Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38
मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेश, RPG ची एक CD आहे
दिनेश, RPG ची एक CD आहे आशाच्या लावण्यांची - नाव 'धडाकेबाज लावण्या'. त्यात पुढील लावण्या आहेत
१. बुगडी माझी - सांगत्ये ऐका
२. इद्राची कामिनी - थापाड्या
३. कंबर लचकली - सुगंधी कट्टा
४. आला गं चावट भुंगा - पुढारी
५. अहो कारभारी - आंधळा मारतो डोळा
६. तिरकी नजर निशाणी - भोळी भाबडी
७. थाप मारून थापाड्या गेला - थापाड्या
८. साडी दिली शंभर रुपयांची - वैशाख वणवा
९. या रावजी - नाव मोठं लक्षण खोटं
१०. माघ मास पडली थंडी - झाला महार पंढरीनाथ
११. हात देऊन मला सावरा - कार्तिकी
१२. तुमचं नाव गाव काय - राघु मैना
१३. हेरला गं - फटाकडी
१४. हात दाबू नका - भोळी भाबडी
१५. माझ्या ढेपला मुंगळा डसला - दिड शहाणे
एक आशा आणि सुलोचना चव्हाण या दोघींच्या लावण्यांची पण सिडी आहे ती तर अप्रतिमच आहे.
भरत, ग घु ह मध्ये लिला गांधी,
भरत, ग घु ह मध्ये लिला गांधी, उषा चव्हाण आणि अरुण सरनाईक आहेत ना?
मला वाटतं केला इशारा जाता
मला वाटतं केला इशारा जाता जाता मधे अरुण सरनाईक, लीला गांधी, उषा चव्हाण होते. आला आला गं चवट भुंगा यातलं असेल.
आला आला गं चवट भुंगा यातलं
आला आला गं चवट भुंगा यातलं असेल.>>>>>हे पुढारी चित्रपटातील ना???
रच्याकने, आज "मि. एक्स इन बॉम्बे" या चित्रपटातील "चली रे चली रे गोरी पनिया भरन को....पनिया भरन को के मिलने सजन को" हे लता/किशोर यांचे युगलगीत ऐकले. ऐकताना नकळत "किचकवध" चित्रपटातील "असा नेसुन शालु हिरवा......" या गाण्याची आठवण येत होती. मराठीतील कितीतरी गाणी अशी आहेत ना जी हिंदी गाण्यांबरोबर जुळतात (किंवा Vice versa)
उदा.
* रजनीगंधा जीवनी या बहरूनी आली, मनमीत आला तिच्या पाऊली...
रजनी गंधा फुल तुम्हारे महके युंही जीवनमें, युहीं महके प्रीत तुम्हारी मेरे अनुरागी मन में...
* मी सोडुन सारी लाज, अशी बेभान नाचली आज कि घुंगरू तुटले रे
मोहे आयी न जग कि लाज, मै इतना जोर से नाची आज के घुंगरू टुट गये.
* पाखरा जा दूरदेशी, सांग माझा निरोप माझ्या साजणा
कबुतर जा जा जा, पहले प्यार कि पहली चिट्ठी साजन को दे आ
* जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे
जीवन चलने का नाम, चलते रहो सुबहशाम.....
इ.इ.
आभार माधव, रागा डॉट कॉम वर
आभार माधव, रागा डॉट कॉम वर असेल बहुतेक. पण यापेक्षा खूप जास्त लावण्या आशाने गायल्यात.
बाई मी पतंग उडवीत होते, दिलवरा दिल माझे ओळखा, येणेजाणे का हो सोडले, माझ्यासाठी दिली राहुटी, गुलजार गुलछडी, रात धुंदीत हि जागवा, सुरई अधीर झाली, राया जरा दिवा बारीक करा,
हिरव्या रंगाची हौस माझी पुरवा, कवडसा चांदाचा पडला कितीतरी.
मला, दे कंठ कोकिळे मला, हा संग्रह पण खूप आवडतो.
