विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत कालच्या मॅचचे हायलाईट्स पाहीले...आपले लोकं अगदीच पराभूत मानसिकतेने खेळले नाहीत...भज्जी, मुनाफ प्रत्येक विकेट नंतर जोरदार शिवीगाळ करत होते...त्यांच्या लिप मुव्हमेंट हुन कुठल्या तेही कळू शकतय...एकुणच जिगर जाणवली....

<< ...भज्जी, मुनाफ प्रत्येक विकेट नंतर जोरदार शिवीगाळ करत होते. >> उथळ पाण्याला खळखळाट फार !! Wink

Dhoni's Mom:"Market se sabzi le aa". Dhoni-"Par Maa hum South Africa se haar gaye naa,toh log bahut gusse mein hain"! Mom-"Ek kaam kar, meri saari pehnkar jaao,koi nahi pehchanega" .Dhoni goes to market wearing saari. 1 GIRL-"Hi, Dhoni how r u? " Dhoni is shocked- "Aapko kaise pataa chala"? GIRL-"Abbe, Main Ashish Nehra hoon"..!!!!!!

मी जे काल इथे लिहिले तेच आज लोकसत्तामध्ये विनायक दळवींनी लिहिलेय.
http://www.maayboli.com/comment/edit/1251075

हरभजनला शेवटचा ओव्हर मिळणे शक्य नाही. टी-२०च्या पहिल्या विश्वचषकात भज्जीने शेवटचा ओव्हर मला नक्को रे बाब्बा असं सांगून पळ काढला होता. याउलट सचिनने एकदा चक्क ५०वे षटक मागून घेतले होते. याला म्हणतात जिगर

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=142...
नेहराने या स्पर्धेत आतापर्यंत कधीही चांगली गोलंदाजी केली नाही. पण त्याच्या हाती चेंडू सोपविण्याची दुर्बुद्धी धोनीला का झाली? याचे कारण हरभजनची पराभूत मनोवृत्ती. त्यावेळी भारताकडे सर्वात अधिक अनुभव असलेला एकमेव गोलंदाज होता, तो म्हणजे हरभजनसिंग. अखेरचे षटक टाकण्यासाठीचे धाडस हरभजन सिंगला दाखविता आले नाही. त्यासाठी वाघाचे काळीज लागते. जी जिद्द सचिन तेंडुलकरने काही वर्षांपूर्वी कोलकाता येथील हिरो कप स्पर्धेच्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात दाखविली होती. दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या षटकात विजयासाठी ६ धावांचीच आवश्यकता होती. कप्तान अझरुद्दीनला चेंडू कुणाला द्यायचा ते कळत नव्हते. श्रीकांत की कपिलदेव असा त्याचा गोंधळ उडाला होता. त्यावेळी सचिनने चेंडू त्याच्या हातूने काढून घेतला होता व अखेरचे षटक टाकण्याची तयारी दर्शविली होती. त्या जिद्दीनेच दक्षिण आफ्रिका संघ खल्लास झाला होता, कारण सचिनने त्या अखेरच्या षटकात अवघ्या ३ धावाच दिल्या होत्या

सुरेश रैना (युसुफ पठाण च्या जागी) आणि अश्विन (नेहरा च्या जागी) ला चान्स दिला पाहिजे. युसुफ एकदम बेभरवसा (चली तो चली नही तो अब्दुल गनी). स्लग्गीश पिच वर शेवट चा ओवर हरभजन ला देण्या ऐवजी नेहरा ला का दिले ह्याचे धोनी चे सारवा सारव एकदम हास्यास्पद. कॉमेंटेटर पण सांगत होता बॅट्समॅन (नाव आता आठवत नाहिये) इस आल्सो वेरी हॅपी दॅट द बॉल इस गिवन टु नेहरा.

