गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरून भरून आभाळ आलंय
<<त्या गाण्यातली दोन्ही गाणी बोरकरांचीच असावीत. >>
साधना ते गीत शांताबाईंचे. अक्षर अंगणच्या (ठाण्यात साहित्य संमेलनानिमित्त चाललेला उपक्रम) शांताबाईंवरच्या कार्यक्रमाचा समारोप या गाण्याने झाला होता.
त्या गाण्यात गर्भवती स्त्रीच्या मनाची अवस्था व्यक्त झाली आहे.हाती काय येई? जाई की मोगरा?=मुलगा के मुलगी.
एफेमवाल्यांना हे गाणे पावसाचे वाटते?????

छान अर्थ सांगितलास भरत Happy

पण, मला वाटते कि शांताबाईंनी पाऊस आणि गर्भारपण अशी सांगड घातली असावी. कारण चित्रपटात हे गाणे भर पावसात झाडाला बांधलेल्या झोक्यांवर कोरससहित नायिका गातेय आणि नायिका गर्भवती आहे. Happy (चित्रपटात अभिनेत्री सुकन्या कुळकर्णी-मोने वर चित्रित झाले आहे हे गाणे).

आज लतादिदीचे एक छान गाणे ऐकले Happy

कसे कसे हासायाचे
हासायाचे आहे मला

हासतच वेड्या जिवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे
कुठे कुठे आणि केव्हा
कसे आणि कुणापास
इथे भोळ्या कळ्यांनाही
आसवांचा येतो वास

शब्दः आरती प्रभू
संगीतः ह्रदयनाथ मंगेशकर

मला वाटते कि शांताबाईंनी पाऊस आणि गर्भारपण अशी सांगड घातली असावी

हो, गाणे वाचुन तोच अर्थ प्रतित होतोय. श्रावणातला पहिला पाउस, त्याने धरतीला फुटलेले पहिले कोंब + हिरविनीची पहिलीच गोड बातमी यांचा समसमा संयोग की जाहला....... Happy

काल हे गाणे गुगलत होते तेव्हा तुनळीवर कोणी सायली की तत्सम नाव असलेली मुलगी पाऊसवेळा या कार्यक्रमात हे गाणे गात होती.

पण मी म्हटलेले ते गडद निळे वाले गाणे हे नव्हे. ते वेगळे आहे. आता कधी सखी मध्ये लागले तर रेकॉर्ड करुन घेते.

इथे भोळ्या कळ्यांनाही
आसवांचा येतो वास

या ओळी खुप फेमस आहेत.. खुप ठिकाणी वाचल्यात. हे गाणे ऐकलेय. गाणे आवडता आवडता एकदम एक खिन्नता भरुन येते मनात..

कसे? कसे हांसायाचे ?
हांसायाचे आहे मला,
हांसतच वेड्या जिवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हांसायचे
कुठे? कुठे आणि केव्हा?
कसे आणि कुणापास?
इथे भोळ्या कळ्यांनाही
आंसवांचा येतो वास

आरती प्रभू - हृदयनाथ मंगेशकर - लता
योगेशची पोस्ट दिसलीच नाही, त्याचवेळी मी काहीतरी पोस्टत असल्याने, बहुधा
साधनाची पोस्ट वाचून कवितासंग्रहातुन शोधून ही कविता लिहिली.

हांसायचे आहे मला, या गीताला मला वाटतं कुणाच्या तरी मृत्यूची पार्श्वभूमी आहे.

साधना, बोरकरांची हि कविता तूमच्या वेळी पण होती ? घाल घाल पिंगा वार्‍या, योगेश ला होती.
आपल्या वयांत इतके अंतर असूनही हि गाणी पाठ्यपूस्तकात राहिली. मला नवल वाटते.
बरं बोरकर आणि शांताबाई, दोघांनीही अनेक कविता लिहिल्या. आणि त्या सुंदरही होत्या. मग मंडळाने आणखी कविता निवडायचे कष्ट का घेतले नाहीत ?

