राजेश पाटील हा खानदेशातील ताडे या अगदी लहान खेड्यातून आलेला तरुण. अतिशय हलाखीत जगणार्या कष्टकरी कुटुंबातून आलेला राजेश शेतमजुरीचे मिळेल ते काम करून, पाव-भाजीपाला विकून, ट्रॅक्टरवर मजुरी करून, विहिरी खोदून शाळा शिकला.
डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर काम करण्यासाठी श्री. विलास मनोहर १९७५ साली हेमलकशाला दाखल झाले. प्रकल्प सुरू होऊन वर्ष झालं होतं. दारिद्र्य, अज्ञान यांमुळे त्या भागात वन्यप्राण्यांची भरपूर शिकार होत असे.
श्री. विजय तेंडुलकर यांच्या ज्येष्ठ कन्या सुषमा तेंडुलकर यांनी लिहिलेली ही कहाणी - त्यांच्या बाबांची.
'श्रम ही है श्रीराम हमारा' असं म्हणणार्या बाबांनी वरोड्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर 'आनंदवन' उभारलं. कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला. ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं.
प्रत्येक माणसात असंख्य माणसं कोंबलेली असतात. वेगवेगळा स्वभाव, वेगवेगळ्या प्रवृत्ती घेऊन आलेली ही माणसं शोधणं फार कठीण असतं. तेंडुलकरांना मात्र ते सहज जमलं होतं.
'संगीताने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती होते, म्हणजेच चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते,' असं भरतमुनींनी सांगितलं आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जन्मच मुळी स्वरांतील सौंदर्य व्यक्त करण्यासाठी झाला आहे.
'मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस' हे वैदेही देशपांडे यांचे अनुभवकथन. सैनिकी आयुष्यातील अनुभव, घडामोडी, पद्धती या सार्यांचा अतिशय खोलात जाऊन वेध घेणार्या पंधरा लेखांचा हा संग्रह आहे. लेखिकेचे पती हे लष्करातील उच्चपदस्थ अधिकारी.
'अमूल', 'धारा', 'आणंद', 'ऑपरेशन फ्लड' ही नावं ही नावं न ऐकलेली व्यक्ती विरळाच. या नावांना प्रत्येक भारतीयाच्या घरात आणि जगभरात मानाचं आणि आपुलकीचं स्थान मिळवून दिलं ते पद्मविभूषण डॉ. वर्गीस कुरियन यांनी.
या मालिकेतील पहिलं पुस्तक आहे ग्रंथालीने प्रकाशित केलेले श्री. संजय पवार यांचं 'पानीकम'. १९९७ - २००२ या काळात श्री. पवार यांनी लिहिलेल्या स्फुटांचं हे संकलन. विद्रोही चळवळीशी अतिशय जवळचं नातं असणार्या श्री.