माझ्या आधीच्या - माझ्यामध्ये मॅच्युरिटी कशी आणू , या धाग्यात नात्यातील भावाने न विचारता पुस्तकं नेल्याने माझा कसा संताप झाला आहे , हे लिहिलं होतं . पुस्तकं आता परत मिळणार नाहीत अशी खात्रीही व्यक्त केली होती .
आता त्यातली अर्धी पुस्तकं परत मिळाली आहेत . उरलेलीही आणून देतो म्हणून सांगितलं आहे . त्यावेळच्या प्रतिक्रियेची लाज वाटून ऍडमिनना तो धागा हटवण्याची विनंती करावी का असा विचार मनात घोळत होता पण समोरासमोर झालेल्या चुकीची माफी मागायची हिंमत नाही , त्याची नाही .. यापूर्वीही काही लोकांना दुखावलं गेलं आहे , त्यांची समोरासमोर माफी मागायला अतिशय लाज वाटते , निदान इकडे तरी बोलून चूक मान्य करण्याइतपत हिंमत दाखवूया असं वाटलं .
याआधीही क्षुल्लक कारणांवरून ज्यांचा अतिशय राग राग केला त्या व्यक्तींनी अशी एकच , वरवर साधी वाटणारी कृती केली की माझ्या वागण्याची मला फार लाज वाटलेली आहे ...
काही लोकांबद्दल मी मनात फार वाईट विचार केला आहे , क्षुल्लक गोष्टींवरून डोकं फिरवून घेऊन .. हा स्वभाव मी कुठून घेऊन आले समजत नाही .. कारण आईवडील , आजी आजोबा , आते , काका , मावशा कोणाचाही असला तामसी आत्मकेंद्रित आणि स्वार्थी स्वभाव नाही .. पूर्वजन्मांचे संस्कार असावेत अशी एक शक्यता वाटते ... किंवा डिप्रेशन आणि इतर मानसिक त्रासांनी स्वभाव हळूहळू बदलत गेला असंही झालं असेल ... नात्यातली बहीण रागावून बोलली म्हणून तिचा 2 -3 वर्षं राग राग केला , मनातच .. आता हळूहळू ते विसरण्याचा प्रयत्न केला पण अढी जाता जात नाही .. आता काही वेळापूर्वी तिने आमच्या घराचं अंगण निसरडं झालं आहे म्हणून खराटा घेऊन , ब्लिचिंग पावडर घालून ते साफ केलं .. कारण काय तर माझ्या वडलांना , तिच्या मामाला आता झेपत नाही त्याचं काम थोडं हलकं करावं .. मी नको नको म्हणत असतानाही माझं ऐकलं नाही .. कोण 40 - 45 हजार पगार घेणारी 35 - 40 वर्षे वयाची बाई अशी दुसऱ्याच्या घरचं , मामा झाला तरी .. असलं काम करेल ... माझ्या मनाच्या क्षुद्रपणाची अतोनात शरम वाटून , मेल्याहून मेल्यासारखं झालं आहे .
भांगेत तुळस असा वाक्प्रचार आहे ... इथे तुळशीत मी एकटीच भांग उगवले आहे ... ह्या लोकांच्या चांगुलपणाची परतफेड होणं अशक्य आहे .. कधीतरी भविष्यात मला अंशतः परतफेड करण्याची संधी मिळावी आणि तुळशीत राहून माझंही आज ना उद्या तुळशीत रूपांतर व्हावं , हे स्वार्थी - क्षुद्र संस्कार जिथूनही कुठून माझ्यात आले असतील .. ते जळून राख व्हावेत आणि मी निदान मरण्यापूर्वी तरी शुद्ध व्हावे अशी कळकळीची इच्छा आहे ..
बरेचजणं भांग असूनही तुळस
बरेचजणं भांग असूनही तुळस असल्याचा आव आणतात.. तुम्ही तर कन्फ्शन करून सिद्ध केलत की तुम्हीही तुळसच आहात.
मला तर साॅरी बोलणच जिवावर येतं..फक्त जवळच्यांसाठीच कधीतरी निघतं.