हो बोरकरांची कविता ९वी किंवा १०वीत होती. गवतफुला रे गवतफुला पण ७वी-८वीत होती. घाल घाल पिंगा ५-६वीला होती. या कविता प्रातिनिधिक आहेत असे मला वाटते. अमुक काळातली कविता अशी असायची किंवा अमुक बाजाची कविता अशी असते म्हणुन यांच्याकडे बोट दाखवता येते, त्यामुळे मंडळाने कदाचित ह्यांना बदलले नसावे. माझ्या आईला तिसरीत एक कविता होती, ती माझ्या मुलीला ५वीत होती. Happy आई हरखुन गेली होती तिच्या पुस्तकातली कविता वाचुन. 'देवा तुझे किती सुंदर ते जग..., इवल्या इवल्याशा टिपक्या ठिपक्यांचे देवाचे घर बाई उंचावरी' या कविता कालातीत आहेत. मुलांना या कवितांशी लगेच रिलेट व्हायला होते. त्यामुळे या कविता पाठ्यपुस्तकातुन जायला नकोच.

पण हे तरी बरे... नंतर मंडळाने थेट लांब उडी मारुन ८०-९० चे दशक गाठले. आता असे मी बोललेले इथे काही लोकांना जातीयवादी वाटेल पण इलाज नाही. माझा भाऊ ८-९ त गेला तेव्हा त्याच्या पुस्तकात दलित लोकांचे इतके साहित्य होते की तो घरात त्याप्रकारची भाषा बोलायला लागला होता. आम्ही त्याला ओरडुन ओरडून शब्द बदलायला भाग पाडायचो आणि वर मंडळाच्या नावाने खडे फोडायचो, इतके दलित साहित्य पाहिजेचच का पुस्तकात म्हणुन.

दिनेश, हल्लीची शाळकरी पुस्तके तुम्ही पाहिली नाहित ते नशिब. साहित्य चांगले आहे, बोर्डावर सुजाण लोकांची नावे दिसतात पण पॅटर्न बदललाय. थोडा धडा झाला की लगेच चौकटीत त्या धड्याबद्दल चर्चा, मग धडा पुढे चालु वगैरेवगैरे... अर्थात शिक्षणाच्या दृष्टीकोणातुन हा बदल चांगला आहे पण माझ्या डोक्यात ती जुनी पुस्तके गच्च बसली असल्याने खुपच अडखळल्यासारखे होते.

हो बोरकरांची कविता ९वी किंवा १०वीत होती. गवतफुला रे गवतफुला पण ७वी-८वीत होती. घाल घाल पिंगा ५-६वीला होती. या कविता प्रातिनिधिक आहेत असे मला वाटते. अमुक काळातली कविता अशी असायची किंवा अमुक बाजाची कविता अशी असते म्हणुन यांच्याकडे बोट दाखवता येते, त्यामुळे मंडळाने कदाचित ह्यांना बदलले नसावे. >>>>>> साधना, अगदि बरोबर. अजुन एक कविता मला आठवतेय
"लाडकी बाहुली होती माझी एक" -- पहिला पाऊस पडला की मला हि माळावर गाईने तुडवलेली बाहुली आठवते व मन हळुवार बनते.

अरे या धाग्याला १२ दिवसांचा उपास घडला.
सुरेश भटांच्या 'सप्तरंग' मध्ये आशा(भोसलें)चे मनोगत वाचले.
"मला जीवनात खरा आनंद कुठल्या गाण्याने दिला असेल तर तो 'केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली" या गझलेने दिला आहे. हे काव्य गाताना मी फक्त माझ्यासाठा गाते. समोरचे रसिक मला दिसत नाहीत. मी माझ्यात रंगुन जाते. हे गाणं आणि दुसरं 'चांदण्यात फिरताना माझा धरलास हात' ही फक्त माझीच आहेत. ती दुसर्‍या कुणी गायली तरी मला आवडत नाही- मी फार पझेसिव्ह अहे त्या गाण्यांबद्दल."
(आशाची हीच २ काय कुठलीच गाणी मला दुसर्‍या कुणी गायलेली आवडत नाहीत.
पण खुद्द बाळासाहेबांनी निवडुंगसाठी केव्हातरी पहाटे पद्मजाकडून का बरं गाऊन घेतलं? मी दोन्ही ऐकलीत. दोन्ही आहेत माझ्याकडे. पण जेव्हा कधी आठवतो, तेव्हा आशाचाच आवाज आठवतो.