योगेश, नुसत्या अर्थाचीच नव्हे तर चालीहि त्याच असलेली अनेक गाणी आहेत.
भरत केला इशारा ची सिडी आहे माझ्याकडे, त्यात हे गाणे नाही. बहुतेक पुढारी मधलेच आहे, त्या दोघींनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.
योगेश, डोळे असुनी.... हे गाणे
योगेश, डोळे असुनी.... हे गाणे चित्रपटाच्या पाचव्या भागात परत आहे आणि सोबत अजुन दोन कडवीही आहेत.... तुला पुर्ण गाणे ऐकायला मिळेल पाचव्या भागात.. अतिशय सुंदर आहे गाणे. 'तुला साजना, पहायचे ना ...' या ओळींवर आशाने काय कारागीरी केलीय.. मी ५ वा भा खास या गाण्यासाठी चारदा पाहिला. साधारण तिस-या मिनिटानंतर गाणे चालु होते.
पण वाईट गोष्ट ही की चित्रपटाचे १-१० भागच आहेत तुनळीवर. आणि यात फक्त अर्धाच चित्रपट बसलाय. चित्रपट पाहताना माबोवरच्या पुनर्जन्म बीबीची खुप आठवण झाली. जयश्री आधी आत्महत्या करते आणि मग देव त्याबद्दल शिक्षा करणार म्हणुन परत जन्म दे, आता खुप चांगली वागेन अशी गयावया करते देवाची. आणि देवाने तिच्या बहिणीच्याच पोटी तिला परत जन्म दिल्यावर मागच्या सगळ्या स्मृती विसरते आणि परत त्याच चुका ह्या जन्मातही करायला लागते. शेवट पाहायचा होता, आता अल्ट्राच्या साईटवर पाहायला पाहिजे पुर्ण चित्रपट आहे का ते.
धन्स साधना (मी उशीरानेच
धन्स साधना (मी उशीरानेच पाहिली तुझी पोस्ट :()
भाग ५ डाऊनलोड केला त्यात आहे पूर्ण गाणे.
१. बुगडी माझी - सांगत्ये
१. बुगडी माझी - सांगत्ये ऐका
२. इद्राची कामिनी - थापाड्या
३. कंबर लचकली - सुगंधी कट्टा
४. आला गं चावट भुंगा - पुढारी
५. अहो कारभारी - आंधळा मारतो डोळा
६. तिरकी नजर निशाणी - भोळी भाबडी
७. थाप मारून थापाड्या गेला - थापाड्या
८. साडी दिली शंभर रुपयांची - वैशाख वणवा
९. या रावजी - नाव मोठं लक्षण खोटं
१०. माघ मास पडली थंडी - झाला महार पंढरीनाथ
११. हात देऊन मला सावरा - कार्तिकी
१२. तुमचं नाव गाव काय - राघु मैना
१३. हेरला गं - फटाकडी
१४. हात दाबू नका - भोळी भाबडी
१५. माझ्या ढेपला मुंगळा डसला - दिड शहाणे>>>>>>
हि अजुन काही लावण्यांची लिस्ट:
१. असेल कोठे रूतला काटा माझ्या तळपायात
२. कुणीतरी बोलवा दाजिबाला
३. अंधारच मज हवा उगा दावितो दिवा....काजवा
४. बाई माझी करंगळी मोडली
५. झाली बहाल मर्जी सख्याची, साडी दिली शंबर रूपयांची
६. खुलविते मेहंदी माझा रंग गोरापान
७. या रावजी बसा भावजी
८. आला गं चावट भुंगा
९. हिरव्या रंगाचा छंद राया पुरवा, मला हिरव्या पालखीत मिरवा
१०. काहो धरीला मजवर राग
११. नवतीच्या अंगणात, प्रीतीच्या गगनात बेभान मी फिरते
१२. तुम्ही माझे बाजीराव
१३. झोंबतो गारवा
फार पूर्वी एक मराठी मालिका
फार पूर्वी एक मराठी मालिका होऊन गेली (नाव आठवंत नाही पण बहुतेक श्रीराम लागु आणि जयश्री गडकर (चुभुद्याघ्या) होते त्यात). मालिकेचा विषय काहीच आठवत नाही पण त्याचे शिर्षक गीत खुपच सुंदर होते.
"आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा, ओठातूनी ओघळावा"
नेटवर हे गाणे उपलब्ध नाही. कुठल्या सीडी/कॅसेट मध्ये आहे ते कुणाला माहित आहे का?
हे गाणे जेंव्हा गुणगुणतो तेंव्हा अजुन एक गाणे ("आपली माणसं") चित्रपटातील नकळत आठवते.
शब्द, संगीत आणि स्वर सगळ्याबाबतीच उच्च असलेले हे गाणे, माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक.
नकळता असे ऊन मागुन येते, सुखाची पुन्हा दु:ख चाहुल घेते
कितीदा हसुनी नव्याने जगावे, किती रंग या जीवनाचे पहावे
जुई-मोगर्याला जसा गंध येतो, नवा गार वारा वनी वाहताना
मनासारखी मी तुझी होत जाते, पुन्हा सांजवेळी तुला पाहताना
पुन्हा एकमेकांस आधार होता, तुला मी, मला तू, आता पांघरावे
तुझ्यावाचुनी मी इथे राहताना तुझ्या आठवाचा मनी जोगवा रे
घरासारखे वाटणारे तरीही, नसे ह्या घराला जुना गोडवा रे
घरी लोक माझेच सारे तरीही, असे एकटेपण कसे मी सहावे
जरी आपुले रक्त गोठून गेले, जरी भोवती सुन्न अंधार आहे
तुझा हात हातात आहे अजुनी, तुझी ज्योत जगण्यास आधार आहे
सुखालाच नाकारताना कशाला, उगा आज डोळ्यांतुनी पाझरावे
नदी जीवनाची तरी वाहते रे, कधी ऊन वा सावली लागते रे
नवे गाव वाटा नव्या शोधुनिया, दिशा तांबडी रोजची सांगते रे
पुन्हा एकदा तू जगावे जगावे, नवे रंग या जीवनाचे पहावे
चित्रपट: आपली माणसं
गायक: सुरेश वाडकर, आशा भोसले
गीत: सौमित्र
संगीत: अशोक पत्की
जयश्री गडकरने मालिका केल्याचे
जयश्री गडकरने मालिका केल्याचे आठवत नाही. (तिने नाटकही केले नाहीच, बहुतेक.) डॉ. लागूंनी पण मराठी मालिका केल्याचे आठवत नाही.
एका पत्रकारच्या जीवनावर एक मालिका होती, पण त्यात फैयाज होती.
दिनेशदा, नेटवर शोधत असताना
दिनेशदा, नेटवर शोधत असताना जुन्या मायबोलीचीवर या मालिकेविषयी चर्चा होती (मराठमोळीमुलगी आणि Ami79).
मालिकेचे नाव "प्रतिकार"
चांदणे शिंपित जा नावाचे नाटक आणि चित्रपट आला होता त्याच कथेवर आधारीत हि मालिका होती.
त्यात श्रीराम लागू आहेत.
ओह, मग मी भारतात नसणार
ओह, मग मी भारतात नसणार त्यावेळी. तसेही मी मालिका बघणे केव्हाचे सोडून दिले. श्रीयुत गंगाधर टिपरे, ही शेवटची मन लावून बघितलेली मालिका.
वरची लावणीची लिस्ट तू एखाद्या एम पी ३ वरुन घेतली आहेस का आठवतील त्या लिहिल्या आहेस ?
वरची लावणीची लिस्ट तू एखाद्या
वरची लावणीची लिस्ट तू एखाद्या एम पी ३ वरुन घेतली आहेस का आठवतील त्या लिहिल्या आहेस ?
>>>>>>या सगळ्या लावण्या माझ्या संग्रहात आहेत. त्याचीच हि लिस्ट बनवली. अजुन काहि आठवत असतील तर प्लीज अॅड करा.
