स्वभाव

मुखवटे

Submitted by पाषाणभेद on 20 September, 2021 - 19:23

खरे चेहरे झाकण्या चढवूनी खोटे मुखवटे
खरेच आहे भासवतात मग ते चेहरे खोटे ||१||

मनात कटूता असूनी वाहवा करती
हसूनी खोटे वार करती पाठीवरती ||२||

तोंडदेखला आदर देवूनी स्वागत होई
पाठ वळता निंदा करण्याची करती घाई ||३||

स्वार्थ साधण्या स्तूती करती तोंडभरूनी
कार्यभाग संपला, टिकेची झोड वदनी ||४||

खोटे चेहरे वागवीत खोटे जीवन का जगावे?
मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे ||५||

- पाषाणभेद
२१/०९/२०२१

शब्दखुणा: 

कन्फेशन

Submitted by राधानिशा on 17 August, 2020 - 05:09

माझ्या आधीच्या - माझ्यामध्ये मॅच्युरिटी कशी आणू , या धाग्यात नात्यातील भावाने न विचारता पुस्तकं नेल्याने माझा कसा संताप झाला आहे , हे लिहिलं होतं . पुस्तकं आता परत मिळणार नाहीत अशी खात्रीही व्यक्त केली होती .

शब्दखुणा: 

माझ्यामध्ये मॅच्युरिटी कशी आणू ?

Submitted by राधानिशा on 15 May, 2020 - 09:13

खरं तर घटना क्षुल्लक आहे पण डोक्यातून जात नाहीये पटकन . मला वाचनाची आवड लहानपणापासून आहे आणि गेल्या 12 - 14 वर्षात खरेदी केलेल्या पुस्तकांनी एक लहान कपाट भरलेलं आहे . मला माझी पुस्तकं शेअर करायला मनापासून आवडत नाही .. लोक हरवतात , नेलेल्यापैकी सगळी आणून देत नाहीत असे अनुभव आहेत . चांगली गोष्ट की सहसा कुणी आमच्या घरी पुस्तकांची मागणी घेऊन येत नाही .

4 दिवसांपूर्वी अगदी जवळच्या नात्यातील एक भाऊ आला आणि बास्केट भरून पुस्तकं घेऊन गेला . मुलांसाठी लायब्ररी सुरू करण्याचा उपक्रम सुरू करायचा आहे .

शब्दखुणा: 

स्वभाव

Submitted by मिलिंद जोशी on 7 September, 2019 - 12:31

माझा आजचा स्वभाव आणि काही वर्षांपूर्वीचा स्वभाव यात बराच फरक पडलेला आहे. खास करून जे मला लहानपणापासून ओळखतात त्यांना तर माझ्यातील हा बदल खास करून जाणवतो. अगदी शुल्लक कारणही मला चिडचिड करण्यासाठी पुरेसं असायचं. हेच नाही तर मी कधी कुणाला चेष्टेत काय बोलून जाईल हे मलाही समजत नव्हतं. ज्यावेळेस लक्षात यायचं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असायची. बरे त्यासाठी माफी मागायची म्हटली तर माझा इगो आड यायचा. या कारणावरून माझे आणि वडिलांचे तर जवळपास दिवसाआड खटके उडत. इतकेच काय तर यासाठी जवळपास ७/८ वेळेस माझी ‘ग्रहशांती’ही केली आहे. पण माझ्यात काहीच फरक पडत नव्हता. घरचेही काहीसे वैतागले होते.

विषय: 
शब्दखुणा: 

द्वंद्व..

Submitted by मन्या ऽ on 27 August, 2019 - 14:52

द्वंद्व..

होकार-नकाराच्या
खेळात नकाराचा
विजय झाला
बुद्धी आणि मनाच्या
द्वंद्वात बुद्धीचा
विजय झाला

विजय झाला असला
तरी मन घायाळ
झाले; आठवांरुपी
मनावर आज
ओरखडे उमटुन गेले

विजय नसे तो बुद्धीचा
विजय आहे तो
लोकांच्या विचित्र
नजरेचा-त्यांच्या
विकृत मनोवृत्तीचा..

(Dipti Bhagat)

Subscribe to RSS - स्वभाव