गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन काही पंडितजींनी गाणी

वार्‍याने हलते रान (चित्रपटः निवडुंग)
ने मजसी ने परत मातृभूमीला
मराठी पाऊल पडती पुढे

आणि लताबरोबरचे आणखी एक युगुलगीत
तूझे नि माझे इवले गोकुळ.

पतितपावन नाम ऐकूनी, हा अभंग पण आहे.

आशाबरोबर आणखी एक गाणे आहे, आत्ता नेमके आठवत नाही !!
या आठवड्यात इथे, कृष्णाची छान नवीन गाणी ऐकता येतील.

http://www.eprasaran.com/

इथे स्वरसंध्या, श्यामरंग वर टिचकी मारा.
या दुव्यावरच्याच नाट्यपराग कार्यक्रमातले शेवटचे, बिलासखानी तोडी मधले, पिताजी क्षमा, हे नाट्यगीत जरुर ऐकाच. इतका अप्रतिम बिलासखानी, मी यापूर्वी कधीच ऐकला नव्हता,

ती येते हे मला पंडितजींच्या आवाजात ऐकायला आवडलं असतं. त्या फुलांच्या मुकेशच्या आवाजात ... ईमॅजिन नाही होत.

मला दयाघना पंडितजींच्या आवाजात ऐकायला जास्त आवडेल. त्या गाण्याच्या प्रकृतीला त्यांचा आवाज जास्त योग्य वाटतो. हे मूळ चीज त्यांच्या आवाजात ऐकल्यावर जाणवले.

सुमन कल्याणपुर म्हटलं की अशोक जी परांजपे, मधुकर जोशी यांची दशरथ पुजारी, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आठवतात.
मंगेश पाडगावकरांच्या या रचना त्यांच्या आवाजात आहेत
१) हे हात असे जुळलेले
हे नेत्र असे खेळलेले
विसरशील तू सारे
२) सोबतीला चंद्र देते अंतरीचा ध्यास देते
तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते
३) शब्द शब्द जपुन ठेव बकुळीच्या फ़ुलापरी
४) तुला ते आठवेल का सारे
दवात भिजल्या जुइपरी हे मन हळवे झाले रे
तुझ्या करातिल मोरपीस ते
अजून गालावरुनी फ़िरते
बनातुनी केतकीच्या येती स्य्गंध शिंपित वारे
त्या तरुवेली तो सुमपरिमळ
झर्‍यांतली चांदीची झुळ्झुळ
आठवणींच्या चिंचा गाभुळ रुचतिल काय तुला रे?
ते सारे मी हृदयी जपते
उगिच लाजते उगिच हसते
हृदयामधल्या देवासाठी हवेत का देव्हारे
५) हात तुझा हातातुन धुंद ही हवा
रोज तोच चंद्र आज भासतो नवा (सोबत अरुण दाते)
६) मी चंचल होउन आले

भरत, दयाघना ची मूळ चीज,

रसोलिल्ला करजो करजो
बेडा पार हमार

राधा बरोबर हृदयनाथांनी एका कार्यक्रमात गायली होती.
तो इप्रसारण वरचा बिलासखानी अवश्य ऐका रे सगळ्यांनी, या शनिवारपर्यंतच असेल !!

ही चीज ह्रदयनाथ 'भावसरगम' मधे गातातच. पण ते 'दयाघना' कधिच गात म्हणत नाहीत असं ऐकलय. (मी पाहिलेल्या कार्यक्रमात पण तसंच झालं होतं.)

हात तुझा हातातुन धुंद ही हवा
रोज तोच चंद्र आज भासतो नवा >>> हे अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांचं आहे ना?

हो , हात तुझा हातात - सुधा मल्होत्रा यांचेच

पहिलीच भेट झाली तरी ओढ ही युगांची
जादू अशी घडी हे या दोन लोचनांची हे अरुण दाते सुमन कल्याणपुर यांचे.

.

.

पंदीत हृदयनाथांचे आणखी एक अप्रतीम गाणे-' हे शामसुंदर..' किशोरीताईंनी त्याचं सोनं केलं आहे. आपल्या दोघी बहीणी सोडुन हे गाणं पंडीतजींनी किशोरीताईंकडुन का गाउन घेतलं हे मला पडलेलं कोडं आहे.

हे शामसुंदर..' आणि 'जाईन विचारीत....' दोनही गाणी. पण किशोरीताईंनी ती गाणी अफाट गायलीत.

