Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38
मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्स, भरत यातील "नशिबात ये
धन्स, भरत
यातील "नशिबात ये गुलामी" हे एकच गाणे ऐकले आहे
नशिबात ये गुलामी हे अगदी
नशिबात ये गुलामी हे अगदी उर्दू शायरीतल्या आशिकाचे मनोगत वाटतेय ना? तसेच शब्द तेच भाव...मराठीतले प्रेमवीर काही समर्पण करून गुलामी स्वीकारायचे नाहीत.
यातले इंटरल्युड म्युझिक ऐकताना पन्नास-साठच्या दशकातल्या रोमँटिक हिंदीच चित्रपटगीतांची आठवण येते, जेव्हा काही न-अभिनेत्यांचे चित्रपट त्यातल्या गाण्यासाठीच पाहिले जायचे(बहुधा)
नशिबात ये गुलामी हे अगदी
नशिबात ये गुलामी हे अगदी उर्दू शायरीतल्या आशिकाचे मनोगत वाटतेय ना?>>>>येस्स्स
महाराष्ट्र शासनाचा लता
महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार ज्यांना जाहिर झाला त्या सुलोचना चव्हाण यांनी गायिलेली ही काही गीते...सगळ्या लावण्याच :
१) कुठवर पाहु वाट सख्याची
माथ्यावरी चंद्र की ग ढळला
सखे बाई ग येण्याचा वखत की ग टळला --------- पठ्ठे बापुराव-एस चव्हाण
२) कळीदार कपुरी पान कोवळं छान केशरी चुना
रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा : राजा बढे- श्रीनिवास खळे
३) पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
ग आई मला नेसव शालू नवा
४) मला हो म्हणतात लवंगी मिरची
५) कसं काय पाटील बरं हाय का?
काल काय ऐकलं ते खरं हाय का?
मराठीत गायला लागण्यापूर्वी त्या (तेव्हाच्या सुलोचना कदम) हिंदी आणि पंजाबी गीतांसाठी प्रसिद्ध होत्या. काठापदाराची साडी, लांब केस आणि त्यावर माळलेल्या वेण्या यामुळे त्यांचे भावी पती एस चव्हाण यांनी ही कुणी मद्रासी गायिका आहे असे वाटायचे!
विष्णुदास भावे पुरस्कार ज्याना जाहीर झाला त्या फ़ैयाज यांनी गायिलेली ही गाणी (पुन्हा?)
१) चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी (हे पूर्ण द्यायचा आणि त्याची सिच्युएशन सांगायचा मोह आवरतोय)
२) स्मरशिल यमुना स्मरशिल राधा स्मरशिल गोकुळ सारे
दोन्ही -नाटक -वीज म्हणाली धरतीला-कुसुमाग्रज- सं वसंतराव देशपांडे
३) लागी करेजवा कटार (कट्यार काळजात घुसली-पुरुषोत्तम दारव्हेकर- पं जितेंद्र अभिषेकी)
४) निर्गुणाचा संग धरिला जो आवडी (संत गोरा कुंभार -अशोक जी परांजपे -पं जितेंद्र अभिषेकी)
५) जोगिया (चि : घरकुल- गदिमा- सी रामचंद्र)
६) वसंत देसाईंच्या संगीतात गायिलेल्या बालभारतीतल्या कविता
देवा तुझे किती सुंदर आकाश
या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया (सोबत साधना सरगम)
अरे या धाग्याचे त्रिशतक झाले, पण बाकीचे फलंदाज कुठे गेले?
सुलोचना चव्हाण यांचे हार्दिक
सुलोचना चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन!!!!
उशिरा का होईना राज्य शासनाला जाग आली तर.
चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी (हे पूर्ण द्यायचा आणि त्याची सिच्युएशन सांगायचा मोह आवरतोय)>>>>> भरत, प्लीज मोह आवरू नकोस.
सुलोचनाबाईंचे खूप
सुलोचनाबाईंचे खूप अभिनंदन!
त्यांची लावणी म्हणजे बंदा रुपया - अगदी पटकन नजरेत भरणार्या त्यांच्या कुंकवासारखा. गातांना बाईंच्या चेहर्यावरचा अलिप्ततेचा भाव जराही ढळत नाही, पण गाण्यात सगळा नखरा सगळी अदाकारी अशी ठासून भरलेली असते की बास्! नेम बरोबर बसतो आणि आपण घायाळ होतो.
त्यांची लावणी म्हणजे बंदा
त्यांची लावणी म्हणजे बंदा रुपया - अगदी पटकन नजरेत भरणार्या त्यांच्या कुंकवासारखा. गातांना बाईंच्या चेहर्यावरचा अलिप्ततेचा भाव जराही ढळत नाही, पण गाण्यात सगळा नखरा सगळी अदाकारी अशी ठासून भरलेली असते की बास्! नेम बरोबर बसतो आणि आपण घायाळ होतो.>>>>>१००००% सहमत
चार होत्या पक्षिणी त्या रात्र
चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी (हे पूर्ण द्यायचा आणि त्याची सिच्युएशन सांगायचा मोह आवरतोय)>>>>>
कशाला आवरताय?? इथे जागा आहे आणि वाचकही आहेत, तेव्हा होऊन जाऊद्या...
जुलेखा ही मूळची नर्तकी,
जुलेखा ही मूळची नर्तकी, झाशीच्या राणीच्या सेवेत आणि मग तिच्या सैन्यात सामील झालेली. काशी आणि मुंदर या आणखी दोन सेविका/सैनिक. जुलेखा लढाईत पायाला गोळी लागून जायबंदी झालेली. सक्तीचा आराम वाट्याला आलेला....एकटीच आपल्या निकामी पायाशी बोलतेय...
चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी
दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती॥
(शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली॥
तोडुनी आंधी तुफ़ाने चालल्या ती चालली
तीन होत्या दीपमाला एक होती सावली॥)
तोच आला तीर कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा॥
कोकिळेने काय केले गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले॥
(मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली)
ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पावले॥
(कंसात दिलेल्या ओळी ध्वनिमुद्रिकेत नाहीत.)
गाणे चालू असताना आलेल्या मुंदरशी जुलेखा एक करार करते. राणी किल्ला सोडून सैनिकांसोबत निसटून जाईल, त्यापूर्वी मुंदरने जुलेखावर गोळी झाडून तिला ठार करायचे. राणीबरोबर बाहेर पडणे जुलेखाला शक्य नाही आणि मागे राहिली तर इंग्रजांच्या हाती सापडून विटंबना होण्याची भीती.
नंतर किल्ला सोडण्यापूर्वी राणी, काशी मुंदर जुलेखाच्या भेटीस येतात. ती शेवटचे गाणे ऐकवते :
मैफ़लीचा हा किनारा दो घडीचा वायदा
कारवां दारात आला अल्विदा हो अल्विदा
मी स्वरांचे पंख झाले रात झाली चांदणी
तारकांच्या रोशनीचा मानला मी कायदा
ही कळी रस्त्यात पडली आपुल्या मेण्यापुढे
काळजाशी घेतली ती ही ललाटी संपदा
मालकांनो प्रेम केले खूप या पोरीवरी
चांदवा तुमच्या दयेचा मस्तकी होता सदा
गीत होते सर्व अपुले सार्थ झाले फ़क्त मी
लाभली काही खुशी का हाच सेवेचा अदा
द्या इजाजत कोकिळा ही चालली शिशिराकडे
जिंदगी हरदम सुखाची आपणा देवो खुदा.
हे गीत गाऊन झाल्यावर जुलेखा मुंदरकडून करार पूर्ण करून घेते.
छान योगेश. हे गाणे मला पूर्ण
छान योगेश. हे गाणे मला पूर्ण माहीत नव्हते. हे नाटकही मी रेडीओ वर ऐकले होते. या नाटकात सुधा करमरकर आणि फैयाझ, या दोघी आवाज कमावलेल्या अभिनेत्री होत्या. फैयाजनी निव्वळ आपल्या आवाजाने, उभी केलेली जिजाऊ (नाटक, जाणता राजा ) विसरताच येणार नाही. फैयाजनी आणखीही काही मराठी चित्रपटगीते, गायली आहेत असे वाटते.
सुलोचना चव्हाण अभंग पण तितक्याच ताकदीने सादर करत असत. माती सांगे कुंभाराला, हे गीतपण मला वाटते, त्यांनी गायले होते.
मल्हारी मार्तंड सिनेमात, जयश्री गडकर साठी त्यांनी बरीच गाणी गायली होती (उसाला लागल कोल्हा, आइ रुसली बाबा रुसले वगैरे ) केला इशारा जाता जाता मधे पण त्यांची गाणी आहेत. (सोबत कृष्णा कल्ले आहेत.)
एका मेळ्यात, लता मंगेशकरने प्रेक्षकात बसून, त्यांचा कार्यक्रम ऐकला होता, अशी आठवण त्यांनीच दूरदर्शनवर सांगितली होती.
भरत, छान माहिती दिलीस.
भरत, छान माहिती दिलीस.
"रविंद्र साठे" माझ्या आवडत्या
"रविंद्र साठे" माझ्या आवडत्या गायकांपैकी एक. रविंद्रजींच्या वाटेला फार कमी गाणी आली असे मला वाटते, पण त्यांनी त्या गाण्यांचे सोने केले. त्यांची बहुतेक सगळीच गाणी माझ्या आवडीची त्यातल्या त्यात खालील गाणी जरा जास्तच
१. पिक करपलं पक्षी दूर देशी गेलं, गळणार्या झाडांसाठी मन ओथंबलं
(चित्रपटः जैत रे जैत, या चित्रपटातील सगळीच गाणी अत्यंत आवडती :-))
२. मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना, जे परतुन कधी ना आले
(चित्रपटः मुलगी झाली हो)
३. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा
(चित्रपटः गारंबीचा बापू)
४. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
(चित्रपटः सामना)
५. सख्या रे घायाळ मी हरीणी
(चित्रपटः सामना, लता मंगेशकर यांनी गायलेली हि लावणी रविंद्रजींच्या आवाजात सुद्धा आहे. बहुदा चित्रपटात नाही, माझ्याकडे HMV ने काढलेली रविंद्रजींच्या गाण्याची कॅसेट "माती भिडली आभाळा" होती त्यात हे गाणे आहे.)
६. गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळु दे
(चित्रपटः उंबरठा)
७. बंद ओठांनी निघाला पेटलेला एकला, दाटलेल्या अंतरी का सूर झाला मोकळा
(चित्रपटः सर्वसाक्षी)
८. मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटुनी आला
(चित्रपटः एक होता विदुषक)
अजुन एक आवडीचे गाणे त्याची
अजुन एक आवडीचे गाणे
त्याची धून झंकारली रोमारोमांत
उमलून जीव आला माझ्या डोळ्यांत
चांदण्यांची लुकलुक झुले गगनी
बासरीने भारावून गेली रजनी
रसरंग उधळला कोनाकोनांत
दूर यमुनेच्या काठी पाय वाजले
दिशांच्या गर्भात झाली निळी वादळे
चैतन्याचे वारे आले वाळवंटात
सावळ्याची खूण सखे, टाळी वाजली
धावू लागे मन आता आनंदमेळी
नुरले ग माझेपण माझ्या देहांत
गायिका: मंगला नाथ
संगीतः यशवंत देव
आशाताईंनी गायलेल्या
आशाताईंनी गायलेल्या गाण्यांपैकी अजुन एक सुंदर गाणे:
हरीनाम मुखी रंगते,
एकतारी करी वाजते
विनविते मी तुला, भाववेडी मीरा
गोड नामी तुझ्या रंगते
घरट्यात माझीया आनंदाचा ठेवा
तुच यदुनाथा सदा असू द्यावा
इतुकेच मागणे तुझ्यापाशी मी मागते
काम क्रोध मत्सर कधी ना पाहिले
लोभ मोह सारे दूर मी सारिले
हरीच्याच चिंतनी, जीवनास मी वाहते
गोड नामी तुझ्या रंगते........
हे ही गाणे बहुतेक मंगला नाथ,
हे ही गाणे बहुतेक मंगला नाथ, यांच्याच आवाजात आहे.
जरी या पुसून गेल्या, सार्या जून्या खुणा रे
हा चंद्र पाहताना, होते तूझी पुन्हा, पुन्हा रे
मला खूप आवडणार गाणं.... का
मला खूप आवडणार गाणं.... का रे दुरावा,का रे अबोला.... अपराध माझा असा काय झाला?
मंगला नाथ यांचे फक्त "त्याची
मंगला नाथ यांचे फक्त "त्याची धून झंकारली रोमारोमांत" हे एकच गाणे आतापर्यंत ऐकले आहे
डॉक, हे गाणे माझ्याही आवडीचे
डॉक, हे गाणे माझ्याही आवडीचे
बाई सुंदराबाई, यांनी आशा
बाई सुंदराबाई, यांनी आशा भोसलेंकडून गाऊन घेतलेली, दिवाळीची अप्रतिम लावणी, गेल्या आठवड्यात ईप्रसारण वर ऐकली. फार जूने रेकॉर्डींग आहे ते. मग शब्द लिहीन.
जरी ता पुसून गेल्या हे शोभा
जरी ता पुसून गेल्या हे शोभा जोशी यांनी गायिले आहे.
'सखी मी दर्ददिवाणी माझी व्यथा कुणा नकळे ग
घायाळाची मर्मवेदना घायाळाच कळे ग'
हे त्यांनी गायिलेले आणखी एक गाणे.
सात जन्मांची निनावी आशा धरुन मनात
बकुळफुला कधीची तुला धुंडते मनात
हे बहुधा मंगला नाथ यांचे.
बकुळफुलाला /झाडाला उद्देशून गीते लिहिलेली ही आणखी गीते :
*घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला (धाडिला राम तिने का वनी)
*या बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले
आभार भरत. या गायिका नंतर मागे
आभार भरत.
