अवकाश स्पर्धा - भाग १
टीप
1. या व येणार्या लेखांमध्ये सोविएत यूनियन ला रशिया म्हणून संबोधण्यात येईल.
2. अग्निबाणाला रॉकेट म्हटले जाईल.
पार्श्वभूमी(थोडक्यात)
4 ऑक्टोबर 1957 रोजी स्पुटनिक-1 ला घेवुन आर-7 हे रॉकेट अवकाशात झेपावले आणि एका नव्या युगाची (अवकाशयुग) सुरवात झाली. स्वतःला “तंत्रज्ञानातील महासत्ता” आणि रशियाला “पिछाडलेला देश” समजणार्या अमेरिकेसाठी हा मोठा धक्का होता. मात्र या घटनेने रशियाला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. दिवसातून सात वेळा अमेरिकेवरून “बीप बीप” करत जाणार्या स्पुटनिक बाबत अमेरिका काहीच करू शकत नव्हती