थंड डोके, दूरदृष्टी, सखोल विचार/ सज्ज जाहलो करण्या विश्वसंचार
KISS (केक इन्स्टिट्यूट अॉफ स्पेस स्टडीज) च्या सौजन्याने एक बस भरून कॅलटेक-जेपीएल चे आम्ही ५९ लोक ८ मार्च २०१२ ला स्पेस-एक्स (SPACEX - http://www.spacex.com) ला गेलो. spacex ला सहजी जाता येत नाही म्हणून लॉटरीत नावे टाकून आमची निवड झाली. डाऊनटाऊनची संध्याकाळची गर्दी टाळण्याकरता एक-दोघे वगळता सगळेच बसने आले.
आम्ही जरा जास्तच वेळेवर पोचल्याने थोडावेळ बाहेर थांबावे लागले - लोकांचे पासपोर्टस, ओळखपत्रे वगैरे पण तपासून होत होते. बाहेर एक लालभडक टेस्ला उभी होती. ५० हजार डॉलर्सच्या या गाड्या पृथ्वीचे आवश्यक भविष्य असु शकतात.
यथावकाश आम्ही खऱ्याखूऱ्या रॉकेट फॅक्टरीत प्रवेश करते झालो. जुजबी स्लाईड शो नंतर आम्ही आतूरतेने वाट पहात असलेला फ्लोअरचा फेरफटका मारायची संधी मिळाली. चारच भिंती असलेली ती एक अवाढव्य खोली आहे. फाल्कन आणि ड्रॅगन रॉकेट्सचे भाग इथे बनवले जातात. सगळे भाग हाताशी असतांना केवळ दहा दिवसात एक अख्खे रॉकेट बनवता येते. रॉकेट्स? कोणते रॉकेट्स? आणि रॉकेट्स कशाकरता?
एलान (किंवा इलॉन) मस्क या दक्षिण अाफ्रिकी तंत्रज्ञाला एकदा एक भन्नाट आयडीया सुचली - एका रॉकेटवर अनेक हिरवी रोपे आरोपायची आणि लालचुटूक मंगळावर ती उतरवून फोटो काढायचा - किती मस्त दिसेल ना? पे-पाल विकून आलेला पैसा ताजा होता (हो ती यानेच सुरु केली होती) मग झाली सुरु शोधाशोध - कुणाचे रॉकेट आपले काम साधेल? नासा स्वत:च विवंचनेत होते. ओह - रशियाकडे आता वापरात नसलेले मिसाइल्सचे रॉकेट्स असणार, चला विचारू या त्यांना. झालं, रशियाला तीन-चार चकरा मारुन झाल्या. पण तेंव्हा लक्षात आले की हे रॉकेट्स वाजवीपेक्षा महाग वाटताहेत. स्वत:च का बनवू नये रॉकेट्स असा साधा विचार त्याने केला. नॉरथॉप ग्रुमन, बोईंग वगैरे सदन कॅलिफोर्नीयात पसरले असल्याने बे एरीयातून तो लॉस एंजेलिसला पोचला. बहुदा पे-पालच्या यशामुळे आणि स्वत:चे पैसे गुंतवायची तयारी असल्याने इतरांनी पैसे द्यायची तयारी दर्शवली असावी.
लॉस एंजेलिसच्या हॉथोर्न परीसरात अशी झाली spacex ची सुरुवात. आता येथे खरीखूरी रॉकेट्स बनतात. फाल्कन-१ ने सुरुवात झाली. पहिल्या दोन-तीन अपयशांनंतर मात्र यशस्वी भराऱ्या सुरु झाल्या. इथे रॉकेट्स बनतात, टेक्सास मधे चाचण्या होतात व पार हवाई पलिकडील बेटावरुन उड्डाण. पण आता फाल्कन-१ पाठोपाठचे फाल्कन-९ मागे पडून फाल्कन-हेवी आले आहे (तीन फाल्कन-९ इतके ते महाकाय आहे). सात लोकांना नेऊ शकेल असे ड्रॅगनपण तयार आहे - सध्या मात्र निर्जीव वस्तुंच्याच कक्षीकरणाकरता ड्रॅगन्स वापरले जातात. रॉकेट बनवायची यंत्रणा इतकी तय्यार आहे की स्पेस-एक्स कडे आता नासाचे १० पेक्षा अधिक कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. मंगळावर जायचे स्वप्न अजूनही एलान उराशी बाळगून आहे. २०१८ पर्यंत त्याचे रॉकेट्स तिथे पोचतील असा त्याला विश्वास आहे. पृथ्वीच्या भवितव्याबद्दल स्वत: अतिशय अाशावादी असुनही एक इन्शुरन्स पॉलिसी म्हणून मंगळावर मानवी वसाहत स्थापण्याचा त्याचा मनसुबा आहे.
अनेक ठिकाणी तो यशस्वी आहे. ती विद्यूत कार बनवणारी टेस्ला कंपनी पण याचीच, आणि सौर-उद्योगात भरारी मारणाऱ्या सोलरसिटी मधे पण याचा सहभाग आहे. स्पेस-एक्सचे भलेमोठे छत सदन कॅलिफोर्नीयातील सधन उन खात दिवसभर उर्जा पुरवतं. तर, त्याच्या यशामुळे लोकांचा त्याच्यावर इतका विश्वास आहे की पेटाने (People for the Ethical Treatment of Animals) त्याला पत्र पाठवून मंगळ त्याने व्हिगन घोषीत करावा अशी विनंती वजा सुचना केली. त्याने स्वत: हे सांगीतले नसते तर हा एक कोणीतरी पसरवलेला विनोद आहे असे वाटले असते. त्यांनी तेच पत्र प्रेसलाही पाठवून स्वत:ला अजूनच तोंडघशी पाडून घेतले.