आशाची हीच २ काय कुठलीच गाणी मला दुसर्‍या कुणी गायलेली आवडत नाहीत.

सेम हिअर.. तशीही मला लता आशाची गाणी इतरांच्या तोंडुन ऐकायला आवडत नाही आणि आता झी च्या कृपेने इतक्या वेळा इतरांच्या तोंडुन ऐकलीत की वीट्ट आलाय. आता इतर कोणीही त्यांच्या गाण्यासाठी तोंड उघडले तर मी लगेच टिवी बंद करुन ओरिजीनल गाणे परत ऐकते. लाखवेळा ऐकुनही यांच्या आवाजातल्या गाण्यांची गोडी कशी काय अवीट आहे देवास ठाऊक.

लताआशा आणि इतर यांच्या आवाजात काय फरक आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर त्यांच्या आवाजातले एखादे साधारण गाणे दुस-या कोणाच्या आवाजात ऐकावे. मग ते साधारण गाणे किती भयाण होऊ शकले असते ते कळते. केवळ या दोधींनी आवाजातल्या जादुनेच कित्येक गाणी तरुन गेलीत.

पद्मजाने सांSSगू तSSरी कSSसे मी वर जे काय केलंय ते इन्टॉलरेबल. आशाने बहुधा तो बाळासाहेबांनाच चिमटा काढला असावा. (उल्लेख पण बाळासाहेब असाच केलाय, बाळ असा नाही!)

पद्मजाने सांSSगू तSSरी कSSसे मी वर जे काय केलंय ते इन्टॉलरेबल.>>>>अगदी बरोबर भरत. Happy

आज "सुमन कल्याणपूर" यांचे "काल राती स्वप्नामधे एक राजा आला, मज मोहुन गेला" हे एक सुंदर गाणे ऐकले (संगीत: अशोक पत्की). आजवर बरेच वेळा हे गाणे मराठी सारेगमप वर इतर गायकांच्या आवाजात ऐकले होते, पण आज ओरीजनल गाणे ऐकले. नेहमीप्रमाणेच सुमन कल्याणपूरचा आवाज गोड वाटला. हे गाणे सुमनजींच्या आवाजात आहे आत्तापर्यंत माहितच नव्हते. Sad

सहजच प्लॅनेट एम मध्ये फेरफटका मारताना "उषा मंगेशकर" यांच्या गाण्याची सीडी पाहिली. त्यातील बहुतेक गाणी माझ्याकडे आधीच होती. मागे याच धाग्यावर "होडी चाले लाटेवरी, कोण चालवे उमगे ना...." या एका गाण्याचा (उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या) मी उल्लेख केला होता. या गाण्याची चाल "माझे राणी माझे मोगा......" या गाण्यासारखीच आहे. त्या सीडीवर या गाण्याच्या चित्रपटाचा उल्लेख "जानकी" होता. माझ्या मते "जानकी"
१. विसरू नको श्रीरामा मला (हॅप्पी आणि सॅड व्हर्जन)
२. मी सोडुन सारी लाज, अशी बेभान नाचली आज
३. झुलतो बाई रास झुला
आणि
४. पॅरॉडी साँग (अशोक सराफवर चित्रित)
अशी पाचच गाणी आहेत ना?
जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. Happy

अवांतरः
"बॉबी" आणि "मिलन" या चित्रपटात अनुक्रमे "अखियोंको रहने दो अखियोंके आसपास" आणि "आज दिलपे कोई जोर चलता नही, मुस्कुराने लगे थे मगर रो पडे..." हि दोन गाणी नाहीत. पण कॅसेट/सीडी/डिव्हिडी मध्ये हि गाणी नाही.
बॉबी मध्ये ""अखियोंको रहने दो अखियोंके आसपास""हा फक्त मुखडाच वापरला आहे ना?
तसंच काही "जानकी" चित्रपटात आहे का?

