प्रत्येक वट पौर्णिमेला

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 June, 2014 - 11:02

प्रत्येक वट पौर्णिमेला मला
न चुकता फसलेला यम आठवतो
बायका किती वस्ताद असतात
मी मनात अधोरेखीत करतो
पुन्हा संसारात आणलेल्या
सत्यवानाची कीव करतो
भोग बाबा आता आपल्या
कर्माची फळ, मनात म्हणतो .
सात पावलात अडखळलेले
ते हजार संसार आठवतो
वडाचे तुकडे घेवून जाणाऱ्या,
सुत गुंडाळणाऱ्या बायकांना मानतो
जणू अट्टाहासाने स्वत:साठीच
केलेली जाहिरात मी पाहतो
किती केविलवाण्या असतात
काही प्रथा, का आपण पाळतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users