सुरुवातीला स्लाईड-शो द्वारे ज्याने आम्हाला स्पेस-एक्सची ओळख करून दिली तो होता 'हु किल्ड द इलेक्ट्रीक कार' आणि 'रिव्हेन्ज अॉफ द इलेक्ट्रीक कार' चा सहाय्यक निर्माता रॉजर गिल्बर्टसन. स्पेस-एक्सवर पण डॉक्युमेंटरी बनवायला आवडेल असे तो म्हणाला. फॅक्टरी फ्लोअरवर आमच्याशी गप्पा मारल्या नासाकडुन दोनदा अवकाशात जाऊन आलेल्या गॅरेट राइसमनने. आता स्पेस-एक्सचा हा सिनीअर इंजिनीअर इतरांकरता रॉकेट्स बनवतो पण त्यापैकी कोणत्याही यानात बसायची त्याची तयारी असते. त्याच्याच शब्दात सांगायचे तर 'आमची याने इतकी सुरक्षीत हवी की आम्हाला स्वत:ला त्यातून जायची भिती वाटता कामा नये'. या उलट एलानला अवकाशात जायला आवडेल पण त्याचे साथीदार ती रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्याचे मूल्य इतरांकरता जास्त आहे.
मंगळाचे अधिपत्य मात्र त्यालाच मिळेल असे नाही. या रेसमधे उतरायची गुगलचीही जय्यत तयारी सुरु आहे, अाणि इतरही काही कंपन्या आहेत.
असे लोक जर असतील, आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य मिळाले तर पृथ्वीचेच नाही तर विश्वाचे भवितव्य निर्विवादपणे उज्वल आहे हे सांगणे न लागे.
लेखाबद्दल खूप खूप धन्यवाद.
लेखाबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप नविन माहिती समजतेय.
मस्त.
मस्त.
थंड डोक्याचा संदर्भ कळला
थंड डोक्याचा संदर्भ कळला नाही.
छान.
छान.
माहितीबद्दल धन्यवाद.
माहितीबद्दल धन्यवाद.
छ्या, मंगळ आतापासूनच व्हिगन?
छ्या, मंगळ आतापासूनच व्हिगन? आमचा पत्ता कट!
माहितीसाठी धन्यवाद!
छान माहिती पण त्रोटक वाटली.
छान माहिती पण त्रोटक वाटली. याची काहीच पूर्वपिठीका माहित नाही त्यामुळे या संदर्भातले थोडे अजून ज्ञानामृत मिळाले तर उत्तम.
फार भारी अनुभव आहे हा. इथे
फार भारी अनुभव आहे हा. इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
सिंडी +१
सिंडी +१
जेम्स बाँड | 19 March, 2012 -
जेम्स बाँड | 19 March, 2012 - 11:38 नवीन
थंड डोक्याचा संदर्भ कळला नाही.>>>
आडव्या वाक्याबद्दल अभिनंदन बॉन्ड
======================================
सध्या मात्र निर्जीव वस्तुंच्याच कक्षीकरणाकरता ड्रॅगन्स वापरले जातात>>
हे वाक्य न समजल्यामुळे मी पुढचे वाचले नाही. तेथपर्यंतचे जे वाचले त्यातील हुरूप फार भावला
माहिती तर मिळालीच
मस्त अनुभव
मस्त अनुभव
अनुभव शेअर केल्याबद्दल
अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. शेवटचे वाक्य छान आहे. सच अँड सच इज नॉट रॉकेट सायन्स
असे आपण किती सहज पणे म्हणतो. तसे ह्या कंपनीतले लोक काय बरे म्हणत असतील.
लोकहो, धन्यवाद या काही
लोकहो, धन्यवाद
या काही संबंधीत लिन्क्सः
http://kiss.caltech.edu/
http://www.spacex.com/
https://www.paypalobjects.com/html/press/070802APEbayBuys.html
http://en.wikipedia.org/wiki/Elon_Musk
http://www.teslamotors.com/
http://www.thejanedough.com/peta-mars-vegan/
http://www.revengeoftheelectriccar.com/filmmakers/filmmakers-roger-gilbe...
http://en.wikipedia.org/wiki/Garrett_Reisman
http://www.dailygalaxy.com/my_weblog/2009/07/your-pick-who-will-win-the-...
http://www.dailygalaxy.com/my_weblog/2008/01/googles-space-v.html
http://mashable.com/2011/07/08/space-exploration-private-sector/
मस्त महिती शेअर केलीय. लिंक्स
मस्त महिती शेअर केलीय.
लिंक्स बद्दल धन्यवाद
ताजी बातमी:
ताजी बातमी: http://www.gizmag.com/spacex-dragon-crew-cabin/21874/
अरे वा एकदम भारीच की असा
अरे वा एकदम भारीच की असा अनुभव.
फारच वेगळी आणि छान माहिती
फारच वेगळी आणि छान माहिती दिलीत.
मस्त माहिती !!
मस्त माहिती !!
http://www.bbc.co.uk/news/hea
http://www.bbc.co.uk/news/health-17439490
मस्क ऐकत नाही
छान माहिती
छान माहिती