तुमचे मनोगत वाचले. त्यामध्ये
तुमचे मनोगत वाचले. त्यामध्ये उल्लेख केलेला तुमचा आधीचाही लेख वाचला होता. तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव होते यावरुन तुमच्यामध्ये चांगुलपणा शिल्लक आहे, त्याला टिकवुन ठेवा. नाती तोडायला काहीच वेळ लागत नाही पण जोडणे फार अवघड असते हे लक्षात असु द्या.
_/\_ अजून नाही .. सुधारायला
_/\_ अजून नाही .. सुधारायला प्रचंड वाव आहे .. कदाचित त्यासाठीच मला ह्यांच्यात पाठवलं असेल देवाने कुणास ठाऊक .. की संगतीने तरी काही सुधारणा व्हावी ..
You are being too hard on
You are being too hard on yourself! इतक्या लहान वयात मरण्यापूर्वी वगैरे विचार डोक्यात पण यायला नकोत. मला वाटतं की तू तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांमध्ये अधिक वेळ घालवत आहेस का? तसं असेल तर शक्य असल्यास आपल्या वयाच्या किंवा तुझ्याहून लहान मुलांच्या बरोबर (चौथी पाचवी आणि त्या पेक्षा लहान) जास्त वेळ घालवता आला तर बघ! चंपक, ठकठक, चाचा चौधरी असं काहीतरी हलकंफुलकं वाच, पत्ते कॅरम वगैरे खेळ आणि मायबोलीवर आजिबात येऊ नकोस!! अर्थात अभ्यास, शाळा/कॉलेज सांभाळून. मोठ्या माणसांच्या आसपास पण राहू नकोस. आत्ता लहान आहेस तोवर लहानपण एंजॉय कर!
हा खूप सुंदर सुखाचा काळ असतो आयुष्यातला.
तू एक चांगली माणूस आहेस आणि माणूस म्हटलं की चुका/गैरसमज असणार. It's not being भांग, it's part of being human. अतिविचार करणं फार वाईट असतं. You might ruin a moment by overthinking things. ही सवय आत्ताच प्रयत्नपूर्वक मोड नाही तर खूप त्रास होईल पुढे आयुष्यभर - हा एक फुस.
शाळा कॉलेज संपलं कधीच .. मी
शाळा कॉलेज संपलं कधीच .. मी 25 वर्षाची आहे .. आणि वयाच्या मानाने खूप अपरिपक्व आहे
पंचवीस पण लहानच वय आहे अगं!
पंचवीस पण लहानच वय आहे अगं! अतिविचार करण्याचं वय definitely नाही! इतका विचार नाही करायचा स्वतःबद्दल. ताईला मदत केलीस ना अंगण साफ करायला? झालं तर मग.
इतका विचार करत बसलीस प्रत्येक गोष्टीत तर आयुष्यात मजा कशी करणार?
इतकं वाईट नको गं वागून घेऊस
इतकं वाईट नको गं वाटून घेऊस
माणूस आहोत आपण. कधीकधी चुकीचे वागणे, मूड स्विंग, फटकळ बोलणे घडून जाते.
घडल्यावर वाईट वाटून घेऊन उपयोग नसतो.
अजून चांगलं वागायला, इतर कोणत्या मार्गाने भरपाई करायला आयुष्य पडलंय.
चुकीची जाणीव झाली आणि आपण इथे
चुकीची जाणीव झाली आणि आपण इथे ते व्यक्त केलत ही खूप छान गोष्ट आहे. इथून पुढे तुम्हाला या अनुभवाचा उपयोगच होईल
ताई, निदान तुम्हाला
ताई, निदान तुम्हाला तुमच्यातील तृटी जाणवत आहेत हे फार महत्त्वाचं आहे. आता यापुढे यावर मेहनत घेऊन मनात पॉझिटिव्हिटी रुजवायचा प्रयत्न करा. एखादा छानसा छंद जोपासा, मित्रमैत्रीणी जमवा, समाजकार्य करा. इच्छा असेल आणि शक्य असेल तर एखाद्या चांगल्याश्या काउंसेलर कडे जाण्यासही हरकत नाही. तुम्हाला यात यश लाभो अशी सदिच्छा!
निशा,
निशा,
मला वाटते तुमच्या भावना तुम्ही मागे व्यक्त झालात तेव्हाही प्रामाणिक होत्या आणि आताही आहेतच. भावना हे जिवंत असल्याचे लक्षण आहे... दुसर्यांच्या वागण्याची संदर्भपट्टी वापरून आपल्या वागण्याबद्दल वैषम्य वाटून घेऊ नका कारण...
