फोटोग्राफी स्पर्धा.. जुलै.."पाउस..आयुष्याचा सोबती" निकाल
नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " जुलै " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
जुलै महिना म्हणजे हमखास पावसाळी वातावरण..धुवांधार पाउस..ओले रस्ते..सर्वत्र हिरवळ..भिजण्याचा आनंद आणि गरमागरम कोळाश्याच्या शेगडीवर खमंग भाजलेले कणिस आणि त्यावर लिंबु चा रस... एकच छत्री आणि भिजणारे दोघे जण..बाहेर तुफान पाउस आणि त्यात तोडकी छत्रीचा आधार..
आपली शाळा ..पाठीवर दफ्तर.. हाफ पँट ...एक जोरदार उडी बाजुला साठलेल्या डबक्यात..पाय चिखलात बरबटलेका..तोंडावर मनसोक्त समाधान..वर भिजण्याचे निमित्त...शिक्षकांचा ओरडा..भिजलेल्या अवस्थेत वर्गाबाहेर उभे राहणे...