भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
आत्ता पाहिले हायलाईट्स. चिमण
आत्ता पाहिले हायलाईट्स.
चिमण तुला एक सचिन च सापडला का टीका करायला अरे इतका वेळ खेळल्यावर आणि त्यातही त्या मॉर्केल ला धू धू धुतल्यावर तेवढा कॉन्फिडन्स येणारच तसा शॉट मारायला. कोणत्याही पिच वर बॉल चा वेग आणि बाउन्स चे सचिन चे जजमेंट जबरदस्त आहे. आणि त्यातही अगदी ऑफ चा बॉल स्क्वेअर लेग कडे तर मारत नव्हता - शॉट बघून वाटले की फक्त लाँग ऑन च्या डोक्यावरून मारायचा प्रयत्न करत होता. आल्याआल्या एखादा नग तसा शॉट मारायला जातो तेव्हा राग येणे बरोबर आहे, पण सचिनचे तसे नव्हते.
कालिस मात्र डोक्यावरच्या केसांच्या औषधाच्या जाहिरातीतील "After" फोटो प्रमाणे अचानक दिसू लागला आहे
कालिस मात्र डोक्यावरच्या
कालिस मात्र डोक्यावरच्या केसांच्या औषधाच्या जाहिरातीतील "After" फोटो प्रमाणे अचानक दिसू लागला आहे >>
सचिनबद्दल अनुमोदन...
इतकं चांगले खेळल्यावर ही चूक विसरायला हरकत नाही....
सेट झाल्यावर बाकीचे मारत नाहियेत म्हणुन असा फटका मारण्याची आणि आउट होण्याची जुनी खोड आहे त्याला.....
कालिस मात्र डोक्यावरच्या
कालिस मात्र डोक्यावरच्या केसांच्या औषधाच्या जाहिरातीतील "After" फोटो प्रमाणे अचानक दिसू लागला आहे>>>
मलाही तेंडल्या आऊट झाला तो शॉट त्यानी अक्रॉस द लाईन खेळल्यासारखा वाटला. थोडक्यात जजमेंट चुकल्यासारखं वाटलं. पण आधी इतका जबरदस्त खेळ केल्यावर बोलायला काहीच जागा उरलेली नाहीये.
आत्ता पाहिले हायलाईट्स. >>.
आत्ता पाहिले हायलाईट्स. >>. आँ! अरे गड्या लाईव्ह पाहायची की.
अरे आम्ही घरी नव्हतो. ट्रकी
अरे आम्ही घरी नव्हतो. ट्रकी ला बर्फात खेळायला गेलो होतो. तेथे एक घर भाड्याने घेतले होते. तेथे फक्त एका कोपर्यात खिडकीजवळ सेलफोन सिग्नल मिळायचा. एक मित्र तेथे सतत बसून होता शनिवारी सकाळी आणि स्कोर "ओरडायचा"
अतिशय सुंदर घर होते पण त्यांच्याकडे इंटरनेट नव्हते. बे एरिया पासून पाचशे मैलात तेवढेच एक घर असेल इंटरनेट नसलेले
About power plays, maybe it
About power plays, maybe it will be good idea if we take batting power play
1. In overs 16-20 if no/a wicket is lost and Tendulkar/Sehwag/ are going great guns.
2. With new ball in 34-39 overs as they are doing right now, if 3-4 wickets are lost.
Tendulkar seems to getting out with tempo change in third power play. Maybe that will enable him to bat all 50 overs, and don't we need that ?
आता शेवटच्या ओव्हरबद्दल - १०
आता शेवटच्या ओव्हरबद्दल -
१० ओव्हर शिल्लक असताना प्रत्येक बोलरच्या २/३ ओव्हर शिल्लक होत्या. ज्यापद्ध्तीने मैच चालली होती, हे पाहुन शेंबडा पोर देखिल सांगु शकला असता की मैच क्लोज होणार. चला मानुयात की इंग्लंड च्या सामन्यात धोनीने चुक केली () पण परत या सामन्यातही तेच ? परत तीच चुक ? आता चुक केले की मुद्दाम हे ज्याला कळत नसेल त्याच्याबद्दल फक्त हसु येउ शकते! >>
कसे का असेना फ़ाईनली धोनीकडे दोन options होते...१) जहीर चांगली टाकत आहे, तर त्याला एका बाजूला लावून ठेवणे.. hopefully त्याने विकेट्स काढाव्यात म्हणुन... इग्लंडच्या against त्याने तशा २/३ काढल्या , त्यामुळे ही अपेक्षा रास्त ...
