विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाक - १० (पाकडे ऑसीजना मारतील कारण मॅच कोलंबोत आहे, ते स्लो पिच आहे)
>> नाही व्हायच बहुदा, कारण पाकची बॅटींग फार गंडलेली आहे. ऑसीजनी पहिले बॅटींग करुन कमी रन्स केले तरी पाक बॅटींग सपशेल लोळण घेईल ऑसी बॉलरपुढे...

बांगला - ६
>>हेही ९९% अवघड आहे...बांगला आफ्रिकेला मारु शकणार नाहीत, आफ्रिकेला स्वतः हराव लागेल.

बाकी निकालांशी (फक्त क्वार्टर फायनल्सच्या आधीचे) सहमत...क्वार्टरचा एकदा सामना ठरला कि सांगता येईल.

चिमण! एकदा जिंकली म्हणून लगेच दुसर्‍यांदाही. Happy अफ्रिका क्वार्टरला किंवा सेमीला हारणार. आपण मॅच हारली असली तरी स्टेन व मॉर्केलने खाल्लेला मार इतर लोक (टीम) विसरणार नाहीत.

उद्या इंग्लंड जिंकणार. मग विंडीजला करो वा मरो. मग भारत विंडीज मॅच! अजुन बी ग्रुप मध्ये रंगत येणार असे वाटते.

चिमण, दक्षिण अफ्रिकेचे १० बांगलादेश ला हरवल्यामुळे असतील ना?
माझा जरा वाईटाची तयारीवाला फलक
दक्षिण अफ्रिका- १० (बांगलाला हरवल्यामुळे)
वेस्ट इंडिज - ८ (भारताला हरवून आणि इंगलंडशी हरुन)
भारत - ७
इंगलंड - ७

बांगला नी दक्षिण अफ्रिकेला हरवलं तर मात्र मग आपली आणि इंगलंड्ची चौथ्या क्रमांकाकरता टाय! फुल्ल लोचा!

बांगला अफ्रिकेला हारवू शकत नाही.
बुवा तू लिहिल्या सारखे झाले तरी त्या परिस्थितीत सध्याच्या नेट रन रेट मुळे आपण पुढे जाऊ. आता तुला नेट रन रेटचे महत्व पटले का? Happy फक्त जिंकणे नाही तर कसे जिंकलो हे ही महत्त्वाचे ठरत जाते.
अर्थात इंग्लंडने पार धुव्वा उडवला तर मात्र त्यांचा नेट रन रेट चांगला होईल अन आपण बसू बोंबलत. नाही तरी होळी जवळ आली आहे. Happy बांगला हरवू शकत नाही पण अफ्रिका हे समीकरण लक्षात घेऊन त्यांच्या ग्रेटर गुड साठी हारू शकते कारण मग एक तुल्यबळ प्रतिस्पर्धी क्वार्टरस मध्ये अन पर्यायाने सेमी मध्ये नसणार.

हे फारच जर तर चालू आहे. Happy

ए ग्रुप
-----
ऑसी - ११
श्रीलंका - ९
न्यूझीलंड - ८ (रन रेट)
पाक - ८

बी ग्रुप
दक्षिण अफ्रिका- १० (बांगलाला हरवल्यामुळे)
वेस्ट इंडिज - ८ (भारताला हरवून आणि इंगलंडशी हरुन)
भारत - ७
इंगलंड - ७

क्वार्टर फायनल्स
-------------
Q1: A1->B4 ... ऑसी -> इंगलंड ---- ढाका --- ऑसी जिंकेल
Q2: A2->B3 ... श्रीलंका -> भारत---- अहमदाबाद - भारत जिंकेल
Q3: A3->B2 ... न्यूझीलंड -> वेस्ट इंडीज ---- ढाका --- वेस्ट इंडीज जिंकेल
Q4: A4->B1 ... पाकिस्तान -> द. आफ्रिका ---- कोलंबो --- द. आफ्रिका जिंकेल

सेमी फायनल्स
-----------
Q1->Q3 ... ऑसी -> वेस्ट इंडीज ---- कोलंबो --- ऑसी जिंकेल
Q2->Q4 ... भारत-> द. आफ्रिका ---- मोहाली -- भारत जिंकेल

फायनल भारत वि ऑस्ट्रेलिया!

