'हे काय कुठे निघालीस नटून थटून ?'
'वड पुजायला. आज वटसावित्री आहे ना. सासुबाई सकाळपासुन मागे लागल्यात. '
'आता आईला काय झाल? तिच आणि तुझ तर अजिबात जमत नाही.'
'तेच म्हणतेय मी. आत सात जन्म आपण नवरा बायको असणार आणि तुम्हालाही जन्मोजन्मी हीच आई हवी. मग काय सात जन्म हीच सासु असणार. म्हणुनच मला वटसावित्रीची पुजा करण्यात जराही रस नाही'
'खर सांगतेस. तू मला मोकळ करायला तयार आहेस. यमच पावला'
'मलासुध्दा'
'आता ऐक. मला त्या पलिकडल्या बिल्डिगमधली सई आवडते. ती वटसावित्रीची पूजा करतेय माझ्यासाठी.'
'हो का तुमच्या आईलाही तसलीच नटमोगरी सुन पाहिजे.'
प्रत्येक वट पौर्णिमेला मला
न चुकता फसलेला यम आठवतो
बायका किती वस्ताद असतात
मी मनात अधोरेखीत करतो
पुन्हा संसारात आणलेल्या
सत्यवानाची कीव करतो
भोग बाबा आता आपल्या
कर्माची फळ, मनात म्हणतो .
सात पावलात अडखळलेले
ते हजार संसार आठवतो
वडाचे तुकडे घेवून जाणाऱ्या,
सुत गुंडाळणाऱ्या बायकांना मानतो
जणू अट्टाहासाने स्वत:साठीच
केलेली जाहिरात मी पाहतो
किती केविलवाण्या असतात
काही प्रथा, का आपण पाळतो
वडाच्या झाडाचे
तुकडे करून
मग तयाला
भावे पुजून
तुमच्या त्याचे
आयुष्य अजून
देईल का तो
सांगा वाढवून
पूजा म्हणजे का
असते कापणे
देवावरीच त्या
शास्त्र ओपणे
मरण पतीचे
घेतात ओढून
करंट्या बायका
वडास तोडून
कसली हौस
सात जन्माची
बात जमेना
अजून आजची
सोंगा ढोंगात
दुनिया चालते
वडाला मरण
उगा ओढवते
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
( यम बोलला वडाला)
वटपौर्णिमेच्या भल्या सकाळी
बायकांच्या आधी यमच आलेला पाहून
वडाला विस्मय वाटला.
पानांची सळसळ करत बोलला यमाला
काय रे यमा, कलियुगात
सत्यवान शोधतो आहेस का सावित्री?
यम लाजत लाजत बोलला
मला वटसावित्रीचं व्रत बघायचं आहे.
वड त्राग्याने म्हणाला,
बाबारे, आजचा एकच दिवस माझ्या धंद्याचा
तू इथे बसलास तर बायका आणि भटजी
कशाला येतील इथे?
यम बोलला वडाला
पूजा तर बघेनच आणि
फांदीही दे एक मला.
वड खो खो हसत म्हणाला,
तू फांदी घेऊन करणार काय?
तुला नवरा म्हणून मागणारी आहे तरी कोण?
यम बोलला... मला नको रे,