( यम बोलला वडाला)

Submitted by जागोमोहनप्यारे on 15 June, 2011 - 05:49

( यम बोलला वडाला)

वटपौर्णिमेच्या भल्या सकाळी

बायकांच्या आधी यमच आलेला पाहून

वडाला विस्मय वाटला.

पानांची सळसळ करत बोलला यमाला

काय रे यमा, कलियुगात

सत्यवान शोधतो आहेस का सावित्री?

यम लाजत लाजत बोलला

मला वटसावित्रीचं व्रत बघायचं आहे.

वड त्राग्याने म्हणाला,

बाबारे, आजचा एकच दिवस माझ्या धंद्याचा

तू इथे बसलास तर बायका आणि भटजी

कशाला येतील इथे?

यम बोलला वडाला

पूजा तर बघेनच आणि

फांदीही दे एक मला.

वड खो खो हसत म्हणाला,

तू फांदी घेऊन करणार काय?

तुला नवरा म्हणून मागणारी आहे तरी कोण?

यम बोलला... मला नको रे,

जन्मोजन्मी हाच रेडा मिळावा म्हणून

माझ्या रेड्याच्या म्हशीचीपण आज वटपौर्णिमा आहे.

Happy

"जन्मोजन्मी हाच रेडा मिळावा म्हणून
माझ्या रेड्याच्या म्हशीचीपण आज वटपौर्णिमा आहे."

......... छान विनोदी संकल्पना ... आवडली

छान .. Happy

छान