या गायिका नंतर मागे पडल्या. शोभा जोशींचे गायन मी प्रत्यक्ष ऐकलेय.
या दोघीपैकी कुणीतरी,
.. शोधाया तूज आले, तूझी झाले रे, तूझी झाले.. असे शब्द असणारे गाणे गायलेय.
सखी मी दर्ददिवाणी, मीरेच्या भजनाचे रुपांतर वाटतेय.
असे रुपांतर गदिमांनी पण केले होते, बहुतेक सुवासिनी चित्रपटासाठी ते आशाने गायलेय. पडद्यावर सीमा आहे, हे नक्की.
या बकुळीच्या झाडाखाली, सुषमा श्रेष्ठ चेच ना ?
तिला पाहुनी फुलते मी अन,
मला पाहता तिही फूले.. अशा पण ओळी आहेत ना त्यात.
आणखी बकुळीचे एक गाणे.
शब्द शब्द जपूनी ठेव, बकुळीच्या फूलापरी..
धन्स दिनेशदा, भरत शोभा जोशी
धन्स दिनेशदा, भरत
शोभा जोशी आणि शुभा जोशी वेगवेगळ्या आहेत का?
शुभा जोशी यांचे "एक उनाड दिवस" चित्रपटातील "हुरहुर असते तीच उरी, दिवस बरा कि रात्र बरी" हे गाणे सुंदर आहे.
(चित्रपटात फैय्याज आणि अशोक सराफ यांवर चित्रित.)
योग्या.. "हुरहुर असते तीच उरी
योग्या.. "हुरहुर असते तीच उरी " हे माझं खूप आवडतं गाणं आहे रे.
अशीच एक विस्मरणांत गेलेली
अशीच एक विस्मरणांत गेलेली गायिका. सुप्रभा हुल्याळकर (या नावाबद्दल पण खात्री नाही मला.)
गाणे होते
धन्य ती पंढरी, धन्य भीमातीर
आणियले सार, वैकुंठीचे
दिनेशदा हे गाणं अधुन मधुन
दिनेशदा हे गाणं अधुन मधुन विविधभारती वर लागतं.
रविंद्र साठे" माझ्या आवडत्या
रविंद्र साठे" माझ्या आवडत्या गायकांपैकी एक. रविंद्रजींच्या वाटेला फार कमी गाणी आली असे मला वाटते, पण त्यांनी त्या गाण्यांचे सोने केले. त्यांची बहुतेक सगळीच गाणी माझ्या आवडीची त्यातल्या त्यात खालील गाणी जरा जास्तच >>> "आम्ही ठाकर ठाकर" पण त्यांचंच ना?
गगनामधुनी देखियले तुज सांगाया
गगनामधुनी देखियले तुज सांगाया गुज आले रे
तुझी झाले रे तुझी झाले
आम्ही ठाकर ठाकर" पण त्यांचंच
आम्ही ठाकर ठाकर" पण त्यांचंच ना?>>>>>हो, हे गाणेही रविंद्रजींचेच
योग्या.. "हुरहुर असते तीच उरी
योग्या.. "हुरहुर असते तीच उरी " हे माझं खूप आवडतं गाणं आहे रे.>>>सुकी, खरंच सुंदर गाणं आहे हे. :). चित्रपटातही फैयाज यांच्यावर चित्रित केलेले पहायला आवडते (पण.. अशोक सराफच्या जागी अजुन दुसर कुणीतरी हव होत. :)).
हुरहुर असते तीच उरी
दिवस बरा की रात्र बरी
हुरहुर असते तीच उरी......
कुठला रस्ता सांग खरा
वळणाचा कि सरळ बरा
वळणाचा कि सरळ बरा
हुरहुर असते.....
जगणे मरणे काय बरे
सुख खरे कि दु:ख खरे
सुख खरे कि दु:ख खरे
हुरहुर असते......
स्वरः शुभा जोशी
गीतः सौमित्र
संगीतः सलील कुळकर्णी
अशीच अजुन एक विस्मरणात गेलेली
अशीच अजुन एक विस्मरणात गेलेली (लावणी) गायिका म्हणजे "रोशन सातारकर".
त्यांची मला आठवत असलेली गाणी:
१. नेहमीच राया तुमची घाई, नका लावु गठूडं बांधायला अन् येऊ कशी तशी मी नांदायला
२. डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस
३. नांदायला नांदायला नांदायला मला बाई जायाचं नांदायला
४. उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा.
रोशन सातारकर यांची अजुन काही गाणी कुणास माहिती असेल तर येथे जरूर अपडेट करा.
Pages