हा एक अंदाज! बांगला नी उद्या दक्षिण अफ्रिकेला मारलं तर आपले वांदे आहेतच थोडेफार. बाकी न्यु झिलंड पण येऊ शकतं सेमीज ला वेस्ट इंडीज ऐवेजी.

केदार, तुझी पोस्ट आता पाहिली. बरोबर आहे. इट डज मॅटर.:)
पण जिंकल्यावर पॉईंट्स ही मिळतात, अर्थात सगळ्याच मॅच जिंकल्या तरच रन रेट बघायची वेळ येणार नाही आणि तसं भारताबाबत सहसा होत नाही. खेळताना सुद्धा जिंकणे हे डोक्यात घेऊन खेळता येतं पण रन रेटचा विचार करुन नाही असं मला वाटतं.

बांगला - ६. अरे गौतमा, त्यांचे ऑलरेडी ६ पॉईंटस आहेत.

>> दक्षिण अफ्रिकेचे १० बांगलादेश ला हरवल्यामुळे असतील ना?
करेक्ट!

>> चिमण! एकदा जिंकली म्हणून लगेच दुसर्‍यांदाही
पहिली आपण हरणार हे मी इथेच सांगितलं होतं. दुसरीही हरणार हे ही इथेच परत सांगतो.

मलाही पाकच्या बॅटिंगचीच भीती आहे. पण ऑसीजच्या फास्ट बॉलरांना स्लो पिचमुळे फारशी मदत मिळणार नाही.

>> आपण मॅच हारली असली तरी स्टेन व मॉर्केलने खाल्लेला मार इतर लोक (टीम) विसरणार नाहीत
इतरांकडे सचिन आणि सेहवाग नाहीयेत ना पण! Wink

>> उद्या इंग्लंड जिंकणार.
नाही कारण इंग्लंडला स्पिन खेळता येत नाहीये फारसा. आणि मॅच मद्रास मधे आहे. ते तर स्पिनला मदत करणारं पिच आहे. ऑइन मॉर्गन, बेल आणि कॉलिंगवूड हे तीनच स्पिन नीट खेळणारे आहेत. त्यातल्या कॉलिंगवुडला घेतील की नाही शंका आहे. घेतलं तरी काही फरक पडत नाही कारण तो फॉर्म मधे नाही.

अरे इंगलंडची डु ऑर डाय परिस्थिती असणार आहे उद्या. ते जिंकु शकतात. त्यात रॉयल वेडिंग पण तोंडावर आलय अगदी. Proud

अरे गौतमा, त्यांचे ऑलरेडी ६ पॉईंटस आहेत.
>>ह्म्मम्म...मी इंग्लंड हि मॅच हरल हे ग्रुहितच धरल नव्हत. उद्या इंग्लंड हरण्याचे चान्स जास्त आहेत. ते हरले तरी बांगलापेक्षा रनरेट चांगला राहिल त्यांचा. म्हणुन बांगला ऐवजी इंग्लंड येतील आत.

जर इंग्लंड आत आले, तर ते फायनल पर्यंत नक्की धडक मारतील...

शांतपणे विचार करा नि सांगा की जर statistically शक्य असेल तर,WI च्या मॅचमधे असे खेळले (जर त्यासाठि WI विरुद्ध हरलो तरी चालेल तरी हरकत नाही) कि quarter final NZ विरुद्ध खेळता येतील तर चालेल का ? Happy

What is important battle or war ? तुम्ही captain/coach असाल तर काय कराल ? Wink

शनिवारी सकाळी उत्तर देतो. तो पर्यंत सगळं क्लिअर असेल मग ते फक्त बॅटल आहे की तेच वॉर आहे हे कळेल. Happy

आपल्याला ऑबवियसली एज आहे न्यु झिलंड वर, त्यामुळे त्यांच्याशी खेळणं नक्कीच पसंत करेन पण अफसोस असं नक्की होईल की नाही ते सांगता येत नाही म्हणून सगळ्याचीच तयारी हवी.