त्यामुळे जहीरच्या ओवर्स संपल्या याला कॅलक्युलेटेड रिस्क म्हणायला पाहीजे.. याच ओवरमधे त्याने अजुन एखादी विकेट घेतली असती तर चित्र वेगळे दिसले असते..
२) आता राहीले बाकीचे बॉलर्स.. मागच्या मॅचेस मधल्या अनुभवावरुन बाकीचे कुणीही भरवशाचे नाही,
हरभजनला मागच्या मॅचेस मधे विकेट मिळाल्या नाहीत.. मुनाफ़चा तर उपयोग नाही, असल्या ओवरला पार्टटईम बॉलर चालतो पण त्याच्याकडे सचिन सारखी जिगर पाहिजे... तसा सध्या कुणी नाही किंवा कुणी फ़ॉर्ममधे नाही....
तेव्हा यातल्या कुणालाही ४५ नंतर ओवर देणे हे गॅम्बलच आहे... त्यांना कुणालाही ४९ वी ओवर दिली असती तर मॅच त्याच ओवरमधे संपली असती आणि वरतून लोकांनी परत धोनीच्या अकलेचे वाभाडे काढले असतेच.. (जहीरला का नाही लावलं मुर्ख़ाने...)
मुळात हा दोष खेळाडूंचा नाहीये... त्यांच दर्जा आणि फ़ॉर्म लक्षात न घेता अवाजवी अपेक्षा करणार्या फ़ॅन्सचा आहे...
या अपेक्षांच्या ओझ्यापायी या खेळाडूंना जिंकले की डोक्यावर घेतले जाते आणि हरले की चिखलफ़ेक केली जाते... त्यामुळेच मिळतेय तोवर मिळवून घ्या अशी प्रत्येक प्लेयरची mentality असल्यास दोष सर्वस्वी त्यांचा नाही.. शेवटी सगळेच सचिन नाहीयेत...
त्यामुळे आता मुद्दा मॅच फ़िक्सिंगचा...
मी तरी भारत नक्की फ़ाईनला जाणार आणि जिंकणारच अशा भावनेने मॅच पाहत नाहीये...सचिनचा मस्त खेळ बघायला मिळाला तर लई भारी.. त्यापलिकडे जिंकले तर चांगलेच आहे ,
हारले तर जाउदे अशीच माझी तरी धारणा आहे...
आता यात फ़िक्स करुन मॅच जिंकली वा फ़िक्स करून हारली तरी मला फ़रक पडत नाही...
चांगला खेळ बघायला मिळाल्याशी मतलब...
जोपर्यंत मी स्वत: मॅचवर पैसे लावत नाही आणि कुणीतरी फ़िक्सिंग केल्यामुळे माझे नुकसान होत नाही , तोवर मला काय फ़रक पडतो? समजा जरी माझं असं नुकसान झालं तरी अशा लोकांविरुद्ध एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी काय करू शकते?.... मॅचमधे किती भावना गुंतवावी हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
.त्याचप्रमाणे मॅच फ़िक्स आहे हे assume केल्यावर तरीही (मला त्याचा रिझल्ट माहीत नाही ना मग) मॅच पाहून त्याचा आनंद घ्यायचा (१) का फ़िक्सिंग चांगले नाही म्हणुन ती पाहायची नाही (२) हा वैयक्तिक मुद्दा आहे..
मला गणू यांच्या मताबद्दल प्रॉब्लेम नाहिये. ते सत्यही असू शकते.., पण मताबद्दलच्या त्यांचा दुराग्रह मात्र नक्कीच न पटण्यासारख़ा आहे..
इथले कुणीही मॅच फ़िक्सिंग असुच शकत नाही असं म्हणल्याचे मी तरी वाचलेले नाहीये...
फ़क्त या बाफ़वर याच विषयाबद्दल चर्चा करत बसण्याचे टाळावे अशीच अपेक्षा होती...
या बाफ़वर माझ्यासारखे बरेच लोक चांगली चर्चा आणि विश्लेषण पाहायला येतात.. तेव्हा मॅच फ़िक्सिंग बद्दल लिहिणार्या सर्वांना विनंती की कुणीतरी spot fixing वा match fixing केलयं किंवा भारत या मॅचमधे हारणारच होता / जिंकणारच होता याव्यतिरीक्त मुद्दे असल्यास ते पुढे आणवेत..
