नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " जुन " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
या वेळी विषय ठरवत असताना "स्ट्रीट फोटोग्राफी" हा विषय डोळ्यासमोर आला. फोटोग्रॉफी प्रकारांमधे हा प्रकार विशेष आहे... म्हणुन या वेळेला हा विषय आम्ही विचार करुन निवडला.. पण हा प्रकार प्रोफेशनल मधे येतो.. झुम आउट, विशिष्ट कोन पकडुन फोटो काढणे. इत्यादी बरेच ऑप्शन यात येतात.. "स्ट्रीट फोटोग्राफी" मधे फोटो हे रस्त्यावरच्या घडामोडींवरचे असतात..लोकांचे हावभाव, काही विशिष्ट घडणार्या गोष्टी.. इत्यादी टिपणे या प्रकारात अपेक्षित असते. लोकांच्या न कळत त्यांचे फोटो काढणे त्याचबरोबर त्या फोटोंमधे रस्त्यावर घडणार्या घडामोडी येणे ...हे मुख्य वैशिष्ट्ये आहे या विषया मधे....
हौशी लोकांसाठीच हा विषय थोडा वेगळा करुन "कळत नकळत" असा केलेला आहे.. फोटो रस्त्यांवर घडणार्या घडामोडींचे आणि लोकांना न क़ळत काढलेले हवे.यात काहीही समावेश करता येईल...
निकाल
प्रथम क्रमांक: आशुचँप - हितगुज
द्वितीय क्रमांक: अमित मोरे - जपानी तरुणी
तृतिय क्रमांक - इंद्रधनुष्य – कॉमनमॅन
उत्तेजनार्थ :-
१) अंकु - ग्राहकाची वाट बघणारी बाई
२) माझी भटकंती - मी आले, निघाले
३) अगो - फुगेवाले जोडपे
जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी"
२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"
३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा"
मस्त .. मज्जा...
मस्त .. मज्जा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हम्म. विचार करायला लावणारी
हम्म.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विचार करायला लावणारी थीम आहे.
सर्वांना शुभेच्छा! ह्यात आपले
सर्वांना शुभेच्छा! ह्यात आपले नेहमीचे पारंगत फ़ोटोग्राफ़रच पहिले येतील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला कल्पना फारशी क्लिअर
मला कल्पना फारशी क्लिअर झालीये अस वाटत नाहीये![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण जे मला समजलं त्यावरुन मी एक फोटो टाकेन... जर तो नियमात बसला तर ठिक नाही तर आहेच नुसतं "वाह! वाह!"
भाऊ हे चालेल काय? (नाहीतर
भाऊ हे चालेल काय?
(नाहीतर बदलते)![](https://lh3.googleusercontent.com/-Y7ThCnnGRWA/Ua7p1thG6KI/AAAAAAAABkY/3bQ_vzhXXRs/s640/DSCN5281.jpg)
१.
२.![](https://lh5.googleusercontent.com/-uN2F05HaP3E/UaxxveJHZoI/AAAAAAAABjw/DbhIRRN42ig/s640/DSCN0984.jpg)
"वाह! वाह!" :फिदी"
"वाह! वाह!" :फिदी" >>>>>>>>>>>.रिया ते मनापासून असुदे. नाहीतर असं हसं होईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तायडे
तायडे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
या वेळी जजेस मधे
या वेळी जजेस मधे ....मार्कोपोलो यांचा समावेश झालेला आहे.... आम्ही केलेली विनंती त्यांनी मान्य केली
.
.
या वेळे पासुन जिप्सी , शापित गंधर्व आणि मार्को पोलो हे तिघे परिक्षण करतील
उदय, अरे वर मी डकवलेले फोटो
उदय, अरे वर मी डकवलेले फोटो चालतील का? (ह्याच उत्तर दे आधी. )![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या वेळे पासुन जिप्सी , शापित गंधर्व आणि मार्को पोलो हे तिघे परिक्षण करतील >>>>>>>>>>तू फक्त निरीक्षण कर.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हो
हो चालतील...........![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
.
.
शोभा.....मी तेच करतो... बाकिचे जमत नाही आपल्याला..
मला कल्पना फारशी क्लिअर
मला कल्पना फारशी क्लिअर झालीये अस वाटत नाहीये>>मलाही नाही समजले.
१) रस्ता दिसतोय.
२) ऑब्जेक्ट म्हणजे ज्या वर फोटो आधारलेला आहे तो या फोटो मधे आहे ( फेरारी कार )
३) लोकांच्या नकळत घेतलेला आहे
४) रस्त्यांवर घडत असलेल्या घटना अचुनपणे टिपलेल्या गेल्या आहेत>>>>फेरारी कार ऑब्जेक्ट वाटत नाही....तर ते जोडपे ऑब्जेक्ट वाटत आहे.....सगळेजण फेरारीचा फोटो काढताना नकळत त्या कपलचा फोटो कढला आहे असे वाटते.