साहेब शुड बॅट थ्रुऑऊट द ईनिंग्स

>>भज्जी, मुनाफ प्रत्येक विकेट नंतर जोरदार शिवीगाळ करत होते...त्यांच्या लिप मुव्हमेंट हुन कुठल्या तेही कळू शकतय...एकुणच जिगर जाणवली....
अरे वाह! जिगरची ही नविन व्याख्ख्या माहितच नव्हती.. जिंकतील मग विश्वचषक Happy

धोणी चं झालय काय की बरेच वेळा नशीबाने त्याला साथ दिली आणि तेव्हा त्याचे निर्णय "धाडसी" ठरले. यशस्वी कप्तानाचे सर्व निर्णय योग्य असतात (?). आताशा नशीबाने त्याच्याकडे पाठ फिरवली आहे तेव्हा तेच निर्णय अनाकलनिय आणि अतर्क्य ठरतात.
तात्पर्यः नशीबाशी जुगार थांबवला नाही तर कॅप्टन कूल चा कॅप्टन फूल व्हायला वेळ लागणार नाही.
--------------------------------------------------------------------------------
भारतात प्रत्त्येकाला क्रिकेट मधले कळते Happy तेव्हा आपल्याला जे "ईथे" कळते आहे ते त्यांना "तिथे" कळत असेलच!

>>साहेब शुड बॅट थ्रुऑऊट द ईनिंग्स
हा हा हा... असं म्हणा: साहेबांनी दहा वेळा फलंदाजी करावी आणि ५० षटके गोलंदाजी करावी.

साहेब आहेत म्हणुन अपेक्षा(साहेबांचे तेव्हढी कुवत आहे), कपाळ करंट्यां कडुन काही अपेक्षा करणं नाही.
ऑफ कोर्स, साहेबांवर पहिलेच अपेक्षांचे ओझे पुष्कळ आहे.

Thanks to Awful display by middle order in SA match , there is a very very realistic chance that we might not qualify if we lose to WI

If India lose to WI , we are stuck at 7
WI will have 8
Eng beating WI , again quite possible gives them 7 and run rate diff should help them because of above 2 matches
SA will beat Ireland so anyway at 8
Now only thing that saves us is Bang beating SA is not easy (Not impossible though as they have home advntge and more Importantly SA would have already qualified and might experiment ) that will give Ban also 8 points .

India's entry in the quarter finals always depends on the performance of other teams, this happens most of the times, in most of the tournaments.

अरे बास झाले भारत मॅच पुराण... कालच्या दोन्ही मॅच मध्ये कॅनडा आणि केनियानी न्यूझीलंड आणी ऑसीजच्या नाकात दम आणला त्याचा विचार करा.... दोन्ही टीमचा ऑल आऊट होऊ शकला नाही... हरलो तरी काही फरक पडणार नाही असे खेळल्यामुळे दोन्ही मॅचेस जबरी झाल्या... बॉलिंग थोडी जरी नीट झाली असती तर अजून मजा आली असती..

>>> जिथे सचिन सकट सगळ्यांनी विकेटी फेकल्या तिथे धोनी बिचारा काय करणार?

एखाद्या विद्यार्थ्याने भरपूर अभ्यास करून भरपूर मार्क मिळविल्यानंतर मौजमजा करणे व इतरांनी अजिबात अभ्यास न करता नापास झाल्यावर सुध्दा मौजमजा करणे यात जो फरक आहे, तोच फरक सचिनच्या विकेटमध्ये व इतरांच्या विकेट फेकण्यामध्ये आहे. धोनीने मार्कही मिळविले नाहीत आणि मौजमजाही केली नाही. सचिन व गंभीर बाद झाल्यावर भारताला ३५० पर्यंत नेण्याची इतरांची जबाबदारी होती. त्यात ते संपूर्ण अपयशी ठरले. १-२ चेंडू खेळून शून्यावर बाद झालेल्या झहीर, नेहरा आणि मुनाफ यांनी निदान धोनीला शेवटपर्यंत साथ द्यायला पाहिजे होती. उरलेल्या ८ चेंडूत निदान ५-६ धावा तरी धोनीने केल्या असत्या.

निषेध तर निषेध! बट द फॅक्ट रिमेन्स!>>>>>>>> You considered that statement a fact? Lol

धोनीची बॅटिंग खरच सुधारायला हवी.

बुवा Lol

>> धोनीची बॅटिंग खरच सुधारायला हवी.

या वर्ल्ड कप क्रिकेटच्या नियमांप्रमाणे फक्त शेवटच्याला बॅटिंग करता येत नाही हो! Wink

तात्पर्यः नशीबाशी जुगार थांबवला नाही तर कॅप्टन कूल चा कॅप्टन फूल व्हायला वेळ लागणार नाही. >>> योगला फक्त च मोदक

केदार,

विंडीज विरुध्ध भज्जी, अश्विन, झहीर, मुनाफ खेळतील आणि युसुफ च्या जागी रैना निश्चीत आहे.
नेमके विंडीज टॉस जिंकून ३००+ करतील (गेल नेमकी आपल्याविरुध्ध पेटेल) आणि आपल्याला धापा टाकत पाठलाग करावा लागेल असा माझा अंदाज आहे. पुन्हा एकदा साहेब आणि युवी यांवर बरेच काही अवलंबून असेल. आपल्याला जवळ जवळ प्रत्त्येक सामन्यात विरु/साहेब यांनी मस्त सुरुवात करून दिली होती. विंडीज विरुध्ध ते गडबडले तर काय होईल हे सामन्यातच कळेल.
धोणी शहाणा असेल तर विंडीज विरुध्ध पहिले फलंदाजी घेवू नये कारण पोलार्ड, ब्राव्हो, गेल, चंद्रा हे फलंदाज पाठलाग करताना अवाजवी धोका न पत्करता (तसा आपल्या गोलंदाजी विरुध्ध तो पत्करावा लागत नाहीच... आफ्रिकेविरुध्ध्द तो कायम प्तकरावा लागतो हाच मुख्ख्य फरक आहे!) यथेच्च धुतील. this toss would be worth to loose.. and let them decide.
थोडक्यात विंडीज च्या सामन्यात हे खेळाडू सामन्याला निर्णायक कलाटणी देवू शकतातः
गेल, पोलार्ड, ब्राव्हो, रोच
विरू, साहेब, युवी, अश्विन
-----------------------------------------------------------------------------------
मला अजूनही एकाही सामन्यात आपण एखाद्या विरुध्ध फलंदाजाला अभ्यासपूर्वक आपण बाद केल्याचे दिसले नाही. अर्थात अभ्यास असून ऊपयोग नाही, कारण गोलंदाज आयत्या वेळी ऊत्तरे विसरतात.

रच्याकने: आपल्या गोलंदाजी पेक्षा बांगला ची गोलंदाजी देखिल बरी आहे. आणि घरच्या मैदानावर चांगल्या फिरकीवर ते आफ्रीकेविरुध्ध जिंकू शकतात. Sad

ईंग्लंड ने सामना टाय केला नसता तर ?

असाम्या,

त्या लिंक चे टायटल "why nehara shouldnt have bowled last over" असे हवे होते.
तक्त्यानुसार एकदिवसीय सामन्या मध्ये त्याने शेवटचे षटक टाकले होते: डिसेंबर १५, २००९
t20 मध्ये टाकले होते: जनेवारी ९, २०११ (२७ धावा हव्या होत्या... ते षटक तू किंवा मी टाकले असते तरी आपण जिंकलोच असतो. so that shouldn't count!)
गम्मत म्हणजे दोनदा १३ धावा हव्या असताना त्याने शेवटचे षटक टाकले (मे ११, २०१० आणि मार्च १२, २०११) तेव्हा आपण हरलोय Happy
तेव्हा आकडे आणि १३ विरुध्ध चे नशीब दोन्ही नेहराच्या बाजूने नाही. धोणी ने सामना संपल्यावर नेहरा आमचा यशस्वी डेथ ओव्हर्स चा गोलंदाज आहे हे म्हणणे म्हणजे एकतर धोणीला short term memory loss झालाय किंवा बोलताना selective memory loss वापरून बोलतोय.

