गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स गिरीश अधिक माहितीबद्दल.
काल हिच लिंक भरतने दिली होती. आज ऐकली काही गाणी Happy

बेगम परवीन सुल्ताना यांची काही गाणी--
*आन मिलो सजना (चित्रपट गदर)
*वादा तुमसे है (चित्रपट १९२०)
* पीतल की मोरी गगरी (चित्रपट दो बूंद पानी)
*पीया की गली लगे भली (चित्रपट परवाना)

http://www.hummaa.com/music/artist/Begum+Parveen+Sultana/24744

मित्रांनो,
गैर मराठी (Non Mahrashtrian) कलाकारांनी गाइलेली मराठी गाणी हा पण एक इंटरेस्टिंग प्रकार आहे.
अशी गाणी बरीच आहेत आणि बर-याच जणांना ती माहित असतील्...तर आपल्या माहितीतली अशी गाणी कृपया इथे द्या ना....

गिरिश, याच बाफवर अमराठी गायकांनी गायलेल्या गाण्यावर चर्चा केली आहे. तुम्हाला अजुन काही गाणी माहिती असेल तर नक्कीच भर घाला.

पितल की मोरी गागरी देलहीसे मोल मंगायी रे, या गाण्यात मिनू पुरुषोत्तमचा पण आवाज आहे.
त्याच चित्रपटात, भाभी तोरी बिंदीया कि ले लू रे बलैया, या गाण्यात पण या दोघींचा आवाज आहे असे वाटतेय (पण ते गाणे नंतर मी कुठेच ऐकले नाही.)

भार्गवराम आचरेकर, पंडितराव नगरकर, श्यामलाबाई माजगांवकर, मधुबाला जव्हेरी हे सगळे गायक कलाकार आमचे नातेवाईक. प्रत्येकाचा गळा गोड आणि गायकी तयारीची !!

पुलंनी एक संगीतिका आकाशवाणीवर सादर केली होती, त्यात जितेंद्र अभिषेकी आणि किशोरी अमोणकर गायले होते (नाव बहुतेक बिल्हण किंवा असेच काहीतरी होते ) ती गाणी पण आता मिळायची नाहीत.

फैयाज आणि अजित कडकडे, भारत एक खोज, या दूरदर्शन मालिकेतल्या शाकुंतल या भागात, नाट्यगीतांचा वळणाने हिंदी गाणी गायले होते. या मालिकेत, ज्या भागातले ते कथानक असले तिथले संगीत पण शब्द हिंदी, असे अजब रसायन होते, पण संगीत सुश्राव्य होते.

अवांतरः
या गाण्यात मिनू पुरुषोत्तमचा पण आवाज आहे.>>>> मिनू पुरूषोत्तम यांचा आवाज मी "नी मै यार मनानी चाहे लोग बोलिया बोले" (चित्रपट: दाग) लता मंगेशकरसोबत याच गाण्यात ऐकलाय.

अवांतर ला अवांतर ..
प्रेमपर्बत मधले, रात पिया के संग जागी रे सखी, चैन पडा जो अंग लागी रे सखी, हे पण मिनू पुरुषोत्तमचेच.

अधिक माहितीबद्दल धन्यवाद दा Happy
रच्याकने, प्रेमपर्बत म्हणजे "ये दिल और उनके निगाहो के साये" हे नितांत सुंदर गाणे असलेलाच ना?

हो रे तोच, पद्मा सचदेव या कवयित्रीचे, ये नीर कहासे बरसे है, ये बदरी कहासे आयी है, हे लताचे गाणे पण त्यातलेच.
कोयल भूल गयी जो घर, वो लौट के फिर कब आयी है ? अशी एक सुंदर ओळ आहे त्यात.
हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला ते कळलेच नाही, पण ये दिल और उनकी, गाणे मात्र हिट झाले होते. जयदेव चे संगीत, म्हणजे जादू होती.