"स्ट्रीट फोटोग्राफी" >>>>हे नाव बरोबर वाटतेय.
ते जोडपे समोर आहे म्हणुन
ते जोडपे समोर आहे म्हणुन त्यावर लोकांचा जास्त फोकस होत आहे ...;)
) कार बद्दल सांगत आहे.. त्यांच्या मागे एक आई आपल्या मुलीला संभाळुन दुसरी कडे नेत आहे..
.पण त्यांच्या बरोबर इतर लोकांच्या अॅक्टिव्हीटी देखील आलेल्या आहेत..
एक जण कार चा फोटो काढतोय ...३ जण कार कडे बघत आहेत.. एक जण आपल्या बायकोला (बहुदा
या गोष्टी सुध्दा आहेत या फोटो मधे.. आणि फोटो मधले ८०% लोक कार कडेच बघत आहे.. त्यामुळे फरारी ऑब्जेक्ट झालेली आहे..:)
उदयन.., उरलेल्या दोन्ही फोटोत
उदयन..,
उरलेल्या दोन्ही फोटोत जोडपीच आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
२ र्या प्रचित कबुतराचे तर ३र्यात २ मनुष्यजोडपी आहेत. कळत - नकळत म्हणजे जोडप्यांच्या नकळत फोटो घ्यावेत काय?
जोक्स अपार्ट, मला तर वाटते रस्त्यावर, समुहाचे रॅन्ड्म फोटो काढावेत, ज्यात अनेक लोक वेगवेगळ्या हावभावात असतील. बरोबर ना?
गमभन ....... बरोबर
गमभन ....... बरोबर आहे
.
.पण.....
२ र्या फोटो मधे कबुतर ऑब्जेक्ट तर आहेच त्याच बरोबर रस्त्यावरचे ट्रॅफिक देखील आहे.. त्यामुळे " रस्त्यावरच्या ट्रॅफिक/ गर्दीतील कबुतरे" ही एक संकल्पना फोटो बघितल्यावर पुर्ण होते...
.
३र्या फोटो मधे.. जोडपी तर आहेतच परंतु मुख्य ऑब्जेक्ट पाउस आहे... पावसात घेतलेला फोटो आहे.. एक जोडप पावसा मुळे घरी लगबगीने जात आहे तर दुसरे पावसाचा आस्वाद घेत एकाच छत्रीत उभे आहे...... खाली चिरमुडी मनसोक्त पणे पावसात भिजत उभी आहे... या सगळ्यांचाच संबंध पाउस हाच आहे.....
.
हे मुख्य असावे फोटोंमधे... फोटो बघितल्यावर फोटोचा ऑब्जेक्ट काय आहे..तो कशा प्रकारे फोटोंमधे असलेल्या व्यक्तींवर व्यक्त होत आहे.. हे दिसावे...
ओके... हौशी लोकांसाठीच हा
ओके...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हौशी लोकांसाठीच हा विषय थोडा वेगळा करुन "कळत नकळत" असा केलेला आहे.. फोटो रस्त्यांवर घडणार्या घडामोडींचे आणि लोकांना न क़ळत काढलेले हवे.यात काहीही समावेश करता येईल...>>>पण मग "स्ट्रीट फोटोग्राफी" हाच विषय नाही ना.....कारण 'कळत-नकळत' विषय घेतला तर ईतर ठिकाणी काढलेले फोटो पण चालतील का? जसे.....पार्क, सभाग्रुह, बस स्टेशन वगैरे.
(No subject)
>पण मग "स्ट्रीट फोटोग्राफी"
>पण मग "स्ट्रीट फोटोग्राफी" हाच विषय नाही ना.. >>>> स्ट्रीट फोटोग्राफी हाच आहे.. फक्त त्यात आम्ही हौशीलोकांसाठीच बदल केलेला आहे... वर लिहिलेले आहे की स्ट्रीट फोटोग्राफी मधे काय काय हवे असते.. त्यातले रस्ता हेच निवड केली आहे.. बाकीचे आम्ही दुय्यम स्वरुपात घेतले..
.
दोन गोष्टी महत्वाच्या हव्यात फोटोंमधे
१) रस्ता - एकदम रस्ता दिसायलाच हवा असे नाही..पण एकंदरीत फोटोवरुन किमान कळायला हवे की ही घडामोडी रस्त्यावर घडत आहे
२) तुमचे ऑब्जेक्ट :- घडत असलेल्या घडामोडींवर तुमच्या ऑब्जेक्ट चा प्रभाव जाणवायला हवा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.
.
.
बस इतकेच आम्ही मुख्य ठेवलेले आहे
आता समजले..... धन्यवाद उदयन
आता समजले.....
धन्यवाद उदयन
"स्ट्रीट फोटोग्राफी" मधे फोटो
"स्ट्रीट फोटोग्राफी" मधे फोटो हे रस्त्यावरच्या घडामोडींवरचे असतात..लोकांचे हावभाव, काही विशिष्ट घडणार्या गोष्टी" >>
"स्ट्रीट फोटोग्राफी" ही कंसेप्ट थोडी मोठी आहे...