अर्थात धोणी चे बरोबर आहे: नेहरा "डेथ" चा गोलंदाज आहे... Happy
अश्विन ला विंडीज ने वाईट धुतला आणि आपण हरलो तर तो अश्विन चा शेवटचा सामना ठरेल यात मला शंका नाही. हा जुगार धोणीला आणि आपल्याला महागात पडतो का हे कळेलच. (मी विंडीज संघात असलो तर अश्विन विश्वचषकातील पहिलाच सामना खेळतोय म्हटल्यावर पहिल्या एक दोन षटकातच त्याच्यावर तुटून पडून त्याचे खच्चीकरण करायचा पूर्ण प्रयत्न करेन... आता हे मला कळते तर विंडीज ला नक्कीच कळणार नाही का? तेव्हा अश्विन ची लेट एंट्री ही दुधारी तलवार ठरणार हे नक्की. आणि या एव्हड्या प्रेशर मधून देखिल उत्कृष्ट गोलंदाजी त्याने केली तर पहिल्या सर्व सामन्यात त्याला न खेळवण्याचा गाढवपणा करणार्‍या धोणीला बाहेरचा रस्ता दाखवायला हवा) Happy

qrt final match

s africa - shri lanka

w indies - newzeland

india - pak

england/ b desh - aus....

मला अश्विनही फार काही दिवे लावेल असं वाटत नाही. ऑसीज विरुद्धच्या वॉर्म अप मधे १० ओव्हरीत ४७ रना देऊन १ विकेट काढली त्यानं.. स्पिनिंग विकेट असूनही. उलट चावलानं ९ ओव्हरीत ३१ रना देऊन ४ विकेटी काढल्या. मी कधीही चावलाला घेईन कारण तो वेगळ्या पद्धतीचा बॉलर आहे. हरभजन आणि अश्विन दोघेही एकाच टाईपचे आहेत. वैविध्य नाही त्यामुळे काही. हरभजनला बसवून त्याला घ्यायला हरकत नाही एकवेळ! आणि बॉल थोडा फार स्विंग झाल्याशिवाय आपले फास्ट बॉलर भेदक वाटतच नाहीत.

आपले कुठलेच बॉलर मला भेदक वाटत नाही. झहीर सध्या चांगली टाकतोय आणि त्यामुळे त्याचं अग्रेशन, शिवीगाळ शोभून दिसते आहे. मला भेदक म्हंटलं की अक्रम किंवा अ‍ॅलन डोनल्ड, मग्रा हे आठवतात. त्यांनाही क्वचित झोडपलं असेल पण जबरी दरारा होता त्यांचा.

इंगलंड वि बांगला पाहत होतो तेव्हा त्या शहजादची बॉलींग चांगली वाटली. भारी स्वींग होत होता बॉल. एकाचा ऑफ स्टंप फार भारी काढला त्यानी (आता नाव आठवत नाही), बॉल इतका सुरेख वळला आणि ऑफ स्टंपच्या अगदी वरच्या भागाला लागला.

>>इंगलंड वि बांगला पाहत होतो तेव्हा त्या शहजादची बॉलींग चांगली वाटली.

इंग्लंड्चे अनेक खेळाडू आयात आहेत त्यामुळे त्यांनी क्रिकेट आउट्सोर्स केलंय असं म्हणायला हरकत नाही Proud

अ‍ॅडमिनने टाकलेली ही 'नवीन' सूचना पहा आणि फिक्सिंग बद्दल येथे आपले ज्ञान पाजळू नका >>>

का फिकिसंगबद्दल बोलु नये याचे कारण द्या आधी! असाच नियम सर्व बाफना लावणार का ?

असो कालची मैच फिक्स होती याबद्दल मला तरि शंका नाहि! मुर्ख भारतीय आपले पैसे दाउदला भेट करुद्यात खुशाल! मी तरी देश्द्रोही नाहि याचा मला अभिमान आहे!