झुठा रैन बसेरा... साचा दर्द मेरा
झालेली पीडा तेव्हाही खरी होती आता ही आहेच..'त्यावेळी' आपले वागणे चुकल्याची जाणीव आता होत आहे, हे अनुभवांची शिदोरी वाढल्याचे लक्षण आहे...हा प्रवास आहे निरंतर चालू असतो. एका भावनेत ऊमाळा, वैषम्य, मनस्ताप अडकून राहिले नाही म्हणजे झाले.
घराबाहेर न पडलेले लोक लवकर
घराबाहेर न पडलेले लोक लवकर मॅच्युअर होत नाहीत. यु आर नॉट अलोन.... तुमच्यासारखे भरपूर आहेत... त्यात तुमची काहीही चूक नाही... स्वतःला दोष देणे बंद करा... हे मी तुम्हाला आधीच्या धाग्यावरही सांगितले होते... परत लिहितो...
तुम्ही कन्फेशन करताय खरेच कौतुकास्पद आहे...
आपल्यात कमी आहे हे accept करणे हीच महत्वाची पायरी...बहुतांश लोकांना तेच कळत नाही... तुम्हाला ते समजले आहे... आता फक्त त्यावर काम करणे बाकी आहे...हळूहळू भांगेपासून तुळस होत जाल नक्की... शुभेच्छा...
_/\_ ग्रज - एखादी गोष्ट मनात
_/\_ ग्रज - एखादी गोष्ट मनात धरून ठेवण्याचा , न विसरण्याचा स्वभाव असल्यामुळे स्वतःला भरपूर मनस्ताप करून घेतला आहे शिवाय नात्यांमध्ये तणाव निर्माण झाला तो वेगळाच .. ही सगळी लोकं मुळातच चांगली असल्यामुळे , शिवाय माझ्या एकूण मनस्थितीची - डिप्रेशन इत्यादीची माहिती असल्यामुळे त्यांनी ते फार मनावर घेतलेलं नाही ..
आता डिप्रेशन हळूहळू बरं होत आहे ..( अजूनही झालं बरं असं म्हणायला जीभ धजावत नाही ... ) त्याचा हात धरून आलेल्या इतर वाईट प्रवृत्तीही कमी होत आहेत ..
हे राम , फार थकवलं या आजाराने ... 10 - 12 दिवस धड जावेत शांतपणे , सगळं ओके आहे आपण का एवढा त्रास करून घेत होतो असं वाटू लागावं .. आणि मासिक पाळी सगळं चक्र परत ढवळून काढायची .. का आपण जगतो आहोत .. अजून किती दिवस सहन करायची ही असह्य वेदना .. एकूण एक सगळ्यांविषयी राग , तिरस्कार , स्वतःबद्दल सुद्धा ... आत्ता याक्षणी जीव गेला तर सुटू ... सुदैवाने जीव देण्याची हिंमत नव्हती म्हणून फक्त जिवंत आहे .. तेसुद्धा पेनिंगच्या भीतीने नाही , पुढचा जन्म कुठेतरी भयंकर परिस्थितीत मिळाला तर काय करणार या भीतीने ... फिजिकल पेनिंगचं काहीच वाटत नाही , जर या मानसिक वेदनेच्या चरकातून सुटका होणार असेल तर ...
ते 4 - 8 दिवस ती मानसिक पीडा .. मग 4- 8 दिवस शांत व्हायला , निवळायला ... मग कुठे आहे पेनिंग ? पेन नाहीच कुठे .. बऱ्यापैकी शांत , खुश ... अर्धा महिना मरण आलं तर सुटेन आणि अर्धा महिना - झालं काय होतं मला ... थकून जायला होत होतं अगदी या fluctuation ने .. नक्की आपल्याला मरायचं आहे की जगायचं आहे हेच समजत नव्हतं .. कुठली इच्छा खरी ...
राधानिशा, तुझी आत्ताची पोस्ट
राधानिशा, तुझी आत्ताची पोस्ट वाचून जरा काळजी वाटली आणि माझे सल्ले उगीच दिले असंही वाटलं. अशाअर्थी की मी फार वरवरचा सल्ला दिला होता. Sorry for that.
