चित्रमय कविता स्पर्धा.. मार्च..निकाल

Submitted by उदयन.. on 9 March, 2013 - 09:16

नमस्कार,

फेब्रुवारी प्रमाणे मार्च महिन्यासाठी देखील एक चित्र आपल्या समोर देत आहे

इथे एक फोटो दिला जाईल..त्यावरुन आपणास कविता, गझल लिहायची आहे..
या पुर्वी याच संकल्पनेवर माझा धागा होता.. यावर आता स्पर्धा चालु केली
फोटोग्राफ स्पर्धेचा धागा चालु असताना अत्यंत सुंदर आणि अर्थपुर्ण प्रकाशचित्रे अनुभवाला मिळाली ..ज्यावरुन उत्तम काव्य कविता / गझल तयार होईल. म्हणुनच आज चा मुहुर्त धरुन हा धागा तयार केला

या धाग्याचे जजेस आहेत ........... "प्राजु" आणि "शाम" ....दोघांनी ही परीक्षक बनण्याची विनंती स्विकारलेली आहे.

प्रकाशचित्र : जिप्सी तर्फे

प्रथम क्रमांक :- अज्ञात ( चिंतामणी ) ..........

द्वितीय क्रमांक :- उमेश कोठीकर ...( फुटु लागणार्या )

तृतिय क्रमांक :- डॉ. कैलास गायकवाड ....( ताट कोणते असेल )

नियम / सुचना :-
१) एक आयडी २ कविता देउ शकेल......कविता स्वरचितच असावी
२) निकाला पर्यंत कविता इतरत्र प्रकाशित करू नये
३) कविता जास्तीत जास्त १२ ते १४ ओळींचीच असावी.
४) कवितेला समर्पक शिर्षक असावे........
५) कविता इथेच प्रतिसादामधेच टाकावी..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_1839_0.jpg

माझा सहभाग

'' ताट कोणते असेल माझ्या पुढे वाढले''

दिल्ली आणिक भंडारा पाहून वाटले
ताट कोणते असेल माझ्या पुढे वाढले

महिला सन्माना च्या इतक्या फुसक्या बाता
ताठपणाचे ओझे अवकाळीच वाकले

शिंपण होते प्रेमाचे पण अशा प्रकारे
डोळ्यांमधले अश्रू डोळ्यांमधे वाळले

मंगळसूत्रे,टिकली,कंकण बंधबंधने
कोण म्हणाले स्त्री मुक्तीचे सूप वाजले

लिहून गेलो इतक्या ओळी,कुठे समजले
अर्धोन्मिलीत डोळ्यांमधले काय वाचले

--डॉ.कैलास गायकवाड

उदयन

स्पर्धेची कल्पना आवडली. या चित्राला समर्पक अशी एक कविता आधीच प्रकाशित असल्याने इथे देता येणार नाही हे उघड आहे. पण लिंक देण्याचा मोह आवरत नाही.

http://www.maayboli.com/node/41661

फुटू लागणा-या अवयवांपासून
ते मोहरू लागणा-या मनापर्यंत
एकच प्रश्न,,
आमचा मनःपूत भोग घेतोय आई
बलात्कार करणा-यांचे हात
आता पोहोचतीलच ना गं
माझ्यापर्यंतही?
मी कुठेही असले तरी?
पार भंडारा अथवा दिल्ली
पौरूषी हिस्त्र हात
येतीलच ना शोधत मादीपण; माझ्यातले?
आमच्यातले बालपण अशाच निर्घृण पद्धतीने
संपविले जाते का ग?
पुरूषातल्या जनावराची
आग शांत होईपर्यंत...
आम्ही नेमकं काय करावं आई?
सांग?
मेंदीचाही नाजूक भार सोसू न शकणारे आमचे
कोमल हात
प्रतिकार की प्राक्तनातील असहाय्यता?
काय बाणवावे आम्ही स्त्रीपणात?
सांग ना
जाउ दे आई..तेच प्राक्तन असेल मादीपणाचे तर..
कोहं चे उत्तर नाही शिकवले नाहीस तरी चालेल
पण एक नक्की शिकव
बलत्कारानंतर..
कसे जगायचे गं?

’बाय’ असणे...

आज पुन्हा मी जरा वैतागले आहे
रात्रभर गस्तीत माझ्या जागले आहे...

उर पाहून आठवावे दूध आईचे
ते निरागसपण ढळाया लागले आहे...

भूक त्यांची कोणती जी हाय भागेना
भाकरीचे चंद्र सगळे भागले आहे...

माय म्हणते झाक बाळा आबरू सगळी
मी तिच्या डोळ्यांत तरळू लागले आहे...

कुणीतरी सांगा मला हे नीट समजवूनी
नेमके का ’बाय’ असणे चांगले आहे...?

