विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मगाशी दिलेल्या बातमीचा फिक्सिंग कडे रोख होता म्हणून डिलिट केली लिंक.

आता ब गटात "क्वार्टर" सिच्युएशन काय आहे? भारताने विंडीज ला हरवले तर बाकी काहीही झाले तरी आपण पुढे जातोय ना?

फक्त भारत हरला तर इतर बर्‍याच निकालांवर अवलंबून राहील असे दिसते. त्यातही विंडीज ने इंग्लंडला हरवले तर भारत आपोआप पुढे जातो असे वाचले.

<< धोनीने या सामन्यात सचिनला विश्रांती द्यावी..... >> मग मस्तपैकीं अख्ख्या संघाला विश्वचषक संपेपर्यंत तरी विश्रांतीच विश्रांति ! Wink
<< भारताने विंडीज ला हरवले तर बाकी काहीही झाले तरी आपण पुढे जातोय ना? >> गुण तक्त्यावरून तरी तसं वाटतंय. वे. इंडीजविरुद्ध जिंकलो तर आपले ९ गुण होतील व ते पुरेसे आहेत पुढे जायला.
<< आता ब गटात "क्वार्टर" सिच्युएशन काय आहे ? >> खरं तर "फुल बॉटल" सिच्युएशन आहे ! द.आफ्रिका सोडली तर ग्रुपमधे इतर "बॉटलड अप फॉर रीचींग द टॉप फोर " !! Wink

ब गटात आताची स्थिती : द.आफ्रिका ५ सामन्यात ८ गुण (८/५), भारत ७/५, विंडिज ६/४, बांग्लादेश ६/५, इंग्लंड ५/५, आयर्लंड २/५, नेदरलंड ०/५
उरलेले सामने : द आफ्रिका वि बांग्लादेश, भारत वि विंडिज, विंडिज वि इंग्लंड, नेदरलंड वि आयर्लंड.
भारत जिंकला तर काळजी नाही, हरला तर :
द आफ्रिका १०(बांग्लाला हरवून), विंडिज ८, बांग्ला ६. मग इंग्लंड विंडिज मध्ये पुन्हा विंडिज जिंकले तरी चिंता नाही, पण इंग्लंड जिंकले तर त्यांचे व भारताचे गुण सारखे. सध्या भारताचा नेट रन रेट +०.७६८ इंग्लंड +०.०१३. म्हणजे भारत तिसर्‍या स्थानी.

बांग्लाने आफ्रिकेला हरवले तर आफ्रिका बांग्ला प्रत्येकी ८.भारत (हरल्यास)७. विंडिज ८ किंवा १०, इंग्लंड ७ किंवा ५. इंग्लंडने विंडिजला हरवले तर पुन्हा नेट रन रेट. भारत व इंग्लंड यात मागे राहिलेला संघ बाहेर.

धन्यवाद भरत, भाऊ! म्हणजे बांगलाने आफ्रिकेला हरवले, विंडीज इंग्लंडकडून हरले पण त्यांनी आपल्याला हरवले तरच भारताला धोका आहे. या तिन्हीपैकी एक जरी झाले नाही तरी भारत क्वार्टर मधे नक्की असे दिसते.

थोडक्यात भारताने ईं कडून किंवा बांगलाकडून खेळावे Happy

असो.
विंडीज विरुध्ध साहेबांचे अजून एक शतक होईल असे ९९% वाटते- कारण साहेब या वेळी ५० षटके खेळायचे या निर्धाराने खेळतील (गेल्या दोन सामन्यातील गळती पहाता). विश्वचषक सुरू होण्यापूर्वी मी ईथे मत दिले होते की साहेबांनी प्रत्त्येक सामना ५० षटके खेळायचा या ईराद्याने खेळला तर (बाकीचे कपाळ्करंटे असूनही) आपण जिंकण्याची शक्यता ९९%. विरू ने त्या फंदात पडू नये- नैसर्गिक खेळ चालू ठेवावा.
विंडीज विरुध्ध मी गंभीर ला बसवून रैना ला खेळवावे या मताचा आहे. कोहलीला ३/४ क्र. वर खेळवावे. रैना फेल गेला तरी कोहली त्या क्रमांकावर मधल्या फळीला चांगले स्थैर्य देतो. शिवाय युसूफ खाली चालला तर मोठाच बोनस आहे- त्याने धोणी च्या वर फलंदाजीला यावे एव्हडाच काय तो बदल आवश्यक आहे. (युसूफ ची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण वगैरे गंभीर पेक्षा खूपच ऊजवे!)