वैद्यकीय मदत तर तू घेत असशीलच. त्याने तुला लवकर बरं वाटू दे. एका छान समृद्ध, आरोग्यपूर्ण आणि आनंदी आयुष्यासाठी तुला खूप सार्या शुभेच्छा!
'ग्रज' इज माय मिडल नेम. पण अ
'ग्रज' इज माय मिडल नेम. पण अॅस्ट्रॉलॉजिकली, माझ्या बाबतीत तरी, वृश्चिक स्टॅलिअम मुळे ते होते असे माझे मत आहे. बट एव्रीथिंग कम्स अॅज अ पार्ट & पार्सल. तेव्हा मला दु:ख, लाज, गुन्हेगार वगैरे काहीही वाटत नाही.
लोकंही फार 'दूध से धुले' नसतात. तेव्हा काही हरकत नसते जरा ग्रज धरण्यात.
बिनधास्त रहा. एका कानाने ऐका दुसर्याने सोडा.
धन्यवाद सगळ्यांनाच .. परत
धन्यवाद सगळ्यांनाच .. परत एकदा जज न करता समजून घेऊन प्रतिसाद दिलेत .. मन थोडं हलकं झालं .
आपण आपल्या पायाखालची जमीन
आपण आपल्या पायाखालची जमीन बघावी. फार पुढचा मागचा विचार करणं तुमच्यासाठी फार फार घातक आहे. अस्तित्वात नसलेले प्रॉब्लेम्स आपण विचार करकरून निर्माण करतोय असं तुम्हाला वाटत नाही का?
तुम्हाला फक्त येईल तो क्षण एन्जॉय करायची गरज आहे.
एक फुकट/ अनाहूत/ आगाऊ सल्ला : रिलेशनशिपमध्ये आहात का? बहुतेक तरी नसाव्यात कारण 25 वयात जे प्रेम वगैरे असतं ते भरपूर टाईम / इमोशनली कन्झ्युमिंग असतं पण हो त्यात पडाल तर वरवरच पडा! (नाहीतर रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती व्हायची).
वैद्यकीय मदत तर तू घेत असशीलच
वैद्यकीय मदत तर तू घेत असशीलच. त्याने तुला लवकर बरं वाटू दे. एका छान समृद्ध, आरोग्यपूर्ण आणि आनंदी आयुष्यासाठी तुला खूप सार्या शुभेच्छा! >> +१००
विशीत सामान्यपणे अनेक ध्येय दिसत असतात उदा: व्यवसाय्/नोकरी, लग्न्/जोडीदार, प्रवास इ. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रीत असले की भावाने पुस्तके नेली काय नि आणली काय काही फरक पडत नाही. सध्या ध्येय काय आहेत? अगदी नोकरी इ नाही पण पुढ्च्या ४ दिवसात काय साध्य करायचे आहे?
तुम्हाला 'इनर इंजिनिअरिंग' चा
तुम्हाला 'इनर इंजिनिअरिंग' चा कोर्स करायला जमेल का? सध्या ऑन्लाइन शिकवतात.
आजूबाजूच्या लोकांना उत्तम अनुभव आहे. सुरूवातीला रोज ४० मि. (सकाळी २० आणि संध्याकाळी २०) आणि नंतर २० मिनिटं द्यावी लागतील.
वर सगळ्यांनी सांगितलं आहेच , जास्त विचार करू नका. समजा आला खूप राग , पश्चाताप झाला आणिनंतर माफी मागायची लाज वाटत असेल तर बिनधास्त इथे येउन लिहा, मनात ठेउ नका उगाच.
Radhanisha,
Radhanisha,
मी कुठल्याही कोतबो वर सल्ला देत नाही. कारण काही जणांना लिहून पूर्णपणे व्यक्त होता येत नाही मगं ते वरवरचे वाचून काही चुकीचे सांगण्यात येऊ नये म्हणून.