हे शामसुंदर..' आणि 'जाईन विचारीत....' दोनही गाणी. पण किशोरीताईंनी ती गाणी अफाट गायलीत>>>>येस्स्स, आणि आता दुसर्‍या कुणाच्या आवाजात ऐकण्याचा विचारही करवत नाही.

"आपल्या दोघी बहीणी सोडुन हे गाणं पंडीतजींनी किशोरीताईंकडुन का गाउन घेतलं हे मला पडलेलं कोडं आहे"
असा प्रश्न पडायचं कारण?

आज एक गाणे(पुन्हा) ऐकायला मिळाले आणि लक्षात आले की मराठीत मंगेशकर भगिनींनी गायिलेली युगुलगीते जवळजवळ नाहीतच.
लता आशा यांनी हिंदीत जवळजवळ ७५ गाणी एकत्र म्हटली. मराठीत ?
आशा उषा यांनी गायिलेली ही दोन गाणी :
वसंत येथे तेथे सुमने
सुमनापरी ही दोन मने
दोन मनातून प्रीत दरवळे
रंग एक परी गंध वेगळे

आणि
आला आला ग चावट भुंगा.
हिंदीत पण या दोघींची दोनच गाणी आठवतात :
साचा नाम तेरा(जूली) काहे तरसाए जियरा(चित्रलेखा)
आणखी कोणती गाणी आहेत का अशी?

भरत मला दोन गाणी आठवत आहेत लता आणि उषा यांचे:
१. दसरा ना दीपवाळी, लाटतेस गुळपोळी गं........
(गाण्याचे बोल आता आठवत नाही, घरी जाऊन व्यवस्थित गाणे ऐकुन लिहितो.

२. राजाच्या रंग म्हाली, रुप्याच्या बाई पलंग......

हो योगेश बरोबर .ही दोन्ही गाणी नेहमीच्य ऐकण्यातली. अतिपरिचयात अवज्ञा.
दसरा ना दिपवाळी आहे माझ्याकडे.
कान धरुन उठाबशा!!!

भरत Happy

भरत, आशा आणि लता यांचे एक युगलगीत
येशिल कधी परतुनी, जिवलगा, येशिल कधी परतुनी (चित्रपटः अंतरीचा दिवा)

अजुन या दोन भगिनींची गाणी आहेत का?

अनुराधा पौडवाल यांनी गायलेली माझ्या आवडीची काहि गाणी Happy

* रजनीगंधा जीवनी या बहरूनी आली, मन मीत आला तिच्या पाऊली (अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या गाण्यापैकी माझे अत्यंत आवडीचे गाणे :)).

१. अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने, तुझ्या नि माझ्या भेटीमधुनी फुलती धुंद तराणे
२. चंद्र वाटेवरती एकटा चालतो, चालताना खुणावुन का हासतो
३. मी तर रमते प्रभूचरणासी होऊनी त्याची दासी, का उगा पतंगा जळसी
४. मी अशी हि बांधलेली मी कशी स्वप्नात येऊ, या तुझ्या गीतास वेड्या मी कशी स्वरसाज देऊ

(वरील चारही गाणी लहानपणी ऐकलेली, अल्बमचे नाव बहुतेक "गीतगंधा" असे काही तरी होते. अशोक पत्की यांचे संगीत असलेले हि गाणी संग्रहात असावी म्हणुन खुप शोधली (आंतरजालावर, प्लॅनेट एम, र्‍हिदम हाऊस, महाराष्ट्र ग्रामोफोन) पण नाही सापडली शेवटी एका साईटवर सापडली आणि रेकॉर्डिंग करून घेतली. :))