आता शेवटच्या ओव्हरबद्दल -

१० ओव्हर शिल्लक असताना प्रत्येक बोलरच्या २/३ ओव्हर शिल्लक होत्या. ज्यापद्ध्तीने मैच चालली होती, हे पाहुन शेंबडा पोर देखिल सांगु शकला असता की मैच क्लोज होणार. चला मानुयात की इंग्लंड च्या सामन्यात धोनीने चुक केली (:खोखो:) पण परत या सामन्यातही तेच ? परत तीच चुक ? आता चुक केले की मुद्दाम हे ज्याला कळत नसेल त्याच्याबद्दल फक्त हसु येउ शकते! Proud

माझ्या मते, भारत हरण्याचे कारण वेगळेच आहे. पहिल्या तीन सामने १९/२, २७/२, ६/३ असे अंतर राखून ठेवले होते. त्यामुळे खेळाडूंना विश्रांति घ्यायला संधि मिळाली. नंतर मात्र ६/३ नंतर लागोपाठ ९/३. १२/३ .... अरे काय आहे काय? काही मधे थोडा वेळ तर द्याल, श्वास घ्यायला!! त्यातून आयर्लंड नि नेदरलंडशी जिंकल्यावर लगेच तीन दिवसात परत?? एव्हढे जिंकल्याबद्दल सेलेब्रेशन करून त्यातून बाहेर यायच्या आधीच दक्षिण अफ्रिकेसारख्या देशाशी खेळायला?

त्या ऐवजी आयर्लंडनंतर सात दिवसानी दक्षिण आफ्रिका, नंतर सात दिवसांनी नेदर्लंड असे ठेवले असते तर बरे झाले असते. कारण आता हरल्यावर परत आठ दिवसात वेस्ट इंडिज म्हणजे जास्तच नाही का? पराभवाचे दु:ख विसरून, त्या हँगओव्हरमधून बाहेर पडायला निदान महिना तरी हवाच ना??
कळत कसे नाही सामन्यांचे वेळापत्रक करणार्‍यांना?

त्यापेक्षा ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकीस्तानी यांना खेळू द्या दररोज, किंवा एक दिवसा आड. ते खेळाडू पितातहि कमी नि सारखे आपले सराव करत बसतात!! (पैसे नसतील मनोरंजन करायला, भिकारी कुठले!)

आणि आता विश्वचषक जिंकला नाही तर चूक कुणाची???

Proud Proud Proud

गणू, सावधान! तुम्ही हळू हळू माझ्यासारखे होताहात!!!!

सारखे आपले विनोदी म्हणून काहीतरी निरर्थक लिहायचे, तेच तेच विनोद परत परत!
भारतीयांवर टीका! हे सगळे माझे विशेष.

मी एक म्हातारा, अमेरिकेचा नागरिक, अक्कल नसलेला माणूस. (अमेरिकन नागरिक म्हंटल्यावर हे लिहायलाच पाहिजे का?)
चाळीस वर्षात भारत किती बदलला आहे, मला माहित नाही. पण तुम्ही पण?????

त्यापेक्षा असे करा - मागे इथे कविता चांगली की वाईट ठरवायला स्टॅटिस्टिक्स ची कल्पना काढली होती. साहित्य, वाचक किती चांगले हे ठरवायला, चर्चेत भूमिति, त्रिज्या, रुंदावलेल्या कक्षा, आणखी भूगर्भशास्त्रातले काहीतरी असे इथे सुचवले होते.

तसे तुम्ही आता क्रिकेटचे थर्मोडायनॅमिक्स तयार करा. संघनायकाच्या निर्णयाची एन्ट्रॉपी, गोलंदाजीची हीट ऑफ रिक्शन वगैरे. नाहीतर सरळ क्वांटम मेकॅनिक्स!! म्हणजे सगळे दोष हायझेनबर्गच्या अन सर्टन्टि प्रिन्सिपल वर ढकलून आपण मोकळे! आणि मी येथून पळून जाईन!!

Happy Light 1

त्या लिंक चे टायटल "why nehara shouldnt have bowled last over" असे हवे होते.>> त्या तक्त्यामधे हरभजनचे नाव मला दिसले नाहि. नेहराने एकदा ODI मधे नि तिनदा T-20 मधे शेवटची ओव्हर टाकली, त्यातली one day नि दोन t20 जिंकलो. मला वाटते हे stats लक्षात ठेवणे स्वाभाविक आहे.

Pages