पण एक साधी विनंती , तू अजिबात इमच्युअर नाहीस. तसे सारखे स्वतःला सांगून कमी लेखू नकोस. शिवाय तुझ्या सारखे या भूतलावर कोणी नाही हे लक्षात ठेव. You are unique in your own way. You are still finding your way to cope up with the stress which is a lifelong process. माझी भाची तुझ्याएवढी आहे, त्यामुळे तुझी पोस्ट वाचून तळमळायला झाले. तू स्वतःच्या भावनांचे अवलोकन करू शकतेस हे खूप मोठे प्रिविलेज समज. You are being honest with your emotions. तू तुझ्या doctor ला विचारून ध्यान सुरू करू शकतेस का , म्हणजे याच भावनांकडे तुला थोडे तटस्थपणे पहाता येईल. कारण तुझ्या नकारात्मक भावना म्हणजे तू नाहीस. त्याच्यातन बाहेर येता येईल का बघं कारण हा pattern असतो you have to train your brain to come out of it. Believe me it is possible to some extent with regular meditation. मलाच का असा विचार करू नकोस , I can handle it, I have been handling it, I will be fine असे म्हणत रहा.
तुला अहो जाहो केले नाही कारण लहान आहेस आणि मला मोकळेपणाने बोलता यावे म्हणून, तुला शुभेच्छा. मला कधीही बोलावे वाटले तर विपू कर. Please go see your therapist until you are all better and make a plan. नकारात्मक भावना येतात पण त्यातनं बाहेर येता आलं पाहिजे, तुला सकारात्मक रहाता येत नसेल तर न्युट्रल रहा (मी तसेच करते कधी कधी). तुला खूप शुभेच्छा आणि hugs !!
सल्ला पटला नसेल , किंवा राग आला/दुखावले असेल तर क्षमस्व.
एकतर्फी प्रेम ( डोंबलाचं
एकतर्फी प्रेम ( डोंबलाचं प्रेम ) , ते व्यक्त करणं , नकार मिळणं आणि तो पचवता न आल्याने वर्ष - दोन वर्ष जीवाची तडफड करून घेणे ही माती 7 - 8 वर्षांपूर्वीच खाऊन झाली आहे ... त्या वाटेला जाण्याची घोडचूक परत झालेली नाही . आपल्याला रिजेक्शन सहन होण्यासारखं नाही , नको त्या वाटेला जाच कशाला .. अर्थात डिप्रेशनचं हे कारण नव्हतं .
सध्यातरी सुशिक्षित बेकार आहे .. नोकरी शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही .. सोशल anxiety ने घरात बसवलं आहे .. एकेक प्रॉब्लेम जसजसा सुटत जाईल तसा पुढचा विचार ... इतके दिवस पुढचा काही विचार करण्याएवढी मनाची शक्तीच नव्हती .. आताही पुढचा फार विचार नाही .. हळूहळू स्टेबल होते आहे ती पूर्ण झाले की पुढचा विचार ...
मी अस्मिता , राग कसला ..
मी अस्मिता , राग कसला .. थँक्स खरंच ... ध्यान करण्याचा प्रयत्न केला आहे , सातत्य नाही .. शिवाय मुळात जे केलं ते ध्यान होतं का / ध्यान लागलं का हे समजत नाही .. पण शांत आणि छान वाटतं ते केल्यावर .. 2 - 4 दिवसातून एकदा करते , रोज करायला पाहिजे समजतं पण आळशीपणा होतो आहे ... सध्या बीके शिवानी , मूजी आणि आणखी काही लोकांचे व्हिडीओ पाहत आहे युट्युब वर आणि जमेल तेवढं फॉलो करण्याचा , स्वभावात - विचारात - दृष्टिकोनात फरक पाडण्याचा प्रयत्न करते .
मनाची शक्ती नक्की परत येइल.
मनाची शक्ती नक्की परत येइल. तुम्ही यातून बाहेर पडालच. झोप - खाण्याच्या / औषधे असतील तर औषधांच्या वेळा - माफक व्यायाम आदि परफेक्ट म्हणजे परफेक्ट सांभाळा.
अजुन एक जॉब मिळत नसेल तरी स्वतःवर शिक्का मारु नका. सध्या मार्केटच डाउन आहे.
सोशल अँग्झायटी मला वाटतं पी टी एस डी मुळेही होते. निदान मला होती. तेव्हा इट विल टेक टाइम, स्वतःला फोर्स करु नका. ती अँग्झायटी नक्की जाईल.
श्रद्धा और सबुरी!!