बा गौतमा, इंग्लंडचे फक्त ५ पॉईंट आहेत आत्ता. ते उद्या हरले तर डायरेक्ट घरीच जातात.

मी captain/coach असलो तर असला विचारच करणार नाही कारण त्यात फार काही तथ्य नाही. कारण आपण quarter final NZ विरुद्ध हरू शकतो. on a given day a team can beat any other team. आपण ८३ मधे असेच जिंकलो होतो, आठवतंय का?

इंग्लंडचे फक्त ५ पॉईंट आहेत आत्ता. ते उद्या हरले तर डायरेक्ट घरीच जातात. >> पुन्हा एकदा माझी नजरचुक Happy चस्मा बसवावा लागणार बहुतेक...

हो हरले तर बाहेरचा रस्ता आहे गोर्‍यांना...पण गट फिलींग अशी आहे कि विंडीज हरल

उद्याची मॅच चुरशीची होण्याचे खुपच चान्सेस आहेत! हायलाईट्स वर तहान भागवावी लागणार. पुढे क्वार्टर्स वीक्डेज ला आहेत तेव्हा सुट्यांची गरज पडणार आहे! Happy

आपण बी३ किंवा बी ४ असू त्या मुळे आपण शेरे बांगला -मिरपुर किंवा सरदार पटेल, अहमदाबाद ला खेळणार. उगाच ट्रिविया काहीतरी Happy .

Q3: A3->B2 ... ऑस्ट्रेलिया -> भारत ---- ढाका --- भारत जिंकेल
----------
Q1->Q3 ... पाक -> भारत ---- कोलंबो --- भारत जिंकेल

<< चिमण,
सॉलिड आशावाद आहे :).
पण दुर्र्दैवानी खरच Q3: A3->B2 ... ऑस्ट्रेलिया -> भारत झालं तर मग तिथेच संपेल आपला खेळ ;(.
एकदम दणकुन नामुष्कीची हार वगैरे......... !!

बुवांचा अंदाज मला पण बरोबर वाटतोय.. या सिचुएएशन मधे जाउ आपण रडत खडत फिनाले ला आणि मग २००३ वर्ल्ड कप फिनाले च्या इतिहासाची पुनरावृत्ती !

डिजे, आपण आता पर्यंतच्या मॅचेस आपण दणकुन हारलेलो नाहीये आणि हीच जमेची बाब सुद्धा आहे. ह्याचा अर्थ चिमण म्हणतो तसं खरच कोणीही जिंकु शकतं त्यावेळी. वी वर ऑलवेज क्लोज! आपण अगदी कमकुवत वगैरे अजिबात नाही आहोत पण ऑसीज किंवा द. अफ्रिकासारखे खुपच तयारीचे (तरी द.अ नी टोला खाललाय एक) नाही आहोत. इथुन पुढे जर खरच जिगर लावून आणि हर्षा भोगले म्हणतो तसं देशा करता आणि तेंडल्याकरता खेळलो तर जिंकुही!

बुवा,
तसं खरच झाले तर चांगलेच आहे, पार्टीच करीन मग Happy
पण अजुनही २००३ विसरु शकत नाही.. इतकी अ‍ॅग्रेसिव्ह टिम इंडिया कधी पाहिली नव्हती..इतर मॅचेस इतक्या एक से एक झाल्या पण पहिली आणि शेवटची मॅच अगदी हत्यार टाकल्या सारखी :(.
बाकी त्या वेळी काय टिम स्पिरिट होतं.. गंगु नॉन प्लेयिंग कॅप्टन असला तरी त्याला ते माफ !

गंगु! Proud
मला तर झहिरची पहिली ओवरच आठवते, ३-४ वाईड/नो टाकले होते. संताप होत होता अक्षरशः! एक वेळ लुज बॉल पण खपू शकतो पण वाईड? वाईड आणि नो बॉल तर कंट्रोल करु शकतो ना बॉलर?