चावला इस फ्लॉप, विंडीज वाले वाईट्ट मारतील. पण भज्जी, अश्विन एकत्र नको असतील तर अश्विन, चावला घ्यावे लागतील. पण धोणी भज्जी ला बसवण्याचा धोका निश्चीत घेणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भज्जी, चावला, झहीर, मुनाफ असतील असे वाटते. श्री देखिल बेभरवशाचा आहे- पेक्षा मुनाफ परवडला- निदान सर्वांचे ऐकतो तरी Happy
थोडक्यात या मह्त्वाच्या सामन्यात धोणी फार प्रयोग करेल असे वाटत नाही. गंभीर त्याचा फेवरेट असल्याने कोहली ला डच्चू अन रैना आत हेच पहायला मिळेल. बघुया..
-------------------------------------------------------------------------------
असाम्या,
धोणीला माझा फोन नं देण्यापेक्षा हर्षा ज्या पाट्या टाकतोय त्याचे पैसे ईकडे वळते कर :)- या बा.फ. वर त्याच्यापेक्षा आपण बरे लिहीतोय!
सन्नीभाय लिहीत नाही का? कुणाकडे लिंक आहे का? गांगुली कॉमेंट्री करतो चांगली पण फारच एकसूरी-लाल डबा (यस्टी) स्टँड वरील अनाऊंसमेंट/सूचना खिल अधिक भावनाप्रधान असते बा Happy

>>> विंडीज विरुध्ध मी गंभीर ला बसवून रैना ला खेळवावे या मताचा आहे.

मला वाटते की पठाणऐवजी रैनाला आत आणावे.

>>> (युसूफ ची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण वगैरे गंभीर पेक्षा खूपच ऊजवे!)

गंभीरच्या आणि पठाणच्या क्षेत्ररक्षणाच्या दर्जात फारसा फरक नाही.

रैना व गंभीर यांचीच तुलना करायची झाली तर रैनाची देहबोली अधिक आक्रमक व उजवी वाटते; विशेष म्हणजे फलंदाजी, क्षेत्ररक्षण व गोलंदाजीतही ही देहबोली तो समर्थनीय ठरवतो. अर्थात, क्र.तीनवरचा फलंदाज म्हणून मात्र गंभीर त्याच्यापेक्षा सरस वाटतो. त्यामुळे दोघातल्या एकाला निवडणं जरा कठीणच व धोक्याचं. पठाण ऐवजी रैना हा बदल त्यामानाने अधिक फलदायी ठरण्याची शक्यता वाटते.
कारण, वे.इंडीजच्या गोलंदाजीवर आपल्या फलंदाजीची वरची फळी खूप अडचणीत येईल आणि पठाणच्या भन्नाट टोलवाटोलवीची आवश्यकता भासेल ही शक्यता खूपच कमी आहे. पण........ छातीठोकपणे कांही सांगणे अवघडच !

<< ही आपली नेहेमीची रड आहे ना!! मी लहानपणापासून हे पाहत आले आहे. आपण आपला सामना एवढ्या रन्स नी जिंकला आणि 'अ' ने 'ब' ला एवढ्या फरकाने हरवले तर आपली पुढच्या फेरीत जायची शक्यता आहे वगैरे >> मो, भारताचीच नव्हे तर ऑस्ट्रेलीया वगळतां बहुतेक संघांची
सर्वच विश्वचषक स्पर्धांत बहुधा हीच "रड" असते. पण या स्पर्धेचं तेंच तर महात्म्य आहे. सांखळी स्पर्धेतच बाद होता होता इतर संघांच्या सामन्यांच्या अनपेक्षित निकालामुळे वांचलेले संघ मग विजेतेही होऊन गेलेत. आताची ही स्पर्धा अगदीं सुरू होण्याआधी पूर्णपणे खच्चीकरण झालेला न्यूझीलंडचा संघ आज "अ"गटात सगळ्यांच्या डोक्यावर जावून बसलाय ! याउलट, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील विजयरथावर स्वार होऊन रुबाबात आलेला इंग्लंडचा संघ बादफेरीतही पोचेल का अशी दाट शंका निर्माण झालीय !
सामन्यांचा आनंद घेणं, अंदाज लढवणं, ते कां चुकले याचं आपल्यापरीनं विश्लेषण करणं यापलिकडे विश्वचषकात निश्चित असं कांही नसतंच !! Wink

लोक हो! घाबरू नका! आपण वे. इंडिजला मारणार. वे. इंडिज इंग्लंडला मारणार. इति मी (या बाफचे ३२ वे पान पहा )

सगळ्यात मस्त कॉमेंट्री बीबीसी वर असते. इंग्लंडच्या सर्व मॅचेस आणि क्वार्टर फायनल पासून पुढच्या सर्व मॅचेसची कॉमेंट्री इथे ऑनलाईन ऐकता येते. (ही यूके बाहेर ऐकायला मिळेल की नाही ही शंका मला आहे. काही बीबीसी ब्रॉडकास्टस फक्त यूके साठी असतात म्हणून. उद्या इंग्लंड वे. इंडिज कॉमेंट्री इथे नक्की असेल. ती ऐकू येते आहे की नाही ते बघा, त्यावरून कळेल.)
http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/tms/default.stm

He has a better average and 100-plus strike rate batting at either No. 3 or 4>>Though it's good suggestion it pushes Kohli/Gambhir to no 4 or Yuvraj to number 5. I am yet not convinced that they can be effective at that spot, especially if they walk in around 35th overs or later Sad

योग, सन्निभाई नि शास्त्री नेहमीच्या पाट्या टाकताहेत विलोवर. You are not missing much.