चल आठवतेय तर हे गाणेच लिहून टाकतो इथे

ये नीर कहासे बरसे है, ये बदरी कहासे आयी है

गहरे गहरे नाले गहरे, गहरा पानी रे
गहरे मन की चाह अनजानी रे
जग की भूलभुलैयामें, कूंज कोई बौराई है

चिडोंके संग आहे भर ली
आग चनार की, माँगमे भर ली
बूझ ना पाये रे, राख मे भी जो, ऐसी अगन लगाई है

पंछी पगले, कहा घर तेरा रे
भूल न जैयो, अपना बसेरा रे
कोयल भूल गयी जो घर वो, लौटके फिर कब आई है

हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला ते कळलेच नाही, पण ये दिल और उनकी, गाणे मात्र हिट झाले होते. जयदेव चे संगीत, म्हणजे जादू होती.>>>>>दा, प्रचंड अनुमोदन Happy

एका दिवसात इतक्या पोस्ट्स....मस्त.
अनुराधा बाई बाकी सगळ्यांचे श्रेय लाटतात त्याचे काय? त्यांनी लतादीदींची किती गाणी (गणपती आरती सकट) स्वतःच्याच आवाजत रेकॉर्ड करून घेतलीत. असंख्य हिंदी चित्रपटगीते आणि शुक्रतारा सुद्धा. टी सिरीज साठी.
पाउस कधीचा पडतो मी प्रथम पुरुष आवाजातच ऐकले होते. बहुधा दूरदर्शनवर शब्दांच्या पलीकडले साठी यशवंत देवांनी संगीतबद्ध करून (बहुधा) स्वतःच गायिले होते. याच कार्यक्रमासाठी त्यांनी चांद मातला मातला (देवकी पंडित) सर्वस्व तुजला वाहुनी (उत्तरा केळकर-रेकॉर्ड पद्मजा फेणाणीच्या आवाजात) काही बोलायाचे आहे (श्रीधर फडके-रेकॉर्ड अरुण दातेंच्या (सुद्धा) आवाजात)माझ्या मातीचे गायन (पद्मजा फेणाणी जोगळेकर - रेकॉर्ड अनुराधा पौडवाल ) ही गाणी केली होती.

माझ्याकडे एक 'महाराष्ट्राची लोकधारा' म्हणून अल्बम आहे. पुण्याला आलुरकरकडे मीळाला होता मला. त्यात खूप छान मराठी लोकसंगीतातील गाणी आहेत. कोणाला हवी असल्यास इथे यादी टाकतो.

खेड्यामधले घर कौलारू ही दोन वेगवेगळी गाणी आहेत. एक गदिमांचे एक कवि अनिल भारती यांनी लिहिलेले. दोन्हीची चाल एकच (रिमिक्सचा वेगळा प्रकार)

आज अचानक एकाएकी मानस लागे तेथे विहरू खेड्यामधले घर कौलारू
( अनिल भारती)
आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरू खेड्यामधले घर कौलारू (गदिमा)
कोणतं गाणं कोणी गायलं आठवतच नाही. एक मालती पांडेंच्या आवाजात आहे, अनिल भारतींचे. दुसरे आशाच्या.

भरत, माझ्या मताचे आणखी कुणी आहे, याबद्दल मला खुपच आनंद झाला.

माधव, ती एकेकाळची दूरदर्शन मालिका होती. शाहिर साबळ्यांनी सादर केली होती. तिचे नॄत्य दिग्दर्शन चारुशीला साबळे ने केले होते. आठशे खिडक्या नऊशे दारं, कुन्या वाटंनं गेली हि नार या गाण्यावर ती आणि प्रदीप पटवर्धन धमाल नाचले होते. (आता बाजारात जी सिडी आहे त्यात गाणी मूळची, पण नाचणारे वेगळेच आहेत.)

खेड्यामधले घर कौलारू ही दोन वेगवेगळी गाणी आहेत. एक गदिमांचे एक कवि अनिल भारती यांनी लिहिलेले. दोन्हीची चाल एकच>>>भरत, धन्स रे या माहितीबद्दल Happy
मी मालती पांडे यांच्या आवाजातील ऐकले आहे.

आता बाजारात जी सिडी आहे त्यात गाणी मूळची, पण नाचणारे वेगळेच आहेत >> दिनेशदा, माझ्याकडे फक्त ऑडिओ सिडीच आहे.>>>>माझ्याकडेपण mp3 फॉर्मॅट्मध्ये आहेत :). त्यात "मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून" आणि "उदे ग अंबे उदे..." हि दोन्ही (वेगवेगळी) गाणी शाहिर साबळेंच्या आवाजातील आहे. Happy

अनिल भारती यांनी या कातरवेळी पण लिहिलेय (गदिमांच्या कातरवेळी सारखं)
पुन्हा दुसर्‍या गीताच्या गायिका मालती पांडे.
पण आता मी गुगलले तर मालती पांडेंच्या गाण्याला संगीत मधुकर पाठक असे दिसतेय. चाल तीच तर आहे. संगीत वेगळे म्हणजे काय म्युझिक अ‍ॅरेंजर म्हणून का?

