोहोचणार)

(मी पोस्टं लिहुन संपे पर्यंत तुमची पोस्ट आली मास्तुरे) Happy

Pages