बुवा,
२००३ मधे पण पाक विरुध्द जिंकलो कि वर्ल्ड कप जिंकल्याच्या आनंदात होते लोक.. फिनाले चा सिरयसनेस गेलाच बहुदा !
सही झाली होती २७९ का अशाच काही तरी रन्स केल्या होत्या आपण, अता इथल्या पिचेस वर हा आकडा पुरेसा वाटत नाही जिंकायला.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध मागच्या तीन वर्षातील रेकॉर्ड चांगले आहे आपले - २००८ ची तेथील तिरंगी सिरीज आपण जिंकली, २००९ मधली भारतातील सिरीज २-४ ने हरलो, २०१० मधे तीन पैकी एकच मॅच झाली ती आपण जिंकलो.

२००३ मधे ऑसीज जबरदस्त फॉर्म मधे होते, विशेषतः पॉन्टिन्ग. आत्ता तेवढ्याच फॉर्म मधे सचिन आहे. सेहवागही आहे.

त्यामुळे मॅच इंटरेस्टिंग होईल.

सध्याच्या संघांपैकी कोणीही कोणालाही हरवू शकते अशी स्थिती वाटते Happy

आता कॅनडा वि ऑस्ट्रेलिया बघतोय. त्या हिरल पटेलचे शॉट भारी आहेत एकदम. टीनेजर आहे, एकदम पोर्‍या वाटतो. ब्रेट ली आणि शॉन टेट ला असला धुतला त्यानी. टेट ला स्क्वेअर्ला सिक्स हाणली!! अगदी कट वाटावा असा शॉट पण सिक्स गेली!! जबरी!
आय पि एल ला इजी पिक आहे हा पटेलभाऊ!

वेस्ट इंडीज आता खरा "क्रुशल फॅक्टर" आहे आपल्या गटात... अन क्रिकेटविश्वातला "मोस्ट अनप्रेडिक्टेबल फॅक्टर " पण ! चर्चेत इथंच कुणीतरी "लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजीस "चा संदर्भ दिला होता;
त्याचबरोबर आपल्या व वे.इंडीजच्या संदर्भात " पोएटिक जस्टीस "ची पण आपल्याला भिती आहेच; दैवानंच ठरवलं कीं १९८३ची भरपाई कॅरिबियन्सना आत्ताच करून द्यायची तर मात्र सचिनची इच्छाशक्ती, सेहवागचं तळपणं, गोलंदाजीत अनपेक्षित चमत्कार, धोनीचे डांवपेच ...आपल्यासारख्या करोडोंची आकांक्षा हे सर्वच पणाला लावून सावित्रीसारखा दैवाचा फासा उलटवावा लागेल ! वे.इंडीजचे आत्ताचे दोन्ही सामने डोळ्यात तेल घालून व हातात जपमाळ घेऊन पहाणं आलं ! ऑल द बेस्ट, इंडिया !!
untitledqqq.JPG

>>शांतपणे विचार करा नि सांगा की जर statistically शक्य असेल तर,WI च्या मॅचमधे असे खेळले (जर त्यासाठि WI विरुद्ध हरलो तरी चालेल तरी हरकत नाही) कि quarter final NZ विरुद्ध खेळता येतील तर चालेल का ?

What is important battle or war ? तुम्ही captain/coach असाल तर काय कराल ?