१) मला गणू यांच्या पोस्टला उत्तर देवून इथे तोच विषय अजिबात वाढवायचा नाहिये..
२) माझा आपली टीम ज्या पद्धतीने हारली त्याचे समर्थनही करायचे नाहीये..
३) माझा धोनीला अजिबात पाठिंबा नाहीये
पण इथल्या काही पोस्ट पाहुन हे नमुद करावेसे वाटले...
हिमांगी, चांगले डिटेल्स! मी
हिमांगी, चांगले डिटेल्स!
मी लाइव्ह पाहिली नाही त्यामुळे जास्त कल्पना नाही. पण हरभजन ला तीन विकेट्स मिळालेल्या असताना का शेवटची ओव्हर दिली नाही ते कळत नाही. त्यात भज्जी "पेटला" की जास्त चांगली बोलिंग करतो - मॅच च्या वर्णना वरून तो पेटला होता हे नक्की. धोनीसारख्याला तर हे माहिती असणारच.
या अपेक्षांच्या ओझ्यापायी या
या अपेक्षांच्या ओझ्यापायी या खेळाडूंना जिंकले की डोक्यावर घेतले जाते आणि हरले की चिखलफ़ेक केली जाते... त्यामुळेच मिळतेय तोवर मिळवून घ्या अशी प्रत्येक प्लेयरची mentality असल्यास दोष सर्वस्वी त्यांचा नाही.. शेवटी सगळेच सचिन नाहीयेत...>>>>>>> वेल सेड!!!
फा, धोनीनी सांगितलं की त्याला शेवटची ओवर सीमर ला द्यायची होती.
आज ह्या बाफवरील कोणाचीतरी
आज ह्या बाफवरील कोणाचीतरी तेंडुलकरविरोधी पोस्ट वाचून नंतर कोतबोवर गेलो तिथे हे पोस्ट बघून कुठला सचिन हे डोक्यात घुसायला जरा वेळ लागला.
"चांगलं ट्रक भरून टोळकं घेवून जा सचिनला धरायला. तुमच्या माहेरच्या टोळक्याना खडसावून विचारायला म्हणून सांगा सचिनला. घरी नाही मिळाला तर ऑफीसला शोधा."
>>का फिकिसंगबद्दल बोलु नये
>>का फिकिसंगबद्दल बोलु नये याचे कारण द्या आधी! असाच नियम सर्व बाफना लावणार का ?
दोन कारणे
१. एक तर तुमच्याकडे काहीही पुरावा नाहीय.
२. या बाफवर विषयासंबंधी अॅडमिनने एक नियम तयार केला आहे तो तुम्ही मानत नाहीय.
राहता राहिला बाकीच्या बाफना हा नियम लागू करणार की नाही याबद्दल, तर कमीत कमी जिथे लागू आहे तिथे तरी तो पाळा आणि जिथे लागू नाही तिथे तुम्ही खुशाल आपली मते मांडा. नपेक्षा, फिक्सिंग बद्दल तुम्ही एक बाफ चालू करा आणि मांडा तुमची मते.
जरा हिमांगीची पोस्ट त्रयस्थ दृष्टीने वाचा आणि काय तो बोध घ्या. आशा करतो की यापुढे तुम्ही (कमीत कमी या बाफवर तरी ) विश्वचषक आणि त्यामधील सामन्यांच्या " तांत्रिक " बाजूंवर चर्चा कराल.
खरंय... धोनीकडे options
खरंय... धोनीकडे options नाहीयेत लास्ट ओवरसाठी हा खरा प्रॉब्लेम आहे...
(अवांतरः रजनीकांतचा option कसा वाटतो?)
रजनीकांतचा option कसा वाटतो?
रजनीकांतचा option कसा वाटतो? >>>
<<या बाफ़वर माझ्यासारखे बरेच
<<या बाफ़वर माझ्यासारखे बरेच लोक चांगली चर्चा आणि विश्लेषण पाहायला येतात.. तेव्हा मॅच फ़िक्सिंग बद्दल लिहिणार्या सर्वांना विनंती की कुणीतरी spot fixing वा match fixing केलयं किंवा भारत या मॅचमधे हारणारच होता / जिंकणारच होता याव्यतिरीक्त मुद्दे असल्यास ते पुढे आणवेत>>
आणि जर तुम्हाला निकाल आधीच माहिती असेल, तर सामना सुरू होण्याअगोदरच इथे जाहीर करावा.
