फोटोग्राफी स्पर्धा..जुन.. "कळत नकळत"..निकाल

Submitted by उदयन.. on 3 June, 2013 - 06:11

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " जुन " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या वेळी विषय ठरवत असताना "स्ट्रीट फोटोग्राफी" हा विषय डोळ्यासमोर आला. फोटोग्रॉफी प्रकारांमधे हा प्रकार विशेष आहे... म्हणुन या वेळेला हा विषय आम्ही विचार करुन निवडला.. पण हा प्रकार प्रोफेशनल मधे येतो.. झुम आउट, विशिष्ट कोन पकडुन फोटो काढणे. इत्यादी बरेच ऑप्शन यात येतात.. "स्ट्रीट फोटोग्राफी" मधे फोटो हे रस्त्यावरच्या घडामोडींवरचे असतात..लोकांचे हावभाव, काही विशिष्ट घडणार्या गोष्टी.. इत्यादी टिपणे या प्रकारात अपेक्षित असते. लोकांच्या न कळत त्यांचे फोटो काढणे त्याचबरोबर त्या फोटोंमधे रस्त्यावर घडणार्या घडामोडी येणे ...हे मुख्य वैशिष्ट्ये आहे या विषया मधे....

हौशी लोकांसाठीच हा विषय थोडा वेगळा करुन "कळत नकळत" असा केलेला आहे.. फोटो रस्त्यांवर घडणार्या घडामोडींचे आणि लोकांना न क़ळत काढलेले हवे.यात काहीही समावेश करता येईल...

निकाल

प्रथम क्रमांक: आशुचँप - हितगुज

ashuchemp 1st.jpgद्वितीय क्रमांक: अमित मोरे - जपानी तरुणी

amit more 2nd.jpgतृतिय क्रमांक - इंद्रधनुष्य – कॉमनमॅन

IMG_4933.JPGउत्तेजनार्थ :-

१) अंकु - ग्राहकाची वाट बघणारी बाई

anu uttejanarth 2.jpg

२) माझी भटकंती - मी आले, निघाले

mazi bhatakanti uttejnarth 3.JPG

३) अगो - फुगेवाले जोडपे

ago uttejanarth 1.jpg

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :

१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी"

२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा"

४) फोटोग्राफी स्पर्धा.. एप्रिल.."चाहुल उन्हाळ्याची

५) फोटोग्राफी स्पर्धा.. मे..."खेळ मांडला"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरा फोटो टाकायचा असल्यास आधीच्या २ पैकी एक काढावा लागेल..

दोन पेक्षा जास्त नकोच...

आणि एकाच प्रतिसादात दोन्ही फोटो टाकावे... एका आयडीचे फोटो शोधण्यास मदत होते

अरे जाहीर झाला म्हणजे माझ्या पर्यंत पोहचला >>> आता ते मला कस कळणार Wink
जाहीर केल्यानंतरच जाहीरपणे सांगायचना कि निकाल जाहीर झालाय Light 1

वाहवा!!!

सहीच... Happy

विजेत्यांचे अभिनंदन.
जज लोकानी तेवढं त्ये प्रत्येक फोटोवर मनोगत व्यक्त करण्याच मनावर घ्याच... Happy

जज लोकानी तेवढं त्ये प्रत्येक फोटोवर मनोगत व्यक्त करण्याच मनावर घ्याच... स्मित>>>>>>>>>झकोबा, जज लोकांना आता वेळ कुठे आहे? Wink

अरे वाह...अजून एकदा...
क्या बात है.....

ज्यूरींना खूप खूप धन्यवाद....

जज लोकानी तेवढं त्ये प्रत्येक फोटोवर मनोगत व्यक्त करण्याच मनावर घ्याच..

अगदी अगदी....काय चुकलं असेल...किंवा अजून काही पाहिजे असेल ते पण सांगावे...नुसते निकाल लावण्यापेक्षा आपण सगळे आपली फोटोग्राफी सुधारण्यासाठी इथे हजेरी लावत आहोत. त्यामुळे ज्युरींकडून काही शिकायला मिळाले तर हवेच आहे...
कृपया ही सूचना मनावर घ्यावी

विजेत्यांचे अभिनंदन

आशुचँप >> +१

तज्ञ लोकांकडून फोटो क्रिटीसाईज होणं हा फार महत्वाचा भाग आहे फोटोग्राफी शिकण्यात. जजेसनी आशुचँपची सूचना नक्कीच मनावर घ्यावी.

हो हो हो...........जजेस ना सांगितलेले आहे तशी सुचना केली आहे मी...

जिप्सी सध्या बिझी असल्याने ( Wink ) आणि शांग आताच द आफ्रिकेला गेला म्हणुन जरा उशीर होत आहे

सर्व विजेत्यांचे आणि भाग घेणार्‍यांचेही अभिनंदन!!! Happy

आशु + १.

रच्याकने, ते शीर्षक 'फोटोग्राफी स्पर्धा..जुन.. "कळत नकळत"..निकाल" असं दिसतंय. Proud

सर्व विजेत्यान्चे अन सहभागी मायबोलिकरान्चे अभिनन्दन Happy
फोटोवर तज्ञांचे भाष्य हवेच, म्हणजे बरेच काही शिकता येईल त्यातुन. Happy

अरे वा, निकाल आला. विजेत्यांचं आणि सहभागी झालेल्यांचे अभिनंदन Happy

फोटोग्राफीतल्या तंत्राबद्दल काहीच कळत नसल्याने उत्तेजनार्थ बक्षिसाच्या यादीत नाव पाहून भलतेच भारी वाटले Happy

जज लोकानी तेवढं प्रत्येक फोटोवर मनोगत व्यक्त करण्याच मनावर घ्याच.. >>> + १

Pages