हो .. ती जाईल असं आताच वाटू
हो .. ती जाईल असं आताच वाटू लागलं आहे .. यापूर्वी तेवढंही वाटत नव्हतं .. सध्या जी डिग्री आहे तिला नोकरीच्या दृष्टीने काडीची किंमत नाही .. त्यावेळी तर फार वाईट मनस्थिती होती , अभ्यासात अजिबात रस नव्हता .. कशीबशी पास झाले .. डिग्रीच्या जोरावर नाही पण एकतरी किमान काम या जगात असेल जे मला चांगलं जमण्यासारखं असेल असं वाटतं .. अजून ते सापडलेलं नाही .. हे जमणार नाही , ते जमणार नाही असं वाटल्यामुळे कॉन्फिडन्स रसातळाला गेला आहे ... बघू आता , भविष्यात एकतरी गोष्ट अशी सापडेल जी मला जमण्यासारखी असेल आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करेल अशी आशा आहे .
शिवाय मुळात जे केलं ते ध्यान
शिवाय मुळात जे केलं ते ध्यान होतं का / ध्यान लागलं का हे समजत नाही .. पण शांत आणि छान वाटतं ते केल्यावर ..>>>>>>>
याचा विचार करायची गरज नाही , तुझ्यातल्या 'त्या'च्या अंशाला माहिती आहे काय करायचे... विश्वास ठेव, (it will be involuntarily customized to your own emotional needs ) ते तुला बरोबर मार्गदर्शन करेल. मी आवड निर्माण कर सुद्धा म्हणणार नाही कारण त्यातही एक प्रकारची नकारात्मक आज्ञा जाणवते. फक्त ध्यानाला बसं एवढेच म्हणेन !!
पुरे करते नाहीतर ध्यानाविषयी कितीही लिहीत बसेल मी Take care.
थँक यू .. सातत्य आणते आता
थँक यू .. सातत्य आणते आता ध्यानात ..
ध्यान वगैरे करा पण घराबाहेर
ध्यान वगैरे करा पण घराबाहेर पडा... तेच तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्स चे सोल्युशन आहे...
एखादा कोर्स करा ज्यामुळे जॉब मिळायला मदत होईल...खाली दिमाग शैतान का घर... डिग्री बेस वर बऱ्याच स्पर्धा परीक्षा देता येतात.. त्या ट्राय करा...
आपलं शत्रू आपलंच मन असतं जे
आपलं शत्रू आपलंच मन असतं जे सतत निगेटीव्ह गोष्टी आपल्या निदर्शनास आणुन देत असतं .या मनाला शांत करणं अशक्य असतं .प्रयत्न करुन बघा ध्यानधारणा,औषधे ,काउंसलींग, योगा ई कशानेही ते शांत होणार नाही.
आपल्या आयुष्याचा गोषवारा म्हणजे या मनाशी आपले चाललेले अखंड युद्ध जे मृत्यूच्यावेळीच संपतं.
तुमचा स्वभाव बदलेल असे जे वर सांगितले आहे त्यात मला फारसे तथ्य वाटत नाही.मी स्वतः अनेकदा माझा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करुन थकलो आहे.स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतंत्र रहा व शांततेचा अनुभव घ्या.स्वभावाला औषध नसते .
राग,गिल्ट,इर्षा,असुया,संताप ,पश्चाताप याने माणुस exhaust होतो. यांना ,या निगेटिव्ह भावनांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात फारसे काही हासिल नाही .
स्पर्धापरीक्षा नको. बाकी सर्व
स्पर्धापरीक्षा नको. बाकी सर्व सल्ले अगदी बरोबर.
कोणत्याही स्पर्धापरिक्षेला अनिश्चता खूप असते.
स्पर्धापरीक्षा नको. बाकी सर्व
स्पर्धापरीक्षा नको. बाकी सर्व सल्ले अगदी बरोबर.
कोणत्याही स्पर्धापरिक्षेला अनिश्चता खूप असते.
Submitted by मोहिनी१२३ +11
radhanisha तुम्ही खूप विचार करून अपराधी वाटून घेऊ नका.
> Submitted by radhanisha on
> Submitted by radhanisha on 17 August, 2020 - 18:23 >
TSH, FT3, FT4, B12, D3, सोनोग्राफी,
तुमच्या फॅमिली डॉक्टरशी किंवा इथे Blackcat, कुमार१ यांच्याशी बोलून आवश्यक असतील त्या इतर टेस्ट
करून घे.
https://www.mayoclinic.org/diseases-conditions/premenstrual-syndrome/exp...
Pages