बाकी माहित नाही पण ते ....'मी सोडुन सारी लाज अशी बेभान नाचले आज की घुंगरू तुटले रे' असे असणार.
पं हृदयनाथ मंगेशकरांनी (स्वतःचीच) चाल दुसर्‍या गाण्याला वापरल्याची उदाहरणे आहेत.
जांभुळ पिकल्या झाडाखाली=होली आयी होली आयी (मशाल)
बॉबी - अंखियों को रहने दो रेडियोवर पूर्ण वाजतं. त्याची सुरुवात
टूटके दिल के टुकडे टुकडे हो गए मेरे सीने में
आ गले लग के मर जाए क्या रख्खा है जीने में

'मी सोडुन सारी लाज अशी बेभान नाचले आज की घुंगरू तुटले रे' असे असणार.>>>भरत, धन्स रे ते असेच आहे गाणे. मी चूक दुरूस्त केले.

बॉबी - अंखियों को रहने दो रेडियोवर पूर्ण वाजतं.>>>>होम ऑडियो फॉर्मेटमध्ये ते पूर्ण आहे पण चित्रपटात फक्त मुखडाच

"टूटके दिल के टुकडे टुकडे हो गए मेरे सीने में
आ गले लग के मर जाए क्या रख्खा है जीने में
अखियोंको रहने दो अखियोंके आसपास
दूर से दिलकी बुझती रहे प्यास......"

एव्हढंच आहे. :(. या एका गाण्यासाठी चित्रपट ४-५ वेळा बघितला :(.

रागा डॉट कॉम वर मराठी विभागात, धर्मकन्या चित्रपट शोधा,
मग त्या चित्रपटातले, आशा चे, देव नाही जेवला, हे गाणे ऐका.
नाही माझे आभार मानलेत, तर परत या बीबी वर येणार नाही.

दा, तुम्हाला अनुमोदन!!
मी हे गाणं जेव्हा पहिल्यांदा ऐकलं त्याला १३-१४ वर्षं झाली...पुढे हा चित्रपटही बघितला. सगळी गाणी अप्रतिम आहेतच, पण देव नाही जेवलेला...हे म्हणजे कळस आहे!!
"नक्षत्रांचे देणे" या आशाच्या कर्यक्रमाची कॅसेट होती, तशीच "आवाज चांदण्यांचे" पण आहे. "जिवलगा येशील कधी परतून...सांग ना..." हेही सुरेख गाणं. (बहुतेक त्यात लताचाही आवाज आहे. नक्की आठवत नाही आत्ता)
"पैठणी बिलगुन म्हणते मला, जानकी वनवास गं संपला..." हे असंच खुप लाडकं गहोतं!!

परवा एक गाणं "अचानक धनलाभ" व्हावा तसं लाभलं. पहिल्यांदाच ऐकलं. "बलमा खुली हवा में.." आशाचं. मग पुढे बराच वेळ तेच एक गाणं चालू होतं!!