धोणी असाम्या च्या तोंडून बोलू लागला आहे काय? असाम्या- काय हे एव्हडी वाईट परिस्थिती आली का? च्यामारी असे प्लॅनिंग करून आपण जिंकत्/हारत असतो तर काय मज्जाच होती. ऐन वेळी प्लेनिंग करून यॉर्कर टाकणे पण अजून जमत नाही आपल्याला.... सामना जिंकणे/हरणे बहूत दूर की बात है! Happy

आज ईंग्लंड जिंकेल असे वाटते.
विंडीज बरोबर आपले काहिही होवू शकते. धोणी चे "हेलिकॉप्टर" ऊडते का पडते एव्हडाच प्रश्ण बाकी आहे. Happy

सुरुवातीपासुनच्या सगळ्या पोस्ट्स वाचल्या.. मजा आली

गंमत बघा.. सुरुवातीच्या बहुतेक पोस्ट्स मधुन भारतच कसा जिंकणार असा कल होता तो कल पार आता भारत निव्वळ उप उपांत्यफेरीपर्यंत पोहोचण्यासाठी..सावीत्री सारखा दैवाचा फासा उलटवला पाहीजे... वगैरे.. इथपर्यंत आला आहे..बघा ३ आठवड्यात भारताच्या टिमने आपल्या चाहत्यांना कशी रोलरकोस्टरसारखी राइड दिली ..:)

दिपांजली.. गंगु..:) पण त्याच्या अ‍ॅटिट्युड बद्दल एकदम सहमत... अग पण २००३ ला आपण फायनलला तरी गेलो .. मला तर अजुन २००७ आठवत आहे.. व तेव्हा पहिल्याच राउंड मधुन बाहेर पडल्यावरती ती सगळी कार्टुन्स आठवत आहेत.. ग्रेग चॅपेल चांभार, उथाप्पा.. सायकलवरचा नारळवाला वगैरे.. व त्यानंतर झालेला भयंकर मनस्ताप!

भुतकाळ जाउन दे... पण यंदा चिमण म्हणतो त्याप्रमाणे ऑन एनी गिव्हन डे टॉप ६ पैकी कोणीही कोणाला हरवु शकतो.. पण या वर्षी इंग्लंडने आयर्लंड व बांगला देशकडुन मार खाउन घेउन आपल्या गटात उगाचच वातावरण तंग केले आहे. नाहीतर या वर्षी वर्ल्ड कप ऑर्गनायझर्सनी असा काही फुल प्रुफ फॉर्मॅट केला होता की जेणेकरुन भारत,पाकीस्तान व श्रिलंका हे लोकसंख्येने अधिक असलेले देश पहिल्या राउंडमधेच बाहेर पडणार नाहीत.. पण इंग्लंड बांगलादेशकडुन हरल्यामुळे भारतावर शेवटचा सामना जिंकावाच लागणार असा घोळ झाला आहे..

अजुन एक गंमत म्हणजे आपण अजुन एकच सामना हरलो.. तेही दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाकडुन.. तेही अटीतटिची लढत देउन! तरीसुद्धा लोकांना आपण वर्ल्ड कप तर सोडाच.. पण वेस्ट इंडीज विरुद्ध जिंकुच असासुद्धा आजच्या घडीला आत्मविश्वास नाही.. त्याउलट इंग्लंड!... ते किरकोळ आयर्लंड व बांगला देशकडुन हरुनसुद्धा.. बर्‍याच पंडितांना असे वाटते की इंग्लंड जर आज वेस्ट इंडिज विरुद्ध जिंकुन उप उपांत्य फेरीत आले तर ते वर्ल्ड कप जिंकण्याच्या क्षमतेचे आहेत!

वैद्यबुवा... २००३ चा झहीर व आताचा झहीर... जमिन अस्मानाचा फरक आहे.. होपफुली इफ ही गेट्स अ चान्स टु प्ले इन द वर्ल्ड कप फायनल अगेन... परत तसा मुर्खपणा तो करणार नाही.आणी.,,,"बांगला नी दक्षिण अफ्रिकेला हरवलं तर मात्र मग आपली आणि इंगलंड्ची चौथ्या क्रमांकाकरता टाय! फुल्ल लोचा!".. हे तुहे वाक्य वाचुन ह.ह.पु.वा.!..:)

असामी.. अरे न्युझिलंडच्या रॉस टेलरला पाहीलेस का पाकीस्तानविरुद्ध? अशी टोलेबाजी मी कित्येक वर्षात पाहीली नव्हती.. त्याने तसा अवतार जर परत धारण केला तर न्युझिलंड उप उपांत्य फेरीत खुपच महाग पडेल.. वैद्यबुवाच्या शब्दात.. एकदम लोचा होउन जाइल! Happy