मझि कविता...ह्या फोतोवरुन सुचलेलि...
------------------------------------------------
तुला फुल दिसलं का फुल
ते तिथे कल्यांमध्ये..
उमलणार होतं
आज उद्या तयामध्ये..
दिसणार होत अंतरंग
होउन पाकळी मोकळी...
पराग करणार होते सडा
पाकळीवर रांगोळी...
दरवळणार होते गंध
मंद ते...धुंद करून
पाहिलसं का तू
का नाहीच उमलल...खुडलं...?
कोणी येणा जाणार्याने ...
फुलंच ना खुडलं...
जाऊ दे फुलच ते..
उमललं असतं तरी काय...?
उद्याच निर्माल्यच ते...
उमलताना पहायचं मला
पहाटेच दव पाकळी वरचं
कोवळ्या उन्हात पहायचय मला
वाटा त्या सुवासिक
अनुभवायच्या आहेत
भ्रमर पाखराची चपळाई
पहायची आहे
तिथे आहेत रे अजून कळ्या
उमलतील ना त्या बऱ्या
आज इथे असेन मी
उद्या उमलण्याचा सोहळा
फुल म्हणून पहायच्या आहेत
जपेन त्या कळ्या....

मझि कविता...ह्या फोतोवरुन सुचलेलि...
------------------------------------------------
** मी आधीची कविता शीर्षकासहित परत पतवत आहे.
--------------------------------------------------------
शीर्षक : "कळ्यान्चि कळ"
तुला फुल दिसलं का फुल ते तिथे कल्यांमध्ये..
उमलणार होतं आज उद्या तयामध्ये..
दिसणार होत अंतरंग होउन पाकळी मोकळी...
पराग करणार होते सडा पाकळीवर रांगोळी...
दरवळणार होते गंध मंद ते...धुंद करून
पाहिलसं का तू ;का नाहीच उमलल...खुडलं...?
कोणी येणा जाणार्याने ...
फुलंच ना खुडलं...जाऊ दे फुलच ते..
उमललं असतं तरी काय...? ;उद्याच निर्माल्यच ते...
उमलताना पहायचं मला
पहाटेच दव पाकळी वरचं
कोवळ्या उन्हात पहायचय मला
वाटा त्या सुवासिक अनुभवायच्या आहेत
भ्रमर पाखराची चपळाई पहायची आहे
तिथे आहेत रे अजून कळ्या
उमलतील ना त्या बऱ्या
आज इथे असेन मी
उद्या उमलण्याचा सोहळा
फुल म्हणून पहायच्या आहेत
जपेन त्या कळ्या....

छान कविता.............
धन्यवाद

“ती” ची कहाणी..

“ती” ची कहाणी , “ती” चं जगणं
अनेक प्रश्न घेउन , आयुष्याशी लढणं ॥

वर्तमानाची चिंता , भविष्याचे प्रश्न घेउन
रोजचा दिवस , कसाबसा ढकलणं ॥

“ती” चं नाही महत्व , घराला नी समाजाला
तिच्या वेदना जाणून घ्याव्याशा , वाटत नाही कुणाला ॥

जीवनाच्या भयानक भोव-यात , अजाणता सापडते
अनपेक्षित घडले कि , असहाय्य बनते ॥

समस्येची उकल ही , करावीच लागणार
आनंददायी तेजोमयी यश , की गडद काळोखी अपयश
हे प्रश्न मात्र क्षणाक्षणाला , विचलितच करणार ॥

चिंतामनी

चिंतनी चिंता कशी; तू कोवळी चाफेकळी
दूध ओठांवर अजूनी; कुंतले तव जावळी
स्वप्न; भोळी सावळी पण नयन घन मेघावळी
दशदिशा बाळे तुझ्यास्तव स्पंदने वेडीखुळी

हास्य विलसू दे मुखावर होउ दे मन बासरी
रंग उधळू दे स्वरांचे मी सखा खलसंगरी
आंदणे सौहार्द्रतेची तरळु दे गा अंतरी
तू सृजनमय माय ममता एकटी वसुधेवरी

...............अज्ञात

अनेक वर्षांपूर्वी चांदोबा मासिकात दोन चित्रं देऊन जवळपास अशीच स्पर्धा असायची त्याची आठवण झाली.

?

हो

समस्त मायबोली करांची माफी मागतो... निकाल अत्यंत उशिरा लावल्या बद्दल...काही अपरिहार्य कारणाने निकालास उशिर झाला... तसेच... माझे ईमेल बॉक्स मधे प्रोब्लेम आल्याने मला परिक्षकांची ईमेल मिळाली नाही....
या सर्व प्रकाराची जवाबदारी माझ्यावर आहे...

हा प्रकार परत होउ नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल .....

क्षमस्व..............