ओह, कवडसा चांदाचा पडला -
ओह,
कवडसा चांदाचा पडला - जिद्द (हि आहे बहुतेक तूझ्याकडे)
सखी गं मुरली मोहन मोही - धर्मकन्या
ह्यो मेला माज्याकडं कवापास्न कसा बघतोय - गोविदा गोपाला
दिलवरा दिल माझे ओळखा - सांगत्ये ऐका
लोणावळा खंडाळा - फटाकडी (बहुतेक)
अजून सजणा मी धाकटी - पुढारी
मी मस्तानी - थांब लक्ष्मी कुंकु लावते
येणे जाणे का हो सोडले - लाखात अशी देखणी
बाई मी पतंग उडवीत होते - लाखात अशी देखणी (बहुतेक)
अत्तराचा फाया तूम्ही मला आणा राया - भाउबीज
अवतीभवती डोंगरझाडी, मधी माझी गं सासुरवाडी - ??
सरकारनामा मधे पण तिची लावणी होती. बाई सुंदराबाईंची पण एक दिवाळीची लावणी, तिने गायली होती. पण ती बहुतेक गैरफिल्मी होती.
आणखीही असणार, त्या काळातल्या तमाशापटात अनेक लावण्या असत. यू ट्यूबवर आहेत काहि चित्रपट (उदा. सवाल माझा ऐका ) त्यात आहेत तिच्या लावण्या.
कवडसा चांदाचा पडला - जिद्द
कवडसा चांदाचा पडला - जिद्द (हि आहे बहुतेक तूझ्याकडे)>>>>>या गाण्यासाठी सगळीकडे शोधुन शोधुन या चित्रपटाची सीडी घेतली आणि नेमके हेच गाणे चित्रपटात कट केलंय :(. माझ्याकडे सध्या आहे ते सुरेखा पुणेकरच्या आवाजात. :(. यातच "सुगंधा गावात आली...." आणि "सख्या चल, जाऊ जाऊ चला पिकनिकला..." हि दोन गाणी आहेत.
लोणावळा खंडाळा - फटाकडी (बहुतेक)>>>> फटाकडीच
अवतीभवती डोंगरझाडी, मधी माझी गं सासुरवाडी - ??>>>>>थापाड्या ????
"ह्यो बरा कि दिसतोय भामटा...." हि लावणी पण आशा भोसले यांचीच ना?
जरा विषयांतर करत आहे
जरा विषयांतर करत आहे त्याबद्दल क्षमस्व.
मध्यंतरी तुनळीवर अरूण सरनाईकांची गाणी शोधत असताना,
"रंगल्या रात्री अशा" या चित्रपटातले "पतित पावन नाम ऐकूनी आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा" हे गाणे सापडले. यामधे "शाहू मोडक", "शरद तळवलकर", "अरूण स." आहेत. हा आवाज छोटा गंधर्वांचा आहे का ? तसेच हा चित्रपट "बालगंधर्वांच्या" जिवनावर आधारित आहे का ?
जिप्सी, ते गाणे जिद्द मधे
जिप्सी, ते गाणे जिद्द मधे पहिलेच होते. संजीवनी बिडकर नाचलीय.
अवतीभवती डोंगरझाडी
मधी माझी गं सासुरवाडी
दोन मजली रंगीत माडी
दारी बांधली बैलांची जोडी
घातली हौसेनं सोन्याची बुगडी
असे शब्द आहेत. चित्रपट नाही आठवत.
भैरू पैलवान कि जय, नावाचा पण सिनेमा होता. (यशवंत दत्त आणि उषा चव्हाण) त्यात पण छान लावण्या होत्या. पैलवान आला गं पैलवान आला, हि त्यातलीच.
भामट्याची आठवत नाही. (ऐकली तर लगेच सांगेन !!)
आशाच्या आवाजात काही सवाल जबाब पण आहेत. चंद्र आणखी पृथ्वी यांचे काय असावे नाते, हे सांगत्ये ऐका मधले.