५. बेभान या रात्री बेबंद झाले मी, अधीर मी अन् अधीर तुही अधीर हे वारे
६. का हासला किनारा पाहुनी धुंद लाट, पाहुनीया नभाला का हासली पहाट
७. कुहु कुहु येई साद
८. डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली, वचने मला दिलेली विसरूनी रात्र गेली
९. गीत हे गाशील तेंव्हा मी जगी असणार नाही, प्रीत हि स्मरशील तेंव्हा मी तुला दिसणार नाही
१०. सजणा कशासी अबोला, घडला असा रे माझा काय गुन्हा
११. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दु:खांच्या मंद स्वराने
१३. मी वार्‍याच्या वेगाने आली, तुझ्या प्रीतीने धुंद झाले, वसंतातले रंग ल्याले
१४. प्रिया आज आले मैफिलीत माझ्या, रंग सुर ल्याली पश्चिमा, गीतास आली लालीमा
१५. कुण्या देशीचे पाखरू माझ्या अंगणात आले, त्याचे पंख परदेसी परी ओळखीचे डोळे
१६. रसिका मी कैसे गाऊ गीत, दाटुनी आले घन आसवांचे मिटलेल्या पापणीत
१७. प्रिया साहवेना आता एकलेपणा, अशा पौर्णिमेच्या रात्री कसा दाह होतो गात्री सांगु रे कुणा
१८. हे सावळ्या घना, का छेडीसी मनाच्या तारा पुन्हा पुन्हा
१९. हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली, धरती प्रकाशवेडी ओल्या दवात न्हाली
२०. माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतीनी जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का रे
२१. पहिल्याच सरीच पहिला सुवास आला, माहेरच्या दिसांचा क्षण काल भास झाला
२२. ओलेत्या पानात सोनिया उन्हात भरून मेघ आले, डहाळी जणु नवी नवरी हळद रंग ओले, साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची
२३. भरून भरून आभाळ आलंय
२४. चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा, गंधामधुनी भिजतो ग चंद्र साजिरा
२५. बंदिनी स्त्री ही

अनुराधा पौडवाल यांचे "घुमला ह्रदयी नाद हा, झन झन झन झरत नाद हा" हे गाणे संग्रहात नाही आहे. Sad
कुणाकडे आहे का?

घुमला हृदयी हे चित्रपटगीत आहे, त्यामुळे भावगीतांच्या संग्रहात नसावं. चित्रपट यशोदा संगीत दत्ता डावजेकर. मराठी चित्रपटासाठी त्यांनी गायिलेले ते पहिले गीत.

कुणाला खालील गाणी येत असतील तर ती पूर्ण द्यावी :
१. गणनायकाय .... धिमही - शन्कर महादेवन
२. सायन आया .... दादर माटुन्गा ..... कल्याण आया - अशोक हन्डे

अरुण दाते यांनी गायिलेली ही गाणी, त्यांच्या इतर गाण्यांइतकी गाजली आणि वाजली नाहीत, पण या तीनही गीतांचे शब्द जखडून ठेवतात.... सर्व गीतांचे संगीत श्रीनिवास खळे यांचे

स्पर्शाच्या गहिर्‍या जहराची
ती रात्र कुसुंबी बहराची
ती डोळे जडवून मला म्हणाली,"राया,
वय ऐनातिल हे नका घालवू वाया"
त्या नजरबंदिच्या कहराची
ती रात्र कुसुंबी बहराची

घातली लाडकी हळुच खुणेची शीळ
चांदण्यात भिजला गालावरला तीळ
अशि मदन झोकल्या प्रहराची
ती रात्र कुसुंबी बहराची

काळीज बुडवुनी जाय मधाची लाट
हातात जडवुनी हात शोधिली वाट
स्वप्नांच्या धूसर शहराची
ती रात्र कुसुंबी बहराची .....................................मंगेश पाडगावकर

प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी
भेटलो आता परी भेटायचे नाही कधी
तू उभी जवळी अशी खुणवी जरी एकांत हा
कालच्या सलगीतुनी बिलगायचे नाही कधी
या जगी माझे तुझे दुरुनीच नाते शोभते
त्या जुन्या स्मरुनी खुणा जगायचे नाही कधी
होतसे सारेच का अपुल्या पसंतीसारखे
या पुढे शहरात या बहरायचे नाही कधी
जाउदे ही पालखी माझी तुझ्या दारातुनी
तू तुझे आयुष्य हे उधळायचे नाही कधी................................राम मोरे

तुज पाहिले असे अन नशिबात ये गुलामी
घायाळ काळजाला काही मुळी सुचेना
तुजवाचुनी जिवाला काहीच अन रुचेना
या भाळल्या जिवाची पहिली अशी सलामी

नजरेत धुंद होत्या हुकमी तुझ्या कट्यारी
घालून घाव गेल्या माझ्या असे जिव्हारी
आव्हान झेलले मी अन जाहलो निकामी

डोळ्यात घेऊनी तू आलीस धुंद रात्री
लावून चांदण्याची गेलीस आग गात्री
स्वप्नास रंग आले हे लाल अन बदामी.......................मंगेश पाडगावकर

शाहण्याने आपुले थडगे खणावे
आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे....मंगेश पाडगावकर

Pages