अनुराधा बाई बाकी सगळ्यांचे श्रेय लाटतात त्याचे काय?

मला या बीबीवर वादाला सुरवात करायची नाहीये आणि मी अनुराधाची खुप मोठी फॅन आहे असेही नाही. मला तिचा आवाज आवडतो. लता-आशाची नक्कल करायचा प्रयत्न करणा-या मंडळींच्या गर्दीत तिचा वेगळा आवाज उठुन दिसायचा. बाकी लता-आशा-रफी-किशोर व. मंडळींची गाणी अप्रसिद्ध लोकांच्या आवाजात गाववुन घेऊन ती कॅसेट फक्त १८ रुपयांना उपलब्ध करुन देण्याची शक्कल लढवण्याचे श्रेय गुलशन कुमारला जाते. (त्यावेळी एचेमवीची मुळ कॅसेट ३० ते ५० रुपयांना मिळायची). भारतभरचे ट्रक ड्रायवर्स, खेड्यापाड्यातली जनता, धाबे, हाटेले हे गुलशनकुमारचे मोठे ग्राहक होते. सोनु निगम आणि कुमार सानु ही मंडळीही त्याच्या कडे या कवर वर्शन्ससाठी गायले आहेत. अर्थात त्या वेळी ते स्टार बनले नव्हते.

लता-आशाचा दबदबा असलेल्या राज्यात अनुराधाचे प्रस्थ तसे म्हटले तर बसलेच नसते. ते गुलशनकुमारमुळे बसले. तिने इतरांचे श्रेय लाटले या गोष्टीचे श्रेय तसे म्हटले तर गुलशनकुमारकडेच जाते. एक वेळ अशी होती की जवळजवळ प्रत्येक चित्रपटाची कॅसेट टी सिरीजवर बनत होती आणि संगित दिग्दर्शकाला अनुराधाकडुनच गाववुन घ्यावे लागत होते. शिरीष कणेकरांनी तिच्याबद्दल - अनुराधाला हाताशी धरुन गुलशनकुमारने भारतातील समस्त स्त्रीसुरांचा समुळ नाश करण्याची योजना हाती घेतलीय असे लिहिलेले.

तिच्या पतीच्या निधनानंतर आणि नंतर गुलशनकुमारच्या हत्येनंतर तिने केवळ भजनांवरच लक्ष केंद्रित केले. आजही तिचा आवाज मला आवडतो. टी सिरिज मागे पडल्यावर उदयाला आलेल्या अलका याद्निकपेक्षा ती खुपच जास्त टॅलेंटेड होती असे मला तरी वाटते. अलकाचा आवाज मला कधीच आवडला नाही. तिने फार क्वचित मोकळ्या सुरात गाणी गायलीत. बाकी कायम चोरट्या आवाजात गायली. कविता कृष्णमुर्तीचे मार्केट चांगले होते तेव्हा तिचा आवाज खुप कर्कश लागायचा कानाला. त्यामानाने आता जी निवडक गाणी गाते त्यात खुप चांगला वाटतो.

पुलंनी एक संगीतिका आकाशवाणीवर सादर केली होती, त्यात जितेंद्र अभिषेकी आणि किशोरी अमोणकर गायले होते (नाव बहुतेक बिल्हण किंवा असेच काहीतरी होते ) ती गाणी पण आता मिळायची नाहीत.

>>>>>
मी असं ऐकलं होतं की HMV सारेगम ने पुन्हा ही रेकॉर्ड काढली होती २-३ वर्षांपूर्वी...मग ती वेगळी होती का? "पुलंची बिल्हण नावाची रेकॉर्ड आली आहे बाजारात" अशी माहिती मला माझ्या मैत्रिणीने दिली होती! चुकीची होती की काय तिला मिळालेली माहिती! Sad

प्रज्ञा, जर ती रेकॉर्ड मूळ गायक कलाकारांच्या आवाजात असेल तर खरेच उत्तम असणार.
माझ्याकडे लोकधाराची व्हीसिडी आहे. सगळेच हौशी कलाकार असल्याने, नृत्य अक्षरशः बघवत नाहीत. इतक्या अननुभवी कलाकारांने ते हक्क का दिले. मूळ मालिका काळ्यापांढर्‍या रंगात होती. पण ती दर्जेदार होती. चारुशीला एक नृत्यदिग्दर्शिका आणि नर्तिका म्हणून लोकांना माहितच नाही. त्याबरोबरच एच एम व्ही ने महाराष्ट्राची भक्तीधारा म्हणून एक संच काढला होता, त्यात मन्ना डे वगैरे नी गायलेले अभंग होते.