होना रे हिम्या! जरा लढताहेत असं वाटलं होतं. अजूनही मी कॅनडालाच सपोर्टतोय! आणि ऑसिज विरुद्ध मी कुठल्याही टीमला सपोर्टतो! शिवाय कॅनडा दुबळे पण आहेत!

हे हे.. Happy . तसा माझा सपोर्ट पण कॅनडालाच आहे.. २११ ला ऑलाआऊट... थोडा जास्त झाला असता तर मजा आली असती.. ऑसीजची सुरुवातीला तरी गोची करायला पाहिजे कॅनडानी मग मज्जा येईल...

>> ऑसीजची सुरुवातीला तरी गोची करायला पाहिजे कॅनडानी
मग धमाल! बंगलोरला ते टाय झालेल्या विकेट वर खेळत असतील तर कठीण आहे. पाँटिंगला अजून फार खेळायला जमलेलं नाहीये. आणि शेवट पर्यंत जमलं नाही तर सोन्याहून पिवळं! Happy

अरे किती ते तुंबड्या लावाल...? तुम्ही ऑसीद्वेष कल्ट चे सदस्य दिसता? वि.कु. कडे तक्रार करायला पाहिजे. Happy

जल्लोष! जल्लोष! पॉन्ट्या ७ वर आउट!

@गौतम, माझी पोस्ट असंबद्ध आहे असं प्रामाणिकपणे वाटतंय का तुला? नुसत्या पोपटाच्या उल्लेखाने ती ती असंबद्ध होते का?

(क्रिकेटच्या नादात/प्रेमात/खुळात) हा धागा अ‍ॅडमिननी नाही अ‍ॅडमने सुरु केलाय हे तुमच्या कुणाच्या लक्षात आले नाहीये का ? Wink

अरे येवढ्यात जिंकले पण? मग पाँटिंग ७ वर आऊट झाल्याची बातमी इतकी उशिरा कशी काय आली? नेमकं काय झालं?

हा धागा अ‍ॅडमिननी नाही अ‍ॅडमने सुरु केलाय >> धागा अ‍ॅडमने सुरु केलाय, पण पान नं. ३० च्या पुढे जो वाद चालु झालाय त्यामुळं अ‍ॅडमीनने वर बोल्ड अक्षरात सुचना टाकलीये.

gupachupa2.JPG

माझा सुधारित अंदाज (आता इंग्लंड १/४ फायनल मधे येतील असं दिसत नाही आणि ऑसीजनी नेट रन रेट मधे मार खाल्ला म्हणून बदलला आहे) --

ए ग्रुप
-----
पाक - १० (पाकडे ऑसीजना मारतील कारण मॅच कोलंबोत आहे, ते स्लो पिच आहे)
श्रीलंका - ९ (नेट रन रेट जास्त असेल म्हणून)
ऑसी - ९
न्यूझीलंड - ८

बी ग्रुप
-----
द. आफ्रिका - १० (भारताला हरवल्यामुळे)
भारत - ९ (वेस्ट इंडिजला मारल्यामुळे)
वेस्ट इंडिज - ८ (इंग्लंडला मारतील म्हणून व नेट रन रेट जास्त)
बांगला - ६

क्वार्टर फायनल्स
-------------
Q1: A1->B4 ... पाक -> बांगला ---- ढाका --- पाक जिंकेल
Q2: A2->B3 ... श्रीलंका -> वेस्ट इंडिज---- अहमदाबाद - वेस्ट इंडिज जिंकेल
Q3: A3->B2 ... ऑस्ट्रेलिया -> भारत ---- ढाका --- भारत जिंकेल
Q4: A4->B1 ... न्यूझीलंड -> द. आफ्रिका ---- कोलंबो --- द. आफ्रिका जिंकेल

सेमी फायनल्स
-----------
Q1->Q3 ... पाक -> भारत ---- कोलंबो --- भारत जिंकेल
Q2->Q4 ... वेस्ट इंडिज -> द. आफ्रिका ---- मोहाली -- द. आफ्रिका जिंकेल

फायनलः द. आफ्रिका विरुद्ध भारत --- द. आफ्रिका जिंकेल.

Pages