रागा डॉट कॉम वर मराठी विभागात, धर्मकन्या चित्रपट शोधा,
मग त्या चित्रपटातले, आशा चे, देव नाही जेवला, हे गाणे ऐका.
नाही माझे आभार मानलेत, तर परत या बीबी वर येणार नाही.>>>>>>>>>>>दा, हे गाणे पूर्वी ऐकले होते, पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

आशाचेच "दिन तैसी रजनी झाले गे माये....." हे एक माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक. Happy

मराठी (लॉजिकल) अंताक्षरीमध्ये "गीत/गाणे" हे लॉजिक चालु आहे. त्यात मी "गीत होऊनी आले, सुख माझे साजणा....." हे गाणे टाकले. यात गायिकेचा आवाज ओळखता आला नाही. आंतरजालावर शोधले असता गायक सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले समजले.
वर्षा भोसले म्हणजे आशा भोसले यांच्या कन्या का? (चुभुद्याघ्या).
आशा भोसले आणि वर्षा भोसले यांनी गायलेले "चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?" हे अजुन एक गाणे आंतरजालावर सापडले.
वर्षा भोसले यांनी अजुन कुठली गाणी गायली आहे का?

मागे एकदा वर्तमानपत्रात वर्षा भोसले यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे वाचनात आले होते. Sad

वर्षा भोसले या आशा भोसले यांच्या कन्या. दोघींनी एकत्र गायिलेले 'तालासुरांची गट्टी जमली नाचगाण्यात मैफल रमली'. हे चांदोबा चांदोबा नाही ऐकलेले.
आशाताईंचे चिरंजीव हेमंत भोसले यांनी संगीतबद्ध केलेली आशागीते - शारद सुंदर चंदेरी राती, जो जो गाई अंगाई गाते बाळा माझ्या नीज ना, जा जा जा रे नको बोलू जा ना (सर्व शान्ताबाईंची). हिंदीत पण एक ऐकलेय.

धन्स भरत Happy

'तालासुरांची गट्टी जमली नाचगाण्यात मैफल रमली' हे गाणे बर्‍याचदा ऐकले पण फक्त आशाताईंचाच आवाज ओळखता आला.

चांदोबा चांदोबा हे गाणे फार पूर्वी ऐकले होते.

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी !

आई-बाबावर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ? आता तरी परतुनी जाशील का ?

हे त्या गाण्याचे बोल. Happy

मागे एकदा वर्तमानपत्रात वर्षा भोसले यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे वाचनात आले होते.
इथे चर्चाही झाली होती त्यावर. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नव्हता तर चुकुन गोळ्यांचा डोस जास्त घेतला गेला होता असेही त्या चर्चेदरम्यान कळले होते.

पेपरवाले सुतावरुन स्वर्गही गाठू शकतात, प्रत्यक्षात मात्र ते सगळे नरकात जाणार आहेत Happy

आशाच्या एका लाईव कॉन्सर्टची कॅसेट माझ्याकडे ब-याच वर्षांपुर्वी होती. त्यात वर्षाने आशाबरोबर दोन्-तिन गाणी गायलेली. निगाहे मिलानेको.. हे एक आठवतेय, हुजुरेवाला, जो हो इजाजत, हेही बहुतेक गायले होते त्या दोघांनी. अर्थात त्या कार्यक्रमात हं.. मूळ गाण्यात नाही.

'जैत रे जैत' मधलं 'कोन्या राजानं' हे वर्षा आणि आशा दोघींनी एकत्र गायलय. सुं द र च आहे एकदम.

वर्षाचं सुरेश वाडकरांबरोबर पण एक सुंदर गाणे आहे. पण आता आठवत नाहिये. Sad

धन्स, साधना, माधव, भरत Happy

पेपरवाले सुतावरुन स्वर्गही गाठू शकतात,>>>>>अगदी अगदी

'कोन्या राजानं' हे वर्षा आणि आशा दोघींनी एकत्र गायलय>>>>अरेच्चा हे गाणही दोघींचे Happy एकदम भन्नाट गाणे आहे हे Happy माझे अत्यंत आवडते. धन्स माधव. Happy

वर्षाचं सुरेश वाडकरांबरोबर पण एक सुंदर गाणे आहे.>>>>>>माधव, मी वरती लिहिलेले तेच गाणे का? संसार चित्रपटातील "गीत होऊनी आले सुख माझे, साजणा.....".

त्यात वर्षा बालगायिका आहे का?>>>>बहुतेक Happy

Pages