एकदा सामना संपला की, " असेच होणार होते..ठरलेच होते.." हे बोलू नये.
रजनीकांतचा option कसा वाटतो?
रजनीकांतचा option कसा वाटतो? >>> व्वा... एकाच चेंडूत दोन बळी (दुसरा नक्कीच फिक्स असणार यात शंका नाही) :d
(No subject)
जबरी भाऊ... चपखल..
जबरी भाऊ...
चपखल..
भाऊ, एकदम ब्येश....
भाऊ,
एकदम ब्येश....
भाऊ
भाऊ
फारएन्डा, मला फक्त सचिन नाही
फारएन्डा, मला फक्त सचिन नाही सापडला टीका करायला. मी असं म्हंटलं आहे की सचिनसकट सगळ्यांनी विकेटी फेकल्या. त्यात काही चूक नाही. मुद्दाम मी सचिनचा उल्लेख केला कारण तो सेट खेळाडू होता. तो प्रचंड अनुभवी आहे. मला वाटलं निदान त्यानं तरी इंग्लंड विरुद्ध झालेल्या कोलॅप्स मुळे धडा घेतला असेल. तो चुकांमधून शिकतो असा त्याचा लौकिक आहे. पण तसं झालं नाही. जेव्हा सुमारे ४०/४२ ओव्हरी पर्यंत फार विकेट्स पडलेल्या नसतात आणि मग एखादी पडते त्या नंतर आपला खूप वेळा दारूण कोलॅप्स झालेला आहे. असो. हे ग्रुप मॅचेस मधेच झालंय त्यामुळे अजून वेळ गेलेली नाही. पुढच्या मॅचेस मधे कळेलच काय ते.
<< रजनीकांतचा option कसा
<< रजनीकांतचा option कसा वाटतो? >> डे-नाईट सामन्यात निर्णायक शेवटची ओव्हर अर्थात रात्रीच येणार; तेंव्हा "रजनी"कांत ब्येसच ऑप्शन. इंग्लंडने जेम्स बाँड आणला तर मग मॅच एकदमच विंटरेस्टींग !!!
मला एक हर्षा भोगलेचं
मला एक हर्षा भोगलेचं नितांतसुंदर article शेअर करायचंय... एमैल वर आलंय..
कसं करू शेअर? इथे पेस्ट करू सगळं?? सगळंच्या सगळं सुंदर आहे..
अनुवादासकट तो लेख इथे
अनुवादासकट तो लेख इथे हलवलाय....
http://www.maayboli.com/node/24377
नंतर इथे प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार...
मस्त रे आनंदयात्री... धन्यवाद
मस्त रे आनंदयात्री...
धन्यवाद शेअर केल्याबद्दल
>>> Its not for nothing that
>>> Its not for nothing that people call him GOD.
अगदी खरं आहे हे!
आपली व इतर काही जणांची मेहनत अजून एका सामन्यात उरलेल्या करंट्यांनी मातीमोल केल्याचे पाहून त्याला दु:ख झालं असेल का संताप आला असेल का तो अशा वारंवार होणार्या अपेक्षाभंगाला सरावला आहे?
आनंदयात्री, धन्यवाद शेअर
आनंदयात्री, धन्यवाद शेअर केल्याबद्दल.
सचिनला समजायला खेळावर खिळणारी व तिथं कांही दिव्य पाहिलं तर काळजांत जपून ठेवायची वृत्ती हवी !!
आतल्या गोटातली बातमी
आतल्या गोटातली बातमी आहे........
या पुढच्या सगळ्या मॅचेस भारत जिंकणार आहे,,,,,,!!
वर्ल्डकप सुध्दा ......
१९ मार्च च्या आधी सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद पवार यांची गुप्त मिटिंग झालेली.....देशात दर दिवशी उघड होनारा घोटाळे, खुन, महागाई, काळा पैसा इत्यादी मुळे सगळया देशाचे लक्ष सरकार कडे लागले आहे......ते लक्ष दुसरी कडे वेधण्यासाठी सगळ्यांनी ठराव पास केला कि भारताला कप जिंकायलाच हवा......भारत जिंकला कि पुढील काही वर्षे क्रिकेट वर चर्चा होईल .......आणी सरकार वरील लक्ष निघुन जाउन सरकार वाचेल्.......या साठी शरद पवारांना कामाला लावन्यात आलेले आहे....बदल्यात लवासा प्रकल्प देन्यात येणार आहे..........