काही म्हणा.. तेंडुलकर मस्तच खेळत आहे.. बाकी सेहवागचा पुर्ण ५० षटके टिकुन राहायचा मनसुबा फक्त पहिल्याच सामन्यापुरता होता असे वाटत आहे.. कोणीतरी त्याला त्याच्याच शब्दांची आठवण करुन द्या रे.. माझ्या मते गंभिरला बसवायला पाहीजे व रैनाला खेळवले पाहीजे... व कोहलीला ३ नंबरवर सातत्याने येउ द्यावे.. भले जरी स्कोर २७० ला १ का असेना! युसुफ पठाणचा खेळ अजुनही मटकाच आहे.. होपफुली महत्वाच्या सामन्यात तो लागावा अशी अपेक्षा!

तिथे मायकेल हसी संघात आल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पारडे एकदम जड झाले आहे. श्रिलंकाही योग्य वेळेला मोमेंटम घेत आहे...

असे सर्व असल्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप विनर प्रेडिक्ट करणे खुपच कठिण आहे...

बाय द वे... विलो टी व्ही चे हाय डेफ प्रक्षेपण लाजवाब!

रार.. कुठे आहेस? की एकदम आपण वर्ल्ड कप जिंकल्यावरच अवतरणार आहेस?

>>रार.. कुठे आहेस? की एकदम आपण वर्ल्ड कप जिंकल्यावरच अवतरणार आहेस?
मला वाटतं ती "खतरू बॉलिंग" च्या शोधात हरवली.. Happy कुणितरी तिला स्टेन चा फ नं द्या रे!

>>माझ्या मते गंभिरला बसवायला पाहीजे व रैनाला खेळवले पाहीजे... व कोहलीला ३ नंबरवर सातत्याने येउ द्यावे.. भले जरी स्कोर २७० ला १ का असेना! युसुफ पठाणचा खेळ अजुनही मटकाच आहे.. होपफुली महत्वाच्या सामन्यात तो लागावा अशी अपेक्षा!

अनुमोदन.. पण धोणी आपले ऐकत नाही तो (असाम्या सारखा) गंभीर वर अडून बसलाय Happy

वातावरण तापूं लागलंय. मुंबई - ४१ डिग्री. विश्वचषकात चेंडूचा टप्पा पडल्यावर धुळीचा लोट उडताना बघायला मिळणं आता फार दूर नाही. जरा एक नजर स्पिनर्सच्या आतापर्यंतच्या ५ सामन्यातल्या कामगिरीवर टाकणं ऑचित्यपूर्ण होईल [ स्त्रोत - कॅस्ट्रॉलक्रिकेट वेबसाईट]-
ऑफ-स्पीनर्स -

स्वान [इं.]- सरासरी २३.५ धावा देऊन ९ बळी ;
मुरली [श्रीलं]- सरासरी १८.७१ धावा देऊन ७ बळी;
हरभजन - सरासरी ४२.४० धावा देऊन ५ बळी.

लेग-स्पीनर्स

आफ्रिदी - १०.०६ च्या सरासरीने १६ बळी;
बेन - १२.०५ च्या सरासरीने १२ बळी;
तहीर [ ३ सामन्यांत]८.९० च्या सरासरीने ११ बळी;
बालाजी राव - २८.११ च्या सरासरीने ९ बळी.

स्पर्धेतील अग्रेसर स्पीनर्सनी घेतलेल्या एकंदर विकेट

लेफ्ट आर्म - २२ च्या सरासरीने ४० बळी;
ऑफ-स्पीनर्स - ३० च्या सरासरीने २९ बळी;
लेग-स्पीनर्स - १९ च्या सरासरीने ४४ बळी.

स्पीनर्सची ही कामगिरी यापुढील सामन्यांत अधिकच भरीव होणं अपरिहार्य आहे.

Pages