गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खालील साईटवर मराठी गाण्यांची बरीच उपयुक्त माहिती आहे.
http://www.aathavanitli-gani.com/Anukramanika
अशी लिंक देणे योग्य नसल्यास कळवावे. मी पोस्ट काढून टाकेन.

पाहिले न मी तुला
तु मला न पाहिले
ना कळे कसे कधी
मन वेडे गुंतले

सुरेश वाडकरांचा आवाज छान लागलाय Happy

अतुल ठाकुर | 10 June, 2014 - 01:11
पाहिले न मी तुला
तु मला न पाहिले
ना कळे कसे कधी
मन वेडे गुंतले

सुरेश वाडकरांचा आवाज छान लागलाय स्मित
>>>>>>>>>>>>
अगदी खरंय अतुल. मराठी चित्रपटातले कदाचित सर्वात कर्णमधुर गाणे. तुमची पोस्ट वाचल्यावर हे गाणं पुन्हा लावलं आणि ते ऐकता ऐकता ही पोस्ट टाकतोय
|| श्री युट्युबदेव प्रसन्न ||

किशोरीबाईंच "हे श्यामसुंदर राजसा", परवीन सुलतानांनी गायिलेल "रसिका तुझ्याचसाठी", माणिक वर्मांच "हसले मनी चचांदणे, वसंतराव देशपांड्यांच "बगळ्यांची माळ फुले", अभिषेकी बुवांच "घेई छंद मकरंद", कुमारांच्या आवजातलं "जोहार मायबाप जोहार".....अशी अनेक

ही गाणी कुणी गायली आहेत? गीतकार, संगीतकार माहिती असले तरी कळवा.

१. कशी मी तुला भेटू वाटे मला लाज, लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज
२. तू माझी मी तुझा जरी, खातर ना जोवरी, प्रीतीची भूल फुकट ना परी
३. आला खुशीत समिंदर त्याला नाही धीर, होडीला बघतोय धरू

धन्यवाद!

वसंतरावांनी गायिलेलं "कुणि जाल का, सांगाल का" हे गाणं काळजाचा ठाव घेणारं आहे.
तसंच "राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे" हेही एक आवडतं गाणं आहे माझं.
कुणि जाल का- बद्दल लोकसत्ता मध्ये आलेला उल्लेख.
http://www.loksatta.com/pune-news/mukul-shivputra-poetry-dvd-kavi-anil-4...

'आला खुशीत समिंदर' ज्योत्स्ना भोळे यांनी गायिले आहे. गीत अनंत काणेकर.

'नको वळुन बघू माघारी जा रे खुशाल दर्यावरी' हे कोळीगीतही ज्योत्स्नाबाईंचेच.

एकाच या जन्मी जनु फिरुनी नवी जन्मेन मी...

ही एक गाण्याची ओळ आहे मला नेहमीच आटवते पण गाणे कुटे एकलेय तेच आटवत नाहीये..

एकाच या जन्मी जणू या गाण्याबद्दल सप्तसूर २०१३ च्या दिवाळी अंकात फारच छान लेख आला होता सुधीर मोघेंचा.
ऑनलाईन असेल तर नक्की वाचा.

चीकू, दुसरे आणि तिसरे ज्योत्स्ना भोळे यांचे आहे. त्यांनी अत्यंत मोजकी गाणी गायली. पण त्यांच्या आवाजासारखा आवाज कुणाचाच नव्हता. त्यांची कन्या वंदना खांडेकर पण गात असे. तिच्या भुमिका असलेली काही नाटके दूरदर्शनवर सादर झाली होती.

ज्योत्स्ना भोळे आणि माणिक वर्मा यांचीदेखील एकत्र मैफिल दूरदर्शनवर सादर झाली होती.
इप्रसारणवर गेल्या वर्षी त्यांचे कार्यक्रम सादर झाले होते. त्यामधे त्यांचे शास्त्रीय गायनही ऐकवले होते.

मला एका गाण्याच्या मधल्या ओळी आठवतात त्या खालील प्रमाणे
ही लाजलाजरी जादू नजरेत तुझ्या भिरभिरली, तव गुपित उमलले गहिरे गुलजार गुलाबी गाली
देहावर प्राजक्ताचा हा बहर तुझ्या ग सजला, पुनवेची चंद्रकला तू मृग चंचल सोज्वळ बाला ............

प्रीतीची नवखी भाषा तू बोल सखे फुलराणी
हे संपूर्ण गाणे कुणाला माहित असेल तर सांगाल का? बहुतेक हे गाणे सुरेश भटांनी लिहिले आहे

>> एकाच या जन्मी जनु फिरुनी नवी जन्मेन मी...

अप्रतिम आणि हृदयस्पर्शी गाणे आहे. या गाण्याची मला भावलेली खासियत अशी कि म्युझिक शिवाय एखादी स्त्री हे गाणे जेंव्हा गुणगुणे तेंव्हा ते ऐकायला खूपच छान वाटते. काही वर्षापूर्वी युट्युब वर कोणीतरी असे आपल्या आवाजात अपलोड केले होते. नंतर ते गायब झाले.

तु भेट नारे रोज रोज नव्याने .
केव्हा तरी पाहाटे.
जुळुनी येती रेशीम गाठी टायटल.
तुझा ध्यासही धुन्द वेडी नशा.
अजुन खुप आहेत.

वैशाली माड्ये - घाव ओला जरासा होता . ह्या अल्बम मधली बाकीची ऐकली गेली नाहीत का कुणास ठाऊक , कानांना कॅची वाटली नसावीत . पण हे अनेकदा ऐकलं आहे .

https://youtu.be/2o3WkWC03fk?si=oMmLqyhtXkp4_h0q

Pages