>>This is not just a game,
>>This is not just a game, and he is not just a sportsman. Its much more than this.
And exactly that is the problem too!
अगदी गल्लीतील क्रिकेट सामना असला तरी सचिन त्यात २००% देतो हे जगजाहीर आहे. विश्वचषकात तरी किमान ईतरांनी १००% द्यायला हवे ही अपेक्षा आहे- नव्हे तसे सक्तीचे आहे. पण वस्तूस्थिती आणि अपेक्षा यात प्रचंड तफावत आहे. गुणवत्ता कमी असली तरी फोकस, जिद्द, परीश्रम आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे प्रत्येक सामना जिंकायचा ध्यास या गुणांवर अनेक संघ सामना जिंकतात (बांगला, पाक, अगदी आयर्लंड देखिल)-- आपल्याकडे याच गोष्टींचा अभाव आहे. आणि कप्तान म्हणून जसे यशाचे क्रेडीट धोणीला तसेच अपयशाची जबाब्दारी देखिल धोणीचीच. कारण नेमकी य सर्व अंगाने तुम्ही संघाला मोटिवेट करू शकत नसाल तर कप्तान म्हणून तुम्ही लायक नाहीत. मला वाटतं एक t20 world cup सोडता गेल्या २ वर्षातील बरेच सामने वैयक्तीक कामगिरींमूळे आपण जिंकलो (सचिन, सेहवाग, लक्षमण, झहीर) आणि धोणी यशस्वी कप्तान ठरला, वास्तवात मात्र एक "संघ" म्हणून मिळवलेले विजय फार थोडे आहेत. विश्वचषक सामन्यात नेमकी ईथेच आपली गोची आहे. आणि एकट्या सचिन वा विरू ने कितीही रतीब घातला तरी सन्नीभाय म्हणतो तसे "क्रिकेट हा खेळ एकट्याने जिंकता येत नाही त्यात अख्ख्या संघाचा (११ खेळाडूंचा) सहभाग आवश्यक आहे".
--------------------------------------------------------------------------------
सन्नीभाय कॉलम लिहीत नाहीये का?
आफ्रिकेची आयर्लॅन्डने हवा
आफ्रिकेची आयर्लॅन्डने हवा केलेली आहे (२६.३ षटकात ५ बाद ११७). आपल्यापेक्षा आयर्लॅन्डने चांगली गोलंदाजी केलेली आहे. आज अपसेट बघायला मिळायला पाहिजे.
<< And exactly that is the
<< And exactly that is the problem too! >> योगजी, खरंच असं वाटतं तुम्हाला ? एखादी मॅच किंवा स्पर्धा नजरेसमोर ठेवून हे बोललं तर ठीक आहे; पण केवळ प्रत्येक खेळाला वेगळ्या उंचीवर न्यायलाच नव्हे तर एकंदर्रीतच समाजजीवनासाठी प्रतिभेचे असे दैदीप्यमान प्रकाशदीप अस्तित्वात येणं अर्थपूर्ण ठरतं. डॉन ब्रॅडमन, पेले, ध्यानचंद, मॅराडोना, यॉन बोर्ग, मार्टिना नवरातिलोव्हा, जेसी ओवेन्स, ... इ.इ. सर्वानी आपला खेळ,संघ, हरल्या/जिंकल्या स्पर्धा, देश या सर्व मर्यादा ओलांडून उभे केलेले निखळ प्रतिभेचे मानदंड कित्येक पिढ्याना प्रभावित व प्रोत्साहित करत आले आहेत ! मला वाटतं या अर्थानंच << This is not just a game, and he is not just a sportsman. Its much more than this. >> असं म्हटलंय.आणि असे खेळाडू प्रत्येक पिढीत निर्माण होतात असंही नाही. सचिन वरील खेळाडूंच्या पंक्तीत बसतो एव्हढंच नसून तो तिथ झळकतोय, हे निर्विवाद. मी स्वतःला भाग्यवान समजतो कीं सचिनसारख्याची बहरती प्रतिभा प्रत्यक्ष पहाणं माझ्या नशीबीं होतं !! आणि त्याच्या अगणित अप्रतिम खेळीनी माझ्यासारख्या लाखो रसिकाना दिलेल्या निखळ आनंदाला तर तोड नाही.
No player can be greater than the game; but instead of getting inspired by a great player in one's team, if he himself is made to look as a problem because of one's own shortcoimings, only God above [ Not Sachin!] can save such a team !
Pages