आणखी काही, मिळाले तर संग्रही ठेवण्यासारखे संच
देवगाणी. हा डॉ अशोक रानडे यांचा कार्यक्रम होता.
यात श्रुती साडोलीकर, उत्तरा केळकर, किर्ती शिलेदार, स्वतः डॉ अशोक रानडे, यांनी गायलेली, अभंग, गवळण, भारुड, कापडी गीत असे अनेक प्रकार होते. पडिले दूरदेशी (उत्तरा केळकर ) कानडाऊ विठ्ठलू (श्रुती साडोलीकर, वेगळ्या चालीत.) रंगीन पालना हौसेनं केला, माझा झुलनार निघून गेला ( हा एक मोहरम च्या वेळेस गायला जाणारा रिवायत हा प्रकार, श्रूती च्या आवाजात ) कमळाचे स्कंधी ( रानडे )
गड्यांनो राज कि रे झाला, कापडी आम्ही कापडी, आल्या आल्या पाच गौळणी अशी अनेक गाणी होती. आरत्यांचे अनेक प्रकार होते.

गोविंदा रे गोपाळा, असा पण एक संच होता, त्यात छोटा गंधर्व, सुरेश हळदणकर, आशा, उषा, माणिक वर्मा, कृष्णा कल्ले, महेंद्र कपूर, अनुराधा पौडवाल अशा अनेक कलाकारांनी गायलेली कृष्णाची गाणी होती.
हे सगळे कॅसेटच्या जमान्यातले. यांच्या सिडीज निघाल्या का, त्याची कल्पना नाही.

बिल्हण गुगलल्यावर कौशल इनामदार यांनी त्याची ध्वनिफीत/चकती काढल्याचे कळले. आता ती मूळ गायकांच्या आवाजात कशी असायची.
पं अभिषेकींच्या आवाजात 'शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले' आणि 'माझे जीवनगाणे' ही दोन गाणी संगीतकार पु ल आणि गीतकार पाडगावकरांची आहेत. ही दोन्ही, किंवा किमान एक बिल्हणमधले आहे.

मला महाश्वेता च गाण हव होत .... कुणाला त्या गाण्याची downloading link माहिती असेल तर कृपया मला सांगावी ... खूप आभारी राहील मी ....
पुढील गाणे .....

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गाते
तू मला शिकविले ते

ते झरे चंद्र सजणाचे
ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडत पुन्हा उगवाया
भय .....

तो बोल शब्द हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला
भय .....

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
भय .....

http://www.youtube.com/watch?v=x88r7JI4ljU
टिना, भय इथले संपत नाही. इथे बघायला मिळेल. ते डाऊनलोड कसे करायचे, ते इमेलने कळवू शकेन.

प्रज्ञा, कसचं कसचं ! एका ठराविक कालखंडानंतर कान, डोळे सगळे मिटूनच घेतल्यासारखे झालेय.

गोविंदा रे गोपाळा, असा पण एक संच होता, त्यात छोटा गंधर्व, सुरेश हळदणकर, आशा, उषा, माणिक वर्मा, कृष्णा कल्ले, महेंद्र कपूर, अनुराधा पौडवाल अशा अनेक कलाकारांनी गायलेली कृष्णाची गाणी होती.
हे सगळे कॅसेटच्या जमान्यातले. यांच्या सिडीज निघाल्या का, त्याची कल्पना नाही.

>>>>>>>दा, हा संच बहुदा माझ्याकडे आहे (घरी जाऊन पहावा लागेल), कारण (बहुतेक) याच संचात "गोपाळा गोपाळा, देवकीनंदन गोपाळा" हे मन्ना डे यांनी गायलेले गाणे आहे.

या संचातली बाकीची गाणी गोविंदा रे गोपाळा (सुरेश हळदणकर ), असा कसा देवाचा देव बाई ठकडा (छोटा गंधर्व ) कशी मी आता जाऊ, जाऊ घरी, सांग मला श्रीहरी ( कृष्णा कल्ले ).
छान संच होता हा. (माझे कॅसेट्सचे बरेच कलेक्शन, पूरात वाहून गेले. )

Pages