आणखी एक आठवतोय तो असा
सवाल :-
तीरकमठ्यासह दोन पारधी गोरा पर्वत चढले गं,
तिळास बघुनी नखाएवढ्या तळ्यात दोघे बुडले गं
बुडले ते ना वरी निघाले, रमले त्या ठायी
अशी कशी हि सांग बाई गं झाली नवलाई
जबाब :-
दोन चोरटे पुरुषी डोळे, न्याहाळीत नवलाई
पायापासूनी तिला न्याहाळीत वरी पोचले बाई
हनुवटीवरती तिळ तियेच्या गालावरती खळी
तिळास भुलुनी खळीत बुडाले, भान न त्यांना मुळी
==
महेश, तो आवाज छोटा गंधर्व यांचाच . त्यांनी आणखीही काही चित्रपट गीते गायलीत (गणराजाला करु मुजरा ) तसे पठ्ठे बापुराव नावाच्या चित्रपटात त्यांनी अप्रतिम लावण्या गायल्या होत्या.
अरुण सरनाईकांनी पण काही गाणी स्वतःच्या आवाजात गायलीत (एक लाजरा न साजरा मुखडा)
पण तो सिनेमा, बालगंधर्वांच्या जीवनावर नव्हता. त्यांच्या जीवनावर एक चित्रपट येतोय, आणि त्यात सुबोध भावे ती भुमिका करणार आहे.
त्यांच्या जीवनावर एक चित्रपट
त्यांच्या जीवनावर एक चित्रपट येतोय, आणि त्यात सुबोध भावे ती भुमिका करणार आहे>>>>येस्स, आणि दिग्दर्शक आहेत नितीन देसाई
धन्यवाद दिनेशदा, तो चित्रपट
धन्यवाद दिनेशदा, तो चित्रपट कुठे मिळू शकेल काय ? मला ते गाणे पाहून त्या चित्रपटाची तहान लागली आहे
सुबोध भावे आणि बालगंधर्व :अओ:, दुसर कोणी मिळाल नाही का ? सारेगमपा मधे एक पुर्ण टक्कल पडलेला चांगले शास्त्रीय संगीत गाणारा एक मनुष्य होता, त्याला घ्या.
महेश, सिडी आहेत बाजारात. आणि
महेश, सिडी आहेत बाजारात.
आणि सुबोध थोडीच गाणार आहे. कदाचित आनंद गंधर्व गाईल.
सारेगमपा मधे एक पुर्ण टक्कल
सारेगमपा मधे एक पुर्ण टक्कल पडलेला चांगले शास्त्रीय संगीत गाणारा एक मनुष्य होता, त्याला घ्या.
हे नाटक थोडेच आहे??? बालगंधर्व म्हणुन घेतलेला नट तसा शोभायलाही पाहिजे. सुबोध भावे शोभुन दिसेल. आणि त्याला स्वतःला थोडेच गायचेय???? पण सुबोध थोडाफार गातो असे मला वाटते. त्याला एका संगित नाटकात मी पाहिलेले असे आठवतेय...
साधना, फक्त गाण्याबद्दल म्हणत
साधना, फक्त गाण्याबद्दल म्हणत नाहीये. दिसण्याबद्दल पण म्हणत आहे. मला नाही वाटत सु.भा. शोभून दिसेल. अर्थात बालगंधर्व प्रत्यक्ष पाहिलेले लोक आता असे कितीसे असतील ? त्यामुळे तसा फारसा फरक पडणार नाही म्हणा.
तो पूर्ण टक्कल असलेला गायक
तो पूर्ण टक्कल असलेला गायक म्हणजे अमोल बावडेकर. त्याची वेबसाईट आहे त्यावर मला हे समजलं. तो संगीत कट्यार...मधे सदाशिवचं काम करायचा.
"बालगंधर्व" चित्रपटात आनंद गंधर्वांनी गाणी गायली आहेत सुबोधसाठी.