- यात जीथे जीथे माणसांचा वावर आहे(पब्लिक प्लेसेस) अश्या जागा देखिल येतात (झू, ट्रेन स्टेशन ई.) पण यात माणसं असायलाच हवी अस नाही.
- आणि "स्ट्रीट फोटोग्राफी" मध्ये घडामोडींची आवश्यकता नसते...गूलमोहराचा सडा पडलेला रस्ता देखिल "स्ट्रीट फोटोग्राफी" मध्ये येतो.
- रत्यावर काढलेला प्रोट्रेट फोटो...'स्ट्रीट फोटोग्राफी' या कॅटेगरीमध्ये येत नाही...तसेच मोर्चा,मिरवणूक देखिल...पण मिरवणूकीत मोर्चा न घेता आजू-बाजूच्या घडामोडी या स्ट्रीट फोटोग्राफी मध्ये येतील.
कळत-नकळत हा विषय मला असा कळला - पब्लिक प्लेसेस मध्ये लोकांचे त्यांच्या नकळत काढलेले फोटो, या फोटोत आजूबाजूच्या घडामोडी आणि लोकांचे हावभाव अपेक्षीत आहेत.
तन्मय शेंडे यांचा प्रतिसाद
तन्मय शेंडे यांचा प्रतिसाद आवडला.
पण माहिती नसलेल्या रँडम लोकांचे त्यांच्या नकळत फोटो काढणं किंवा काढलेले इथे डकवणं फारसं रुचलं नाही.
मृण्मयी धन्यवाद माहिती
मृण्मयी धन्यवाद
माहिती असलेल्या लोकांचे देखिल फोटो काढू शकतात...फक्त त्यांच्या नकळत आणि पब्लिक प्लेस मध्ये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विषय आवडला. जरा वेगळा आहे
विषय आवडला. जरा वेगळा आहे त्यामुळे प्रत्येकाचा दृष्टिकोन दिसेल.
प्रवेशिका १ : आठवड्याचा बाजार
कळत-नकळत हा विषय मला असा कळला
कळत-नकळत हा विषय मला असा कळला - पब्लिक प्लेसेस मध्ये लोकांचे त्यांच्या नकळत काढलेले फोटो, या फोटोत आजूबाजूच्या घडामोडी आणि लोकांचे हावभाव अपेक्षीत आहेत.>>>मला आधि तेच वाटले होते.
रस्ता किंवा आउट डोअर सेटिंग
रस्ता किंवा आउट डोअर सेटिंग असणं जरूरी आहे का?
तन्मय अगदी बरोबर... . याचा
तन्मय अगदी बरोबर...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.
याचा कॅनव्हास फारच मोठा आहे...
म्हणून थोडा आवरला आहे..
मला समजल्याप्रमाणे या विषयात
मला समजल्याप्रमाणे या विषयात तीन गोष्टी गरजेच्या आहेत :
१. रस्त्याची बॅकग्राउंड हवी. म्हणजे फोटो रस्त्यावर काढला आहे इतपत तरी निदान कळायला हवं. रस्त्याशिवाय इतर कोणतेही आऊटडोअर सार्वजनिक स्थळही चालेल.
२. फोटोत काहीतरी ठळक विषय हवा (हेतू हवा)
३. फोटोतील पात्रांच्या नकळत तो फोटो काढलेला हवा.
बरोबर ना?
हो... र्सता बरोबर सार्वजनिक
हो... र्सता बरोबर सार्वजनिक स्थळ देखील चालेल..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोणतंही आऊटडोअर सार्वजनिक
कोणतंही आऊटडोअर सार्वजनिक स्थळ चालेल का? ओके. धन्स. (माझ्या वरच्या पोस्टीत तसा बदल करते.)
जबरदस्त विषय आहे असा विषय
जबरदस्त विषय आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
असो.
असा विषय देखिल असतो हे तरी आता कळले
नैतर आहेच आपल, इकडे बघा, हसा अन खट्याक क्लिक करा! फ्लॅशचा चकचकाट करा.... फ्लॅश पडला की समोरच्याला देखिल कस कृतकृत्य झाल्यासारख वाटत. पूर्वी रोलचे क्यामेरे असायचे, अन असल्या फ्रेम्स करता रोलची एकेके फ्रेम वाया घालवणे परवडायचे नाही, अन लोकान्चा आग्रहही मोडता यायचा नाहि. शेवटी मी स्वतंत्ररित्या नुस्ताच फ्लॅश पेटेल अशी सोय करुन घेतली होती.
या विषयाला तुफानी स्कोप आहे. यावेळेस एकसे एक घडामोडी बघायला मिळतील अशी अपेक्षा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा मस्त विषय...
व्वा मस्त विषय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages