दोरीवर कपडे कसेही वाळत असतात
कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात?
शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो
फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो
(यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.)
पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत
दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत
नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते
भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे
साडी घालून घडी बसते वाळत
वा-याने तिचा पदर असतो हालत
किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल
गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल
कुरबुर झाली
(काल रात्री साडे तीन वाजता पाणी बचतीवर एक पथनाट्य लिहीले. एका व्हाट्सअॅप गृपमध्ये सदस्य दुर्गविहारी अन दीपक११७७ यांनी झोप घेत चला अन काही कुरबुर झाली असेल असे विनोदाने लिहीले. सकाळी मी ते वाचले अन मग त्यांना देण्याचे उत्तर या गीतलेखनातून लिहीले.)
तुझ्यासंग माझ्यावाली
कुरबुर झाली ग कुरबुर झाली
त्यानेच माझी झोपायाची
ग झोपायाची पंचाईत झाली ||धृ||
एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली गोष्ट. अनेक शतके कैलासाच्या बाहेर पाउल न टाकल्यामुळे पार्वतीमातेचा जीव अगदी उबून गेला होता. तीच ती हिमाच्छादित पर्वतशिखरे, तेच ते धूसर करडे आकाश, त्याच त्या गणादिकांच्या लीला, तीच ती कार्तिकेय अन गणेशाची कौतुके अन तीच ती पतीराज शिवशंभूंची धीरगंभीर तपोमुद्रा ! कुठलंही च्यानल लावलं तरी एकच सिरीयल लागावी तसं काहीसं जगन्मातेला वाटत होतं. आदिमायेला आता जरा पृथ्वीतलावर जाऊन मनुष्यामात्रांची नखरेल रेलचेल पहावीशी वाटू लागली. त्यांच्या सुखदु:खांची दखल घ्यायची उर्मी तिच्या कोमल मनात दाटून आली.
आम्ही जेवायला बसलो होतो. संध्याकाळचे एकत्र जेवण. अस्मादिक, बायको व मुलगा एकत्र जेवायला बसले की एकत्र जेवण असे म्हणायचे. आता एकत्र कुटुंब राहिलेले नसले, तरी जेवण एकत्र असते. पुढच्या पिढीत त्यालाही फाटा फुटेल कदाचित. विविधभारतीवर लागलेल्या "मेरी मा" हे "तारे जमीन पर" ह्या चित्रपटातले गाणे ऐकताना, एकदम माझ्या आठवणीची तार लताच्या "प्रेमा स्वरूप आई" ह्या गाण्याशी जोडली गेली. जेवता जेवता क्षणभर खूप वर्षांपूर्वीचा गोड्या मसाल्याचा तोच घमघमाट नाकात दरवळळ्याचा भास झाला. आई जाऊन बरीच वर्ष लोटली होती.
ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश.
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १.
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट.
राजाराम सीताराम....... भाग ७….. ड्रिलस्क्वेअर.
राजाराम सीताराम....... भाग ८...... शिक्षा.
राजाराम सीताराम....... भाग ९...... एक गोली एक दुश्मन।.... भाग १.
राजाराम सीताराम....... भाग १०.. एक गोली एक दुश्मन।.... भाग २.