आशा भोसले यांच्या वरील
आशा भोसले यांच्या वरील लिस्टमध्ये "सुगंधी कट्टा" या चित्रपटातील लावणी अॅड करायच्या राहिल्या
१. घुंगरं आज कशी रूसली
२. नाचु किती कंबर लचकली
३. तिळगुळ घ्या गोड गोड बोला
४. रात धुंदित हि जागवा
५. तुझ्या चरणासी देवा एक आशा,संसारात माझ्या शिरला तमाशा
आशाच्या आणखी लावण्या : टकटक
आशाच्या आणखी लावण्या :
टकटक नजर पडतोय पदर नार तोर्यात नखर्यात चालते
डाव्या डोळ्याची शीळ अशी घालते :
सून लाडकी या घरची- पी सावळाराम - दत्ता डावजेकर
नाकी डोळी नीट डाव्या गालावर तीट
केसांची बट जिथे खुलायची
पुरुषाची जात तिथे फसायची
कामापुरता मामा : गीत संगीत यशवंत देव
आशा भोसले यांचे एक गाणे ऐकले
आशा भोसले यांचे एक गाणे ऐकले (चित्रपट बहुतेक "नाव मोठं लक्षण खोटं)
नको रे नंदलाला, नंदलाला
धरू नको हरी रे पदराला....
यात पहिले कडवे अगदी शांत चालीत आणि लगेचच दुसरे कडवे उडत्या चालीत. (हिंदीतील "हरे राम हरे कृष्ण" च्या शिर्षक गीताची आठवण झाली.)
मध्येच संथ चाल आणि लगेचच फास्ट
सुप्पर गायलंय आशाने
जिप्स्या, त्यावर नाच पण तसाच
जिप्स्या, त्यावर नाच पण तसाच म्हणजे दोन स्टाईलने असणार :-
मराठीत नाही, पण हिंदीतली अशीच दोन उदाहरणे.
एक माधुरी अनिल, च्या खेल मधले. त्यात एकच गाणे तिने, आधी कॅबरे आणि मग भजन म्हणून गायलेय.
द बर्निंग ट्रेन मधे पण, एकाच गाण्यात, दोन वेगवेगळ्या तर्हेने गायलीय ती, पडद्यावर हेमामालिनी आणि परवीन बाबी होत्या.
तिच्या प्रत्यक्ष कार्यक्रमात तिने, एकच गाणे, मीना कुमारी, परवीन बाबी आणि पद्मिनी कोल्हापुरे साठी कसे गायले असते ते दाखवले होते.
नवरंग मधे पण, आ दिल से दिल मिलाले, इस दिल को घर बसाले, हे गाणे तिने पूर्णपणे वेगळ्या आवाजात गायलेय, कारण ते सहनायिकेवर चित्रीत करायचे होते.
एक माधुरी अनिल, च्या खेल
एक माधुरी अनिल, च्या खेल मधले. त्यात एकच गाणे तिने, आधी कॅबरे आणि मग भजन म्हणून गायलेय.
द बर्निंग ट्रेन मधे पण, एकाच गाण्यात, दोन वेगवेगळ्या तर्हेने गायलीय ती, पडद्यावर हेमामालिनी आणि परवीन बाबी होत्या.>>>>>येस्स्स, दिनेशदा
हिंदीत ऐकली होती पण मराठीत हे एकच ऐकलंय.
"मेरी नजर है तुझपे, तेरी नजर है मुझपे" हे ते बर्निंग ट्रेन मधले गाणे ना?
वर लिहीलेल्या "सुगंधी कट्टा"
वर लिहीलेल्या "सुगंधी कट्टा" मधील "तुझ्या चरणासी देवा एक आशा,संसारात माझ्या शिरला तमाशा" हे ही मला वाटते दोन वेगळ्या चालीत आहे. त्यात मध्ये "झनन् झंकार पायी माझ्या उठला" हे आशानेच वेगळ्या चालीत म्हटले आहे
हो जिप्स्या तेच गाणे. सुगंधी
हो जिप्स्या तेच गाणे.
सुगंधी कट्टा राहिलाच माझा बघायचा.
Pages